|
Malavika
| |
| Tuesday, April 17, 2007 - 4:52 pm: |
| 
|
मनु, आजच हे वाचले. खूपच भयंकर अनुभवातुन गेलीस तू. तरी तुझी भावंडे इथे असतात म्हणून बरे. नोकरी तुला पुन्हा मिळणार आहेच. तब्येतीकडे मात्र व्यस्थीत लक्ष दे.
|
मनू मनापासुन शुभेच्चा. कठीण असलं तरी झालेलं विसरायचं. लोकांना हे सांगणं सोपं असतं माहिती आहे गं.. पण एवढ्या लांबून अजून काही करु शकत नाही. लवकरच सगळं पुन्हा रुळावर येईल. ऑल द बेस्ट! चिअर्स! मेघा
|
Manuswini
| |
| Wednesday, April 18, 2007 - 7:52 pm: |
| 
|
thanks मालविका नी मेघा
|
Siddhita
| |
| Thursday, April 19, 2007 - 10:57 am: |
| 
|
ख़रंच ख़ूप वाईट वाटलं मनु तुझा अनुभव वाचुन.पण मला वाटतं खरंच आहे हे सगळं. कठीण समयी च कळतं कोण कसा आहे ते. तू खरंच धाडसी मुलगी आहेस.
|
Sas
| |
| Friday, April 20, 2007 - 7:29 pm: |
| 
|
मनु घरी छान आराम कर. काळजी घे. मी तुझी Post वाचली व तुला आलेल्या इतर काही post ही त्या वरुन वाटतय तु CA त होतिस. मी पण CA Bay Area त आहे. तु खरच इथे कळवायला हव होतस. असो. आता परत आलिस आणी काहीही लागल तर हक्काने कळव. अगदी असच भेटायलाही आवडेल तुला. Take Care & Get Well Soon!!!
|
Monakshi
| |
| Friday, April 27, 2007 - 8:39 am: |
| 
|
मलाही आलेला एक वाईट अनुभव मी कॉलेजमध्ये असताना आम्ही सर्वजण, मी, आई, बाबा आणी माझ्या दोन बहिणी असे आम्ही बेंगलोरला जायला निघालो होतो. सकाळची उद्यान एक्स्प्रेस पकडली, दुसर्र्या दिवशी सकाळी पोचणार. जाताना आम्ही जे पैसे बरोबर नेणार होतो ते डिव्हाईड केले होते आणी एक पाऊच माझ्याकडे होता. दुसर्र्या दिवशी जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा स्टेशनवरच जे ट्रेव्हल एजंट असतात त्यांच्याकडून पुढ्चा सगळा प्लान आख़ला आणी आम्ही हॉटेलवर आलो. त्याला काही पैसे आगाऊ द्यायचे होते म्हणून बाबा मला म्हणाले की तुझ्याकड्चे देऊयात म्हणून मी बेग उघड्ली व पाऊच शोधायला लागले तर काय माझ्याकडे तो नव्हताच, सर्व बेग उलटीपालटी केली पण काही उपयोग झाला नाही. त्या पाऊचमध्ये रु. १०,०००, क्रेडिट कार्डस आणी आमची रिर्टन रिर्झवेशन टिकीट्स होती. नवल म्हणजे माझ्या बेगेत वरच्या बाजूला ९०० रुपये होते, ते जसेच्या तसे पण हा पाऊच मात्र कपड्यांच्या आतमध्ये ठेवला होता तरी गेला. नशीबाने तो एजंट मराठी होता त्याला आमची अडचण सांगीतली, त्याने १२ दिवसांची ट्रिप ८ दिवसांत करुन दिली व सर्व पैसे नंतर द्या म्हणून सांगितले. आमचे परत जाण्याचे बसचे रिझर्वेशन पण त्यानेच करुन दिले. होता होईल तेव्हढी मजा आम्ही केली पण त्यांत काही उत्साह नव्हता. माझ्या आजीने घरी पण ख़ूप शोधले पण तिला काहीच मिळाले नाही. पैसे जायचेच होते ते गेले. पण शेवटपर्यंत कळले नाही पैसे कुणी, कसे, कुठे मारले ते
|
Yashwant
| |
| Friday, April 27, 2007 - 9:56 am: |
| 
|
मला पन दोन अठवड्यापुर्वि मुम्बै मध्ये वैत अनुभव आला. मी नविन अल्टो पुणे पास्सिन्ग घेवुन येत होतो. गोवन्डी ला मला ३-४ मानसान्नी गाडी अडवुन तुमच्या गाडी मधुन धूर येतो असे सान्गितले. मला त्यानी बोनेट उघडायला लावले. मी जेन्व्हा स्टार्टेर मारायला गेलो तेन्व्हा त्यानी एक वायर खेचली. त्यामुळे स्पार्किन्ग व्हायला लागले. एक पार्ट खराब ज़्हालाय असे सान्गुन मला तो पार्ट ४००० रुपयाला विकला. गाडी मध्ये कुटुम्ब असल्यामुळे मला गाडी सोडुन जायची भीती वाटली आणि मी तो पार्ट त्याच्याकडुनच घ्यायचे ठरवले. दूसर्या दिवशी डीलर कडे गेलो तर त्याने तुमची फ़सवनुक ज़ाली असे सान्गितले. मी ही बातमी सकाल ला पाठवली. त्यान्नी ती बातमी ९ अप्रील सकाळ ला पुब्लीश केली आहे. आनखी कुनी असे फ़सु नये हिच सदीच्चा.
|
मनु, अताच वाचल ग. कशी आहेस अता? काळजी घे स्वताची.
|
यशवंत, तुम्ही सांगितलेला प्रकार चेंबूरच्या दरम्यान हमखास घडतो. २-३ जणांचा अनुभव आहे हा. कुटुंब असलेली कार पाहून त्यांच्या बाजूनी येऊन धूर, flames निघतो आहे असं सांगतात. कार थांबवून, बोनेट उघडून त्यांच्या हातातलं एक solution गरम इंजिन वरती नकळतपणे टाकतात ज्यामुळे एकदम फ़्लेम दिसते इंजिनमधे. मग इथेच जवळच गॅरेज आहे सांगून त्यांच्या कडून गरज नसताना एखादा पार्ट बदलतात. हे सर्व त्यांचं नेटवर्क असतं. माझ्या आत्याला असा अनुभव आला होता. तुमच्या पोस्टवरून आठवलं मला हे. bb चुकीचा असावा हा इथे लिहायला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|