Sonalisl
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:00 pm: |
| 
|
माझी एक मैत्रीण, एक दिवस अचानक तिला डाव्या हाताने लिहिताना पहिलं....तिला विचारलं तर ती बोल्ली, "मी डावखुरी नाही, मला दोन्ही हाताने लिहिता येतं". एका हाताने लिहून थकलो कि आम्ही 'बऽऽस...बाऽस' ओरडायचो, पण ही एक हाथ थकला कि लगेच दुसर्या हाताने लिहायची. वाऽव!
|
Supermom
| |
| Wednesday, January 30, 2008 - 7:07 pm: |
| 
|
माझी आई पण डावखुरी आहे. पण दोन्ही हातांनी लिहिते. ती शाळेत शिक्षिका होती तेव्हा डावा हात थकला की खडू उजव्या हातात घेऊन फ़ळ्यावर लिहिणे continue करत असे. सगळ्यात वाईट्ट म्हणजे दोन्ही हातांनी फ़टके देत असे लहानपणी आम्हाला....
|
Upas
| |
| Wednesday, January 30, 2008 - 9:50 pm: |
| 
|
म्हणजे सव्यसाची
|
Runi
| |
| Thursday, January 31, 2008 - 1:42 am: |
| 
|
मी नाही पण माझी बहीण डावखुरी आहे. ती पण दोन्ही हाताने फटके मारते. ती लहान असताना जेव्हा वाड्यातल्या मित्र-मैत्रीणींशी भांडण आणि मारामारी करायची तेव्हा बर्याचदा सगळेजण तिच्या उजव्या हाताकडे लक्ष ठेवायचे आणि ही नेमकी उजव्या हाताऐवजी डाव्या हाताने फटका मारायची. मार खाणार्या मित्र-मैत्रीणींना हे एकदम अनपेक्षित असायचे. पण मला तिचा हेवा वाटतो कारण ती दोन्ही हातांनी तितक्याच पटपट काम करु शकते.
|
Anaghavn
| |
| Thursday, January 31, 2008 - 8:53 am: |
| 
|
दोन्ही हाताने काम करण्याचा फायदा कळाला--मारणे सोप्पे जते---एक हात थकला की दुसरा. तोपर्यंत पहील्याला विश्रांति मिळतेच, की पुन्हा पहीला. असो. मनीषा धन्स. लहानपणी मला स्वत:ला complex होता माझ्या डावेपणा बद्दल. कारण सगळे येताजाता विचारायचे आश्चर्याने. आणि मैत्रिणी तर फारच दयेने बघायच्या. आईच्या लक्षात आल्यावर तिने समजाऊन सांगितले.
|
चेस खेळताना दुसर्याचे प्यादे मारताना सहसा सगळे एकाच हाताने त्याचे प्यादे उचलणे आपले ठेवणे अस करतात. मी दोन्ही हाताने करत असे. पटावर दोन दोन हात आले की पट नीट दिसत नाही आणि मग तू खालच्या खाली काहितरी हलवाहलवी करतोस असा एक आरोप माझ्यावर यायचा
|
Bsk
| |
| Thursday, January 31, 2008 - 5:00 pm: |
| 
|
अग अनघा त्यात कॉंप्लेक्स कसला! उलट आपण वेगळे उठून दिसतो डावखुरेपणाने.. मला पण सगळे विचारतात , "तू डावखूरी आहेस??" पण सगळ्यांना कुतुहल च वाटतं.. आणि हेवा पण! माहीत नाही का..
|
Anaghavn
| |
| Friday, February 01, 2008 - 7:45 am: |
| 
|
हो गं. पण ते लहानपणी वाटायच--तेव्हा काही कळायच नाही (३४ थी त असताना). पण आता मात्र अभिमानच वाटतो. माझ्या सासुबाई एकदा माझ्या भाचीला डव्या हाताने लिहीलं म्हणुन म्हणाल्या होत्या, चुकीच्या हाताने लिहायचं नाही. जाम चिडले होते मनात. पण वरकरणी शांतपणे (तरीही ठामपणे) म्हणाले, तो चुकीचा हात नसतो. आपल्या कल्पना चुकीच्या असतात. ज्यांचा उजवा मेंदु प्रबळ असतो, ते डावा हात प्रामुख्याने वापरतात.
|
श्या... गोंधळ हो. शिंचे हे ३४थी असताना म्हणजे काय यैसे आणिक काही ईतर विचार करोन करोन आस्मादीकांचे प्रबळ मस्तिष्क अगदी थकुन गेले... ईतके शिकोन आणिक पुन्हा काही एक कळो नये याचे गहन आश्चर्य वाटोन सीमा जाहली. येणेप्रमाणे विकल्प हे आम्हासच होतात की कसे ते शहाण्यासुरत्यानी कळवावे यैसी विनंती वजा आज्ञा. कसे? वामहस्तासंबंधी उदबोधक आख्याने वाचोन मन संतोषले... कैक दीन आम्ही काही संधींची नीरगाठ उकल होत्ये का ते पाहात होतो... आज योग आला... वाम न... असा जो तो म्हणजे वामन... किंवा व्वा मन... म्हण्जे त्याचे मन खुपच चांगले आहे असा अंमळ विश्रांती घ्यावी म्हणतो.
|
Anaghavn
| |
| Friday, February 01, 2008 - 8:10 am: |
| 
|
अहो धोंडोपंत, ते ३ अथवा ४ थी असे आहे मधल slash दिसत नाहिये.
|
मी पन डावखुरा आहे. खुप मार खाल्ला डाव्या हाताने लिहितो, जेवतो म्हनुन, पण काहि उजवा होवु शकलो नाहि. नन्तर समज़ले कि, त्यात काहि चुकिचे नाहि, डावा काय नि उजवा काय..... पण रोजच्या जिवनात सर्व काहि वस्तु उजव्यासाठी बनवलेले पाहिले की वाईट वाटते. उदा. कात्रि, नाळ ई.
|
Pan kaay ho?? daavkhure khup hushaar astaat naa.. mag te nehmi apamanacha vishay kaa thartaat?
|
Soni_kudi
| |
| Thursday, April 10, 2008 - 8:26 am: |
| 
|
माझी मुलगी पण डावखुरीच आहे तीने उजव्या हाताने निदान जेवावे म्हणुन आम्ही खुप प्रयत्न केले...पण यश नाही आले. ती डाव्या हातानेच जेवते. आणि लिहिते मात्र दोन्हि हातानी..एकदा तिच्या टिचर ने बोलावुन विचारले कि ही नेमक कोणता हात वापरते ? त्याना कळत नव्ते की ही दोन्हि हात कसे वापरते?आता मात्र तीला हवे तसे म्हणजे हवा तो हात वापरु देतो...
|
Dakshina
| |
| Thursday, April 10, 2008 - 9:09 am: |
| 
|
सोणी कुडी, कृपया, मुलीला उजव्या हाताने जेवण्यासाठी प्रवृत्त करू नकोस. माझी आत्तेबहीण पण डावखुरी आहे, लहान असताना माझे काका तिचा डावा हात मागे बांधून ठेवत आणि तिला जबरदस्तीने उजव्या हाताने जेवायला लावत. ती खूप रडायची. महिनोंमहीने हा प्रकार चालू होता. आणि जेवलं तरीही ती दिवसभर भूक भूक करायची. एकदा ती रडून आत्याला सांगत होती की उजव्या हाताने जेवलं की माझी भूक भागत नाही म्हणून... मला खूप वाईट वाटलं तिचं.... 
|
Soni_kudi
| |
| Thursday, April 10, 2008 - 11:17 am: |
| 
|
दक्षिणा..म्हणुन आम्ही तो प्रयत्न सोडुन दिला कारण मी असेही ऐकले की मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो
|
Dakshina
| |
| Friday, April 11, 2008 - 4:42 am: |
| 
|
छान केलंस गं.. आणि उजवा हात काय आणि डावा काय? काय फ़रक पडतो? शेवटी तो ही एक शरीराचाच भाग आहे ना? सर्वं आई वडीलांना (विशेष करून ज्यांची मुलं डावखुरी आहेत अशांना) जर उपरती झाली तर खूप बरे होईल. कारण (निदान) जेवणासारखी 'पवित्र' गोष्टं मुलांनी डाव्या हाताने करू नये असे त्यांना वाटते.
|