|
Dakshina
| |
| Tuesday, June 19, 2007 - 7:47 am: |
| 
|
मी पण त्याच सरांकडे २ / ३ वर्षं गणित शिकले. मुलांना ते 'कुतरड्या' म्हणत असले तरीही, ते ऐकताना कधीच त्यातून 'शीवी' चा feel यायचा नाही.
|
Cool
| |
| Tuesday, June 19, 2007 - 10:59 am: |
| 
|
आज उतनी भी नही बची हमारे पैमाने मे, जितनी कभी छोड दिया करते थे मैखाने मे । आमचे फिजिक्स चे सर एकदा वर्गात हा शेर म्हणाले होते. नेहमी खडू हवे तेवढे उपलब्ध असताना ऐनवेळी, एकही खडू गवसला नाही म्हणून त्यांनी हा शेर म्हणून दाखवला होता. फारच मजेशीर व्यक्तिमत्त्व !!, शुक्रवारी लेक्चर संपत असतानाच न बोलता फळ्यावर काहीतरी खरडून निघून जायचे, ते गेल्यावर कळायचे की आज रात्री दूरदर्शन वर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे नाव, त्यातील कलाकारांचे नावे असे सगळे लिहिलेले असायचे फळ्यावर. त्यांचा विषय फिजिक्स असला तरी त्यांना शेती आणि बागकामात विशेष रस होता, त्यामुळे बाजारच्या दिवशी ते नियमीतपणे बाजारात दिसत काहीतरी विकताना. सर्व चुकार मुलेही त्यांच्या लेक्चरला आवर्जून हजर असायची, त्यांच्या या विशिष्ट पद्धतीमुळे. त्यांच्याच प्रमाणे आमच्या प्राथमिक शाळेतील एका सरांची एक विशिष्ट सवय होती, ती म्हणजे मारताना हातातील घड्याळ काढायची. म्हणजे तसे ते काही फार मुलांना मारत नसत, क्वचितच, पण जेव्हा कधी मारायचे तेव्हा हातातील घड्याळ खिशात ठेवूनच. त्यांची ही सवय सर्वांना एवढी परिचित होती, की नंतर नंतर त्यांनी फक्त घड्याळाला हात लावला की मुले शांत होत असत. असे अनेक शिक्षक अनेक सवयी, त्या सोबत येणाऱ्या कडू गोड (म्हणजे त्या त्या वेळी कितीही कडू वाटल्या असल्या तरी आता गोड वाटणाऱ्या) आठवणी, सरकून गेल्या नजरेसमोरून.
|
Ravisha
| |
| Tuesday, June 19, 2007 - 4:26 pm: |
| 
|
अरे काय मस्त आठवणी आहेत सगळ्यांच्या...स्वाती,तुझा किस्सा तर भन्नाट
|
Arch
| |
| Tuesday, June 19, 2007 - 4:43 pm: |
| 
|
Cool तुझे Physics चे Prof खरच cool होते. 
|
Pancha
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:23 am: |
| 
|
आज चिल्ड्रेन ऑफ हेवन हा चित्रपट पाहुन मला शाळेतले एक क्रुर शिक्षक आठवले, ते मुलांना १ मिनिट उशिर झाला तरी छड्या मारायचे. का तर म्हणे शिस्त. !!! आता ते आठविले कि एवढी चिड येते एकदा मला स्लिपर घालुन आलो म्हनुण मारले होते. आणि हे एका प्रतिष्ठित शाळेत! स्लिपर नाइलाज म्हणुन घालावी लागली होती बुट फ़ाटले होते आणी नविन बुटा साठी महिनाअखेरी पर्यंत वाट पहावी लागणार होती
|
Sandy_102
| |
| Wednesday, June 20, 2007 - 7:37 am: |
| 
|
mi 8th stad marathi medium madhe astana aamche ek history che sir sarkhe pramukhane ase kup vela bolayache aami ekda tharvile ki lecture la kiti vela bolayache te bench var khadu ne lihiache mi te kam ghetle hote mi evdi bussy hote te lihinyat teva sira ni mala uthavili ani vicharle ki mi aata kai shikavale te sang mi utbhi rahile pan mala kai mahit te kai shikavat hote mala tyani shikha keli class chya baher ja mi geli mitrini la sangitale conti kar nanter class sampla teva kale ki 47 time pramukhyane manale hote
|
... दाते बाई ... इयत्ता आठवी ते दहावी आमचा वर्ग तोच होता, म्हणजे “सगळी मुले तीच” या अर्थी ! या तीनही वर्षी आम्हाला इंग्रजी शिकवायला एक शिक्षिका होत्या : ’दाते बाई’. साधारण पन्नाशीला आलेल्या, स्वभावाने अतिशय प्रेमळ, कधी कोणावर रागावून न बोलणाऱ्या या बाई अगदी मनापासून इंग्रजी शिकवायच्या आणि खरोखर, त्यांचे इंग्रजी अतिशय चांगले होते. पहिल्या तीन रांगांमध्ये बसलेली मुले सोडली, तर इतर पूर्ण वर्ग त्यांच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायचा, हे सांगायला नकोच. एका हातात इंग्रजीचे पुस्तक आणि दुसऱ्या हातात खडू आणि डस्टर घेऊन, वाक्यामध्ये आलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या इंग्रजी शब्दाचे मराठीत भाषांतर आणि त्याचे व्याकरण त्या फळ्यावर लिहायच्या. वाक्याचा अर्थ न बदलता तेच वाक्य इतर कोणकोणत्या प्रकारे लिहिता येऊ शकते हे देखील सांगायच्या. शिकवताना बहुतेक सगळ्या वाक्यांचा कीस काढून, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, ऍक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस, ऍसर्टीव्ह, निगेटीव्ह, मेन आणि सबॉर्डीनेट क्लॉझ हे सगळे सगळे त्या प्रत्येक वाक्यासाठी शिकवायच्या. म्हणजे थोडक्यात, एखाद्या मुलाने गांभीर्याने शिकायचे असेच जर ठरवले असते, तर प्रत्येक इंग्रजीच्या तासाला त्याच्या ज्ञानकोशात अनमोल भर पडली असती. पण अशाप्रकारचे चांगले शिक्षण आमच्या शाळेतल्या आठवी ते दहावीच्या वर्गांना विशेष रुचकर वाटायचे नाही. गाईड, स्वत: केलेला अभ्यास, मित्रांबरोबर सोडवलेल्या प्रश्नपत्रिका, आई-बाबांनी दिलेले इंग्रजीचे ’फंडे’, जास्त पैसे भरून लावलेली खाजगी शिकवणी; वगैरे मार्गांनी इंग्रजीचा अभ्यास उत्तम होतो असा त्यांचा (आमचा) ठाम विश्वास होता. बिचाऱ्या दाते बाई मात्र “सगळी मुले शिकवण्या लावू शकत नाहीत” या तत्त्वाने, मनापासून आणि घसा फोडून इंग्रजी शिकवत असत. मलाही पक्के आठवतेय, फक्त दोन तीन वेळाच मी त्यांच्या तासाला लक्ष दिले आणि माझ्या ज्ञानात प्रचंड भर पडली, शिकवण्याची पध्दतच उत्तम होती ना ! तर अशा या अतिशय मनमिळाऊ, शिक्षा न करणाऱ्या आणि आमच्या टपोरी वर्गाच्या दृष्टीने ’निरुपद्रवी’ दाते बाई, आमच्या वर्गाला तीन वर्षे इंग्रजी शिकवायच्या. कारण आमची ’अ’ तुकडी ही हुशार मुलांची तुकडी समजली जायची ! पण खरे सांगायचे तर आमच्या वर्गात हुशारपेक्षा खोडकर आणि टपोरी मुलेच जास्त होती. वर्गातल्या इतर मुलांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे पडताळून पाहण्यासाठी आणि बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असलेली हजेरी लावण्यासाठी ही जनता शाळेत येत असे. पण सांगायचा मुद्दा असा की या दाते बाईंची एक खूप लाडकी सवय होती, त्या वर्गात शिकवताना आणि नुसते बोलतानाही, ’या ठिकाणी’ व ’त्या ठिकाणी’ असा शब्दप्रयोग आवश्यकतेपेक्षा फार जास्त करायच्या. आता मी म्हणतो, असते एकेकाला सवय. इंग्रजी भाषा मराठीमधून शिकवायला जर एखाद्याने ’त्या ठिकाणी’ किंवा ’या ठिकाणी’ असा शब्दप्रयोग खूप जास्त केला, तर मी म्हणतो, काय बिघडले इतके ? आपल्याला इंग्रजी शिकायचे आहे, मराठी थोडेचे शिकायचेय ? इंग्रजी तर उत्तम प्रकारे शिकायला मिळतेय ना ? मग त्यांच्या या व्यक्तिगत लकबींकडे करायचे दुर्लक्ष. उदाहरणार्थ : दातेबाई म्हणायच्या ’या ठिकाणी वाक्याचा voice हा active आहे. त्या ठिकाणी तो जर बदलायचा असेल तर … अमुक तमूक … हे वाक्य होईल, त्या ठिकाणी. म्हणजे सजमलंय का त्या ठिकाणी ?’ किंवा ’या ठिकाणी हे वाक्य नकारात्मक आहे, पण त्या ठिकाणी ते सकारात्मक करण्यासाठी हा शब्द वापरला तर ते सकारात्मक होईल, त्या ठिकाणी’ किंवा ’या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेत हा प्रश्न गली तीन वर्षे सलग आलेला आहे, त्या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही अगदी ’महत्त्वाचे’ असे लिहूनच घ्या त्या ठिकाणी’. म्हणजे सारांश काय, तर ’या ठिकाणी ’ आणि ’त्या ठिकाणी’ या दोन तीन शब्दांचा अनावश्यक वापर त्यांच्या नकळत व्हायचा. पण यामुळे इंग्रजी शिकवण्याच्या दर्जात काहीही फरक पडायचा नाही. एक उत्तम इंग्रजीच्या शिक्षिका म्हटले तर आजही मला दाते बाईच लक्षात आहेत. पण दातेबाईंच्या तासाला आमच्या वर्गातल्या मुलांना इंग्रजी भाषेपेक्षा त्यांच्या या सवय़ीचेच विशेष आकर्षण वाटायचे. इतके आकर्षण वाटायचे की आगावपणे मुले त्यांना शंका विचारताना त्यांच्याच लकबीचा स्वत: वाक्यात उपयोग करून प्रश्न विचारायचे. म्हणजे उदाहरणार्थ : “बाई, त्या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळाचे वाक्य आहे त्याचा voice change केला तर वाक्यात past participle वापरायचे का या ठिकाणी ?” किंवा “बाई, या ठिकाणी खिडकीतून प्रकाश आल्यामुळे फळा चमकतोय आणि तुम्ही लिहिलेले दिसत नाहीये, त्या ठिकाणी. (बोट दाखवत) तुम्ही त्या ठिकाणच्या ऐवजी या ठिकाणी लिहाल का ?” आता मुलांनी केलेला हा आगावपणा त्यांना समजायचा नाही असे मला मुळीच वाटत नाही. पण त्यांचा स्वभावच रागीट नवता. उलट अगदी प्रेमळ आणि शांत होता. मुलांना शिकवण्याची इतकी कळकळ त्यांना होती की समजूनही त्या असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मुलांच्या प्रश्नात जर खरोखरच मुद्दा असेल तर त्याचे निरसन त्या करायच्या. सुमारे ४५ मिनिटाच्या तासाला अर्धा ते पाऊण धडा, या गतीने आमची अभ्यासक्रमात प्रगती होत असे. पण असे असूनही खूप काही शिकवण्याचे सामर्थ्य दाते बाईंमध्ये होते. या ४५ मिनिटात आमचा उद्योग इतकाच की दाते बाई किती वेळा ’या ठिकाणी’ किंवा ’त्या ठिकाणी’ असे म्हणाल्या त्याचा हिशोब ठेवणे ! कोणीही पाहू नये असे अगदी व्यक्तिगत मजकूर असलेले वहीचे शेवटचे पान या आकडेवारींनी भरलेले असायचे. दिनांक, वार आणि आज ’या ठिकाणी’ किंवा ’त्या ठिकाणी’ या शब्दप्रयोगाची संख्या असे तक्ते बहुसंख्य मुलांच्या वहीत होते. खरेतर हा प्रकार आजिबात भूषणास्पद नाही, पण दहावीमध्ये इतकी अक्कल कोणालाच नवती. चार उभ्या रेघा आणि त्या खोडून तिरकी एक रेघ असे पाचच्या संख्येने केलेल्या मोजमापाचा हिशोब मुले ठेवायची. पंचेचाळीस मिनिटानंतर तास संपला की ओरडून एकमेकाला हा आकडा सांगणे, हे भूषण ! म्हणजे इंग्रजीचा तास संपल्यावर एका कोपऱ्यातून ’पंच्याहत्तर’ आणि दुसऱ्या कोपऱ्यातून ’ब्याऐंशी’ अशा आरोळ्या ऐकू यायच्या. ’तुमची आकडेवारी चुकली आहे, आमचीच बरोबर आहे, पाहिजेतर अमुक तमुकला विचार’ अशा प्रकारचे वादंगही व्हायचे. एखाद्या त्रयस्थाला वाटायचे बहुतेक गणिताचा तास संपला आहे, आणि अवघड गणित सोडवून मुले त्याचे उत्तर पडताळत आहेत, वा ! काय हुशार वर्ग आहे हा ! ’. पण प्रत्यक्षात ही आकडेवारी दाते बाईंच्या ’या ठिकाणी’ आणि ’त्या ठिकाणी’ या शब्दप्रयोगाची असायची !!
|
Ekrasik
| |
| Thursday, June 21, 2007 - 6:06 pm: |
| 
|
सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे का?
|
माझे एक शिक्षक विद्यार्थ्याना 'अरे म्हशीच्या प्राणनाथा!!!" असे म्हणत
|
Arch
| |
| Thursday, June 21, 2007 - 6:57 pm: |
| 
|
माझे एक शिक्षक विद्यार्थ्याना 'अरे म्हशीच्या प्राणनाथा!!!" असे म्हणत कोणत्या विद्यार्थ्याला हे विचारायची गरजच नाही 
|
Sayuri
| |
| Thursday, June 21, 2007 - 8:21 pm: |
| 
|
Chatrapati, मस्तं लिहिलयंत. 'ललित' मध्ये टाकत का नाही.. तुमची शैली चांगली आहे.
|
एक रसिक, आपण अगदी बरोबर ओळखलेत ! फक्त सेंट विमलीज मधलाच विद्यार्थी हे ओळखू शकतो. कोणती बॅच आपली ?
|
Farend
| |
| Friday, June 22, 2007 - 1:00 am: |
| 
|
एक रसिक, छत्रपती, आमच्या वेळी दोन दाते बाई होत्या. पण आम्हाला इंग्लिश त्यातील कोणीच शिकवायचे नाही. पानसरे बाई होत्या इंग्लिश आणि संस्कृत ला. छान शिकवायच्या. आमची बॅच ८४ ला बाहेर पडलेली (आमच्या वेळचे टण्णू आणि ते कर्वे रस्त्याच्या बाजूला असलेल्या वर्गांजवळचे नारळ काय होते )
|
Bee
| |
| Friday, June 22, 2007 - 1:56 am: |
| 
|
छत्रपती, दाते बाईंबद्दल खूप छान लिहिलं. डोळ्यासमोर दातेबाई उभे राहिल्यात. ललित मधे हे लिखान केलं असतं तरी चाललं असतं.
|
आमच्या बॅचला सौ. सोहोनी व सौ. रमा जोशी संस्कृत शिकवायच्या. नारळ प्रभातरोडच्या बाजूला होते, कर्वे रोडजवळ पाहिलेले मला आठवत नाहीत. कदाचित चित्रकलेच्या वर्गाजवळ झाड असेल, आणि मला आठवत नाहीये. टण्णू पुढेही अनेक वर्षे दिसायचे, पण आजकाल भारतभेटीमध्ये कधी दिसले नाहीत. दहावीला असताना ’हुशार’ मुले हजेरी लाऊन मधल्या सुट्टीत घरी पळून जात. त्यामुळे कर्वे रोडवरचे दार तर बंदच असायचे, आणि प्रभात रोडवरच्या दारावर शिपाई पहारा देत बसायचा. बरोबर दप्तर नसेल तर मुलांना शाळेबाहेरच्या फेरीवाल्यांकडे जायला तो परवानगी द्यायचा. पण दप्तर घेतलेले कोणी बाहेर पडताना दिसले, तर तो हटकायचा. जर घरची चिठ्ठी असेल तरच मुलांना घरी जाऊ द्यायचा. प्रभात रोडच्या बाजूला एका बंगल्यातून सायकलच्या पार्कींगमध्ये एक झाड भिंतीतून आत आलेले मला आठवतंय ! त्या भिंतीला गोलाई देऊन झाड तोडणे टाळले होते. झाडाचे खोड आणि भिंतीला दिलेली गोलाई याच्यामध्ये झाड वाढल्यामुळे जागा तयार झाली होती. त्यातून पलिकडच्या बंगल्यात दप्तरे टाकून, मधल्या सुट्टीत मुले मागच्या गेटमधून शिपायाच्या समोरून ऐटीने घरी पळून जात !! यावर तोडगा म्हणून सर्वात शेवटच्या तासाला उपस्थिती घेणे चालू केले. पण तो डावही मधल्या सुट्टीत वर्गप्रवेश करून मुलांनी हाणून पाडला. प्रीलिमच्या आधीचे दोन महिने पहिल्या आणि शेवटच्या तासाला, अशी दोन वेळा उपस्थिती घेतली जायची !
|
बी ? म्हणजे तू पण विमलाबाईंचा ?
|
Bee
| |
| Friday, June 22, 2007 - 2:30 am: |
| 
|
छत्रपती, बाई डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात म्हणजे त्या कशा असतील ह्याची कल्पना मला करता आली. विमलबाईमधे नव्हतो मी. मी विदर्भात शिकलो आहे.
|
Zelam
| |
| Friday, June 22, 2007 - 2:37 am: |
| 
|
छत्रपती टाका ना हे ललितमध्ये. मस्त आहे.
|
Bsk
| |
| Friday, June 22, 2007 - 5:17 am: |
| 
|
छत्रपती खरंच खूप छान लिहीलय! शाळा आणि शाळेतले दिवस आठवले! आम्हाला कधी दाते बाई नव्हत्या.. पण सिरसिकर मॅडम होत्या ईग्लीश ला.. आणि त्यांची पण अशीच एक सवय होती.. 'ठीकेकीनई' म्हणायची! अक्षरशः प्रत्येक वाक्यानंतर म्हणायच्या त्या.. आणि आम्ही पण असाच काऊंट ठेवायचो! खूप धमाल यायची... 
|
मालवणला एका शिक्षक सर्व मुलांना संबोधताना fellows म्हणायची सवय होती.. एक दिवस 'न रहावून' एक मुलाने विचारलं, 'सर, fellow म्हणजे काय?' ' buffalo चा भाऊ,' उत्तर आलं... 
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|