Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 03, 2006

Hitguj » My Experience » भटकंती » Europe » माझा 'जर्मनी'वास! » Archive through August 03, 2006 « Previous Next »

Nalini
Tuesday, July 18, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु, संपदा, ललिताताई तुमचे अनुभव वाचुन मलाही ऑस्ट्रिया तसेच पुर्व युरोप बद्दल लिहिण्याची ईच्छा होतेय.
खुप मस्त लिहिलत तुम्ही. संपदा आणखी माहिती येऊ देत. चारु तुला वेळ मिळाला तर तु सुद्धा लिही.


Lalitas
Tuesday, July 18, 2006 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिही ना... वाचायला आवडेल आम्हाला!
मी इथे स्वीसचे अनुभव जर जर्मनीशी समान असतील तरच लिहिन. हा जर्मनीचा बीबी आहे, त्यांत स्वीस लुडबुड नको.


Naatyaa
Tuesday, July 18, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकन लोक स्वस्तिकास स्वस्तिक म्हणुनच ओळखत असावेत. काल Jay Leno Show मध्ये त्याने या चिन्हाचा उल्लेख स्वस्तिक असाच केला..

Storvi
Tuesday, July 18, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तरी इथे अमेरिकेत स्वस्तीक चा स्वास्तिका असाच उल्लेख ऐकला आहे

Raina
Wednesday, July 19, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळा BB वाचून काढला आत्ता.. खूप आवडला कारण बरीच वर्ष जर्मनीला जाउन यायचं मनात आहे.. जर्मन भाषा मला मनापासून आवडते कधी जायचा योग आला नाही पण आता तुम्हा सर्वांचे अनुभव वाचून छान वाटले.

Megha16
Wednesday, July 19, 2006 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुराधा,संपदा
खुप छान माहीती दिलीत तुम्ही जर्मनी बद्द्ल.
कारण बरयाच सगळे देश बघता येतील हे काही शक्य नाही. पण अशी माहीती मिळाली की मग छान वाटत. अजुन येऊ देत.


Zakki
Wednesday, July 19, 2006 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या पुतण्याच्या लग्नात (बायको अमेरिकन) भारतातून खास अंतरपाट पाठवला होता. त्यावर मोठ्ठे स्वस्तिक! मग मी लायब्ररीत जाऊन (इंटरनेट नव्हते हो तेंव्हा इतके पसरलेले. गूगलपण नव्हते वाटते) माहिती काढली. ती अशी: स्वस्तिक हे शेकडो वर्षांपूर्वीचे जुने आहे. दक्षिण अमेरिकेत, जुन्या जर्मनीत स्वस्तिक वापरत असत, भारतात त्याचा अर्थ काय हे माहित आहे सर्वांना, पण इतरत्र त्याचा अर्थ काय होता हे नीटसे कळले नाही. तेंव्हा स्वस्तिक नि हिटलर किंवा स्वस्तिक नि ज्यू एव्हढ्या पुरतेच स्वस्तिक मर्यादित नाही. हा खटाटोप करावाच लागतो. ज्यू लोकांच्या भावना दुखावून चालत नाही, अमेरिकेत तरी! ते लगेच जिवावरच उठतात! ते काय भारतीय थोडेच आहेत? सुसंस्कृत, निश्चल श्रद्धा असणारे? म्हणून हिंदूंचे काहीहि अपमान केले तरी चालते. उगीच कुणितरी मायबोलीवर लिहितात किंवा कुठेतरी निदर्शन करतात. त्यामुळे काही अपमान होण्याचे मुळीच थांबत नाही, कारण बाकीचे हिंदूच सांगतात की अहो ती कला आहे, ते अमुक रसाचे चित्रण आहे, आपली श्रद्धा अभंग आहे, एवढ्या तेव्हढ्याने तुमचा अपमान का होतो? इ.

Jadhavad
Thursday, July 20, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी,
मी फ़्रंकफ़र्ट ( frankfurt ) मध्ये ६ महिने होतो,... २००४ च्या ऑक्टोबर फ़ेस्ट च्या १ वीक आधी पासुन, त्या योगे सगळ जर्मनी आणी युरोप भटकंती चा चान्स आला. इतिहासाचा छंद असल्याने माझी जर्मन वारी ही माझी पर्वणी होती. पहिल्या महायुद्धापासुन आता पर्यंत प्रसिद्ध असे बहुतेक स्थळ मी बघितली....
आणी माझी त्या वर्षा ची दिवाळी खरच अविस्मरणीय झाली. आमच्या प्रोजेक्ट मनेजर च्या भावाच्या घरी, जो की तिथला एक प्रसिद्ध नेता आहे, त्याच्याकडे,....त्या दिवशी त्याचे सगळे भाऊ, बहीण, त्यांची मुल अशा ३० जणांबरोबर मी k3g बघितला. ३:३० तासाचा तो मुव्ही..... शनीवारी रात्री ७ ते रवीवारी सकाळी ४ पर्यन्त गप्पा मारत आम्ही रात्रभर बसलेलो. (बरोबर रंगीत पाणी होते, हे सांगणे न लागे.)
दुसर महायुद्ध हा माझा आवडता विषय. हिटलर संबंधी जे मी इथे वाचल ते किती तोकड आहे, हे मला तेव्हा समजल. न्युरंम्बर्ग मध्ये १ वीक फ़िरुन सुद्धा माझी दुसर्‍या महायुद्धाची मनीषा भरली नाही. माझ्या नशीबाने तो महा संग्राम अनुभवणारे ज्येष्ठ नागरीक मला भेटले, तेव्हा किती बोललो असेल आणी किती नाही. अर्थात अथ पासुन ईती पर्यन्त जरे नसली तरी भरपुर माहीती मिळाली. सेन्य-शिस्त, कडक नेत्रुत्व छळ्-छावण्या, हे अजुन खोलात समजले. बर्लिन चा फ़्युर्रेर बंकर बघितला. इव्हाच बोर्वेक्स्तान्च घर बघितल. १९३६ च्या बर्लिन ऑलम्पिक ग्राउंड वर गेलेलो. स्वास्तिक च्या चिन्हा वर तर बराच R&D केल.
स्किन्-हेडर्स हा एक त्रासदायक प्रकार, अस एकुन होतो, पण पुर्ण भटकंती मध्ये मला ह्याच त्रास झाला नाही.
एकटे असताना, हातात handy cam घेवुन बर्फ़ात असणार निसर्ग किंवा उन्ह्याळ्यात उन्हाने चकाकणारा जँगलाचा रस्ता.... सगळ अवर्णणीय. विसबाडेन ची चक्कर किंवा म्युनीच्बाण ची सफ़र... अजुन मनात घर करुन आहेत.

अमित


Yogesh_damle
Tuesday, August 01, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्तिकास 'हिटलर च्या तिथे' हॅकेनक्रोज़ ( Hakenkreuz ) म्हणतात ना? अंधुकसं आठवतंय...

Zakki
Tuesday, August 01, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<हातात handy cam घेवुन>

अरे, हातात हात घेऊन असली दृष्ये बघायची असतात! अन् तो सुद्धा कुणाचा कोमल हात, हळूवारपणे घ्यायचा.

handy cam मग म्हातारे झाल्यावर घ्या!



Charu_ag
Wednesday, August 02, 2006 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु, संपदा, Jadhavad सही लिहीताय तुम्ही.
नलिनी, ललिता ताई आता तुम्ही करा सुरुवात.

संपदा, तुझ्या सेमिनार्स चे अनुभव पण लिही. इथे आम्हला कुणालाच हा अनुभव नसल्याने वाचयला आवडेल.


Sampada_oke
Wednesday, August 02, 2006 - 9:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारू, मी वेळ झाला की लिहितेच, पण इथे Auf wiedersehen करण्याआधी तू सुद्धा थोडी भर घाल की.:-)
नवीन देशात जाऊन तुला अजून खूप लिहायला वेळ मिळो.:-):-)


Jaaaswand
Wednesday, August 02, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारू तुझा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय..
मी अजून इथे काही पोष्टले नव्हते ( ह्या पोस्ट च्या आधी ) ... :-)
पण वाचतोय मात्र नक्कि...
जर्मनी आमच्या पल्याडचाच देश... ..मस्त वाटतय वाचताना..

ललिता ताई.. तुम्ही सुरू करा कि आपल्या स्वीस बद्दल...
मी आपला काही तरी हातभार लावीन अधून मधून :-)

जास्वन्द...


Bee
Thursday, August 03, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, सुंदर माहिती देत आहेस..

मी पण लिहू शकतो का मग इथे सिंगापूरबद्दल?


Jadhavad
Thursday, August 03, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बी,
नेकी ऑर पुछ पुछ.... तु नवीन थ्रेड स्टार्ट कर, मी पण लिहीतो, सिंगापुर बद्द्ल.
तसा माझा नेशनल डे चा लेख रेडी आहे, पहील्या सवडी मध्ये पोस्ट करतो.

अमित


Bee
Thursday, August 03, 2006 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या वर्षीचा नेशनल डेचा लेख की ह्यावर्षीच्या डेचा :-) मी इथले national days चे कार्यक्रम कधीच बघितले नाही. तू बघितलेस का रे कधी.. कुठे आहेत ह्यावर्षी जरा सांगतोस का? मला एकदा तरी बघायचे आहे.. खास करुन त्यांचे fireworks

मी इथे जेंव्हा पहिळ्या वेळी आलो त्यावेळी november महिना संपायला आला होता. सगळीकडे Y2K चे भूत पसरले होते. कारण ते वर्ष 2000 होते. त्यावेळी इथे ORCHARD मध्ये खूपच जंगी new year celebration झाले होते. तसे celebration नंतर कधी झालेच नाही. Suntec City Mall जवळ दरवेळी तेच तेच दृष्य दिसते नविन वर्षाला मी जाणे सोडले. आता तर कुठेच फ़िरावेसे वाटत नाही. राशन संपले की little india ला जावे लागते. बाकी काही नाविन्य नावाचा प्रकारच उरला नाही रे इथे.. तुला कधी असे वाटले नाही का की सिंगापोर इतके छोटे आहे की इथे इतके वर्ष काढणे म्हणजे कठिण आहे. तीच हिरवळ, तिच स्वच्छता, HDB बीची एकसारखी दिसणारी घरे, MRT तीमध्येही एकसारखेपणा. सगळीकडे तोचतोचपणा मला जाणवतो आहे. आता ह्यावर्षी मी कंबोडियातील Ankor Watt बघायला जाणार आहे. गेल्यावेळी बाली बघून आलो. सुंदर आहे रे पण सुरक्षितता नाही त्यामुळे परत जाण्याची इच्छा असूनही मन मागे खेचले जाते. अरे गेल्या वेळी मी तिथे बालीला गेलो आणि दुसर्‍याच दिवशी bomb blast झालाय. नशिब मी तिथे नव्हतो. मग काय घरी आणि office मध्ये माझ्या नावानी चर्चा सुरू झाली. इथे मी changi air port वर पोचलो तर त्यांनी लगेच HR चा नंबर फ़िरवून मला त्यांच्याशी बोलायला लावले. HR नी मी आहे ना ठिक म्हणून विचारले. घरच्यांना ३ दिवसानंतर कळले की बालीला bomb blast झाला आणि मी तिथे आहे. पण मी रोज फ़ोन केलाय तरी वर विचारतात आम्ही तुझी किती काळजी करत होतो. हो पण मी केलाय ना त्यानंतर फ़ोन तरी काळजी.. का रोज blast होत आहेत इथे :-))


Kashi
Thursday, August 03, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee .....mi pan tuzashi sahamat aahe..
sinp avade lahan aahe ki aata tech tech pahayla kantala yeto...pan sinp che anubhav lihayla harkat nahi..

Kashi
Thursday, August 03, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

amit..,bee singapore thred chalu kara...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators