|
ही मुलगी जेव्हा आली तेव्हा तिला लोकलमधे कसे चढायचे हे सुध्धा ठाऊक नव्हते... आणि आता मला सागते की मी मुम्बईत कशीही राहीन.. कधी कधी मला तिची काळजी वाटते... मला मुम्बई हे काय जगल आहे त्याची पूर्ण कल्पना आहे.. न जाणो उद्या काही झाले तर लोक मलाच म्हणतील की हिने बाहेर काढले आणि असे झाले.. आतापण कितीतरी जण तूच थोडे adjustment कर म्हणून सागतायत...
|
काय होता, बरेच लोका घरा बाहेर तर पडतात, नोकरि च्या किन्वा शिक्षणाच्या निमित्ताने. पण बाहेर रहाण्या चि मॅचुरिटि आलेलि नसते. घरि आपले आई वडिल आपल्या चान्गल्या वाईट गोष्टि ऍड्जेस्ट करुन घेतात. बाहेर तसा होत नाहि म्हणून मग असा काहितरि वागतात. तु तिचा एवढा विचार नको करु. बाहेर च जग बघेल तेन्व्हा समजेल आणि आपच सुधारेल. Don't worry. Such girls know how to take care of themselves.
|
बरोबर आहे.. मी काळजी करून तरी काय होईल,, मात्र आता कानाला खडा.. नव्हे भला मोठा धोन्डा.. आता कुणाला मदत करायच्या फ़न्दात पडायचे नाही.. तुमच्या सगळ्याच्या advice साठी मनापासून धन्यवाद..
|
Lopamudraa
| |
| Thursday, November 16, 2006 - 11:29 am: |
| 
|
आता कुणाला मदत करायच्या फ़न्दात पडायचे नाही.>>>>> . अस नको करुस.. नंदिनी.. (खर सांगु तुझ्याकडुन ते होणारही नाही परत कोणी अडचणीत दिसले की आपण मदत करतोच) मि सुध्धा.. college ला असतांना एकिला.. खुप मदत केली. तीची fee भरण्यापासुन सगळ्या.. notes पुरवणे.. परिक्षेला.. माझ्याघरी ठेवुन घेणे.. ई..ई बरच काही पण शिक्षण झाले.. आणी तीने.. नंतर ओळख द्यायचेही नाकारले.. कारन काय तर तीला.. पुर्वीचे तीचे वाईट दिवस आठवायचे नाहियेत म्हणुन पुर्विच्या सगळ्यांना विसरुन जायचेय समोरुन जाउन ती हसत सुध्दा नसे.. नंतर तीचे एक एक प्रताप कळल्यावर मालाच तीच्यापासुन सुटका.. झाल्यासारखे वाटले. तेव्हा मी सुध्दा कुणाशीच मैत्री करायची नाही असे ठरव्ले.. होते पण तस. झाल नाही मी पुन्हा..मैत्रीनी जमवल्या आणि पुन्हा काही धक्के पण खाल्ले आणि.. काही कायमच्या.. जोडल्या. अग.. आयुश्यात असे प्रसंग येतातच काही जण कृतघ्न तर बर्याचदा.. असा पण अनुभव येतो की आपल्याला.. काहीजण मदत करुन निघुन जातात आणि त्यांना त्याबदल्यात आपल्याला काही द्यायची संधी सुध्दा येत नाही.. आपण फ़क्त त्यांच्या मदतीची आठवण काढत राहतो... देवाने.. असाच balance केलाय लोकांच्या.. स्वभावाचा..
|
लोपमुद्रा म्हणते ते एकदम बरोबर आहे. एक व्यक्ति वाईट भेटलि म्हणुन सगळ्याच व्यक्ति वाईट नसतात काहि. थोडस विषयन्तर होता आहे पण लोपमुद्रा, तुझा नाव फ़ारच सुन्दर आहे. Beautiful name 
|
Dineshvs
| |
| Friday, November 17, 2006 - 5:04 pm: |
| 
|
लोपा आणि नंदीनी आपण यावेळी आपल्या धर्म आठवायचा. म्हणजे मा फलेषु कदाचन. कोणाला मदत करावीशी वाटली तर अगदी स्वार्थीपणे करायची, म्हणजे स्वतःला मिळणार्या आनंदाखातर केवळ. अजिबात कसलीच अपेक्षा न ठेवता. सगळीच वाया जाते असे नाही, पण जे परत मिळते त्याची अपेक्षाच न ठेवल्याने जास्त आनंद मिळतो.
|
मला तुमचे म्हणण अगदी मनोमन पटतय... खरे सागू,, मी हे सगळे इथे लिहिल्यापासूनच मला बरे वाटत आहे. thanks for all your help
|
Ria
| |
| Wednesday, November 22, 2006 - 5:21 pm: |
| 
|
मला कोणाशी तरी खुप बोलाव असे वाटते, पण मी माझ्या मनातलं कोणाशीही बोलु शकत नाहि...पण मला आज वाटले कि इथे कहि बोलावे बरे वाटेल... तशी मी खुप शान्त आहे पण आजकाल मी खुप चिडचिडी झाली आहे मी माझ्या नवराचे काहि अईकतच नाही.तसा तो शान आहे पण मला प्रत्येक वाक्यावर राग अच येतो.मला महित आहे माझे चुकते पण मी काय करु?
|
Apurv
| |
| Wednesday, November 22, 2006 - 6:15 pm: |
| 
|
Hi Ria माझे पण मध्यंतरी असेच झाले होते, माझ्या हिच्यावर फार राग येत असे, ती काही करेल, काही बोलेल, सगळ्यावर मी चिडत असे, ती खूप चांगली आहे, नंतर मला जाणिव झाली की मला तिला दुखवायचा काही अधिकार नाही आहे, जर ती शांत राहून प्रेमाने सगळे सहन करत आहे तर तिल दु:ख देउन काय मिळणार, या उलट मी सुद्धा तिला तेवढेच प्रेम दिले तर आयुष्य किती आनंदी होइल. दुसर्याच्या दु:खाची जाणिव आपल्याला झाली, आणि त्याला सुख द्यायचे ठरवले तर राग यायला वेळ कुठे मिळतो,स्वत:चा राग दुर करत बसण्यापेक्षा त्याला खुश करण्याचा प्रयत्न कर, राग आपणहूनच जाईल. मग त्याला सांग की त्याच्या कुठल्या गोष्टिंचा तुला राग येतो, म्हणजे तो त्या करणार नाही. एकदा मनावर जखम झाली की ती भरून यायला बराच वेळ जातो हे लक्षात ठेव. Good Luck! Happy Thanks Giving !!!
|
Ria
| |
| Monday, December 04, 2006 - 5:52 pm: |
| 
|
अपूर्व, sorry for late reply thanks a lot for ur reply तुमचा reply वाचून माझ्यात बराच फ़रक पडला. once again thanks
|
Grihini
| |
| Wednesday, December 06, 2006 - 4:16 pm: |
| 
|
रिया तुझ्या अश्या वागन्याचे कारण तु शोधावेस असे मला वाटते, कधी कधी आप्ल्यासाठी नवर्याला वेळ देता येत नसेल तरी असे होते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|