|
जुने चित्रपट विषेशत्: black and white जमान्यातले तसेच नंतरचेही ज्यांनी पाहिलेले असतात त्यांच्या मनात ते कायमचे घर करुन बसतात. अशा चित्रपटांच्या आठवणींमधे रमणे हा त्यांच्यासाठी एक सुखद अनुभव असतो. नव्या पिढीला हे चित्रपट सहजी बघायला मिळतीलच असे नाही. अशा काही मनात घर करुन बसलेल्या चित्रपटांच्या कथा तरी निदान सर्वांपर्यंत पोचाव्यात असे वाटते. इंग्रजी चित्रपटांच्या कथा लिहिलेली पुस्तके सहज उपलब्ध असतात. परंतु हिंदी चित्रपटांच्या बाबतीत अगदी क्वचित पूर्वी शांताबाई शेळके किंवा हल्ली विजय पडाळकर, शशिकांत किणिकर सोडले तर निदान मराठीत तरी कोणी ह्या दृष्टीने फारसा प्रयत्न करीत नाहीत. लक्षात घ्या हा बीबी film appreciation चा नाही. कारण नाहीतर मग सर्वच अंगाने चित्रपटांचा विचार करावा लागेल शिवाय सर्वांना ते जमेलच असेही नाही. तरीपण कथेच्या ओघात दिग्दर्शक, संगीत, छायाचित्रण, अभिनय ह्या बाबतीत काही सांगता येणे शक्य असेल तर जरुर सांगावे. पण शक्यतो संपूर्ण कथावस्तू आधी मांडली जावी. बिमल रॉय हे माझे अत्यंत आवडते दिग्दर्शक. ह्या बीबी चे ओपनिंग मी त्यांच्या दोन चित्रपटांच्या कथांनी करु इच्छीते. सुजाता, उसने कहा था, आणि तिसरी जमल्यास बंदिनी. जास्तीत जास्त जणांनी आपली माहिती इथे शेअर करावी ही वनंती.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 26, 2006 - 5:36 pm: |
| 
|
शर्मिला, मला उसने कहा था, या सिनेमाबद्दल खुप उत्सुकता होती. लता तलतचे, आजा रिमझीमके ये प्यारे प्यारे गीत लिये हे गाणे त्यातलेच आणि लताचे, मचलती आरजु हे पण त्यातले. हे दुसरे गाणे मी कधी बघितलेच नाही. नंदावरच चित्रीत झालेय का ते. आणि बंदीनी तर माझा खुप प्रिय चित्रपट, हि कथा लिहुन झाली कि त्यावरचा एक किस्सा लिहिन मी.
|
Junnu
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:53 pm: |
| 
|
वाह शर्मिला, मस्त लिहिल आहेस. एवढं सगळ कस काय आठवत तुला? मला इतक्या सार्या details लिहिता येतील का ह्याचि शंका वाटते, पण प्रयत्न करेन वेळ होईल तेव्हा.
|
Moodi
| |
| Thursday, July 27, 2006 - 8:37 pm: |
| 
|
वा शर्मिला. मस्त सुरुवात. खरे तर मध्ये प्रतिक्रिया देऊन तुझी लिंक तोडायची नव्हती. पण रहावलेच नाही. नूतन तर अभिनयसम्राज्ञीच. बरोबर लताचा अमृततुल्य आवाज, अहा! सचिनदांबद्दल काय बोलावे. लता अन किशोरला खरेच भाग्य लाभले. एकेक गाणी अजरामर झालीत. पुढे जमल्यास वहिदा,राजेशचा खामोशी, नूतन अन बलराज सहानींचा सीमा, गुरुदत्त चा आरपार किंवा देव आनंदचा बंबईका बाबू यावर लिहीशील का? अर्थात आधी तुझी ही लिंक पूर्ण होऊ दे. 
|
Dineshvs
| |
| Friday, July 28, 2006 - 4:06 pm: |
| 
|
मी लिहिणार होतो तो किस्सा असा. त्याकाळी धर्मेंद्र नवा आणि त्या काळच्या मानकाप्रमाणे देखणा होता. नायिका त्याचा स्वीकार न करता, अशोक कुमारकडे जाते, हे अनेकजणाना पटत नव्हते. पण बिमल रॉय म्हणाले, शेवट तसा केला तर बंदिनी या नावाला काहि अर्थ राहणार नाही. शेवटच्या प्रसंगात स्टीमर सुटता सुटता, नुतनचे त्या अरुंद फ़ळीवरुन धावत जाणे, अजुनहि लक्षात आहे. या सिनेमातली आणखी एक खास बात म्हणजे आनंदी गाणी लताला आणि दुःखी गाणी आशाला दिली आहेत. ओ पंछी प्यारे सांझसकारे, बोले तु कौनसी बोली, बता रे हे गाणे चित्रीकरणासाठी पण बघावे असे आहे. यात पार्श्वसंगीत म्हणुन पाखडणे, झाडलोट यांचे आवाज वापरले आहेत. आणि अबके बरस बद्दल तर बोलायलाच नको.
|
एक सुंदर उपक्रम शर्मीला.
|
Sashal
| |
| Friday, July 28, 2006 - 10:23 pm: |
| 
|
खरंच सुंदर उपक्रम .. मी ही आताच तीन अतिशय सुंदर पिक्चर्स बघितले .. पण ते एव्हढे जुने नाहित .. अनुभव, आनंद आणि स्वामी .. ह्या (जुन्या) चित्रपटांचं माझ्या दृष्टीने महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची simplicity .. मला जमलं तर मी आनंद विषयी लिहायचा प्रयत्न करेन ..
|
दिनेश, केदार, मुडी, सशल, जुन्नू आणि इतरही जे वाचत असतील त्यांना मनापासून धन्यवाद. आपल्या मर्मबंधात जो चित्रपट स्थान मिळवून बसलेला असतो त्याबद्दल लिहिणे हाही एक सुखद अनुभव ठरतो. प्रत्येकनेच जास्तीतजास्त चित्रपट कथा इथे मांडले आणि त्या चित्रपटांबाबतचे किस्से, आठवणी, माहिती शेअर केली तर classic गणल्या जाणार्या चित्रपटांचा एक छान nostalgia treasure चं इथे तयार होईल. मुडी तु उल्लेखलेले चित्रपट all time favourites आहेत. खामोषी आणि बंबईका बाबू वर मी जरुर लिहीन. तु सुद्धा लिहायचा प्रयत्न कर. दिनेश तुम्हाला तर ते सहज शक्य आहे. अर्थात हे खूप वेळखाऊ(?) काम आहे त्यामुळे मनात असूनही अनेकांना contribute करता येणार नाही ह्याची कल्पना आहे. माझ्यासुद्धा मोठमोठ्या गॅप्सच पडणार आहेत लिहिण्यात. सशल 'अनुभव' वर लिहिताना बासु भट्टाचार्यांच्या संपूर्ण त्रयी बद्दलच लिही ना! अनुभव आविष्कार आणि गृहप्रवेश. स्त्री पुरुषांच्या संबंधांमधील विशेषत्: पती पत्नी नात्यामधले बारकावे, संवादविसंवादाचे कळतेनकळते सूर बासुदांनी अगदी समर्थपणे टिपले आहेत. शेवटी बासु भट्टाचार्य म्हणजे बिमलदांचेच शिष्य (जे पुढे त्यांचे जावई बनले).
|
Psg
| |
| Saturday, July 29, 2006 - 10:58 am: |
| 
|
वा! छान लिहिलय. शर्मिला तुझी शैलीही ओघवती आहे. मस्त वाटलं वाचून. असच लिहत रहा
|
Deemdu
| |
| Monday, July 31, 2006 - 6:43 am: |
| 
|
शर्मिला मस्तच लिहीत आहेस. लगे रहो. काही काही वेळा वाचताना अगदी तो चित्रपट समोर बघत आहोत किंवा आत्ताच्या आत्ता बघावा अस वाटलं
|
Maudee
| |
| Monday, July 31, 2006 - 9:43 am: |
| 
|
शर्मिला छान लिहिलयस. बंदिनी मी बघितला नाहीये पण त्यातली गाणी अतिशय सुंदर आहेत. बघुयात कधी योग येतोय बघायचा तुझी पोस्त वाचून उत्सुकता आणख़ी वाढलीय.
|
Junnu
| |
| Wednesday, August 02, 2006 - 6:19 pm: |
| 
|
माऊडी, कधी पुर्ण करणार story ?
|
कुंकू हा चित्रपट मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत आहे. त्या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण सुध्दा एकत्रच होत असे. व्हि शांताराम यांची एक फोटोबायोग्राफी आहे यात त्यांनी या चित्रपटाविषयी आठवनी सांगीतल्या आहेत. पोस्ट करायचा मुख्य मुद्दा हा की त्या काळी मराठी चित्रपटांवरुन हिंदी चित्रपट तयार व्ह्यायचे.(आज तामीळ, तेलगु वरन होतात). कालोघात मराठी चित्रपट पाहाने कमी झाले. सामना, शेजारी, सांगत्ये ऐका, झालच तर यशवंत देवांचा सरकारनामा असे चित्रपट मराठीतील क्लासिक आहेत परत असे चित्रपट निर्मान होतील का?
|
Soha
| |
| Thursday, August 03, 2006 - 7:06 am: |
| 
|
कुंकु चित्रपटात नीरा आणि तिचा नवरा यांच्यात काही झटपट होते किंवा ती त्यांना मारते असा प्रसंग मला आठवत नाही. ती निजण्याच्या खोलीचे दार आतून लावून घेते. केशवराव तिला कडी उघडायला सांगतात. तर ती त्यांना धमकी देते की, "ह्या खोलीत एक दिवा आहे. त्यात तेलही भरपूर आहे. मी पूर्ण घरची होळी करीन."
|
Maudee
| |
| Monday, August 07, 2006 - 6:41 am: |
| 
|
सोहा, मी कुंकु तसा बर्याच वर्षापुर्वी बघितला आहे. पण तरी तो मनात घर करुन राहिलेला चित्रपट आहे. मला स्वतःला तो प्रसंग बघताना फ़ार tension अलं होतं. पण तरिही मी परत एकदा ख़ात्री करुन त्याबद्दल लिहिन. जुन्नु, अगं सध्या कामात आकंठ बुडालेले अहे.पण लवकरच पुर्णकरेन केदार, हो, शेजारी मी बघितलाय. एक नितांतसुंदर चित्रपट. आणि चित्रिकरण पण उत्कृष्ट या सदरात मोडणार. ख़ास करुन धरण फ़ुटायच्या वेळची दृष्य. शिवाय त्या चित्रपटातून सामाजिक संदेश पण फ़ार छान दिलाय.
|
Psg
| |
| Monday, August 07, 2006 - 10:47 am: |
| 
|
माऊडे लवकर लिही की गं! त्यात ती घरची बाग फ़ुलवते आणि मंगळागौरीची पूजा करते, हे सुरेख प्रतिक दाखवल आहे तिच्या मनानी उभारी धरल्याचं. तसच मामा भेटायला आल्यानंतरची अगतिकताही.. नीरेबद्दल कणव वाटल्याशिवाय रहत नाही, पण तिचा कणखरपणाही आवडतो!
|
Soha
| |
| Tuesday, August 08, 2006 - 5:40 am: |
| 
|
माऊडी, मी पण परत एकदा तो सिनेमा बघून खात्री करून घेईन. मला पण कुंकु सिनेमा फारच आवडतो. तसे बघितले तर मी व्ही. शांताराम यांची चाहती अजिबात नाही. पण तरीही मला कुंकु आवडतो. त्यातले अनेक प्रसंग आणि गाणी मनात घर करून रहातात. "भारती स्रुष्टीचे सौंदर्य खेळे" हे एक अविस्मरणीय गाणे या चित्रपटात आहे.
|
माउडी, केदार छान लिहित आहात. मी पण 'सुजाता' करते लवकरात लवकर सुरु. मॉडरेटर्सनी कथा आणि प्रतिक्रीयांचा बीबी वेगळा केला हे फारच छान झाल. धन्यवाद.
|
Upas
| |
| Monday, August 14, 2006 - 10:51 pm: |
| 
|
अतिशय सुंदर.. खूप छान वाटतय हे सगळं वाचताना.. शर्मिला फडके ही उत्तम कल्पना मांडल्याबद्दल खूप धन्य्वाद..
|
Farend
| |
| Monday, August 14, 2006 - 11:26 pm: |
| 
|
'बंदिनी' चे वर्णन सुरेख आहे. पूर्वी दूरदर्शन ने एकाच महिन्यांत बिमल रॉयचे चार चित्रपट दाखवले होते तेव्हा मी पाहिला होता. मी कोठेतरी असे वाचले आहे की लता आणि एस डी यांच्यात काही दिवस वितुष्ट आले होते, ते संपून यात लता बर्याच दिवसांनी गायली. एस डी कडे ही गाणे शारदा वगैरेच्या आवाजात ऐकायची वेळ आली नसती, पण ती दोन्ही गाणी लतापेक्षा वेगळ्या आवाजात ऐकायची कल्पना करवत नाही. आणि मुकेश, एस डी हे एक दुर्मिळ कॉम्बिनेशन.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|