Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 16, 2006

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Majhe dukh » Archive through November 16, 2006 « Previous Next »

Smi_dod
Monday, May 22, 2006 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनिया, वाईट वाटले वाचुन... पण अश्या गोष्टी घडतात ग आयुष्यात.. बोलणे सोपे आहे.. त्यातुन निभावणे कठिण... पण खरच तु स्वत:ला कुठेतरी गुंतव काही दिवस जवळ्च्या नेहमीच्या लोकांना भेटु नकोस त्या मुळे धरलेली खपली परत निघते... परदु:ख शितल असते.. असे नाही पण दुसरे दु:ख मी बघीतले आहे.. काळासारखे दुसरे ओषध नाही.धीराने घे.. मायबोली वर येत जा.. सगळे बी.बी. बघ तुझ्या आवडीचा विषय बघ मन गुंतव...

Bee
Monday, May 22, 2006 - 8:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतक्या दुःखाच्या घडीला लोकांनी सोनियाला विनोदी पुस्तक वाच किंवा विनोदी सिनेमा बघ असे सुचवावे म्हणजे त्या लोकांचे ज्ञान गडगंज आहे..

smi_dod तुमचे अगदी बरोबर आहे. म्हणने सोपे आहे पण अखेरीस ज्याचे त्यालाच निभवून न्यावे लागते.


Dhani
Monday, May 22, 2006 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i agree with smi..दुसरे आधार देतलीच पण उभे तुम्हालाच रहायचय सोनिया..

Moodi
Monday, May 22, 2006 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनिया मीनूला तुझे दुख जाणवलय त्यामुळे ती म्हणतेय ते खरे आहे. परिस्थितीतुन बाहेर निघण्यासाठी अन तब्येत सुधारुन शारीरीक व मानसीक दोन्ही जखमा भरुन निघण्यासाठी विनोदी साहित्य वाच, छंदात, नोकरीत मन गुंतव. काळ हाच सर्व जखमांवर इलाज असतो, तोच मलम लावु शकेल.

बाहेर मोकळ्या हवेत फिरायला जाणे, आजूबाजुच्या निसर्गाशी ओळख करुन घेणे हे पण औषध आहेच.

देवावर अन स्वतःवर विश्वास ठेव. सर्व व्यवस्थीत होईल.


Dineshvs
Tuesday, May 23, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आहे मनन. सोनिया, रोज संध्याकाळी याला फिरवुन आणल्याशिवाय माझा आणि त्याचाहि दिवस पुर्ण होत नाही.
मग त्यानंतर दु : खाला मनाचे दरवाजेच बंद झालेले असतात.

mn

Moodi
Tuesday, May 23, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा दिनेश!! मनु एवढा मोठा झाला का? मागे फोटोत बघितला तेव्हा कुक्कुला होता की. आता आम्हा सर्वांच्या वतीने त्याला गोड पापा.

Megha16
Tuesday, May 23, 2006 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनीया तुला सगळ्या योग्य ते सांगीतले आहेच. दिनेश दा नी तर तुला फोटो सहीत उदाहरण पण दिलय बघ. जितक्या लवकर तुला सावरता येईल तितक सावर. काही २ आठवड्या पुर्वी माझ्या मैत्रीणीला असाच अनुभव आला ती खुप खचुन उदास झाली होती. आम्ही तिच मन दुसरया गोष्टीत वळ्वण्याचा प्रयत्न पण केला पण तिला या मधे तिच्या नवरयाने खुप मदत केली. तुही शक्य तितक्या लवकर बाहेर पड फिरायला जा, पुस्त्के वाच नवरया सोबत गपा मार. याने तुला खुप छान वाटेल.

बी,मला तुला एक सांगावस वाटत की, तु शब्दाचा गोंधळ करु नकोस, वाक्याचा वेगळा अर्थ लावु नकोस. कळत नसेल तर २-३ वाच.


Sunflower
Wednesday, May 24, 2006 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा तु म्हणत आहेस ते बरोबर आहे. मला सुद्धा मज़्या नवरयानी खुप जपले. He is a wonderful husband. हे मला खुप प्रकर्शाने जणवले. आणि तुम्हि सगळे म्हणत आहत ते आगदी बरोबर आहे दुसरी कडे कुटेतरी दुसरी कडे मन रमवायला हवे. मला अगदि पटतय ते.मी तसे करण्यच प्रयत्न करिन.
thanks सगळन्चे.


Sunidhee
Thursday, May 25, 2006 - 6:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sunflower तुझ्यावर आलेल्या प्रसंगाची कल्पना पण करवत नाही, तरीही तुझ्या जागी स्वत:ला ठेवले असताना मला दिनेश नि लिहिलेले पटले.. जर तुझी इछ्छा आणि शक्य असेल तर अश्या तान्हूल्याला प्रेम दे की ज्याला प्रेमाची गरज असेल.. कदाचीत लवकर मनाला शान्ती मिळेल...

दिनेश, तुमचि हरकत नसेल तर एक विचारु का? हा मनन कोण हो? किती गोड आहे. आणि नाव पण सुरेख आहे. सान्गायची अजीबात जबरदस्ती नाही. जर तुम्हाला माझे विचारणे आवडले नाहि तर मी हे काढुन पण टाकीन.



Dineshvs
Friday, May 26, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनीधी,
हा मनन माझा शेजारी. अगदी गोड आहे. आता सव्वा वर्षाचा झालाय. माझ्या अंगाखांद्यावरच वाढलाय.
तो जवळ असताना मी रस्त्यात कुणाशीहि बोललेले त्याला आवडत नाही. मोबाईलवर पण मला बोलु देत नाही.
त्याची मातृभाषा कच्छी. पण त्याला मराठी, हिंदी, कोकणी, ईंग्लिश, कच्छी आणि गुजराथी सगळ्या भाषा कळतात.
त्याचे आई बाबा ऊशीरा येतात, त्यामुळे तो माझ्याचकडे असतो.
आणि मला यात न आवडण्यासारखे काय आहे. एवढासा मनन मला घाबरत नाही, आणि बाकि सगळ्याना माझा दरारा वाटावा हे काहि बरे नाही बॉ.
मी सहसा कुणावरच चिडत नाही. त्यामुळे मला काहिहि विचारायला हरकत नाही.


Sunidhee
Friday, May 26, 2006 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks दिनेश.. :-) हुशार दिसतोय पोट्टा. मुले देवाघरची फुले..
नाही नाही तुमचा दरारा म्हणुन नाही पण दत्तक वगैरे असेल तर काही जण उघड करत नाहीत, म्हणुन जरा... आणि तुम्ही चिडत नाहीत ते मायबोली ची नियमीत वाचक असल्याने मला माहीत आहे.. :-)


Radha_gd1
Monday, July 24, 2006 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dear neera and soniyaa ,
this is first time i have come on this bb.i read all the archives. here by mentioning that after so many days i dont want to hurt u.but as i felt some soft corner for both of u ,i want to send something for u.

http://www.123greetings.com/general/cheer_up/cheer5.html

http://www.123greetings.com/general/cheer_up/cheer7.html

असं म्हणायंचं कि जेंव्हा एखादि गोष्ट आपल्या मनासारखी होते तेंव्हा छान आणि आपल्या मना विरुद्ध होते तेंव्हा अजून छान

Lots of Good Wishes and Support from All Maaybolikars

Radhika

Nandini2911
Wednesday, November 15, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

recently I have gone through a very bad relationship. My parents are aware of it and they have seen my trauma diring that period.
म्हणून मी नवीन नोकरी धरली. मी एकटी रूम करून राहणार असे ठरलं/..
मी जॉईन व्हायच्या आदल्या दिवशी शामिकाचा फ़ोन आला..
ती माझ्याबरोबर कोलेजला होती.. आमची काही फ़ार घनिष्ट मैत्री नव्हती. पण एकमेकीना व्यवस्थित ओळखत होतो.. लहानपणी तर एकाच गल्लीत राहयला होतो. तिला पण जॉब लागला होता. आणि माझे आणी तिचे ऑफ़िस हाकेच्या अंतरावर होते. तिलाही रूमची गरज होती. मी 1 BHK flat rent केला होता. चल एकत्र राहुया म्हटले..
ज्या दिवशी मी जॉईन झाले त्याच दिवशी ऑफ़िसला एक मुलगी जॉईन झाली.. अमरावतीवरुन आली होती..
computer engineer नंतर तिला कळलं की, मी रूम करून राहते. मला विचारलं मी पण येऊ का? मी वीचार केला की जाऊ दे.. तिच्या घरची परिस्थिती खास नाही... आपली तेवढी सोबत होईल.. कारण शमीचा शेड्युल खूप विचित्र अस्ते...
ही मुलगी आली रहायला.. आल्या आल्या तिने माझे आणि शमीचे सामान बेडरूममध्य्य हलवले.. आणी स्वत्:चे सामान तिथे लावले.. हे आम्हाला आवडले नाही... तिचे म्हणणे होते की ती हॉलमधे झोपेल. पण कशाला दोन फ़ेन लावायचे? म्हणून अम्ही तिल बेडरूममधे झोपायला सागितले..
हिने मला सागितले की तिला सगळा स्वयम्पाक येतो.. प्रत्यक्षात तिला साधी फ़ोडणीचा भात ही नीट करता तेत नाही... बर काही साग़ायला गेले तर लगेच मअणते की कोकणात तशी पद्धत असेल... आम्ही असेच करतो..
रोजच तिचे नवीन उद्योग सुरू झाले किती सागितले तरी ऐकायची नाही.. वर आम्हालाच उलट बोलायची..
माझ्या ग्रुपने ठरवले की माझ्या रूमवर जमून धमाल करायची... मी या दोघीना सागितले,, की असे ठरत आहे.. लगेच हिने objection घेतले,, मुले तेणार मग ते रात्रभर थाबणार.. मला याही सवय नाही.. मझ्या घरी चालत नाही, मी म्ह्टले ठीक आहे तू एक दिवस्स नातेवाईकाकडे जा.. पण नाही...
जाऊ दे..
पण गेल्या आठवड्यापसून तिने कहर केला.... शेवटी तिला रूम सोडून जायला सागितले.. काल रात्री तिने सामान नेले.
माझा प्रश्न असा आहे.. की आता ही मुलगी कशी राहील.. मी तिला समजावले की तू तुझे वागणे सुधार नाहीतर तुला सगळीकडे तुला त्रास होईल.. मला म्हणाली की नाही त्रास होत.. confirm म्हणजे हिने काय मला छळायचा मक्ता घेतला?
शमीसुध्हा खूप वैतागली, हिला आम्ही शिकवायचा समजावयाचा आटोकात प्रयत्न केला... पण उपयोग नाही,,,, खायचे बोलायचे manners शिकवले.. मला स्वत:ला लहान बहीण नाही.. म्हणुन मी हिला इतका जीव लावला तर हिने अशी परतफ़ेड केली... दारातल्या कुत्र्याला जर माया केली तर ते जीव लावते मग माणुस का असे वागतो? जर माझे चुकत असेल तर मी करायला तयार आहे. पण माझे चुकले काय?



Rahul_1982
Wednesday, November 15, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


कुठे काय चुकले आहे?
काहीही नाही. (असं मला वाटतय)
तुम्ही दोघींनी तुमचा निर्णय सांगितला, आणी तीने तीचा निर्णय घेतला, (निर्णयावर कोणाचेही बंधन नसते) जर ती
challenge accept करुन घराबाहेर निघाली आहे, आणी तीला स्वत:वर पुर्ण confidence आहे. तर it's good तिचे चांगलेच होइल.
Otherwise ती पुन्हा येइल तुमच्याकडे.
आणी कदाचित त्या वेळेस तिच्या वागण्यात बदल असेल
Don't worry.

Nandini2911
Wednesday, November 15, 2006 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती परत आली तरी आता आम्ही घेणार नाही,, प्रश्न तिला जा हे सान्गण्याचा सुद्ध नाही.. ती ऑफ़िसभर सागत सुटलेय की मी तिला खूप त्रास देत होते. she has also stasrted spreading stories about my character. she is fully aware what I have faced, yet she is spreading baseless stories.
दु:ख तिच्या जाण्याचे नाही. तिच्या क्र्रुतघ्नतेचे आहे.


Dineshvs
Wednesday, November 15, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, मुळात अपेक्षाच का धरायची ? मुळात ज्याला कळतच नाही कि आपले काहितरी चुकतेय त्याला सुधारायचा प्रयत्नच करु नये.
आता राहता राहिला प्रश्ण तो कांगावा करण्याचा. त्याने काय बिघडते ? कुणाकुणाला स्पष्टिकरण देणार ? प्रत्येकाला सत्य सांगण्याईतका वेळ आणि उत्साह आहे ? लोकाना काय दोन्हीकडचे ऐकुन घ्यायला मजा वाटते. ईथे लिहुन मन मोकळे झाले ना, मग तो विषय संपला. आता वेगळे झालाच आहात. भीडेखातर राहु दिले असते तर किती त्रास झाला असता ?
अनुभवाने शहाणे व्हायचे. दुसरे काय ?


Zakki
Wednesday, November 15, 2006 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असा अनुभव दोन तीनदा आला आहे, खरे तर माझी नोकरी गेली त्यामुळे. नि आधी पण काही चांगल्या संध्या हातच्या गेल्या. मित्रांमधे सुद्धा माझ्या बद्दल इतकेदा एकजण खोटे बोलत असे की माझे काही काही मित्र ते खरे मानू लागले. जर मी वेळच्यावेळि तिथल्या तिथे त्या व्यक्तिंना चूप बसवले असते तर बरे झाले असते. पण मी पण आपला असेच समजत होतो की तो जरी खोटे बोलला तरी मला लोक ओळखतात, ते ऐकणार नाहीत. पण तसे काही झाले नाही!

तर शक्य असल्यास त्या व्यक्तीला वेळीच चार चौघांसमोर दम द्या नि ते बंद करा नाहीतर पोलीसात देईन अशी धमकी द्या!


Disha013
Wednesday, November 15, 2006 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर असा मस्त दणका घेतलाय so called मैत्रिणीचा,की त्यानंतर कोणाही मुलीवर विश्वास बसायचा नाही पटकन.....फ़ार मन्स्ताप ज़ालेला...त्यावेळी आईने समजावले होते,सगळेजण सारखे नसतात.... अशा अनुभवातुनच शिकायला मिळते....शहाणी होशील अजुन
आता असे कोणी भेटले की सरळ म्हणते'जा उडत!किती तो ताप करुन घ्यायचा डोक्याला?....का किंमत द्यावी अशा लोकांना?


Asmaani
Wednesday, November 15, 2006 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

you r right dishaa , माझी पण अग्दी recently एका मैत्रीण म्हणवणारीकडून फसवणूक झाली. मी एका व्यक्तीबद्दल काही असभ्य बोलले असे तिने खोटेच पसरवले. ते प्रकरण नुकसान करु शकले असते पण सुदैवाने ज्या व्यक्तीबद्दल पसरवण्यात आले ती व्यक्ती समजूतदार असल्याने पुढचे कटू परिणाम टळले.

Arundhati_s
Thursday, November 16, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्डळि, मि मायबोलि वर नवीन आहे. चुकल तर साम्भाळुन घ्या. नन्दिनि, मि ५ वर्ष पेइन्ग गेस्ट राहिले आहे. बर्याच मुलि असतात अशा, आपलच तेच खरा समजणार्‍या.
मि पण चुप रहायचे पण आपण गप्प बसलो ना कि अशा लोकाना वाटत कि आपण वीक आहे. म्हणुन अजुन जास्त त्रास देतात.
एक दिवस सन्धि साधुन तिला २-४ लोका समोर शान्त पणे, पण स्पष्ट शब्दा मधे सान्ग, कि हे पोरखेळ थाम्बव. आता आपण बरोबर रहात नाहि. आता आपला काहि सम्बन्ध नाहि. तु ४ लोका मधे तिला बोलु शकते हे तिला समजला ना कि ति आपच शान्त बसेल.

आपण शान्त रहिलो ना कि ते आपल्या च मनाला खात रहाता कि चान्गला वागुन सुद्धा आपल्यालाच त्रास झाला म्हणुन.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators