|
Zelam
| |
| Thursday, June 28, 2007 - 5:40 pm: |
| 
|
छत्रपती - HHPV झाली अगदी. खुद्द तुमच्या सुटकेची गोष्ट कुणी दुसर्यानी शिकवलेली चालवूनच कशी घेतलीत तुम्ही छत्रपती? :-) BTW सिद्दी जोहर आदिलशाही सरदार होता ना? मुघल नाही.
|
Simm
| |
| Thursday, June 28, 2007 - 6:28 pm: |
| 
|
chhatrapati --omg-- that is so funny!
|
पुरवणीवरून आठवले. आमच्या शाळेत एक अतिशय "श्ट्रीक्ट्ट" सर होते. एकदमच कडक. (त्यामुळे पाठीमागे चेष्टेचा विषय बनलेले.) ते आम्हाला शिकवायला नव्हते पण परिक्षेत सुपर्व्हिजनला यायचे. एकदा भूगोल-अर्थशास्त्राचा पेपर होता. एका मुलाने भूगोलाचा पेपर झाल्यावर अर्थशास्त्राचा पेपर सुरू करण्यासाठी नवीन पुरवणी मागितली. तर सर म्हणाले की मला भूगोलाची उत्तरपत्रिका दाखव. हा घेऊन गेल्यावर सरांनी तो सगळा पेपर उलटून बघीतला आणि म्हणाले, "यात प्रत्येक उत्तरानंतर उरलेली जागा रिकामी सोडली आहेस त्यात आधी लिही. आणि मगच पुरवणी मागायला ये." तो मुलगा म्हणाला की, "सर पण हा भूगोलाचा पेपर आहे आणि मी अर्थाशास्त्राची उत्तरं त्यात लिहिल्यावर मिक्स होईल सगळं. मला नवीन पुरवणी पाहिजे." यावर सरांनी चक्क त्याच्या कानाखाली आवाज काढला आणि पुन्हा तेच सांगितले. बिचार्याने जागेवर येऊन त्याच उत्तपत्रिकेत अर्थशास्त्र लिहून मग दुसरी पुरवणी घेतली.
|
छत्रपती त्या लढाई मुळे मला माझ्या एका सरांची आठवन झाली. गांवडे सर. खर तर हा कवि माणुस. ईतिहास का शिकवायचा माहीत नाही. पण अफझलखाण शिवाजी भेट ह्या धड्यात एकाने विचारले की सर अफझलखान धिप्पाड, उंच म्हण्जे कीती हो? शिवाजी महाराज बुटके होते का? तर गुरुजी म्हनाले माझी उंची ५ फुट ८ ईंच समज मी शिवाजी. अन असे म्हणता म्हणता ते अचानक खुर्ची वर चढले व म्हणाले हे बघ हा अफझलखान अन तो ५ फुट ८ ईंचांचा शिवाजी. मग सर्वांच्या डोक्यात प्रकाश पडला की खान उंच होता. ते धिप्पाड त्यांनी काही करुन दाखविले नाही. आज लिहीतान लक्षात आले की ते त्यांना करुनही दाखविता आले नसते कारण सर कदाचित ३८ नंबर चा शर्ट घालत असावेत. हे पण दिवस जातील">>>>> माझ्या रुमी ने हा ही दिवस असाच गेला हे वाक्य रुमच्या दरवाज्यावर कोरुन ठेवले होते. त्याला काही केल्या नोकरी मिळत न्हवती म्हणुन निराश होऊन त्याने ते लिहीले होते. मग रोज रात्री झोपायचा आधी तंबाखु चा बार लावुन तो म्हणयचा केद्या " हा ही दिवस असाच गेला. " अन छता कडे बघत म्हणायचा साला उद्याचा दिवस बाकी आहे पण.
|
छत्रपती एकदम मस्त वर्णन तुम्ही फक्त एक दिवस पाचकुडवे सरांकडून इतिहास शिकलात मी इयत्ता ९ वी चा संपूर्ण इतिहास असाच शिकलोय आमच्या 'ड' तुकडी मध्ये त्यांचा उल्लेख कायम 'पाच्या' असा व्हायचा आणि गाडगीळ मास्तरांचा उल्लेख 'धोतर्या' असा व्हायचा. असे उल्लेख होत कारण हे शिक्षक विनाकारण त्रास देत. गाडगीळ सरांची अत्यंत आवडती शिक्षा म्हणजे - 'कोंबडा' - ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच कळेल की 'कोंबडा' काय प्रकार असतो. मी बराच अनुभव घेतलाय त्याचा. बर्याच वेळा ही शिक्षा विनाकारण असायची. आमच्या वर्गातल्या मुलांचा गाडगीळ मास्तरांवर प्रचंड राग होता; काही टवाळ मुलांनी त्यांना पोत्यात घालून मारायचा plan केला होता. कुणीतरी एक पोतं पण वर्गात आणून शेवटच्या बाकाखाली लपवून ठेवलं होतं असे बरेच plans आमच्या वर्गात शिजत असत. कुणितरी मासळी बाजारातून काही सडलेले मासे आणून मुख्याध्यापकांच्या खोलीच्या खिडकीवर टाकले होते
|
पाचकुडव्यांनी इतिहास शिकवला त्यामुळे कदाचित मला समजले नसेल की सिद्दी जौहर हा अदिलशाही सरदार होता, मुघल नाही. स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद ! बाकी इतिहासातले 'फंडे' जरा कमीच आहेत माझे. मुसलमान लोकांना मुघल म्हणतात अशीही माझी समजूत होती. लहानपणी 'सिद्दी जौहर'ला आम्ही वर्गातली मुले 'सिद्धी जौहर' म्हणायचो ! असो.
|
आमच्या वर्गातल्या मुलांचा गाडगीळ मास्तरांवर प्रचंड राग होता; काही टवाळ मुलांनी त्यांना पोत्यात घालून मारायचा plan केला होता. कुणीतरी एक पोतं पण वर्गात आणून शेवटच्या बाकाखाली लपवून ठेवलं होतं <<<मी तर असं ऐकलं होतं कि काही पोरांनी पाचकुडवे सरांना पण पोत्यात घालून बेदम मारलं आणि वाळलेल्या मुठा नदीच्या खड्ड्यात टाकून दिलं होतं ! Btw, कोणाला P.T. चे एक लंपट सर आठवतायेत का ? नाव लिहित नाही मी पण ज्यांना अनुभव आला असेल त्यांना लगेच कळेल मी कोणा बद्दल लिहिलय . मुलींना नक्कीच आठवत असतील , अतिशय वाईट नजर होती त्यांची , आमच्या वर्गातल्या मुलींनी त्यांची complaint केली होती , त्याच सुमारास त्यांच्या अनेक complaints मुख्याध्यापकां पर्यंत गेल्या होत्या आणि एका senior मुलीनी सरांच्या काना खाली वाजवली होती आणि ते पण मुख्य ध्यापकां समोर .... कारण सांगायची गरज नाही !
|
हे मी पण अनेकदा ऐकले होते ! पण पाचकुडव्यांना पोत्यात घालून मुठेच्या खड्ड्यात टाकण्याची दंतकथा आहे. पाचकुडव्यांनी एकदा PT च्या तासाला सर्व वर्गातल्या मुलांच्या देखत आणि इतर शिक्षकांच्या देखत एका विद्यार्थ्याला झापले होते, कारण त्यांच्यामते ही दंतकथा त्या मुलाने शाळाभर पसरवली होती !
|
Tiu
| |
| Friday, July 20, 2007 - 8:59 pm: |
| 
|
Engineering ला असतान्ना चन्द्रात्रे नावाचे एक सर होते...लेक्चर चालु होतान्ना चॉक चा एक डब्बा घेउन यायचे...बोर्ड वर डायग्राम्स काढ्तान्ना अर्धा चॉक सम्पवुन उरलेला अर्धा खाली फ़ेकायचे....आर्ध्या तासात सगळे चॉक्स सम्पायचे...आअणि मग खालि फ़ेकलेले चॉक्स उचलुन पुढ्चा अर्धा तास सम्पायचा! त्यांची अजुन एक सवय म्हणजे बोलतान्ना 'Ok' वापरणे! मुलांना ते काय शिकवतायत त्यापेक्षा Ok चा count मोजत बसण्यात जास्तं interest...एका लेक्चर मधे कमीत कमी १५० Ok!!!
|
आमचे जीवशास्त्राचे सर होते, ते तासाच्या शेवटी आज जे शिकवले ते थोडक्यात सांगायचे.... म्हणजे, today we learnt the types of epithelium- no one: Cuboidal epithelium, no two: Ciliated columnar epithelium, no three: Glandular epithelium.... .... असे. प्रत्येक point ला एक बोट वर करायचे. सुरुवात करंगळीपासून करायचे. आम्हाला जाम हसायला यायचे. दुसरे एक मराठीला सर होते, त्यांना कवितेला चाल लावा म्हणल्यावर म्हणायचे, "दुसर्या कुणाकडून तरी लावून घ्या. मी चालीचा माणूस नाही." (चालीचा असणे म्हणजे सरळमार्गी असणे.)
|
पु लं नी त्यांच्या एका मराठीच्या शिक्षकाची आठवण सांगीतली आहे. ती म्हणजे हे मास्तर सगळ्या कविता 'कळविण्यास अत्यंत खेद होतो की...' या एकाच चालीवर म्हणत असत....
|
Aaftaab
| |
| Tuesday, July 24, 2007 - 8:30 am: |
| 
|
वालचंद इन्जिनीयरिंग कॉलेज मध्ये गणितासाठी एक एकदम नवीन शिक्षक आले होते.. त्यांना एवढा मोठा class handle करायचा सराव नसावा.. पहिल्याच तासाला मागच्या बेंचकडून वेगवेगळे आवाज ऐकु येऊ लागले.. कुत्रे, मांजरी आणि अजून बरेच अनाकलनीय आवाज येऊ लागले.. नंतर तर पुढच्या बेंचेसमधूनही आवाज येऊ लागले. ते सर अगदी काकुळतीला आले होते.. शेवटी म्हणाले "तुम्ही जर गप्प बसला नाही तर मी शिपायाला बोलावून आणीन.." सगळ्या वर्गाची हसून हसून वाट लागली. शेवटी ते वर्ग अर्ध्यावरच सोडून गेले...
|
Aaftaab
| |
| Tuesday, July 24, 2007 - 8:39 am: |
| 
|
आमच्या शाळेत वेगवेगळ्या लकबी असलेले सर होते.. १. एक सर होते ते प्रत्येक वाक्यानंतर भिंतीकडे बघून हसायचे.. नंतर कळाले की त्यांना दातांचा काहीतरी त्रास होता. २. दुसरे सर नेहमी खडूचा हात शर्टाला लाऊन शर्ट अगदी मळकट करायचे.. त्यांच्या शर्टांची बटने नेहमी वरखाली असायची.. नेहमी 'तुम्हाला सांगतो' म्हणायचे. ३. तिसरे एक सर आगाऊ होते.. त्यांनी गुणसुत्रांचा धडा शिकवताना एका वर्गात (ज्या वर्गात एकच मुलगी होती टेक्निकलचा वर्ग होता) मुलीला म्हणाले.. "बाई तुम्ही जरा बाहेर जाऊन या.. आम्हाला मुलांशी जरा private बोलायचं आहे!" ४. आमच्या प्राथमिक शाळेत एक सर होते.. ते म्हणायचे "अरे जास्त कडेला जाऊ नकोस, सांडशील"
|
Zakki
| |
| Tuesday, July 24, 2007 - 2:56 pm: |
| 
|
शाळेतल्या शेवटच्या वर्षाला आमचे हिंदीचे सर, पुस्तकातला एक परिच्छेद वाचून मग म्हणायचे 'इसके माने क्या होता है ये मै बताता हूं!' नंतर सर्व काही मराठीत. इंजिनियरिंग कॉलेजातले गणिताचे सर, गणित सोडवून झाले की एक हात दुसर्या हाताच्या कोपराखाली आडवा धरून, उभा हात नाग डोलल्याप्रमाणे हलवायचे, नि म्हणायचे ' That is that, no harm' . गणित संपत आले की मुले हळू हळू, नागीन सिनेमातल्या गाण्या आधी जशी पुंगी वाजते, तसे गुणगुणू लागत.
|
Dakshina
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:10 am: |
| 
|
५वी ते ७वी ल ज्या बाई आम्हाला English शिकवायच्या त्या Mangoes चा उच्चार मँगोजिश असा करत. रसायनच्या बाई कायम लेमनची गोळी तोंडात ठेऊन शिकवायच्या आणि माझ्या तोंडाला जाम पाणी सुटायचं ८वी / ९वी च्या English च्या बाईंचा तास नेहमी जेवणाच्या सुट्टीनंतर असायचा. आणि मी पहील्या बाकावर, त्यामुळे 'भावे' सुपारीचा वास... तो पण मला खूप आवडायचा... एक गम्मत अठवली, नववीत असताना आम्हाला Leave vacancy वर एक तरूण शिक्षक गणित शिकवायला आले होते, त्यांचं आडनाव मला आता आठवत नाही. त्यांच्या, शाळेतल्या शेवटच्या दिवशी मुलींनी त्यांना नाना प्रश्नं विचारून अगदी हैराण करून सोडलं होतं. तुम्ही कोणत्या गावचे असं विचारलं तर बराच वेळ त्यांनी काही उत्तरच दिलं नाही.. शेवटी मुली ऐकेचनात. तेव्हा त्यानी ते एका कागदावर लिहीलं आणि एका मुलीला तो कागद दिला... तिने तो जोरात वाचला 'ऐतवडे बुद्रूक' त्यात खरंतर काही हसण्याजोगं नव्हतं पण ते नाव ऐकल्यावर मुली फिदीफिदी हसल्या होत्या, आणि ते सर भयंकर कानकोंडे झाले होते.
|
Vegayan
| |
| Friday, October 19, 2007 - 7:50 am: |
| 
|
amache ek sir : jar por iekat nasatil tar mhanayache ' Mi kay rikshawala ahe ka ?' ani kadhi kadhi konala jar uttar deta ala nahi tar 'Bashit Pani Ghe Un Dubun Mar.' !! mhanayache
|
Vegayan
| |
| Friday, October 19, 2007 - 7:53 am: |
| 
|
aamachya ek madam english far bore shikavayachya ... tya shikvatana madhun madhun mhanayachya 'u fellow' ami sagale halu awajat mhanayacho 'kay buffelo'
|
Gsumit
| |
| Friday, October 19, 2007 - 2:41 pm: |
| 
|
आम्हाला इंजिनीयरिंगला असतानी गणित शिकवायला एक सर होते. खुप तल्लीन व्हायचे शिकवतानी, म्हणजे, त्रिमितित वस्तु दाखवायची असेल तर डेस्कवरुन उतरुन कोपर्यात जायचे अन म्हणायचे, हा सेंटर आणी भिंतीन्ना अन जमीनीला प्रतलं करायचे... आता हवेतला object दाखवतानी खरी मज्जा, हवेत उडी मारायचे अन म्हणायचे समजा मी पडलोच नाही तर मी जिथे असेल तिथे आहे आपला object त्यान्ना एक विचित्र सवय होती, वर्गात गोंधळ झाला की, शेवटच्या ओळीतल्या पोरान्ना हाकलुन द्यायचे, गोंधळ कुणी का करेना...
|
Tiu
| |
| Friday, October 19, 2007 - 8:36 pm: |
| 
|
मग शेवटच्या ओळीत बसण्यावरुन मुलांमधे भांडणं होत असतील, नाही?
|
Gsumit
| |
| Saturday, October 20, 2007 - 4:51 am: |
| 
|
पण प्रेझेंटी तासाच्या शेवटी व्हायची ना... त्याच्यामुळं मागे बसणार्यांचा जीव टांगणीला, कुणी काही गडबड केली तरी ते बिचारे बाहेर...
|
Hkumar
| |
| Monday, October 22, 2007 - 10:09 am: |
| 
|
मेडिकल काॅलेजमध्ये आम्हाला legal medicine या विषयाला एक सर होते. त्यांनी पहिल्या तासाला विचारले,''वर्गात कोणाकोणाला मराठी येत नाही?''. जेमतेम ४ हात वर आले ( गेले ते दिन! आता नीट मराठी येणारे ४ जण निघतील). त्यावर ते म्हणाले,'' मग माझी lectures तुमच्यासाठी नाहीत!'' त्यांनी चक्क मराठीत सर्व तास घेतले. आधीच हा विषय खूप मनोरंजक. त्यामुळे त्यांच्या मराठीतून शिकवण्यामुळे मजा आली खरी.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|