Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 27, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » भूत पुनर्जन्म वगैरे » Archive through June 27, 2006 « Previous Next »

Apurv
Thursday, March 30, 2006 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ करा लोकहो पण तुमचा भूतावर विश्वास आहे की नाही, मनाचे खेळ की खरे? हे सगळे सांगून V & C चालू करू नका! मजा जाते सगळी :-(
काही गमतीदार गोष्टी असतील तर सांगा तेवढीच करमणूक होते!


Rahulbaba
Sunday, April 02, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ekda Unhalyat anganat zhoplelo astanna zopet ek kutra aani tyacha tondachya jaagi mansache tond aahe ase chalat mazya davya bajoola ubhe aahe ase disle. te swapn hote aani mi tyatun jaage honyasathi zorzroat haat marat hoto. Khari jaag aali tenvha bajoola karech kutra hota pand tyala mansache tonda navhate. Faar nanatar jaoon Kalale tyala "sleep paralysis" Ase mhantaat. Majechi gosht tar pudhe aahe. "sleep paralysis" Google Images madhye paste kara aani tithe tumhala aalele anubhav chitra rupat disteel. Mazha aajahi Butanvar Vishwass nahi. Mala Bhutanche cinema Avdat nahit pan haa tyvaroon banlelya Scary Movies Khoop avdtat. :-)

Abcd
Friday, May 12, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मन्डाळी,
मी ईथे खूप नवीन आहे, सम्भाळुन घ्या.



मी स्व्तहा भुत पहिलेल नाही आणी माझा भुतान्वर अजीबत विश्वास नाहि पण एक मात्र नेहेमी वाटत कि देअर आर सम सुपर हुमन थिन्गस,
पण हा अनुभव मात्र १००% खरा आहे.मज्ज्या स्वतहाच्या घरात.
दिड वर्शा पुर्विची गोष्टा, अम्हाला नविन घर घेउन नुक्तच वर्ष पुर्ण आल होत.घरात आम्ही तिघच रहात होतो मि नवरा आणी ९ महिन्यान्चा मुलगा.
मी २ दिवसन्च्या कामा सठी बाहेर गेले होते अर्थातच मुलगा नवर्या बरोबर होता.मी परत आले तस नवरा खूप घाबरुन सान्गत होता कि अपल्या घरात कहितरि विचित्र घडतेय.
त्याला कधिच घबरलेल पहिल नसल्यामुले मी पण जरा साशन्क ज़ाले.तओ म्हनल गेले २ दिवस अचानक पणे आपले music system चालु होते अनि फ़क्त एकच गाण लागत. मी म्हन्टल अरे एव्धच होय मुलानी खेळतना कही बटना दाबली असतिल.तो गप्प बसला,तुला कळेल.....मग मि music system चे सगळे प्रोग्रम रीसेट केले,वेळ पण चेन्ज केला.
दिवस सम्पला रत्रि मी खालच्या मजल्यावर आवरत होते,डिशवौशर,क्लीनीग वगेरे.मला वाटल कि हे दोघ वर आहेत.पायच्या चालण्याचा अवाज येत होता काम आटपून वर्ती गेले आणी कोणिच दिसेनात काही कळेना आवाज तर येत होत आत्तापर्यन्त आणी हे दोघ गेले कुठे. खूप हक मारल्या शेवटि नवर्यच्या सेलवर फोन लावला.तर हे दोघ मझ्या शेजारी राहण्यार्या बहिणीकडे होते "येतोय लगेच" तिकडुन उत्तर. फोन बन्द केला तशी एक भितिचि रेख उमटुन गेली वरच्या मजल्यावर कोणी नव्हत तर हा पायाचा आवाज कसा कय आला? णक्कई मनचे खेळ, मी स्वतहशिच म्हन्टल की हा नक्की भास ज़ल असेल. हे दोघा अले, आम्ही जाउन झोपालो, जारा दुलकी लागे पर्यान्ता जोरात गान्याचा आवाज, नवरा तार शेजारिच होता आणी तेच गाना पारात. दोघा धडकान उथुन बसलो, पळत पळत खाली गेलो अणी मुसीक सिसतीम बान्द केली. म्हान्तल काय कटकट अहे.


या गोश्टीकडे भघायला वेळच नव्हता,रात्री मात्र झोपयच्या आधी power of आहे ना हे पहीला. परत तोच प्रकार, तेच गाण मोठ्यन्द सुरु. आता मात्र मी चक्रावले होते, नवरा म्हणाला मी म्हन्टला ना तुला, "थिस इज व्हेरी स्ट्रेन्ज".आता माला मान्य करण्यशिवय काही गत्यंतर नव्हत. आज जरा भिती वाटली,पण ठरवल "ज़ो डर गया वो मर गया" ,माणुस घाबरला की डोक चालण बन्द होत,भिमरुपि, अथर्वाशिर्ष म्हणात दोघेही खाली आलो पाॅवर कोर्ड कढुन टाकली, तेव्हड्यात वरती परत चालायचे आवाज,धप धप.... आता मात्र माझि फ़ार टरकली कारण मुलगा वरती झोपला होता,सुसाट पळत सुटलो पण तो तर शान्त पणे झोपला होता. आजुबजुला काही नाही.त्याला आमच्या खोलित आणला आणि
सतत लक्श ठेवत झोपयच प्रयत्न सुरु केला,दुसर करणार तरी काय.....??
दुसर्या दिवशी वीक एन्ड, छान उशिरा उठल तरी चालेल. रात्री झोपेत दोन्दा जाउन केबल काढली आहे ना चेक केल. आज शन्तता होती दिवस्भर, म्हणा दिवसा जरी सुरु होत असेल तरी ऐईकायला कोणीच नसत घरात.
सन्ध्याकाळ झाली तसे दोघेही टेन्स ज़ालो, मुलगा त्याचा नेहमिचा दन्गा करत होता. आज चक्क शान्तता. रात्री उशिरा पर्यन्त सिनेमा बघत बसलो.. होरर भघायची हिम्मत नक्की नव्हती.
आज काही आवाज नाही....वाटल आपण काहितरी डोक्यात घेतलय. आज रात्र शन्त होती साकळी जोरात गाण्यानी जाग परत तेच गाण येकुन शहरा आला, खाली जायची खूप भीति वाटली. हे कस काय चालु झाल कालच पाॅवर पण काढलि होती डोक सुन्न आणि मन घाबरलेल धीर करुन दोघा खली आलो. राम राम म्हणत सिसटीम ओफ़ केली. काय कराव सुचेना.
खुप चिडचिड होत होती,शेवटी उठले आणि त्या सिडी चे तुकडे तुकडे केले. सगळ्या खोल्यात जाउन अथवश्रिश म्हन्टल. डोक्यत एकच if there is some -ve there is always +ve thats why the world is working fine.
आता गाण एकदम थाम्बल, आवज मधे मधे येतात अजुन.पण overall हे जर भुत असेल तर एकच वाटत. त्यानी अम्हाला काहि त्रास दिला नाहि,मी मात्र भिति पोटी त्याची आवडती सिडी तोडली.
हा अनुभव वेगळीच जणिव करुन गेला. आस्तिल हि जगत काहि गोश्टी ज्या अपाल्या कल्पनेच्या, बुद्धी च्या पलिकडे आहेत,मी एकटीच रहात नाही माज़्या घरात.पण हे मात्र खर कि भिती वाटत नाही


" If there is something –ve in the world then defiantly there is more +ve that’s why the world is so beautiful".

Rutu_hirwaa
Friday, May 12, 2006 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एबीसीडी

जबरी अनुभव आहे ग


Maudee
Friday, May 12, 2006 - 9:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

abcd
तू जो हा सुविचार दिला आहेस.....ख़ूपच सुन्दर आहे तो....
फ़ारच +वे


Divya
Friday, May 12, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तन्वी तुझे आणि तुझ्या नवर्याच्या धैर्याचे +ve attitude चे कौतुक करायला पाहिजे. तुम्ही अजुनही तिथेच रहाता का?

Maitreyee
Friday, May 12, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Abcd , एक कुतुहल, तुझ्या घराची भिन्त दुसर्‍या घराशी common आहे का? कारण तो घरात वरच्या खोलीत धप धप चालण्याचा आवाज हा अनुभव मलाही माझ्या घरी खूपदा आला. अर्थात माझाही अजिबात कुठल्याही supernatural गोष्टीवर विश्वास नाहिये त्यामुळे नीट पाहिले तर असे आढळले की शेजारच्या घरात वरच्या मजल्यावरच्या खोलीत कुणी चालले की आपल्याच घरात तो आवाज येतोय असे वाटते!


Abcd
Friday, May 12, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर सन्गायच तर यात माज़ काही कौतुक नाही. माज़्या आई बाबा आणि आप्पा (अजोबा) यान्नि हे लहान पणा पासुन बिम्बवल आहे.

आप्पानी पण कोकणात त्यान्च्या अत्त्यचे भुत पाहिले आहे म्हने.


Anyways the belief is so strong that I am not afraid of most of common fear.
still thanks!!
For facts-
Yes we still stay in the same house...but last 2 years nothing strange has happened.
I have a single family home with double pane windows...(dont get anysound from outside)and distance between 2 houses is at least 100ft.
Believe me I have spend two restless nights thinking for all possible logical explanation for this as I still don’t believe in “bhut” as a figure...but can’t deny existence of something beyond human thinking.


Dha
Monday, May 22, 2006 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला पुनर्जन्माबद्दल काय वाटते?

Storvi
Monday, May 22, 2006 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते या जन्मी सांगता येणार नाही :-O

Zakki
Monday, May 22, 2006 - 11:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |

भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?


Sunidhee
Wednesday, May 24, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे, abcd .. धीट आहात तुम्ही दोघे..
माझा अनुभव... वेगळ्या प्रकारचा..

तेव्हा मी १०-११ वर्षाची असेन.. मला कुत्र्या-मांजराचे अति वेड होते. रस्त्यावर कोणतेही मांजर नाहीतर कुत्र्याचे पिल्लु दिसले की मी उचलुन ते घरी आणायची आणि पाळायची. मग ते जरा मोठे झाले की निघुन जायचे. हा राबता नेहमीचा.. तर एकदा दुपारी ४-५ च्या सुमारास खेळत असताना रस्त्याच्या बाजुला एक ३-४ दिवसाचे कुत्र्याचे पिल्लु पडुन रडत होते ते ऐकु आले (त्याला चालता येत नव्हते आणि खुरडत खुरडत पुढे जाऊ शकत होते) .. आम्ही तेव्हा चाळीत रहात होतो. केवळ ८-१० बिर्‍हाडं होती. चाळीच्या एका बाजुला छोटा रहदारीचा रस्ता होता आणी दुसर्‍या बाजुला एक बोळ होता जिथुन लोक सहसा जायला-यायला तयार नसत काही समजुतिमुळे). तर मी ते पिल्लु आणले घरी.
आई म्हणाली त्याला आत घेउन येउ नको, बाहेर भिंतीशी पोतं घाल, सावली मधे बाहेरच झोपव..
मी तसे केले. त्याच्याशी खेळताना लक्षात आले की त्याच्या गळ्यात एक काळी दोरी होती.. (ताईत असतो तशी). ती चाळीतल्या एका दादानी काढुन टाकली. लगेच निघाली. त्याचे रडणे बंद झाले होते.. मग मी त्याला खाऊ-पिऊ दिले, खेळले त्याच्या बरोबर, चाळीतल्या लोकांनी पण त्याचे लाड केले आणि रात्री खुप वाईट वाटले तरी ९-१० ला मी झोपायला आत गेले. ते पण पोत्यावर झोपुन गेले.

१२.३०-१ ला एकदम मला जाग आली. कारण पिल्लु खुप जोरात ओरडत होते. खुप लहान होते ते, चालता पण येत नव्हते त्याला. मी लगेच उठले. बाहेर आले. दिसले कि पिल्लु जागेवर नव्हते.. आवाजाच्या दिशेनी पाहिले तर बोळातुन आवाज येत होता त्याचा. धावत बोळाकडे गेले. चाळ आणि बोळामधे एक पडकी भिंत होती, तिचा मधला भाग पडला होता, त्यातुन बोळात गेले. लाईट्स नव्हते. लोक सन्ध्याकाळ नंतर बोळातुन अगदी जायचे नाहित.. तर मला ते माहित होते.. पण माझे कुत्रे-प्रेम इतके उफाळले होते की रात्रि १२.३० झालेले असताना, बोळात फक्त चंद्रप्रकाशाचा प्रकाश असताना मी बोळात गेले आणि पिल्लाला उचलुन आणले आणि परत पोत्यावर झोपायला टाकले.. तेव्हा मला दिसले कि पुन्हा त्याच्या गळ्यात एक काळी दोरी होती. मनात हा विचार पण आला नाही की ती दोरी कुठून आली? ती मी पुन्हा काढुन टाकलि. आणि झोपायला आत आले. अर्थात घरात कोणाला कळले नाही..

पुन्हा पहाटे ४-४.३० च्या सुमारास ते पिल्लु इतक्या जोरानी ओरडु लागले की मी जागी पण झाले आणि रडु पण येउ लागले.. कळत नव्हते की त्याला काय त्रास होत होता. आई पण उठली.. इतकेच नाहि तर चाळीतील काही लोक पण उठुन बाहेर आले पहायला की ते असे का ओरडत होते.. पाहिले तर पिल्लु कसेतरी चाळीच्या मेनगेट पाशी पोचले होते आणि... एक भयंकर गोष्ट आम्हाला दिसलि... ती म्हणजे, ह्या वेळी 'कोणीतरी' त्याच्या पोटाला तसलीच काळी दोरी बांधली होती...... इतकी घटट्, इतकी घटट् कि त्याच्या पोटाचे स्पष्ट २ भाग दिसत होते... आपण फुग्याला मधे दोरि बांधु तेव्हा दिसेल तसे... मी लहान होते तरी माझी विचारशक्तिच थाम्बलि... काय प्रकार चालु आहे कळेनाच.. मग कोणीतरी ताबडतोप ती दोरी काढु लागले... काढता पण येइना.. कशीबशी कात्री नी दोरि कापली.. त्याचे पोट नाॅर्मल ला पण नीट येत नव्हते... पन थोडेफ़ार आले..
तेव्हा चाळीतले, एक आजोबा म्हणाले हे पिल्लु इथे कसे आले?
आई म्हणाली माझ्या मुलीनी आणले...
तेव्हा आजोबा म्हणाले ' अहो, पोरीला अस कुठुनही कोणताही प्राणी घरी आणु देउ नका.. ह्याच्यावर कुणीतरी काहीतरी प्रयोग केला आहे (करणी म्हणायचं होत त्यांना).. मी दुपारी पण रस्त्यावर त्याच ओरडणं ऐकलं होतं.. आणी ते चक्क लहान मूल रडत असल्यासारखं रडत होतं ' .

माझा तर घसा कोरडा पडला होता. काय हात लावणार पुन्हा मी त्याला?? मग कोणीतरी त्याला पुन्हा बाहेर सोडुन आले.. मग खुप वेळ ते ओरडत होते.. अनि त्या आजोबांनी सांगितल्या प्रमाणे, नंतर नंतर ते ओरडत होते तेव्हा खरोखरच लहान मुल रडत असल्यासारखं वाटत होतं.

मग मी शाळेला गेले. आणि परत आल्यावर कोणीतरी सांगितले कि ते पिल्लु मेलं.... मला खुप वाईट वाटलं.. पण लहान असल्यानि काही बोलायची हिंमत झाली नाही.. आई नि पण तो विषय कधी काढला नाही.. पण मी मात्र कुठला ही प्राणी त्या नंतर घरी आणला नाही.. (मांजर आणले कधीकधी इतकं होउन)

आत चाळ पाडली. सर्व कडे फ़्लॅट्स झालेत...

पण ह्याच निरसन कधी झाले नाही..म्हणुन, असे काहि पाहिले कि कळत नाहि काय म्हणावे. पण इतक मला पटले कि अमानवी गोष्टी जगात असाव्यात.



Yog
Friday, May 26, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yes! अमानवी किव्वा ज्या आपल्याला विज्ञानात पुराव्यानिशी सिद्ध वा शिकवल्या जात नाहीत त्या गोष्टी असतातच. कुणी त्याला अन्धश्रध्धा म्हणोत, कुणी भोन्दूबाजी, कुणी कही सुनी किव्वा कुणी supernatural , किव्वा कुणी न मानोत... some things don;t change, even if they couldn;t be proved with any facts.. पण जसे तुम्ही जे डोळ्याने पाहिले अन अनुभवले तसा तो अनुभवच पुरेसा असतो. आजकाल "हे यात काय? सब कुछ झूट आहे", किव्वा अट्टहासाने ओढून ताणून स्पष्टिकरणे शोधायचा प्रयत्न करतात. ती एक fashion आहे. अशा अनेकान्ची प्रत्त्यक्ष अनुभवाने बोबडी वळलेली पाहिलेली आहे.. anyways आपण डोळे बन्द केले म्हणून बाहेर अन्धार होत नसतो. गरूड पुराणात याचे व्यवस्थित वर्णनही आहे. भूत, प्रेत, पिशाच्च या सर्व योनी असतातच, त्यान्चेही जग असतेच, आपण ते "अमानवी" म्हणतो इतकच!

Maitreyee
Friday, May 26, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐ. ते. न.! भुतावर विश्वास नसणे ही फ़ॅशन??
हल्ली प्रतिपक्षाला विरोध म्हणून 'ही फ़ॅशनच झालेय' असे वाक्य टाकणे ही पण फ़ॅशन च दिसतेय :-O


Chafa
Friday, May 26, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्या! चीड आली त्या बिचार्‍या पिल्लाचे हाल करणार्‍याची. मला तर वाटतेय की अशाच एखाद्या तांत्रिक मांत्रिकाच्या सांगण्यावरुन त्या पिल्लाचा हकनाक बळी दिला गेला असेल! :-(

आणि मग या प्रकाराला 'अमानवी' म्हणून मोकळं व्हायचं?
I am speechless! अमानवी आहेच पण फार वेगळ्या अर्थाने!

Divya
Friday, June 23, 2006 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर खोट देव जाणे
http://www.sptimes.com/2006/06/23/Northoftampa/Ghost_Watchers_explor.shtml

Reena_talekar
Sunday, June 25, 2006 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i also dont believe in ghosts as u all said those r all manaache khel .. but i experienced something that i wud like to share with u . it was 2 yrs back when i went to my native place to marry ( I am from Mumbai n my native place Karwar, karnataka ) . My Brother was supposed to marry 5 days b4 my marriage . The day he got married , we wr just having a blast n just dead tired .That night one of my cousin said chalo lets chat n there was no place that we cud sit n chat for hrs together . So the best place we found is to sit in the Scorpio which was parked in the compound . there was just one street light which was like a minminata diva .we went on chatting . around at 1 Oclock in the night , i saw one white figure walking outside the compound . it was not even white but as if it was water walking across the street, something transperent . i was just watching it with a blank mind . it walked for around 50 feets then that figure came in . we have a well there in the compound . it went there , looked into the well . n it started coming to the car we wr sitting in !!! but still something weired happened to me that i cudnt even realise that something strange was happening . it came to the car , sat in the drivers sit ( we wr sitting behind n we kept the doors open for air , aamacha didshahanepana ) . trust me i was watching it continuously but still i didnt react . around 5 min it disappeared . the whole process took around 20 min . i still remember that i didnt sleep ot it was not a dream . my cousin was talking n talking n talking but even she didnt realise that i was not listening to her . that was really strange .
this must have some explanation or may b i was so tired . but whenever i remember this ajunahi shahaara yeto
i have some more experience which i will tell u guys later

Supermom
Tuesday, June 27, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग, मला या बी बी वर यायचीच भीती वाटायला लागली आहे आता.
कसले भयानक किस्से एकेक.


Rimzim
Tuesday, June 27, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पण एक अनुभव.

नवीन ठिकाणी रहायला आलोत. साधारण ६ महिने एकदम नीट गेले.
अधुन मधुन वरच्या मजल्यावर चालायचे आवाज यायचे.( आमच्या वरच्या मजल्यावर कोणीच रहात नसे.) पण ते बहुधा मैत्रेयी म्हणते तशा प्रकारचे असावेत असा आम्ही अंदाज काढला.

त्या नंतर मी दुपारी चार च्या सुमारास घरी आले. music sys सुरु होती. engish मधे रेडिओ चे कार्यक्रम सुरु होते. आणी आवाज खुप मोठा होता.
आश्चर्य वाटले. पण म्हंटल विसरुन चालु ठेवला असेल. पण इतका मोठा आवाज ?
त्यानंतर हा प्रकार दोन वेळा झाला. नवर्‍याला सांगीतले, तर त्याने मैत्रीणीने सर्वांनी चेष्टा केली.
पण हा प्रकार रोज दुपारि होत होता. मग परत सगळे सेटिंग चे केले. कदाचित काहि वेळा आपणच सेट करतो आणी मग विसरतो.
दुसर्‍या दिवशी परत तेच.
मग नविन तर्क काढला गेला कि दुसर्या कोणाच्या तरि remote मुळे चालु होत असेल.
पण त्याचा आवाज suddenly इतका मोठा का होत असेल ते नाहि कळाले अजुन.
मग plug काढुन टाकला आणी हा प्रकार थंबला.


Rimzim
Tuesday, June 27, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या सगळ्याच्या आधी एक अजुन प्रकार घडला.
आम्ही दुसर्‍या ठिकाणी new city रहायला जाणार होतोत.
आधिच्या घराचे lease संपले होते. आणी १ week साठी आम्ही एका (मायबोलि वर येणारी) मैत्रीणीकडे रहायला गेलोत. त्या वेळी हि मैत्रिण आणी तिच्या घरचे सुट्टीसाठी दुसरिकडे गेले होते.
दिवस सगळा स्कुल मधे जायचा.
दोन वेळा लक्षात आले कि जाताना जरी बंद केला तरि पंखा सुरुच असतो.
एकदा दुपारी मी घरी होते आणी अचानक पंखा सुरु झाला.
वाईट्ट....घाबरले मी.

नंतर कळाले की शेजारच्या गराज garrage ओपनर मुळे यान्चा पंखा ओपरेट होतो आहे. :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators