Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 09, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » असाच एक कडवट अनुभव? » Archive through April 09, 2007 « Previous Next »

Manuswini
Sunday, April 08, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर इथे लिहु इच्छित न्हवते. पण लिहावेसे वाटले.एक दीड महिन्यापुर्वी माझा accident झाला पुर्ण डावी बाजु जख्मी झाली. डावा पायाच्या knee ला जख्म कमी झाली पण तो पाय आधीच जरासा दुखरा सल्याने metally मी खुप घाबरले होते की आता काय?. नशीब मानले की डावी बाजु होती इतकेच. ३ वर्शापुर्वी skating मध्ये मी हा knee injured केला पण डावा हात मानेपासुन ते पुर्ण करंगळीपर्यन्त सुन्न होत असे काही दिवस. नोकरी सुद्धा सोडावी लागली. हा काळ कसा गेला मलाच माहीती होता. emergency मधील Experience खुप painful होता, नेहमीसारखाच पाच सहा तास pain मध्ये होते. घरी काही कळू दीले नाही सुरवातीला ह्या वेड्या अशेवर की आहेत एवढे friends कोण ना कोण मदत करतील. पण हा अनुभव खुप दुख देवुन गेला परत एकदा.....
आवडीने ज्या मित्र मैत्रिणींना घरी बोलावुन स्वागत करायची,जेवणं करायची, त्यांन मदत करायची कश्याला कश्याला नेहमी त्यातील एकही जण मनापासुन फिरकलाच नाही.

अगदी विंनती करुन कोण तरी यायचा, hosptial मधुन घरी आले पण travel बंदी होती म्हणुन घरीच food deliver करुन कशी तरी खायची. मनाने इतकी कमजोर झाले की नुसते रडायला यायचे एक तो TV नी मायबोलि site हा आधार होता.
घर घाण झालेले,तेच तेच order करुन खायला लागलेले जेवण, सतत taxi बोलवुन physical therapy करावी लागत असे. चक्क Taxi वाला ओळखीचा झाला ने तो मदत करत असे. चढायला, उतरवायला.

अशी चीड होती मनात ह्या सर्व friends बद्दल पण मग स्वःतालाच प्रश्ण केला की का मी अपेक्षा करतेय? ... मी तर इतकी स्वःभीमानी आहे की कधीच कोणाची मदत घेतली नाही पण सगळ्यांन मात्र मनापासुन मदत केली. ......

असह्य झाल्यावर शेवटी घरी सांगुन टाहो फोडला. दोन टोकावर रहाणारे माझे घरचे हादरले. आई तर हातासाठी दिवस रात्र नवस करत होती.

शेवटी एक महिन्याने भावाच्या घरी कशीबशी आली. तो विमान प्रावास अगदी काळरात्र होती. racism खरोखर आहे असे मला नमुद करावेसे वाटते. हाता पायकडे बघुन सुध्हा ते security checking वगैरे वगैरे. माझ्या बरोबर असलेली wheel chair वरची गोरी तीला दीलेले attention नी ताटकळत वाट पहाणारी मी. मीच भावाला मनाई करुन एकटी का निघाली ह्याचा विचार करत राहीली plane सुटेपर्यन्त.
सगळे अगदी भावाने वडीलांच्या प्रेमाने करुन एका आठवड्यात मी " मनाने " बरी झाले. मग बहिण आली, ती बाकी सर्व सोप्स्कार कारायची माझे.
ह्या दरम्यान इतके कुचकट अनुभव आले friend चे, त्यातील वेगवेगळ्या Friends नी फोनवरुन विचरलेले काही प्रश्ण,

plast कसा वाटतो गं?

shoulder पासुन plast कसा करतात गं?

मग तुझी नोकरी सोडलेस्स तु? भरपुर चांगला पगार होता ना? मग boss ला दाखवायचास ना हा तुझा असा हात.
कीती पगार होता गं?

मग कधी घेणार परत नोकरीवर का घेणार नाही?

भावाने नी बहिणीने अगदी सगळे सगळे केले. त्यात ह्या मायबोलिने इतका विरंगुळा दीला ना की चक्क रात्री pain मुळे झोप येत नसताना एका उजव्या हाताने बेड मध्ये मी हळु हळु type करत site surf करायची खुप रडायला आले की. रात्र रात्र झोप नसायची.
हा कडवट अनुभव असा नाही पण नक्कीच विचार करायला लावणारा अनुभव वाटला.

शेवटी भावा, बहिणीकडे आले सगळे घर तसेच टाकुन, आवडीने सजवलेल्या घरातील वस्तु देखील अश्याच देवुन... तो एक वेगळा अनुभव होईल वस्तु घेणया लोकांचा........


हात हळु हळु सुधारतोय,पाय ठिक आहे बर्‍यापैकी. थंडीत हात ज्यास्त दुखतो.
पण hoping it will be ok in few more months to come as per doctor .
आता कीती कणखर झाले मी मलाच माहीती पण तो विश्वास राहीला नाही, थोडासा धक्का बसला जरुर कारण स्वःताची पर्वा न बाळगता, नोकरीतुन रजा घेवुन मी इथे friends ना मदत केली मग मला का असे अनुभव आले वा अनुभव येतात कायम ह्याचे उत्तर मात्र कधीच मिळत नाही..............
खरे तर मी कायम धक्के खावुन न सुधरण्यापैकी आहे अशी एक जवळची मैत्रीण म्हणते. ती एक मनाला दिलासा द्यायची. तीने अगदी पुर्ण मदत केली. ती कायम सांगते dont do so much for people, you go extreme, they dont care. you dont understand. १८ वर्षाची ही मैत्रीण मला समजवायची जेव्हा जेव्हा सुरवातेला ती पाहयची माझी धडपड friend ना मदत करण्यासाठी असायची तेव्हा. ती एकदम चीडायची, you are big fool Manu, I am not asking you to be mean but dont be so giving.dont do so much cooking for them. etc etc
मी regret करत नसले तरी दुख मात्र होते. But I still have faith in what I do :-)


Kedarjoshi
Monday, April 09, 2007 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु खरच वाईट वाटले. तु घरी आधीच कळवायला हवे होतेस. जे नविन मित्र होतात (कॉलेज नंतर) ते सर्वच जिवाभावाचे नसतात. काही फक्त पार्टी करन्याचेच असतात.

लवकर बरी हो. आणी हो त्यांनी मदत केली नाही तरी तु दुसर्यांना मदत करने चालु ठेव. Take care .


Savyasachi
Monday, April 09, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह... वाचून वाईट वाटले. एक खरय की इथे आजारी पडल एकट असताना की खूप त्रासदायक ठरू शकते. तू मायबोली वर तुझी स्थिती का सांगितली नाहीस?
लवकर बरी व्हावीस अशा शुभेच्छा आणि मदत चालू ठेव. मदत नेहमी परतफ़ेडीची अपेक्षा न करता करावी.


Arch
Monday, April 09, 2007 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, कशी आहेस आता? एवढ सहन करेपर्यंत आमच्याशी काहीच बोलली नाहीस. खरच काही मदत हवी असेल तर जरूर सांग.

अग fair weather friends खूप असतात. असे अनुभव बर्‍याच जणांना येतात. जास्त विचार करून वाईट वाटून घेऊ नकोस. ह्यावरून काहीतरी शिकायला मिळाल असच समजून विसरून जायच.


Dineshvs
Monday, April 09, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, मायबोलीवर आव्हान करायला हवे होते. कुणीतरी नक्कीच काहितरी केले असते.
अगदी खरे मित्र आयुष्यात खुपच कमी भेटतात.
आता काळजी घ्यायची. एक अनुभव आला आणि शिकलो असे म्हणायचे. उगाच मनात कटुता ठेवण्यात अर्थ नाही.


Jayavi
Monday, April 09, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, अगं किती सहन केलंस गं... !! आता कशी आहेस? तू लिहिलेलं वाचून कसंतरीच झालं!! पण तुझा स्वभाव मला आवडला. लोक चांगले वागत नाहीत म्हणून आपण आपला चांगुलपणा का सोडायचा?
काळजी घे. आता कुठे असतेस?


Fulpakhru
Monday, April 09, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे मनु US मधे कुठे असतेस तु? इथे आजारी पडण्यासारखी दुसरी शिक्शा नाही. लवकर बरी हो. खरच तू मायबोलीवर सान्गायला हवे होतस. आणि fair weather friends आपल्याला खूप भेटतात. खरे मित्र मैत्रीणी मिळायला नशीबच लागत. आणि ते अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच मिळतात. कळजी घे आणि फ़ार विचार करू नकोस. आणि तुझा सुन्दर स्वभाव बदलू देउ नकोस. all the best. take care

Psg
Monday, April 09, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, तुला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा..
असे अनुभव येतात.. त्यातून शहाणं होत जायचं.. पण हेही आहे की 'मूळ स्वभाव जाईना' :-) काही दिवसांनी पूर्ण बरी झालीस की तुझी नेहेमीची धडपड सुरु होईल.. :-) अश्याच वेळा असतात जेव्हा 'आपली, हक्काची माणसं' ओळखू शकतो आपण.. परिवाराची साथ कधीच सोडू नकोस, आणि देवकृपेनी जीवाभावाचे मित्रमैत्रिणीही भेटतील तुला.. :-)
लवकर बरी हो, आणि इथे लिहायला लाग..:-)


Nandini2911
Monday, April 09, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे!... एवढं होऊनही घरी सांगितलं नाही,,, मला याचंच आश्चर्य वाटतय..
आणि हे फ़्रेड़सचे अनुभव मीही घेतलेत. त्यामुळे हल्ली कुणावरही विश्वासच टाकला जात नाही.


Sanghamitra
Monday, April 09, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू ज्यांना आजूबाजूला माणसं हवी असतात ना त्यांना नाहीच रहावत गं हे सगळं केल्याशिवाय. आणि अशा माणसांना संधीसाधू लोक बरोबर ओळखतात आणि वेळेला वापरून घेतात.
पण पन्नास साध्या मित्रांपेक्षा (इथे मित्र हा शब्द मित्र आणि मैत्रिणी दोन्ही अर्थी वापरलाय.) २ - ३ च अगदी जवळचे मित्र असलेले बरे. असो.
काळजी घे.


Bee
Monday, April 09, 2007 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manu, don't worry experience makes man perfect.

Zakasrao
Monday, April 09, 2007 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मनु,
आता तब्येत कशी आहे? अशावेळी मित्र मैत्रिणी यांची फ़ार वाट न बघता घरी सांगावं. तुला आलेला अनुभव वाइट आहेच . ह्यापुढे मदत करत जा पण कोण कसे आहे ह्याचा अंदाज घेवुन कर.
अगदी मदत करण्यासाठी जीवाच रान करायची गरज नाही. तुझे तिकडे कोणी नातेवाइक असतील तर लवकर contact करायला हवा अस मला वाटत.
काळजी घे. दिनेश दा बोलल्याप्रमाणॆ कदाचित जवळापासच्या मायबोलीकरानी मदत केली असतीच.एक लक्षात ठेव माय बोली हे कुटुंब आहे मदत हवी असेल तर माग पुढ बघायच नाही सरळ हाक मारायची.

Sheshhnag
Monday, April 09, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे! फारच मनस्वी अनुभव आहे तुझा. एवढा अपघात होऊनही घरी सांगितलं नाहीस? घरचे काळजी करतील म्हणून सांगितलं नसशील, पण अपघात झालाय म्हणून हिंट द्यायला हवी होतीस. Any way, take care आणि जगात जेवढे वाईट अनुभव येतात तेवढेच चांगलेही येतात, फक्त आपण ज्यांच्याकडून अपेक्षा करतो, त्यांच्याकडून मात्र चांगलेच अनुभव येतील याची ग्वाही देता येत नाही. तुझी प्रकृती लवकरात लवकर बरी होऊ दे ही इच्छा.

Gobu
Monday, April 09, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु,
फ़ार वाईट वाटले
तु लवकर बरी हो
माझ्या मनापासुन शुभेच्छा
बरेवाईट अनुभव माणसाला बरेच काही शिकवतात
आणि तुला कसलीही मदत हवी असेल तर नक्की कळव
आम्ही दुर आहोत पण मदत नक्की करु
शिवाय मायबोलिवर येत जा आणि लिहीत जा
लवकर बरी हो
माझ्या शुभेच्छा...



Swa_26
Monday, April 09, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, मनु, अगं काय हे? इतके सगळे होऊनही मायबोलीवर तु आता सांगतेस? असे नाही करायचे गं... सगळे एकटीने सहन केलेस यातच तुझा स्वभाव दिसून येतो, पण मग त्रास पण तुलाच झाला ना??

आणि असे अनुभव तर येतच असतात. आणि त्यातुनच आपण माणसे ओळखु शकतो.

आता कुठे आहेस पण?


Supermom
Monday, April 09, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू,
वाचून खूप वाईट वाटले ग.
आता कुठे आहेस? मला सांग. जवळ असलीस तर कळेल म्हणजे. आणि जी मदत लागेल ते सांग. संकोच करू नकोस. जवळ असशील तर भेटायलाच येईन मी. म्हणजे काहीही लागले तर सांगता येईल तुला.


Shonoo
Monday, April 09, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु
अगं इथे लिहायचंस की? आणि नोकरी का सोडलीस्- Long Term or Short Term Disability हे माझ्या माहिती प्रमाणे प्रत्येक राज्यात असतात. पगार नाही मिळाला तरी बेनेफ़िटस सगळे मिळतात आणि नंतर नोकरी वर परत जाता येते.

असो. झाले ते झाले.

अशा दिवसातच खर्‍या मित्र-मैत्रिणींची ओळख होते. आता कुठे आहेस? कशी आहेस? इस्ट कोस्ट वर असशील तर मेल करून कळव. पाहिजे तर काही दिवस माझ्या कडे रहायला ये. तेव्हढाच बदल झाला तर तुला बरं वाटेल.


Mrinmayee
Monday, April 09, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, आता कशी आहे तुझी तब्बेत? एकटीनं इतकं कसं सहन केलंस? नोकरी सोडावी लागली तेव्हा तुझ्या विसाचा प्रॉब्लेम झाला का?
तुझ्या प्रोफाइल मधल्या झिप कोड प्रमाणे तु आधी एडिसनला रहात होतीस असं दिसतंय. आता कुठे आहेस?
इथे आम्ही मायबोलीकर तुझ्या मदतीला तयार आहोत. खरंच काय हवं नको ते नि:संकोचपणे सांग.
दुर्दैवानं कुणाला येऊ नये असा कटु अनुभव तुला आला. पण सगळे मित्र सारखे नसतात!


Maitreyee
Monday, April 09, 2007 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, लवकर बरी हो. पात्रता असल्यावर जॉब पुन्हा मिळेल च. मी पण इथे सगळ्यांनी लिहिलेय तेच लिहिणार होते, मायबोलीवर आधी लिहिले असते तर नक्की काही ना काही मदत मिळाली असती बघ तुला. असो.
तुला शुभेच्छा!


Manuswini
Monday, April 09, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांच्या प्रेमाबद्दल खुप आभारी आहे. साईबाबां शप्पथ मला खुप भरुन आले हे वाचुन. ह्या सर्व त्रासात मी साई बाबांचा खुप धावा केला.

एक प्रश्ण मनाला सतत पडला, मी कधीही कोणाला त्रास दीला नाही,दुखःवले नाही,उगीच कारण नसताना उणे दुणे बोलत नाही, तेव्हा मला असे का झाले ह्याचाच त्रास ज्यास्त झाला.
मी सहसा माझी दुख, त्रास स्वःताशी ठेवते. घरी सांगितले तर खुप काळजी करतील, विषेश्तः आई ज्यास्त. खरे तर सर्वच. आणी मी नेहमी travelling करायचे friday-saturday नोकरीसाठी. माझा base Santa Clara, CA असला तरी east coast Vs west coast असे travelling accident नंतर शक्य न्हवते. खुप द्ख झाले चांगली नोकरी सोडावी लागली. I work as consultant( Contract basis) मग काहीच option न्हवते. इथे तर तुम्ही मरा, त्यांची कामे मन लावुन करा पण हेच गोरे लोक We are sorry to hear about your accident but cant grant so much vacation , काम तर करु शकत न्हवते. पोटात अन्न टिकत न्हवते सतत Acidity antibiotics खावुन. office मधील म्हणाले work from home पण शक्यच न्हवते.माहीत नाही चुक केली की बरोबर नोकरी सोडुन.
भाऊ, बहिण माझी अवस्था बघुन अस्वस्थ झाले. केस गळले, सुरवातीला वजन कमी झाले पण अचानक steriods injections ने Water retention , नको तेव्ह्ढे Antibiotics,painkillers .

खरे तर मी घरच्या लोकांना जुजबी माहीती दीली की अशीच पडली. पण आईला मात्र सारखे धस्स होत होते. मी न सांगता ही तीचेच फोन यायचे आणि मी शेवटी सांगीतले. त्या दरम्यान आईला आपोआप झोप न्हवती. काहींना काही करणावरुन ती बैचैन होती. बहिण सारखे फोन करत होती, तीला काहीतरी Wrong आहे माझ्यामध्ये जाणवत होते. अजुनही आईला पुर्ण खरी माहीती दीली नाही की accident झाला म्हणुन. तीचा हाच प्रश्ण एवढे कसे काय शक्य आहे तु नुसती पडुन जख्मी व्ह्यायला? हात का numb होतो मधुन मधुन वगैरे वगैरे?

anyways आता मी बहिणीच्या घरी आहे Washington DC .
तीन महिन्यापुर्वीच india ला जायला ticket काधले होते. पण ते cancel केले. आता येत्या शनीवारी भाऊ, मी आणी बहिण असे एकत्र जातोय मुंबईला. hoping, it happens .
ह्या अपघातानंतर खुप negative think करते. सतत भीती वाटते काहीतरी होईल म्हणुन पण भाऊ, बहिण, आई,पप्पा ह्याच्यां शब्दावर विश्वास ठेवुन आहे.

तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

ही मायबोलि मला खुप मदत करते. कीतीतरी वेळा मला बरे वाटले इथे येवुन.
एक दोन महिन्याने पुन्हा तेच चक्र... पुन्हा नोकरीच्या शोधात.........
इथे आजारी पडु नये नी डॉकटरचे तोंड बघायला लागु नये हेच फक्त आता ध्येय. खरे तर मी mentally थकलेय आता physically हळु हळु बरी होतेय.
Thanks to all once again


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators