|
Nilima_v
| |
| Friday, June 22, 2007 - 5:34 pm: |
| 
|
छत्रपति तुम्हाला मराठी शिकवणार्या बाई देखिल उत्क्रुष्ठ होत्या हे नक्कीच.
|
सगळ्यान्चेच अनुभव मस्तयेत आमच्या शाळेत एक इतिहासाचे सर होते.. ते धडा शिकवून झाला की म्हणत लिहा आता मुद्दे रोमन एक (म्हणजे मुद्दा क्र. १) , रोमन दोन.. त्याना आम्ही रोमन सम्राट म्हणत असू त्यामुळे जर कधी तोन्डी परिक्षेत रोमन सम्राट असा शब्द आला तर पोरे-पोरी हसू येऊ नये म्हणून प्रयत्नान्ची पराकष्ठा करत आणि उत्तरे देत..
|
Ekrasik
| |
| Monday, June 25, 2007 - 6:14 pm: |
| 
|
छत्रपती, फ़ार-एन्ड, (farend) मधल्या सुट्टित आम्ही पण पळुन जायचो, भिंती वरुन दप्तरे टाकुन. टण्णु चे झाड अजुनही आहे. आमच्याही बॅचला (८९ मध्ये बाहेर पडलेली) सौ. सोहोनी व सौ. रमा जोशी संस्कृत शिकवायच्या. दोघीही सुन्दर शिकवायच्या.
|
अरे वा , बरेच st.Vimali's public अहे कि सोहोनी बाई कसल्या विक्षिप्त होत्या , लाल केसां मुळे अजुन विक्षिप्त वाटयच्या , सारख्या डोकं खाजवायच्या ! त्यांचा आवाज पण typical स . पे . पुणेरी लोकांची नक्कल करावी असा नाकात होता . एकदा अगदी seriously नेहेमी प्रमाणे डोळे वटारून म्हणल्या म्हणे , भारतात लोक्संख्येवर आळा घालायचा असेल तर road dividers, traffic signals काढून टाका , भरपूर accidents होतील ! आणि ते पाचकुडवे सर आठवतात का कोणाला ..... मुलांना हका मारताना ' नालयकांनो ' म्हणून संबोधायचे .. त्यांचे typical शब्द म्हणजे ' वर्तणात परीवर्तण , सुजान पालकत्त्व ' कसले भारी होते !! 
|
Farend
| |
| Tuesday, June 26, 2007 - 12:06 am: |
| 
|
दीपाली तुझी बॅच कोणती? आमच्या वेळी सोहोनी बाई खूप छान (आम्हाला मराठी) शिकवायच्या. नंतर विक्षिप्त झालेल्या दिसतायत. आम्हाला कॉलेज मधे microprocessor शिकवायला एक सर होते, नाव लक्षात नाही पण दिसायला साधारण Danny DeVito सारखे. आम्ही त्यांचे लेक्चर म्हणजे " microprocessor by microprofessor " म्हणायचो
|
सोहोनीबाईंच्या डोक्यात प्रचंड कोंडा झालेला होता. त्यांना बहुतेक कसलातरी त्वचेचा आजार असावा. त्यामुळे शिकवताना त्या प्रचंड डोके खाजवायच्या (इथे ’डोके खायच्या’ म्हणायचा मोह टळला नाही). इतकेच नाही, तर गडद रंगाची साडी घालून त्या जेव्हा शिकवायच्या तेव्हा डोके खाजवून खाजवून त्या साडीवर डोक्यातला कोंडा पडलेला शेवटच्या बाकावरून देखील दिसायचा. आमच्या वर्गातली मुले त्याला ’हिमवर्षाव’ असे म्हणत असत. केसांना बऱ्याचवेळा त्या मेंदी लावायच्या, त्यामुळे त्यांच्या पिकलेल्या पांढऱ्या केसांची मुळे तांबूस व्हायची. त्यात अजून एका रंगाची भर म्हणजे लावलेला कलप. म्हणजे अगदी मुळाशी नवीन वाढलेल्या केसांचा पांढरा रंग, त्याच्यावर मेंदी लावल्यामुळे दिसणारा तांबूस रंग आणि त्याच्यापुढे कलप लावल्यामुळे दिसणारा काळा रंग, या रंगसंगतीला आमच्या वर्गातली इरसाल मुले ’तिरंगी झेंडा’ म्हणायची. एखाद्या शब्दाची विभक्ती आठवताना त्या डोके खाजवायला सुरूवात करायच्या आणि शेवटी शब्दाची विभक्ती आठवली, की एकदम "शोभनं भाषितं सुभाषितम्" असे चिरक्या स्वरात ओरडून केसांच्या मुळाशी साठलेला कोंडा नखाच्या खोबणीतून खोदून काढायच्या ! हे किळसवाणे दृष्य रोज पाहून आम्हाला त्याची किळस वाटेनाशी झाली होती. आज मात्र त्या आठवणीने पुन्हा एकदा किळस आली. वर्गातली मुले देखील या गोष्टीचे अनुकरण करत एकमेकाला डोके खाजवत शब्दांच्या विभक्ती सांगायचे, आणि शेवटी उत्तरावर जोर देऊन डोक्यातून कोंडा खणून काढल्याची नक्कल करायचे. सोहोनीबाईंच्या शिकवण्याच्या पध्दतीमध्ये खडूचा वापर अत्यंत कमी होता. नववी आणि दहावीच्या दोन्ही वर्षात निदान संस्कृत शिकवतानातरी त्यांनी कधीही हातात खडू घेतलेला मला आठवत नाही. पुस्तकातले वाक्य वाचून त्यातल्या महत्त्वाच्या शब्दाच्या विभक्ती सांगणे, म्हणजे खरेतर मुलांनाच त्या विचारणे, अशी त्यांची शिकवण्याची पध्दत होती. आमच्या वर्गात दोन मुले होती ज्यांचा संस्कृतचा दांडगा अभ्यास होता. दहावीच्या विद्यार्थ्याला जितकी गरज असते, त्याच्या दहापटीने जास्त त्यांचा संस्कृतचा व्यासंग होता. या सोयीमुळे अडीअडचणीच्या वेळी सोहोनीबाईंना मदत होत असे.
|
Zelam
| |
| Tuesday, June 26, 2007 - 2:09 am: |
| 
|
छत्रपती - त्या दोन मुलांपैकी एक तुम्हीच नव्हतात ना? त्यामुळेच बरंच निरीक्षण करायला वेळ मिळाला असेल.
|
नाही, त्या दोनही मुलांमधला मी एक नवतो, म्हणूनच निरीक्षण करायला इतका वेळ मिळाला
|
पाचकुडवे सर आजुन एक संबोधन कायम वापरत 'जहागिरदाराची अवलाद' "जहागिरदाराची अवलाद! चल सरळ उभा रहा ...."
|
Ekrasik
| |
| Wednesday, June 27, 2007 - 6:38 pm: |
| 
|
श्री. गाडगीळ सरांची एक सवय म्हणजे वर्गात आल्या आल्या कुणाला तरी मारायचे. माझा भाउ त्यांचे नेहमीचे target होता. वर्ष भर त्याने विनाकारण मार खाल्ला. म्हणजे वर्गात आले की " हं काय xxx " अस म्हणुन पाठीत एक गुद्दा. आणि केस धरुन गदागदा हलवायचे.
|
Disha013
| |
| Wednesday, June 27, 2007 - 7:34 pm: |
| 
|
छत्रपती,मस्त लिहिलयं. आम्हाला शाळेत एक सर होते. हिंदी शिकवायचे. जास्तीत जास्त १० मि. शिकवायचे नि एखादा धडा काढुन विद्यार्थांना वाचायला लावायचे. पहिल्या बाकापासुन सुरुवात. मॉनिटरने लक्ष ठेवायचे. नि सर मस्त डुलक्या काढायला सुरुवात करायचे! त्यांची मान कधी उजवीकडे तर कधी डावीकडे डुलायची नि आम्ही खुदुखुदु हसायचो.
|
पाचकुडवे नावाच्या मास्तरांना 'सर' म्हणणे म्हणजे त्यांना इतर शिक्षकांच्या रांगेत नेऊन बसवणे. बहुतेक लोक मान्य करतील की असे करणे इतर शिक्षकांचा अपमान करण्यासारखे आहे. पाचकुडवे 'जहागिरदार' हा शब्द 'जागिरदार' असा उच्चारायचे. कोणा एका मुख्याध्यापकाने पाचकुडवे मास्तरांना बदली शिक्षक म्हणून आमच्या वर्गाला एक महिना इतिहास शिकवायला नेमले होते. त्यातल्या एका तासाला, पन्हाळयाला सिद्दी जौहारने दिलेला वेढा आणि नंतरचे युद्ध, हा ऐतिहासिक प्रसंग खडूने फळ्यावर आकृती काढून या मास्तरांनी आम्हाला शिकवला. इतिहासाच्या पुस्तकातल्या वर्णनावरून मावळे आणि मुघल सैनिक यांची एकमेकात कशी चकमक झाली असेल याची स्वत:ची कल्पना या मास्तरांनी फळ्यावर आकृतीच्या स्वरूपात उतरवली होती. अमीबासारखी एक बेढब आकृती काढून 'हा पन्हाळगड आहे' हे त्यांनी आधी स्पष्ट केले. मग प्रत्येक सैनिकासाठी एक छोटे वर्तुळ काढून दाखवावले ! अशी वर्तुळे काढत काढत सुमारे पंधरा ते वीस सैनिक पाचकुडव्यांनी पन्हाळगडाजवळ उभे केले. नंतर सैनिकांनी गडाला वेढा कसा दिला, कोण कुठे टपून बसले होते, किल्ल्यावर जाणारा आडवळणाचा अवघड रस्ता; वगैरे, याचे वर्णन हातात खडू घेवून त्यांनी त्याचे फळ्यावर रेखाटान करायला सुरूवात केली. फळ्यावर ठिपके काढून अगदी पडणाऱ्या पावसाची नोंद सु़द्धा त्यांनी त्या आकृतीत केली होती. 'रात्रीची वेळ' या गोष्टीचे चित्र काढून दाखवणे शक्यच नवते, नाहीतर ती देखील आम्हाला फळ्यावर पाहून अनुभवायला मिळाली असती. सैनिकांची हालचाल झाली हे दाखवण्यासाठी, आधी काढलेल्या छोट्या वर्तुळापासून रेघ मारून पुढे दुसरे एक छोटे वर्तुळ ते काढायचे आणि ते दुसरे वर्तुळ तिथेच परत परत गिरवायचे. असे करत करत पाचकुडवे मास्तरांनी सगळे मावळे आणि सगळे सैनिक पन्हाळ्याच्या पायथ्याशी युद्धासाठी तैनात केले. खडूनेच चित्र काढून गडावर चार पाच तोफा आणून ठेवल्या. इतके झाल्यावर शिवाजीमहाराजांच्या सुटकेची आकृती म्हणून गडाच्या मध्यभागावरून त्यांनी एक रेघ मारायला सुरू केली आणि ती काढत काढत थेट उजव्या बाजूला फळा जिथे संपतो तिथेपर्यंत नेऊन टेकवली, तिथे एक छोटे वर्तुळ काढून ते दोन तीन वेळा गिरवले. ही होती शिवाजी महाराजांची वर्तुळांच्या गर्दीतून झालेली सुटका ! सर्वात शेवटी हातातले पुस्तक त्यांनी टेबलवर ठेवले आणि दुसऱ्या हातात सुद्धा एक खडू घेतला. तास संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना दोन हातात दोन खडू घेवून सगळी छोटी वर्तुळे जोडणारे एक मोठे वर्तुळ सुमारे मिनिटभर दातओठ खात जोरजोरात गिरवले, आणि हे 'युद्ध' कसे त्वेषाने झाले हे त्यांनी मुलांना दाखवून दिले ! या युद्धानंतर आमच्या वर्गातला फळा बघण्यालायक झाला होता. इथे नेमके काय शिकवले गेले असावे, याचे आकलन करणे कोणालाही शक्य झाले नसते.
|
Mepunekar
| |
| Thursday, June 28, 2007 - 12:14 am: |
| 
|
Chhatrpati ह. ह. पु. वा. ) सही वर्णन केलय. मी office मधे वाचायला नको होत हे
|
Arch
| |
| Thursday, June 28, 2007 - 1:10 am: |
| 
|
पण काही झाल तरी शिक्षकांना अरे जारेने संबोधणं पटल नाही. 
|
Farend
| |
| Thursday, June 28, 2007 - 2:41 am: |
| 
|
छत्रपती, 'रात्रीची वेळ' LOL पाचकुडवे सर नाव नक्की ऐकले आहे, पण चेहरा समोर येत नाही. Arch आम्ही तर एकदा एका सरांसमोर दुसर्याचा उल्लेख 'तो तास (नाव)चा असतो' असा केला होता, आणि जाम झापून घेतले होते
|
>> इथे नेमके काय शिकवले गेले असावे, याचे आकलन करणे कोणालाही शक्य झाले नसते. छत्रपती
|
Bsk
| |
| Thursday, June 28, 2007 - 5:45 am: |
| 
|
>> इथे नेमके काय शिकवले गेले असावे, याचे आकलन करणे कोणालाही शक्य झाले नसते.
 खूप सही वर्णन!!! पाचकुडवे सर शिकवायला कधीच नव्हते. पण भावाकडून खूप ऐकलय! त्यांचा तो चेहरा, पांढरे कपडे आठवले! असाच इतिहास आम्हाला 'अनुकुल' मॅडम शिकवायच्या! अनुराधा कुलकर्णी ना त्यांच नाव? अगदी पुस्तकात युद्ध सुरु झाले की बाई इथे तलवार उपसायचा अभिनय करायच्या! मी दुर्दैवाने पहील्या बाकावर बसायचे! :D (अनुकुल बाईंचा एक किस्सा आठवला... कुठल्या तरी बाईंच कौतुक त्या करत होत्या.. किती त्या कायम फ़्रेश असतात वगैरे.. त्या म्हणाल्या.. " एकदम over-green बाई" !! ) गाडगीळ सरांबद्दल काय बोलायचं! खरच मारकुटे आणि तोंडाळ होते ते! काही वर्षांपुर्वी एक केस झालेली त्यांच्यावर... गाडगीळ सरांचे बोलणे आणि अपमान सहन न होऊन एका मुलानी आत्महत्येचा प्रयत्न केला होता(की खरच आत्महत्या? आठवत नाही..) पण त्यांच्याइतके शिस्तीचे शिक्षक कुठेच पाहीले नाहीत ! विशेषतः गणपती मिरवणूकीच्या पुढे वाजवणार्या बॅंड पथकासाठी ते खूप मेहनत घ्यायचे! ( आणि आमचे हाल व्हायचे!) (एकदा रविवारी बॅंडच्या प्रॅक्टीसला गाडगीळ सर, त्यांचा तो नेहेमीचा धोतर सदरा न घालता, चक्क जिन्स आणि टी शर्ट घालून आले होते!!!! )
|
Farend
| |
| Thursday, June 28, 2007 - 6:22 am: |
| 
|
गाडगीळ आमच्या वेळेला बरे होते. शिकवताना विनोद वगैरे करायचे (६ वीला गणित शिकवायचे आम्हाला. शिकवायचे चांगले). दिंडी ला ही बहुतेक तेच होते (मी दोन वर्षे होतो दिंडीत, एकदा बहुधा जिलब्या मारूती आणि एकदा श्रीमंत दगडूशेठ... पहाटे पाच च्या सुमारास अलका टॉकीज चौकात उभ्या उभ्या डुलकी मारल्याचे आठवत आहे ). नीट आठवत नाही, पण त्या परिक्षेत पेपर ला पुरवणी लावयला पांढरे बहुधा खळ लावलेले वीतभर लांबीचे दोर्याचे तुकडे मिळायचे ते खोड्या करणार्या मुलांच्या डोक्यावर मुलींना हेअर बॅंड बांधतात तसे बांधायचे
|
गाडगीळ सर म्हणजे छोट्याश्या खोलीतलं शालेय भांडार आठवतं पहिल्यांदा आम्हाला शिकवायला कधीच नव्हते , ते मास पी . टी . ला " फ़ " तुकडी मधल्या मोठाल्या दिसणार्या मुलांना अंगठीने गुद्दे मारायचे , आणि पुढे उभे करायचे !
|
Yashwant
| |
| Thursday, June 28, 2007 - 10:16 am: |
| 
|
मला सा.ग.पवार सर होते. त्यानी आम्हा सर्वाना घरात भिन्तीवर एक वाक्य लिहुन ठेवायला सान्गीतले होते. "हे पण दिवस जातील". नेहेमी काहीतरी चान्गला उप्देश करायचे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|