|
आम्हाला CO ला (Computer Organisation) ला एक अत्यंत खडूस सर होते. आमच्या वर्गात एक सय्यद इलेक्ट्रीकवाला म्हणून मुलगा होता. तो data हा शब्द 'डाटा' असा उच्चारायचा यावरून सरांनी त्याला एवढे झापले आणि नंतर त्याची एवढी खेचली की बास! गम्मत म्हणजे दुसर्या एका वर्गात दुसर्या सरांनी 'डेटा' असा उच्चार केला म्हणून खिल्ली उडवली. यानंतर त्याने त्या शब्दाचा उच्चार सरळ 'डि ए टि ए' असा करायला सुरूवात केली!
|
N M Kulkarni तिथे त्या kidnappers ना trigonometry चे formulae विचारून गार करतील ते विद्यार्थ्याला मंडईत भेटला तरी product formulae विचारायचे पण एकंदर विद्यार्थ्यांमधे पॉप्युलर होते ते!
|
Arch
| |
| Friday, June 23, 2006 - 5:58 pm: |
| 
|
RH मला वाटत हे लोकांच्या मूर्खपणाचे किस्सेमध्ये शोभेल. ह्या BB शी तुमच्या post चा काही संबंध नाही. hopefully tumhee delete कराल नाहीतर Admin, moderator नेतरी delete कराव तुमच post
|
माझे पोस्ट डिलिट केले वाटते एडमीनने. हरकत नाही. पण हा किस्सा सर्क्युलेट करणार्या विद्यार्थ्यातही एन एम सराविषयी आदराचीच भावना असावी असे मला वाटते. तो मुलांच्या बालसुलभ खट्याळपणाचा भाग आहे असे मला वाटते.
|
Prasik
| |
| Sunday, December 03, 2006 - 7:35 pm: |
| 
|
मी शाळेच्या बाबतीत लिहायचे म्हटले तर mi बारा घाटातले पाणी प्यायलो आहे ही म्हण फ़िट बसते. पण काही आठवणीतले शिक्षक... पेंद्या, आगरबत्ती, केकाट्या, कंडक्टर, बेगड हे सग़ळे शाळेतले आणि हो मादाम क्युरी, पायथागोरस, न्युटन कॉलेजमधे होते..... आजुन आठवतोय.
|
आम्ही अकरावी सायन्सला असताना आठवणीने ढोले सरान्चे accounts चे लेक्चर बघायला दरवाजात फ़िरायचो.. हा माणूस शिकवताना platform वर थया थया नाचायचा.. अखंड बडबडत इकडुन तिकडे फ़िरायचा आणि गंमत म्हणजे विद्यार्थी उठून बाहेर गेले तरी त्यान्चे लक्ष नसायचे..
|
माझ्या कालेज मधे एक सर होते. त्यांची मिशी एका बाजुने वर आणि दुसरी कडुन ख़ाली होती. He used to teach "Water" for the entire 1st sem of Engg( in chemistry)
|
Sanchu
| |
| Tuesday, December 05, 2006 - 6:02 pm: |
| 
|
अम्हाला एक सर होते इंजिनीयरींगला. ते सतत उत्सुकतेने सगलीईकडे बघतात असे वाटाय्चे.लहान मुल बघते तसे. डोळेच होते मोठ्ठे मोठ्ठे.
|
Rajeshad
| |
| Friday, December 08, 2006 - 7:33 am: |
| 
|
आम्हाला ११वीत केमिस्ट्रीला एक सर होते त्यांचा इंग्रजी शब्दांच्या उच्चारांबाबत काही गैरसमज असावा. नोट्स डिक्टेट करत असताना consists या शब्दाचा उच्चार कन्सिस्ट्सट्सट्सट्स असा बराच वेळ करत रहायचे.
|
Swa_26
| |
| Saturday, December 09, 2006 - 6:59 am: |
| 
|
आमच्या कॉलेजमधे एक सर होते, मराठी शिकवायचे. एकदा वर्गात शिकवत असताना बाजुच्या क्लासमधून खूप गडबड चालू झाली. सर म्हणाले मी त्या वर्गात जाऊन बघतो आणि बाहेर गेले. आमच्या वर्गांना २ दरवाजे असायचे. सर आपले एका दाराने बाहेर गेले आणि दुसरा क्लास समजून परत आमच्याच वर्गात शिरले आणि म्हणतात कसे,"अरे मुलांनो, जरा शांत रहा, मी दुसर्या वर्गात शिकवतोय". आम्ही सगळे विद्यार्थी एका सुरात,"सर, आपलाच क्लास आहे...."
|
Zakasrao
| |
| Saturday, December 09, 2006 - 8:17 am: |
| 
|
आम्हाला १२वीमधे chemistry शिकवायला एक सर होते. त्याना सारखे that is the म्हणायची सवय होती. त्यान्चे आडनाव तळप होते. मुले त्याना that is the तळप असे म्हणायचे.
|
Chyayla
| |
| Saturday, December 09, 2006 - 6:29 pm: |
| 
|
तुमच्या सगळ्यान्चे किस्से वाचुन ह. ह. पु. वा, स्वाती तुझा किस्सा तर खुपच सही... खुप हसलो वाचुन... आमच्या कॉलेज मधे पण आमच्या क्लास ला २ दरवाजे होते सरानी प्रेजेन्टी घेतली मुल मागच्या दाराने पसार आणी थेट कॉलेज कट्ट्यावर. शाळेतल्या एका नवीन आलेल्या सराना शिकवताना समोरचा डेस्क उचलायची सवय होती आणी ती एकदा नाही तर पुर्ण वेळ शिकवताना तो डेस्क फ़्ळ्याच्या एका बाजुपासुन सुरु होउन अर्धगोलाकार फ़िरुन दुसर्या बाजुला जाईपर्यन्त. अश्याच एक नवीन म्याडम आल्या होत्या डी-एड वाल्या होत्या मुल ऐकतच नव्हते शेवटी चिडुन त्या म्हणाल्या कुणाला मार हवा आहे का? एका डाम्बरट पोराने आवाज काढला होSSS पुर्ण वर्ग हसायला लागला आणी म्याडम पण त्या त्याला मारायला गेल्या खर्या आणी त्या स्वता:च हसायला लागल्या.
|
sglaynna namskar mi nitin navinach joint zalo ahe tumhi sagle khup chan gappa martat mala 1 shaletli gammat share karayla awdel aamhi eyatta nawwi tukdi d phar kahi hushar navto pan jara tapori mulan madhe aamcha naw aawargun ghetala jaycha tashe purana shalet aase 10-12 jana hoto aamhi aamcha warga ha ground floor la saglyat shewti hota, aani mage 1 exit gate hote aaani shala sutatanna aamhala tya gate ne sodayche , aani aamchya palacyahca to 1 changla marga hota , 1kya tasala hajeri lagli ki kalti asa nehamichach zala hoata ekda mmahi char janani marathicha tas samplya nantar palaycha tharawla dustre shikkshak yenyachya aat ha progaram asaycha , marathichya madam baher gelya aani aata kaltimahnun ekekkane dupttar baher khidkitu takala aaani wargatun baher padnar tewdyat ganitache khadus sir aale mag kay wargatch bsawa lagla aani duptar baher kal sodwayla dilele ganita mastar check karat hote aani aamchi pali ali kay dakhawnar duptar baher aani aamhi aat , wahi kuhte wicharlyawar kay sangnar sagle 1 mekahcya todakade paghayla lago aamchayt 1 ghabrat hota tyne sangitle sir duptar khidkitun baher padla , bakichyacha kay sairnane vicharla , aasa marla aamhala vargachya hya toka pasun tar dusrya tokaparyanta marunmarun lal keala chaoganna aani mahatwacha mhanje sir damlechnai tyancha topne naw hota keshto...... pan hi saway aami sodli nahi palana ha tar janmasida hakka hota tyat 1 wegli maja asaychi
|
Swa_26
| |
| Tuesday, January 09, 2007 - 12:03 pm: |
| 
|
समीर, अरे तो मागच्या दाराने पळायचा उद्योग तर अम्ही पण करायचो... हो, नाहीतर उपयोग काय २ दारांचा??? पण माझ्या कॉलेजमधे attendance compulsary असल्याने ग्रुपमधील सर्वांनी बाहेर थांबायचे आणि मग आतून कोणीतरी attendance sheet पास करायचे.... मग बाहेर सह्या करून परत ती attendance sheet पाठवायची... असा उपद्व्याप करावा लागे पण काय "एकमेकां साह्य करु... अवघे धरु सुपंथ" असे असायचे ना!!!
|
Suvikask
| |
| Tuesday, January 09, 2007 - 12:17 pm: |
| 
|
आमच्या BCS ला शिकविण-या एका सरांचे english असे होते.. ते विचारायचे " where are you yesterday?" १२ ला मराठी शिकविणारे सर सम्पुर्ण lectur भर फक्त १८० डीग्री मध्ये मान हलवून शिकवायचे. दार to खिडकी and vice-a-versa . समोरून मुले claass मधुन पळुन जायची तरी त्यांचे तेच.. दार to खिडकी and vice-a-versa .
|
मी बिर्ला कोलेज मधे असतानाची गोष्ट. एकूण ३ पाटील सर शिकवायला होते. अनुक्रमे १) लाडू पाटील कारण त्यान्चे गाल लाडू ठेवल्यासारखे होते. २) टकलू पाटील स्वाभाविक कारणासाठी. ३) कमान्डो पाटील कारण ते थोडे विचित्र होते. एकदा आम्ही वर्गात दन्गा करत होतो, म्हणजे मी आणि माझा मित्र. कमान्डो अला आणि म्हणाला Both of Three get out. बाप रे, किती दिवस तो किस्सा अठवून हसलो असीन अठवतपण नाही
|
Saee
| |
| Thursday, May 10, 2007 - 9:01 am: |
| 
|
८वी ते १०वी आम्ही घरातली सगळी सख्खी - चुलत भावंडं एका सरांकडे खाजगी शिकवणीला जायचो. गणित, विद्यानाचे सर्व विषय, इंग्लिश हे अभ्यासाचे विषय आणि वाद्ये आणि गाणी हे उपविषय. ते आणि माझे बाबा एकाच शाळेत काम करत असल्याने क्लासला शाळेतले विद्यार्थीही भरपुर असत. वरच्या सर्व विषयांमधे त्यांना जबरदस्त गती. चिडले की 'कुत्तरड्या' अशी ठरलेली शिवी देत (मुलांना फक्त) आणि मुलींचा तोंडाला येईल त्या स्त्रिलिंगी शब्दात उध्दार. त्यांची मुलंही आमच्याबरोबरच बसत, त्यांनाही तोच नियम. अजुनही रस्त्यात भेटले तरी तसेच बोलतात पण आमच्या प्रगत्या ऐकुन एकदम खुश होतात. आम्ही कुणीही कधीही त्यांना घाबरलो नाही, त्यांच्या चुका त्यांना सांगितल्यावर ते मजेत स्विकारत आणि सांगणार्याचे जाहीर कौतुक करत. त्यांच्याबद्दल बोलताना आजही सगळ्यांची कळी खुलते. राहणं वागणं एकदम झकास. मुसलमान आहेत पण उभ्या हयातीत महादेवाच्या उपासनेसाठी धरलेला सोमवारचा उपास कधीही चुकलेला नाही त्यांचा. परिक्षा आणि स्नेहसंमेलने दोन्हींशी जवळून संबंधीत असल्याने वर्षभर पोरांच्या गराड्यात असत. कोल्हापूरच्या न्यू हायस्कुलच्या पोरांना नाव सांगायची गरज नाही.
|
Nilima_v
| |
| Friday, June 15, 2007 - 7:48 pm: |
| 
|
Aamhala FYBE la MB Shah hote. Mhanje jyanche Eng. Drawing Part1, Part2 Text book sarkhe wapartat te MB Shah. He was solid funny and strict same time. Tyanna Drawing chya Files na kuthehi staples ulate lawlele aawdat nasat. Karan staple madhye adkun kapade fattat. Tyanna drawing war barik pusat daag aawdat nase ani maza haat laget tithe drawing paper malkat vaycha,. Tyanna ajun ek gosht aawdat nasse te mhanje, Plan, aani view kiva 3D wegweglya papers war kadhlele ajibat chalat nase. Ase 2 paper anle tur te kahitari comment karat, ekala mhanale, tula lagnala athra warshachi mulgi hawi, mhanun 9 warshyachya 2 gheun aalo tur chalel, nahi na, tase mala pun eka image sathi 2 papers nakot. ase khadus asle tari mala tyanni submissionla madat keli. Maze submissionchya diwshi kahi drawings chorila geli. Mug maze te drawing purn hoiparyant wargaat, Te aani mi ase doghech ratri 8 paryant thamblo.
|
चिडले की 'कुत्तरड्या' अशी ठरलेली शिवी देत (मुलांना फक्त) >>> ही शिवी नसून रूपक अलंकाराचे उदाहरण आहे. जेव्हा उपमेय आणि उपमान यामधील अभेद वर्णन केलेला असतो तेव्हा रूपक अलंकार होतो.. वगैरे वगैरे
|
आहे की नाही सांगा!!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|