|
मृण्मयी, मला visaa problem नाही ग. मी long term contract basis वर काम करत होते. मायबोलि site मी जेव्हा पाहेली आणी माझा profile काढला तेव्हा मी edison ला होते. मी product analyst म्हणुन नोकरी करत होते. त्यामुळे travelling हे फक्त East- west coast नसुन out of US करावे लागयचे. anyways झाले ते झाले.
|
Mansmi18
| |
| Monday, April 09, 2007 - 3:40 pm: |
| 
|
एक प्रश्ण मनाला सतत पडला, मी कधीही कोणाला त्रास दीला नाही,दुखःवले नाही,उगीच कारण नसताना उणे दुणे बोलत नाही, तेव्हा मला असे का झाले ह्याचाच त्रास ज्यास्त झाला. -------------------------------------------------- नमस्कार, आपल्याला झालेला त्रास वाचुन वाइट वाटले. देव करो आपल्याला लवकर बरे वाटो. तुम्हि असे समजा कि तुम्हि देवाच्या लाडक्या आहात आणि देव तुमचि परीक्षा घेत आहे. यातुन तावुन सुलाखुन निघाल आणि आणखि उजळुन निघाल. आता असे तुम्हालाच का झाले असे विचाराल तर त्याला उत्तर श्री तुकाराम महाराजानी दिले आहे. आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना हरीश्चन्द्र ताराराणी वाहे डोम्बाघरी पाणी पान्डवान्चा साहाकारी राज्यावरुनी केले दुरी तुका म्हणे उगेची राहा, होइल ते सहज पाहा.
|
Disha013
| |
| Monday, April 09, 2007 - 4:19 pm: |
| 
|
मनुस्विनी,खुप वाईट वाचले गं वाचुन.एकटीने कसे काय सहन केलेस?मायबोलीवर विचराउन पाहाय्चेस, बहीण,भावाला तरी लगेच सांगायचे होतेस. एकटी काय काय करणार? आणि friends चे कडवट अनुभव मीही घेतलेत. डोळे झाकुन कुणावर विश्वास नाही ठेवता येत. अनुभवाने शहाणे बनतो आपण. अशा संधीसाधु लोकांशी मैत्री नकोच. उगिच मनस्ताप. पण चांगले लोकही असतात गं. त्याचेही अनुभव घेतलेत मी,म्हणुन सांगते. परतफ़ेडीची अपेक्षा न करता दुसर्यांना मदत करणे, एवढेच आपल्या हाती असते. आता कशी आहे तब्येत? कळजी घे स्वत:ची. लवकर बरी हो.
|
मनु , खरच एखादे post इथे / बे एरीया BB वर टाकायला हवे होतेस . Santaclara म्हणजे आस पास मदत करणारे खूप मायबोलीकर मिळाले असते . अत्ता कुठे आहेस , काही help हवी असेल तर email कर नक्की . मी Fremont मधे असते .
|
Dineshvs
| |
| Monday, April 09, 2007 - 4:40 pm: |
| 
|
मनुस्विनी, बघितली हि मायबोलीची ताकद ? आपण सगळे एकमेकांसाठीच तर एकत्र आलोत. नुसती हाक मारायला हवी होती.
|
माझी चुकच झाली मी खरोखर एक email इथे टाकायला हवे होते. जेव्हा मदत स्वःताला लागते तिथे माझा भिडस्तपणा आडवा येतो. तशि मि आता बरि आहे. फक्त Recovering from weakness, thats it . हातासाठी फक्त physiotherapy session चालु आहेत.
|
Sunidhee
| |
| Monday, April 09, 2007 - 6:34 pm: |
| 
|
मनूस्वीनी, लवकर पुर्ण बरी हो (मनाने सुद्धा). बाप रे, तुझी मानसिक स्थिती काय झाली असेल?? नशिबाने निदान तुझे भाऊ-बहिण तरी इथे होते नाहीतर फार अवघड झाल असतं गं. तुला खूप शुभेच्छा. भारतातुन पण लिही.
|
मनु मी पण santa clara ला असते. मायबोलीवर तशी नवीन आहे. इथे परत केव्हा येणार आहेस? आलिस की काहि हव असेल तर नक्की सान्ग. मला तुला भेटायला खूप आवडेल. तू इथे असताना काही बोलली असतीस तर मि नक्की तुला शक्य तितकी मदत केली असती. इथे आजारी पडल्यावर काय हाल होतात ते मिही अनुभवले आहे. आणि मला माझ्या २ मैत्रीणीन्नि मदत नसती केली तर काय झाले असते हे मी imagin पण नाहि करु शकत. असो झाले गेले विसरून जा. कडू अनुभव मनात ठेउ नकोस. आणि काहि लोकनशी हातचे राखूनच वागावे लागते ग. इथे आलिस परत की नक्की सान्ग ह.
|
Jhuluuk
| |
| Tuesday, April 10, 2007 - 10:10 am: |
| 
|
मनु, तुझ्या लिखाणातुन तु नेहमीच विचारी आणि प्रगल्भ मुलगी आहेस हे जाणवायचे. पण स्वत्:वर आलेले हे संकट, आजारपण हे तु या मायबोलीकर friends पासुन का गं दुर ठेवलेस... आता मुंबईला येणारेस, तरी इथे मायबोलीवर येत रहा. आणि तु काळजी करु नकोस, इकडे येउन तुझी तब्येत नक्कि सुधारेल. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा तुला!! happy journey to you n do take care
|
Chinnu
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:36 pm: |
| 
|
मनुबाई, समजु शकते तुझी व्यथा. परप्रांतात एकटेपणा आणि असहाय्यता किती मोठा नरक असतो, हे मलाही दुर्दैवाने अनुभवायला मिळाले आहे. अश्या वेळेस कुणी मदत करो न करो, उगाच काहितरी खोचक बोलुन वैताग आणणार्यांचा सदैव तिरस्कार करत आले मी. तुझ्यासाठी US परप्रांत असेल, पण मला सखेद नमूद करवं लागतय, माझ्यासाठी माझा स्वत:चा देश असले अनुभव देत गेला. नव्हे अजुन देत आहेच! असली कुचकामी लोक आपल्या दयेला पात्र असतात. तेव्हा त्यांच्यावर दया करुन त्यांना सोडून द्यावं. जे ते पेरतात ते त्यांच्यासाठी कधी न कधी उगवतेच. त्यामुळे आपण फ़क्त आपली काळजी करायची. तु मला वयापेक्षा जास्त समज असलेली आणि खंबीर मुलगी वाटतेस. चांगुलपणावरचा विश्वास उडु देवु नकोस. स्वत:ला कधीच असहाय्य, कमी किंवा एकटं समजु नकोस. तुला गरज नाही, तरी शुभेछ्छा! btw तुझ्या कृतीने पेपर दोसा सुंदर होतो. मी साउथ इंडीयन असुनही मला एवढी authentic रेसीपी माहीत नव्हती. (तसाही बर्याच बाबतीत अंधार आहे म्हणा! ) तुला आणि तुझ्या मैत्रीणीला धन्यवाद.
|
सगळ्यांचे आभार परत एकदा. मी सगळी posts भावाला, बहिणीला दाखवलि. ते एकदम खुष, म्हणतात काय मस्त Friends आहेत तुझे, आम्हलापण असे नाही आहेत. हो, माझी मैत्रिण संगीता नसती तर खुप हाल झाले असते. १८ वर्षाची असुन तिचि समज माझ्यापेक्षा ज्यास्त आहे. she certainly made me feel good whenever i used to get depressed being alone at home during this period. I am Happy! आता फक्त शनिवार कधि येतोय ह्याचि वाट पाहतेय. ३ वर्षाने जाणार आहे मि. तुम्हा सर्वांना धन्यवाद परत.
|
Arch
| |
| Tuesday, April 10, 2007 - 3:05 pm: |
| 
|
मनु, Happy journey . काही news असली तर आम्हाला सांगायला विसरू नकोस हं 
|
Savani
| |
| Tuesday, April 10, 2007 - 3:29 pm: |
| 
|
मनु, Happy Journey. लवकर छान बरी होऊन आणि रीफ़्रेश होऊन ये. अश्या ह्या अनुभवातून तर कळतं कोण आपले जवळचे आहेत आणि कोण नाहीत.. त्यामुळे विसरून जा हे कडू अनुभव. पण मदत करणं सोडु नकोस मात्र.
|
हो पोहचले एकदाचि इथे. भरपुर उकाड्यात. पुढच्या आठवड्यात चिपळुणला जाईन मग टाकेन तिथील भेटीचा अनुभव. आर्च, नक्कि सांगेन हं एखादी news असेल तर.
|
ah thats cool ! I mean, pochalis te. ukada nahi u from chiplun? hmm... kokan, hapus ambe astil ata... tondala pani sutale.
|
Sayonara
| |
| Tuesday, April 17, 2007 - 1:06 am: |
| 
|
सव्यासची, हापूस आंब्याची आठवण काढून तोंडाला पाणी सुटण्यापेक्षा इथले इंडियन स्टोअरचे मेक्सिकन आंबे आण बरं. मस्त आहेत ते पण. हापूससारखा घमघमाट सुटतो.
|
अग सायो, पुर्वी तर तेच मेक्सिकन आंबे आणले होते मी. वास अगदी हापूस सारखा असतो. त्यामुळे तसेच लागतील असे वाटले. पण चवीला पायरी सारखा लागतो. अगदी चवच जाते मग
|
मुळचे पप्पांचे गाव अंजनवेल पण settled in गोवा. उकाडा म्हणजे नुसते ओवन आहे इथे मुंबईत
|
गोवा! कुठे? मी पण गोव्यातच राहतो, म्हणून विचारलं.
|
Swa_26
| |
| Tuesday, April 17, 2007 - 8:58 am: |
| 
|
अंजनवेल???? माझ्या आत्याचे गाव आहे ते.... खुपच छान आहे असे सांगत असते ती..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|