Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
प्रतिक्रिया

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट कथा old classics » प्रतिक्रिया « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 14, 200620 08-14-06  11:26 pm

Farend
Monday, August 14, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोले च्या त्या दुसया व्हर्जन मधे आणखीही काही बदल आहेत्:

१. बसंतीला 'आम' तोडायला वीरू शिकवत असतो, तेव्हाचा जयचा एक संवाद 'जेम्स बॉन्ड के पोते है ये' असा बहुधा मुख्य कॉपीत आहे, पण दुसयात 'तात्या तोपे के पोते है ये' असा आहे. मी लहानपणी तोही ऐकला होता आणि जेव्हा जेव्हा शोले पाहताना जेम्स बॉन्ड ऐकले तेव्हा वाटायचे की तात्या टोपेही कोठे ऐकलेले आहे. मधे एका DVD त सापडले.

२. सचिनला जेव्हा गब्बर मारतो तेव्हा... मुख्य कॉपीत काही संवाद नाहीत, फक्त तो मुंगळा मारलेला आहे, पण दुसर्‍यात बरेच संवाद आहेत त्याच्या आधी.


Robeenhood
Tuesday, August 15, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोहा, भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे हे गाणे माझ्या लहानपणी नागपंचमीच्या आसपास अंगणात बायका फेर धरायच्या व त्या फेरात गायच्या... एकदम भूतकाळात गेलो. मला माहीत नव्हते हे चित्रपटातले गाणे आहे...

तसेच धौम्यऋषी सांगतसे रामकथा पांडवा हेही गाणे त्या म्हणत. ते सांगते ऐका चित्रपटातील आहे हे नंतर कळले

एनीवे माहीतीमुळे फारच आनन्द झाला. हितगुजवर येण्यात ही तर खरी मजा आहे...


Moodi
Tuesday, August 15, 2006 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माऊडे लिही गं अजून. सोहा धन्यवाद. फारच छान गाणे आहे ते. माझ्या आई बाबांचे आवडते आहे.

भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
दाविती सतत रुप आगळे

वसंत जनात बनात नाचे
पृथ्वी देवी जणू हासे उल्हासे
......
घालाया सृष्टीला सौंदर्य स्नान
पूर अमृताचा सांडे वरुन...

पुढचे नाही आठवत. मी चित्रपट नाही पाहिलेला, पण जुन्या चित्रपटांची गोडी खरच अवीट आहे.


Lalitas
Tuesday, August 15, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी असं आहे ते गाणं.....

भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
दाविती सतत रुप आगळे

वसंत वनात जनात हांसे
सृष्टीदेवी जणूं नाचे उल्हासे
गातात संगीत पृथ्वीचे भाट
चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट

जैष्ठ आषाढांत मेघांची दाटी
कडाडे चपला होतसे वृष्टी
घालाया सृष्टीला मंगल स्नान
पूर अमृताचा सांडे वरुन
गगनी नर्तन कृष्ण मेघांचे
भूतली मयूर उत्तान नाचे

श्रावणी पाऊस हास्याचा पडे
श्रीकृष्ण जन्माची दंगल उडे
बांधिती वृक्षांना रम्य हिंदोळे
कामिनी धरणी वैभवी लोळे


Moodi
Tuesday, August 15, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा ललिताताई खूप धन्यवाद. खूपच गोड गाणे आहे हे.

Prashantkhapane
Monday, September 18, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

This is a nice thread. I might try to add something, english should be ok, or?

Lopamudraa
Monday, September 18, 2006 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई धन्यवाद.. मलाही हे गाणे खुप आवडते..
माझे आजोबा खुप छान म्हणत तसेच माझी आई पण खुप छान म्हणते हे.. गाणे..!!!
तुम्च्याकडे
बाळ जातो दुर देशी मन गेले वेडाउन हे गाणे आहे का...?


Soha
Monday, September 18, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिताताई धन्यवाद. संपूर्ण गाणं मला पण हवं होतं. पण मला वाटतं की ह्याचे आणखी एक कडवे आहे. त्या कडव्यात दिवाळीचे वर्णन आहे. चित्रपटातही ते कडवे दिवाळीच्या वेळेस वासंती गाते. असो. जेवढं मिळाले तेही खूप आहे.

Lalitas
Monday, September 18, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपामुद्रा, हे गाणं नाही माझ्याकडे

Dineshvs
Tuesday, September 19, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा

या सारखेच
उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर

असे पण एक छान गाणे आहे.


Robeenhood
Tuesday, September 19, 2006 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा,
बाळ जातो दूर देशा
मन गेले वेडावून
आज सकाळपासून
आज सकाळपासून....

याला नागिन मधल्या मेरा दिल ये पुकारे आजा या गाण्याची चाल होती

दिनेश उमा म्हणे हे गाणे मानिनी चित्रपटातले आहे.


Robeenhood
Tuesday, September 19, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वि म कुलकर्णी यांची
चावडीच्या पाठीमागे
जुना सरकारी वाडा.....
ही शाळेविषयीची कविता कुणाकडे आही का?
तसेच रात्र काळी घागर काळी ह्या गाण्याची एम पी थ्री आहे का?


Swaatee_ambole
Tuesday, September 19, 2006 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारती सृष्टीचे चं पुढचं कडवं..

भादव्यात येती गौरी गणपती
उत्सवा येई बहार
मिळे आरास करोनी
गाती नाचोनी हसोनी
ध्वनी त्यातही गाजे
अहा भारत विराजे
जगा दिपवित तेजे..


Bee
Wednesday, September 20, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन, अरे आता CD मध्ये देखील रात्र काळी घागर काळी हे गाणे आले आहे. तू ती CD विकत घेतली नाहीस का? मी घेतली आहे. सध्या ती मायबोलिवरच्या मध्या कडे दिलेली आहे. नाव स्मरत नाही.

आणि मला पण वि. म. कुलकर्णी ह्यांची एक कविता हवी आहे. पहिल्या दोन ओळी अशा आहेत -

चाललाय चाललाय लमाणांचा तांडा
एका गावाहून दुसर्‍या गावाला

रॉबीन, तुला असेल ती माहिती मला ह्या कवीबद्दल सांगतोस का? त्यांची एखादी तरी पुर्ण माहिती असलेली कविता इथे योग्य बीबीवर टाकायला जमले तर खूप बरे होईल. मला ही एक माहिती मिळाली पण ती कुणी दिली हे मी इथे नाव घेऊन सांगू शकत नाही.

Chalala Chalala Lamancha Tanda.... is very welknown poem by Shri. V.M. Kulkarni (Vee Ma. Kulkarni) now in his 90's. Stays in Pune. His grand sons are here studying in North america. He distanly related to me. The poem was writen in late 40's early 50's. this poem was included in text books of Marathi like Mangal Vachan (Editor: V.S. Khandekar) Subhash Wachanmala (Editor: P.K. Atre) of my generation.


Lopamudraa
Wednesday, September 20, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोबिनहूड पण पुर्ण गाणे आहे का.. तुमच्या जवळ.. माझ्या.. पणजी(आईची आजी) म्हणायच्यात हे गाणे.. (त्यानी नसेल पाहिला.. नागिन पण वयाच्या ९२ व्या वर्षी सुध्दा.. सुंदर म्हणायच्या.
मी second year BSc ला असताना वारल्या..!!!


Robeenhood
Wednesday, September 20, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी वि म कुलकर्णींबद्दल मला एवढीच माहिती आहे. फक्त ते सोलापूरचे आहेत हे मला माहीत आहे..
तू दिलेली कविता अशीआहे
चालला चालला
लमाणांचा तांडा..
एका गावाहून दुज्या गावाला..

रात्र काळी कोणत्या सी डी त आहे? एम्पी ३ असल्यास मला मेल कर...


Milindaa
Wednesday, September 20, 2006 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Robeenhood, शक्य असेल तर या बीबी ला पण ' Looking for ' चा बीबी बनवू नका. तुम्ही एकच प्रश्न विचाराल आणि इथे काहीजण मोकाट सुटतात संधी मिळाली की.

तुमचे प्रश्न (योग्य असले तरीही) योग्य बीबीवर विचारलेत तर खूप चांगलं होईल असं मला वाटतं


Bee
Thursday, September 21, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन, जरूर जरूर!!!! सद्या Madya कडे CD आहे. ती परत येईपर्यंत फ़क्त वाट बघ.

Asami_asami
Thursday, September 21, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगल्या मराठी चित्रपटांची लिस्ट तशी खूप मोठी आहे. पण अगदी आवडणार्‍यांपैकी "आपली माणसं" आणि "वजीर". Patriotic चित्रपटांपैकी मला सर्वाधीक आवडलेला (आणि कदाचित एकमेव) चित्रपट म्हणजे "प्रहार". ह्या विषयावर प्रहार सारखा दुसरा चित्रपट झाला नाही असे मला वाटते. ह्यावर बाकी लोकांची मते यावीत...


Robeenhood
Thursday, September 21, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी एकदम परफेक्ट. प्रहार हा माझ्या आवडत्या चित्रपटातील अत्यन्त वरच्या नम्बरचा आहे. नाना पाटेकरने हा एकच पिक्चर काढून स्वत:च्या आयुष्याचे सोने केले आहे... बाकी त्याचा सगळा बोनस आहे....

Upas
Saturday, January 06, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है शर्मिला.. अगदी माहितीपूर्ण लिखाण.. छानच लिहिलयस, असेच जुने चित्रपट पुनरूज्जीवित करत रहा.. :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators