|
Lalitas
| |
| Friday, July 14, 2006 - 12:53 pm: |
| 
|
हा स्वस्तिक फोबिया स्विसमध्येही आहे... आमच्या उंबरठ्यावर मी लक्ष्मीची पावले चिकटवली आहेत. त्यांत दोन पावलांमध्ये स्वस्तिक आहे. इथले डाकिये पार्सल असेल तरच तुमच्या दाराची बेल वाजवतात. तसाच एक डाकिया आला होता व त्याचा स्वस्तिक बघून गोन्धळ उडाला... एकतर मी जर्मन दिसत नाही हे कुठलं चिन्ह या लोकानी दारांत लावलंय हे त्याला समजत नव्हतं. मग मी त्याला थोडक्यांत समजावून सांगितलं. तरीही मान उडवत परत गेला.. पटलं नसेल कदाचित! परत दुसर्या महिन्यांत रजिस्टर पत्र द्यायला त्याला यावं लागलं होतं तेव्हा नीट बोलला. तेवढ्यात आपल्या धर्माची माहिती त्याने मिळविली... स्वस्तिक चिन्हाचं हिंदू धर्मांतील स्थान व हिटलरने केलेला त्याचा दुरुपयोग यावर माझं बौद्धिक घेतलं!
|
Sonchafa
| |
| Friday, July 14, 2006 - 2:30 pm: |
| 
|
मला हा अक्खा लेख रेघा रेघा दिसतोय. काय केलं मी म्हणजे मला सगळ्या रेघा दिसणे बंद होईल?
|
Bee
| |
| Saturday, July 15, 2006 - 2:04 am: |
| 
|
लालित, भारतीयांच स्वस्तिक आणि नाझीच स्वस्तिकच चिन्ह ह्यांच्यात फ़रक आहे. आपले स्वस्तिक हे clockwise roate होते आणि नाझींचे स्वस्तिक हे anti-clockwise rotate होते मग त्यांना किंवा हिंदूंना गोंधळ उडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... मला जेंव्हा स्वस्तिकबद्दल विचारले तेंव्हा मी त्या जर्मनला हेच उत्तर दिले तेंव्हा तो oh ho I see.. असे करून निघून गेला. जर्मन लोकांमध्ये वेळेचे काटेकोअर्पणे पालन होते आणि ही खूपच छान गोष्ट आहे. त्यांच्यासाठी time is money...! . आपण भारतीय वेळेवर आला तर किम्मत न मोजणारे..
|
जर्मनी मधे स्वस्तिकास त्यान्च्या भाषेत काय म्हणतात?
|
Naatyaa
| |
| Saturday, July 15, 2006 - 4:37 am: |
| 
|
जर्मनी मध्ये स्वस्तिकास स्वस्तिकच म्हणतात.. http://de.wikipedia.org/wiki/Swastika
|
नाट्या, तुला थॅन्क्यू! >>>>> clockwise roate होते आणि नाझींचे स्वस्तिक हे anti-clockwise rotate होते मग त्यांना किंवा हिंदूंना गोंधळ उडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... बी, वरली साईट रेफर कर, अन्टीक्लॉकवाइज असेल असा माझाही चुकीचा समज होता पण तस ते नाही हे! झाल काय हे की नाझी भस्मासुराचा उदयास्त व इतर ठिकाणी निगेटिव्ह वरुन फोटो उलटे छापले गेल्याने स्वस्तिक उलटे दिसते!
|
Nandita
| |
| Saturday, July 15, 2006 - 6:00 am: |
| 
|
संपदा, अनु, ललिता, मूडी खुप छान वाटतय वाचायला अजुन लिहा तुमचे अनुभव. अनु मी एकदा एक किस्सा वाचला होता की आपले एक foreigh minister जर्मन भ्टीवर गेले असताना त्यांना चरकालोजी Deptt दाखवन्यात आल, त्यांना वाटल की काहितरी नविन medicinal R&D असेल पण नंतर कळल की कृषी चरक यांच्या चरक संहितेवर संशोधन चालु आहे या संबधी काही माहिती आहे का? Krushii कस लिहायच मला कळत नाही 
|
Anaghang
| |
| Saturday, July 15, 2006 - 7:16 am: |
| 
|
अनुभव वाचताना फारच छान वाटले. मला भारतातील प्रवासस्थळे,प्रवासवर्णने, नकाशे इ.माहिती कोणत्या साईटवर मिळेल. कोणी सांगु शकेल का?
|
Lalitas
| |
| Monday, July 17, 2006 - 7:16 am: |
| 
|
जर्मनी मध्ये स्वस्तिकास स्वस्तिकच म्हणतात.. नाट्या, मला जितकं माहित आहे त्याप्रमाणे स्वस्तिकला जर्मनीत 'Hakenkruez' म्हणतात. उच्चारी हाकनक्रॉयझ.... आपल्या संस्क्रुतीत या चिन्हाला स्वस्तिक म्हणतात हे देखिल समान्य युरोपिय माणसाला माहित नसायचे. आता इंटेरनेट व इतर प्रचारसाधनांमुळे स्वस्तिक चिन्हाची माहिती त्यांना झालीय. भारतीयांच स्वस्तिक आणि नाझीच स्वस्तिकच चिन्ह ह्यांच्यात फ़रक आहे. आपले स्वस्तिक हे clockwise roate होते आणि नाझींचे स्वस्तिक हे anti-clockwise rotate होते मग त्यांना किंवा हिंदूंना गोंधळ उडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... बी, जेव्हा स्वस्तिक नजरेसमोर येतं तेव्हा मला नाही वाटत clockwise अथवा anti-clockwise आहे का याची शहानिशा कुणी करत असेल. लिंबूने सांगितलं आहे ते खरं आहे... हिंदु व नाझी स्वस्तिक यांत फरक नाही!
|
ललिता, 'नाझीचे चिन्ह म्हणजे उलटे स्वस्तिक' असे आम्हाला शाळेतून शिकवले जायचे. पण आम्ही हिटलरच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती शाळेच्या ग्रंथालयातून मिळवली त्यातल्या सगळ्याच फोटोंमध्ये हे चिन्ह आपल्या स्वस्तिक सारखेच आहे असे कळले. त्यामुळे माझाही गोंधळच झाला होता. उलटे म्हणजे नेमके काय? शेवटी उलटे म्हणजे या चित्रात दाखवल्याप्रमाणे जरासे कललेले असा समज करून घेतला. अजूनही, त्याला उलटे असे का म्हटलेय ते कळले नाही.
|
Lalitas
| |
| Monday, July 17, 2006 - 8:40 am: |
| 
|
गजानन, उलटे म्हणजे स्वस्तिकाच्या दात्यांची दिशा anti-clokwise असते. फोटोतल्या बाहीवरच्या स्वस्तिकाची गती clockwise दिसतेय. नाझी संघटनेने ते जरासे कललेले लावण्याची पद्धत आणली.
|
Moodi
| |
| Monday, July 17, 2006 - 8:45 am: |
| 
|
आपल्या स्वस्तिकात चारही ठिकाणी बिंदू असतात, ते यात नाहीत. त्या बिंदूचाही एक अर्थ आहे, पण तो लक्षात नाही. 
|
वरील फोटो उलटा छापला गेल्यास उलटे स्वस्तिक असे दिसते! अशा प्रकारे उलटा फोटो छापला गेल्याने उलट्या स्वस्तिकाचा गैरसमज तयार झाला असावा
|
Bee
| |
| Monday, July 17, 2006 - 9:31 am: |
| 
|
स्वस्तिकाच्या चारी घरात हळद कुंकू तांदूळ ठेवतात इतके माहिती आहे पण मी असेही पाहिले आहे की काही जण स्वस्तिकाची सगळी घरे रिक्त ठेवतात आणि मध्यभागी हळद कुंकू फ़ुलपाकळ्या वाहतात. तेंव्हा चार बिंदू काढणे हे आपापल्यावर अवलंबून आहे. अजून एक आहे, आपल्यात स्वस्तिक always clockwise rotate होते, इथे चित्रांवरुन असे वाटते की नाझींचे स्वस्तिक both rotations allowed करते.
|
Bee
| |
| Monday, July 17, 2006 - 9:37 am: |
| 
|
नात्याने दिलेली लिंक बघितली मी पण चित्रांखेरीज त्यातल काहीच कळत नाही..
|
Moodi
| |
| Monday, July 17, 2006 - 9:54 am: |
| 
|
ती लिंक बरोबर आहे. तुला जर्मन भाषा समजते / बोलता येते का? संपदाला विचार तीच सांगेल. त्यात स्वस्तिकाला भारतीय काय म्हणतात, चायनीज काय म्हणतात ते दिलय. म्हणजे त्या त्या भाषेत स्वस्तिक हेच नाव आहे की वेगळे हे दिलय.
|
Bee
| |
| Monday, July 17, 2006 - 10:19 am: |
| 
|
जर्मन नाही कळत म्हणूनच तर वरचे वाक्य मी लिहिले आहे मूडी. त्या लिंकवरून आपले स्वस्तिक वेगळे असते का हे मला माहित करुन घ्यायचे आहे. वर लिंबुटिंबुने मला ती लिंक बघायला सांगितली मला वाटले त्यावरुन काही कळेल पण काहीच उपेग नाय झाला संपदा तुला जर्मन येत का.. कुठे शिकलीस? मला थोड थोड फ़्रेंच येत आणि खूप गोड वाटतय बोलायला, ऐकायला, आणि खास करुन हावभाव व्यक्त करायला.. facial expression
|
Moodi
| |
| Monday, July 17, 2006 - 10:35 am: |
| 
|
आता जर्मन भाषेतील लिंक असल्यावर कळण्याची शक्यता कमी. पण जे मला कळले ते तुला सांगीतले. 
|
Lalitas
| |
| Monday, July 17, 2006 - 11:58 am: |
| 
|
मला जसा करता येतो तसा अनुवाद करते... पहिलं वाक्य Die Swastika (Sanskrit: स्वस्तिक „Glücksbringer“ / „Erfolgreicher"), auch Sonnenrad oder Rad des Lebens, ist ein sehr altes religiös-rituelles Symbol und war schon früh in verschiedenen Kulturen auf fast allen Kontinenten bekannt. =स्वस्तिक (संस्कृतमध्ये शुभदायक अणि समृद्धीकारक) किंवा सूर्यचक्र, वा जीवचक्र हे एक पुरातन धार्मिक रुढीन्चे चिन्ह (Symbol) आहे व निरनिराळ्या संस्कृतीमधुन जवळ जवळ सार्या जगांत (इथे Kontinent = continent शब्द वापरला आहे) प्रसिध्द होते
|
Naatyaa
| |
| Monday, July 17, 2006 - 4:13 pm: |
| 
|
hi ghya tya article chi English avrutti.. http://en.wikipedia.org/wiki/Swastika
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|