scraper नी बटाटा सोलणे माझी बहीण मला यावरून खूप चिडवते. जर fork आणि knife वापरून pizza खायला बसलो की खूप तारांबळ उडते. मला उजव्या हातानी कुठलीही थोडी जड वस्तू still पकडता येत नाही, my hand starts shaking terribly . पण तीच वस्तू डाव्या हातानी अगदी आरामात पकडू शकतो.
|
Saanjya
| |
| Thursday, March 23, 2006 - 5:50 am: |
| 
|
माझा problem म्हणजे मला पट्कन डाव, उजव कळत नाही, गाडी चालवताना जाम त्रास होतो, बाजुची व्यक्ति डावीकडे/उजवीकडे असे म्हणाली कि एकदम गोंधळ उडतो.. आणि बरेचदा मी आपला भलतीकडेच वळतो.. :D
|
सांज्या तुझी अडचण वेगळी आहे. ती या बिबिच्या अखत्यारीत येत नाही. तेरा तो बेसीकमेच राडा है
|
Giriraj
| |
| Thursday, March 23, 2006 - 7:48 am: |
| 
|
इतकी वर्ष Royal Enfield डावर्यांसाठीच बनवली जात असे. पण आता ThunderBird हे मॉडेल उजव्या लोकांसाठीच आहे! जनरली Bullete ला डाव्या बाजूला brakes असतात!
|
गिर्या, आधी येक सान्ग, डाव्या हाताचा वापर जास्त करणार्यास डावखुरे म्हणतात, मन्ग डाव्या पायाचा वापर करणार्यास काय म्हणावे? 
|
खरतर डाव्या हाताचा वापर करणारा डावरा आणि डाव्या पायाचा वापर करणारा तो डाव खूर आ
|
Giriraj
| |
| Thursday, March 23, 2006 - 11:37 am: |
| 
|
बरोबर सव्या! पण तू तर दोन्ही हातावाला आहेस ना!
|
मी पण आहे डावखुरी. पण त्याच्याबद्दल या बीबीवर काय लिहायचेय ते कळले नाही. गिरी मला पण दोन हात आहेत.
|
Divya
| |
| Thursday, March 23, 2006 - 2:16 pm: |
| 
|
माझी एक मैत्रीण डावखोरी होती. आमच्या शाळेत स्कॉलरबॅच म्हणुन प्रकार असायचा त्यात दहावी बारावीच्या मुलानकडुन बोर्डाच्या पेपर आधी महिनाभर रोज एक असे परिक्षे सारखे पेपर सोडवुन घेतले जायचे. त्या मैत्रीणीचा नम्बर माझ्या पुढेच होता. आम्च्या शेजारी बारावी सायन्स ची मुल बसली होती. तिच्या डावखुर असण्याचा तिच्या शेजारच्या मुलाला आणि तिला जाम त्रास व्हायचा. तिच्या हाताचा कोपरा आणि त्याच्या हाताचा कोपरा सारखे एकमेकाना लागायचे मग दोघ परत बाजुला पुन्हा तेच त्या सायन्सच्या पोराला इतकि घाई असायची तिचा हात लागायला लागला कि तो तिला ढकलुन लिहीत रहायचा. आजुबाजुचे जाम हसायचे. शेवटी त्यान्च्या जागा बदलल्यावरच त्याना पेपर नीट लिहीता आले नाही तर चालु होतीच मारामारी.
|
सं.मी. जाहीर केलेस ते बेष्ट केलेस दिव्या, मी पण हा त्रास दुसर्यांना देतो. बाजुबाजूला बसलो परिक्षा देताना की आणि हॉटेलमधे जेवायला बसलो की. गिरी, हो मी दोन हातवाला आहे. जेवणाच्या बाबतीत शब्दश: . उजव्या हाताने जेवताना डाव्या हातातील चमच्याने पण जेवतो.
|
Divya
| |
| Friday, March 24, 2006 - 3:29 pm: |
| 
|
बरय ना दोन्ही हातानी जेवणार्याना, एका हातानी स्वता जेवायच एकानी जोडीदाराला भरवायच काय. 
|
Chioo
| |
| Friday, March 24, 2006 - 3:46 pm: |
| 
|
aadhi jodidarala aani mag baL zala ki, balala. ki already bal aahe? balachya aaiche ek kam vachel. achchha.. mhanun tuza nav savyasachi hoy. chhan aahe ID. 
|
इथे स्वताबद्दल लिहायचे आहे पण मी वडीलांबद्दल सांगते.. माझे वडील डाव्या हाताने लिहीतात.. आताचे शिक्षक, आई वडील डव्या हाताने लिहीणे समजुन घेतात.. पण पुर्विच्या काळी असे नव्हते तेव्हा माझ्या वडीलांना डाव्या हाताने लिहितो म्हणुन त्यंचे गुरुजी त्या हाताअवर खुप छड्या मारायचेत, मग ते परत उजव्या हाताने लिहायचा प्रयत्न कराअयचेत.. पण जमायचे नाही.. गुरुजी पण डाव्या हातावर मारणे सोडायचे नाहीत.. " तु कधीच अध्यास करु शकणार नाही असे ते म्हणायचेत " त्यांतर पप्पा Phd झाल्यावर त्यंना भेटायला गेले तेव्हा मात्र त्यांनी आशिर्वाद दिलेत...
|
आमचे एक प्रोफ़ेसर होते डावरे, खर म्हणजे ते दोनही हात वापरायचे, फ़ळ्यावर दोनही हातानी लिहायचे, एक थकला कि दुसरा हात. एक सर्जन पन दोनही हात सफ़ाईने वापरायचे. मी पण थोडी डावरीच. माझी आत्या पण डावखुरी. एकदा तिला बघायला आलेल्यानी तेवढ्या एका कारणावरुन नकार दिलाय. भाकरी करताना ती एकटी असली कि फ़टाफ़ट डाव्या हाताने करायची. (being left handed was somehow considered अशुभ. ) उजव्या हाताने तिला जमायच नाही, जाड व्ह्ययच्या, वेळ लागायचा. पण सासुबाईना चालायच नाही डाव्या हाताने काम केलेल........शेवटी आत्याच्या मदतीला सासरे आले, त्यानी सासुबाईना समजावल.
|
मि तसा उजवाखोर पन Cricket खेळतांना bowling डाव्या हाताने तर Batting उजव्या हाताने करतो. Somehow माझ्या डाव्या हाताने FAst bowling करन सोप पडत. बाकि लिहिने वैगेरे प्रकार हे सर्व उजव्या हातानिंच !!!
|
Suniti_in
| |
| Tuesday, March 28, 2006 - 11:44 pm: |
| 
|
मी ही डावखुरी आहे. लग्नाच्या पंगतीमधे जेवताना नेहमी हाताची टक्कर बसून घास पडतात. माझ्या पेक्षा शेजारी बसणा-याचेच जास्त. . म्हणून मी कोप-यातली सीट बरेचदा मिळवण्याचा प्रयत्न करते. शाळेत असताना जर पेपर मधे वेळेअभावी काही राहीले लिहायचे आणि आईला सांगितले तर ती म्हणायची 'तू डाव्या हाताने लिहिते ना म्हणून तुझ राहात असेल.' तरी बर नेहमी पहिल्या ३ मधे असायचेच. लग्नानंतर सासरी मात्र जेवायचे वांदे होतात. सासुबाई सोबत असल्या म्हणजे उजव्या हातानेच खाण्याचा आग्रह करतात. माझे मात्र घास बळेबळेच ढकलले जातात. त्यांचे लक्ष नसले की मी मात्र हळूच डाव्या हाताने खावून घेते. नाहितर समोरच मावशी राहाते तिच्याकडे चक्कर मारून येते सांगून काहिना काही खावून येते. काय करणार डाव्या हाताने खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटतच नाही.
|
Mita
| |
| Tuesday, March 28, 2006 - 11:49 pm: |
| 
|
suniti, nice experiences.. .. ..
|
Storvi
| |
| Wednesday, March 29, 2006 - 11:26 pm: |
| 
|
>>'तू डाव्या हाताने लिहिते ना म्हणून तुझ राहात असेल>>
|
Maazhi Girlfriend Daavkhuri hoti pan tiche hastakshar faar chaan hote. Hoti mhanje doosryashi lagna zhale tiche. Gammat mhanje nantar tichyach navachi ek doosri mulgi bhetali ti pan daavkhuri hoti ani ticha navacha S ekdum saarkhaach kadhyachi. Parmeshvar doghanchyahi Navaryanna Dirghayushya deo
|
Puru
| |
| Tuesday, April 04, 2006 - 5:55 am: |
| 
|
सुनीती, डाव्या हाताने किबोर्ड टाइप करत हा मेसेज लिहिलास वाटंतं! By the way, I use my left hand for throwing things (I mean bowling etc), remove bottle-lids etc & use right hand for writing/batting. I'm lefty while playing Lawn tennis & righty while playing Table tennis )
|