Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 22, 2006

Hitguj » My Experience » डावखुरे आहेत का? » Archive through March 22, 2006 « Previous Next »

Champak
Tuesday, March 14, 2006 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस सिझर, बिल क्लिंटन, लिएंडर पेस,अमिताभ, अन चंपक ह्यात एक साम्य आहे.... कुठले बरे!...... ते सगळे डावखुरे आहेत!!!:-)

इथे मायबोलीवर अजुण कोणी डावखुरे / डावरे आहेत का?


http://www.anythingleft-handed.co.uk/fam_history.html#leaders

Ameyadeshpande
Tuesday, March 14, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक मी दोन्ही आहे थोडा थोडा... म्हणजे, सगळे खेळ, badminton, tennis आणि cricket डावखुरा, स्वयंपाकाचा मुख्य हात डावा आणि जेवण लिखाण उजव्यानी... अश्यांसाठी वेगळा BB करू की इकडे चालेल? :-)

Limbutimbu
Wednesday, March 15, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्पुमामा, म्या ल्हानपणी डावखुरा होतो पर समद्यानी बोलुन बोलुन मला उजवाखुरा केला!
पर आजबी, कवा हाणामारीचा वखत आलाना तर डावा हात जास्त चालतो!


Kandapohe
Wednesday, March 15, 2006 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे एक ऑब्सेर्व्हेशन आहे. डावखुर्‍या बर्याच लोकांचे अक्षर चांगले असते. आणि जनसामन्यामधे हे लोक्स वेगळे असतात. लहानपणीच ज्यांना दावा हात वापरावासा वाटतो ते वेगळेच असणार ना? अपवाद असतीलच. :-)

Shankasoor
Wednesday, March 15, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आहे डावखूरा!
पण लिखाण मात्र उजव्या हातानी करतो त्याला कारणीभूत माझे शाळेतील शिक्षक आणि आई वडील.


Saanjya
Wednesday, March 15, 2006 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण आहे डावखूरा! मात्र जेवण, लिखाण उजव्या हातानी करतो..

Sahilshah
Wednesday, March 15, 2006 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा डावखुरा आहे. जेवण पण डाव्या हातानी करतो. फक्त mouse उजव्या हातानी चालवतो

Ameyadeshpande
Thursday, March 16, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी बहीण डावखुरी आहे आणि अगदी पक्की खाणं, लिहिणं, खेळणं सगळच आणि आई बाबांनी ही कधी तिला force केलं नाही... पण लहानपणी तिचं पाहून पाहून मी अर्धा डावरा झालो :-)
आणखी एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी... माझा एक मित्र डावरा आहे तर तो देवाचा प्रसाद पण डाव्या हातानी घेतो आणि ह्या गोष्टीबद्दल त्याचे बाबा एकदम logical विचारांचे आहेत त्यांनी कायम त्या गोष्टीला पाठींबा दिला आहे...आता जर निसर्गानीच त्याला डावरा केलयं तर मग देव तरी माझा प्रसाद उजव्या हातानी घे का म्हणेल... ही प्रसादाची गोष्ट बर्‍याच जणांना सुरुवातीला पटत नाही. त्यांचा हा विचार unconventional तर आहेच पण त्यांच्या पिढीला खूप कौतुकास्पद ही आहे.


Champak
Thursday, March 16, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! बरेच जमले कि:-)

मी पक्क डावरा हे. आई सोबत देवळात गेलो कि प्रसाद घेताना तिथल्या बाबा बरोबर हुज्जत नेहामी च होते!

अनेक जण forcefully उजवे बनवले जातात. माझा एक पुतण्या पण डावरा आहे. माझी मोठी वहीनी ही डावखुरी आहे.

संगणका ला मात्र उजव्या च हाताने माउस वापरावा लागतो...... बिल गेटस ला सांगितले पाहिजे हे :-)

डावरे पणा ला कारण काय आहे हे माहिती आहे का?


Kalandar77
Thursday, March 16, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक भो, माउस डाव्या हाताने वापरायचं असेल तर Control Panel -
Mouse Properties मध्ये जा, तिथे तुला तसा option दिसेल. नंतर माउस डावीकडे ठेव नाहीतर अडचणीचे होईल!

मी फ़ेकण्यात डावखुरा आहे. आपले वसंत डावखरे पण डावखुरेच असतील बहुतेक!
:-)

Moodi
Thursday, March 16, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक मी अर्धी डावखुरी आहे रे.

Shankasoor
Thursday, March 16, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खाली दिलेली link पहा
http://www.indiana.edu/~primate/brain.html

Champak
Friday, March 17, 2006 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks धाकले साहेब! आता पक्का डावरा!:-)

शंकासुर, ह्यावर मी नंतर लिहिल.


Naatyaa
Friday, March 17, 2006 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण जन्माने डावखुरा आहे. पण मला लहानपणी जेवण आणी लिखाण या गोष्टी उजव्या हाताने करायला लावल्या.. त्यामुळे मी पण आता अर्धा डावखुरा :-)

Adityaranade
Saturday, March 18, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिमी हेंड्रीक्स हा एक अतिशय प्रतिभावान गिटारवादक डावराच होता..त्या काळात (म्हणजे १९६०-७० मध्ये) डाव्या हाताने वाजवता येण्यार्‍या गिटार बनवल्या जात नसत
म्हणून त्याने
regular गिटारच उलटी धरून वाजवायला सुरुवात केली
thus came his unique style and sound!!

Adityaranade
Saturday, March 18, 2006 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

९० च्या दशकातला डावखुरा गिटारवादक म्हणजे कर्ट कोबेन ('निर्वाणा' या ग्रुप मधील)
दुर्दैवाने आजच्या घडीला जिमी हेन्ड्रीक्स किंवा कर्ट कोबेन हे दोन्ही आज आपल्यात नाहीत


Shyamli
Saturday, March 18, 2006 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी पण डावरी आहे...
अगदी हातात वस्तु धरायला शीकतात तेंव्हापासुन....
लगेचच माझ्या लक्षात आल.....काही समोर धरल की ती डावाच हात पुढे करते....

शाळेत घातल्यावर १ल्यांदा पेंन्सिल हातात दिली तर तीला उजव्या हातात धरताच येईना....

मग मात्र नोट लिहुन पाठवावी लागली........




Manuswini
Saturday, March 18, 2006 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते जवळपास सर्वच जण अर्धे डावखुरे असतात ना काही बाबतीत :-)


Bhagya
Sunday, March 19, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक माझी आई डावखुरी आहे रे! लहानपणी आम्ही मस्ती केली की दोन्ही हाताने फ़टके मारायची. मस्ती आणी वेड्यावाकड्या गोष्टी बंदच केल्या आम्ही मग.

Milindaa
Sunday, March 19, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण इथे कसल्या अनुभवांविषयी लिहीतोय ?

Champak
Sunday, March 19, 2006 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा, अरे हे सदर कुठे सुरु करावे हे समजेना म्हणुन मी इथे सुरु केले. डावर्‍या लोकांना येणारे अनुभव इथे लिहावे त असा माझा माणस आहे. मला वेळ झाल कि मी लिहील च. आता ईतरांना लिहु दे!

गुरुदास कुठे गेले? ते ही डावरे आहेत असे म्हणाले होते मागे!

आदित्य, माहितीबद्दल आभार!

भाग्या....... डाव्या हाताचा धपाटा लै जोरदार असतो :-)

शामली, तुम्ही मुलीला मारुण मुटकुण उजवे बनवु नका. डावरे लोक लै उनिक असतात असे वर अनेकांनी लिहिले आहेच!:-)


Vaatsaru
Sunday, March 19, 2006 - 11:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याच्यावरची एक ओळ आठवली म्हणून
It's our right to be left


Mrinish
Wednesday, March 22, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण पक्की डावखुरी आहे......पण एथे अनुभवान्बद्दल बोलायचे आहे ना...
मला सान्ग्गा तुम्हा कोणाला कात्री वापरण्यात कधी काहि अडचण आली नाही का? मला अजुनहि कात्रीने कापडकागद निट कापता येत नाही.....


Champak
Wednesday, March 22, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो ते च त लिहा कि! तुम्हाला काय काय अडचणी येतात ते!

सगळ्यात सुरुवात म्हंजे shake hand ला कशी गंमत होते पहा! डावा हात पुढे जातो अन match-mismatch होते:-)


Jaaaswand
Wednesday, March 22, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रांनो..
प्रथम हे स्पष्ट करतो कि.. मी डावरा नाही..
तरी चंपक ने म्हटल्याप्रमाणे.. डावर्‍या लोकांना
काय काय प्राॅब्लेम येत असतील.. ह्याचे एक उदाहरण

कुठल्याही company च camcorder घ्या तो फ़क्त righ hand grip च देतो....
डावर्‍यांचे खूप हाल होत असतील त्याने

काही अनुभव.. आपल्या पैकी काही लोकांचे... ??


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators