Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 22, 2006

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Majhe dukh » Archive through May 22, 2006 « Previous Next »

Bee
Wednesday, March 15, 2006 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bravo MM. khupach chhan!

paN Bhawanik dukh hehee ek asashya karaNare dukh asoo shakate. daraweLee aapalya feelings dust bin madhye takawyat ka?

Lopamudraa
Wednesday, March 15, 2006 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डस्ट्बीन मध्ये टाकणे नाही म्हणत त्याला, आयुष्यात हार न मानता पुढे पुढे जात रहाणे म्हणतात!
झरा वहतो त्याला रस्त्यात दगड लागला आणि तो म्हनत राहीला माझ्याच रस्त्यात दगड का आला, मी आता येथेच थांबतो, तर त्याचे डबके होइल!! पण जर तो त्या दगडाला वळसा घालुन पुढे गेला तर तर त्याचे नयनरम्य ठिकाण बनेल.


Chingutai
Wednesday, March 15, 2006 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It is just a passing phase!!

नीरा
अग, निघुन जाईल आणि खर सान्गू तर आपणच आपली केटेगरी ठरवायची मग अजिबात दु:ख होत नही.
मला असे वाटते, ना ही तू दु:ख करावस आणि नाही खूप आनन्दाचा देखावा!
हे करून पहा...
आरशासमोर उभी रहा- १० वेळा स्वतहाच्या डोळ्यात पाहून म्हण-
"मला आज खूप छान वाटतय.
I am enjoying. I am better today. I am the best" & give a nice smile to urself.
See it will work like magic in 4-5 days.Its fun too.Deep breathing is very important to boost ur confidence.
[-These r my views; no claim whatsoever.]



Moderator_7
Wednesday, March 15, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बीबी ची चर्चा मूळ विषयापासून दूर जात असल्याने हा बीबी आता बंद करण्यात येत आहे.

कोणाला विषयाशी संबंधित काही लिहायचे असेल तर तशी विनंती करावी म्हणजे बीबी उघडता येईल.


Sunflower
Wednesday, May 17, 2006 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज मी प्रथमच लिहित आहे, मी एथे कुन्हालाच ओलखथ नाही, पन मला आज लिहावासे वतले, ३ महिन्या पुर्वि मी एका छान बालाला जन्मा दिला, पन आज तो मज़्या सोबत नाहि आहे, देवाने त्याला मज़्या पासुन हिरवले अहे.मी खुप आहे मला कलत नाही कय करु ते?
सतत मला बालाचि अथवन येते.


Mrinmayee
Wednesday, May 17, 2006 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सनफ़्लावर, खूप वाइट वाटलं बघ तुझं post वाचून! आपलं बाळ गमावणं ही कल्पनाच करवत नाही तिथे तर तू हे प्रत्यक्ष भोगतेय. परदु:ख शीतल असतं म्हणतात पण तरीही तुला काही सांगावसं वाटतय. काळ हेच औषध असू शकतं असं वाटतं. स्वत:ला गुंतव कशात तरी. मायबोलिवर येत रहा. घरी एकटं बसण्यापेक्षा बाहेर पडून काही करता येतं का ते बघ. तुझा देवावर विश्वास आहे ना? मग तो तुला मार्गही दाखवील यावरही विश्वास ठेव.
तुला खूप मन्:शांती लाभो ही इश्वराकडे प्रार्थना! हे कठीण दिवसही जातील बघ.


Maitreyee
Wednesday, May 17, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनिया, खूप वाईट वाटलं वाचून. तुझ्या वाट्याला आलेलं दुःख मोठं आहेच. एक सांगू, जरा विचित्र वाटेल, पण थोडे दिवस कुणाही ओळखीच्यांना, मित्र मैत्रिणींना भेटूच नकोस, त्यांना आपली काळजी, प्रेम असते हे खरे पण त्यामुळेच होते काय की ती घटना विसरणेही अवघड होऊन बसते काही वेळा! शक्य असेल तिथे शक्य असेल तसे वेगळ्या ठिकाणी जाणे, नव्या लोकांना भेटशील असे पहा. नवे मित्र मैत्रिणी बनव. वेगळे काही शिकायला जा, अशाने पुन्हा एकदा नवीन सुरुवात करायला जरासे सोपे जाईल असे मला तरी वाटते. Good Luck!

Robeenhood
Wednesday, May 17, 2006 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सनफ्लावर....
घटना तर खरच दु:खद आहे. नाइलाज आहे. नियन्त्याने त्या जीवाचे आयुष्य तेवढेच ठेवले होते त्याला कोण काय करणार?
अशा असंख्य भगिनी आहेत.
भविष्यकाळ उज्वल आहे.....
त्यावर विश्वास ठेव.....
मायबोलीवर येत रहा... विरंगुळा मिळेल..


Bee
Thursday, May 18, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनिया, माझ्या office मधील दिपाला २ महिन्यांपुर्वी मुलगी झाली. त्यानंतर तिने मला सांगितले की तिचे हे २रे बाळंतपण आहे. पहिल्या वेळी दिवस पूर्ण भरले होते आणि तिला still born baby झाली होती. त्यानंतर तिने ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही. आपले दुःख आपणच सहन केले. जेंव्हा तिला दुसरे मुल झाले तेंव्हा तिने ही गोष्ट ढसाढसा रडत सर्वांना सांगितली. त्यावेळी आम्ही अगदी सुन्न झालो.

माझी सख्खी वहिनी मुलीला जन्म देऊन लगेच गेली. ह्या गोष्टीला १६ वर्ष पूर्ण झालेत. आम्ही भावासाठी काही मुली बाघितल्यात पण सतत वहिनीचा चेहरा त्यांचे गुण डोळ्यासमोर उभे राहतात. शेवटी त्याने लग्न केलेच नाही. आता माझी पुतणी १६ वर्षाची झाली आहे आणि हुबेहुब वहिनींसारखी दिसते. तिला बघुन आम्हाला ती वहिनीचे जणू दुसरे रूपच आहे असे वाटते. आमच्या वहिनीची उणीव तिच्यामुळे भरून निघाली. वहिनी गेल्यानंतर आमच्या घरावर एक अवकळा पसरली होती. एक तान्हे मुल, भावाचे विधुर होणे हे सगळे दुःख कमालीच खोलवर होते. आजही वहिनींची छबी डोळ्यासमोर उभी राहीली की गंगाजमुना एकत्र होतात.

काही दुःखांना काळ हे एकच औषध असते. असो.. सुखी रहा.. तुझे २रे अपत्य लवकरच जन्माला येवो अशी शुभेच्छा!


Wonder_ajit
Thursday, May 18, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार!!... छान वाटलं हा फ़ोरम बघुन......खरंच मी पण विचार करत होतो कुठं मनमोकळेपणानं माझे विचार व्यक्त करावेत..... कधी कधी मी विचार करतो की मी ह्या जगात का आलो आहे? माझा जन्मं कशासाठी आहे? इत्यादि इत्यादि...कधी कधी डोकं उठतं विचार करुन...पण हाती काहीच लागत नाही!!.... कधी कधी वाटतं आपण हा विचार आता तरुण वयात का करावा?...पण नंतर वाटतं माझं आयुष्य मलाच घडवायचं आहे मग हा विचार मीच करायला हवा.... तुम्हाला काय वाटतं?... प्लीज मला कोणी तत्वज्ञानी समजु नका


Maudee
Thursday, May 18, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wonder_ajit ,
अस कधी कधी होते,.... i will suggest u की मायबोलीवरच्याच या bb वर जा....कदाचित तुझ्या प्रश्नन्ची उत्तरे मिळतील किन्वा येणारे नैराश्य जाईल....

/hitguj/messages/103384/104553.html?1147766284

मला देखिल असेच काही प्रश्न पडले होते....पण आता छान वाटत आहे.

Sunflower
Thursday, May 18, 2006 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याचे मी आभार मानते, तुम्हि मला हिम्मत दिलीत.
तुम्हा मी आता मजे मन रमवीण्याचा प्रयत्न करीन.
तुम्हि सगळे म्हणता तेच बरोबर अहे कि कहि दुःखांना वेळ हा एकच मार्ग आसतो.
मायबोलि वर येवुन खुप बरे वट्ले.सगळ्याचे मेसेज वचुन बरे वट्ले.
थन्क्स,


Dineshvs
Thursday, May 18, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sunflower हे वियोगाचे दु : ख मी जाणतो. पण त्या नंतर जगातले प्रत्येक बाळ मी माझे मानले.

Storvi
Thursday, May 18, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह दिनेश! मान गये. एकदम पटलं

Wonder_ajit
Friday, May 19, 2006 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मौदी......मनाला थोडा दिलासा मिळाला

Robeenhood
Friday, May 19, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बी बी एक चांगला बी बी आहे. ह्या मानसिक आधाराचे महत्व आहेच. आमच्या ऑफिसमध्ये आम्ही शेतकर्‍यांच्या आत्महत्याबाबत काय करायचे याबाबत एक चर्चासत्र घेतले होते. सकाळ ने यावर सविस्तर अभ्यास करून त्याचा रिपोर्ट मुख्यमंत्र्याना दिला आहे. सकाळ वाल्यानाच आम्ही बोलावले होते चर्चेला. त्यात मानस शास्त्रज्ञ ही होते. सुरुवातीला बरेच दारू पिऊन मेले आहेत अशा टिपिकल काॅमेन्ट्स झाल्या. पण सकाळ सर्व्हेची चर्चा झाल्यावर असे बोलणार्‍यांची तोंडे गोरीमोरी झाली.
बर्‍याचदा आपण नुसत्या कॅजुअल काॅमेन्ट करतो. त्याला सायकाॅलाॅजीत arm chair method of analysis म्हणतात. तशातलेच.
त्यात एक मुद्दा असा की आत्महत्या करण्याच्या त्या टिपिकल क्षणाला जर सहानूभूती,दोन प्रेमाचे शब्द मिळाले तर त्या माणसाचे मन बदलू शकते. आपल्याला कोणी नाही, कोणी विचारत नाही ही वैफल्याची भावना दूर होऊ शकते. आपण कोणाला तरी हवे हवेसे आहोत ही भावना तर जगण्याचे इन्धन आहे.

त्यावर मला एक किस्सा आठवतो.
एकदा एक माणूस असाच जीवनाला वैतागून आयफेल टाॅवरवर आत्महत्या करण्यासाठी चढतो. तो उडी मारणार तोच एक पोलिस त्याला पहातो व ओरडतो'अरे अरे काय करतोयस तू हे?'
नाही मला मरायचे आहे मी सगळ्याना नकोसा झालोय, माझे कोणी नाही.
त्यावर तो पोलिस ओरडला'तू जरूर उडी टाक पण मरण्यापूर्वी ही सिगरेट ओढून जा...
तो माणूस खाली आला. सिगरेट ओढता ओढता हळू हळू त्याचे बोलता बोलता मतपरिवर्तन होत गेले आणि तो वाचलाही...

हा किस्सा खरा नसेलही पण त्यामागचे तत्व नक्कीच महत्वाचे आहे....
'त्या' नाजूक क्षणी कुणीतरी भेटले पाहिजे बोलले पाहिजे.
यासाठी एकमेकाशी बोलले पाहिजे भेटले पाहिजे....

वर दिनेशनी जो विचार मांडलाय तो खरंच ग्रेट आहे.

Really Dinesh is Great man and pride of Hitguj!!!!!!!!!!!!!!


Maudee
Friday, May 19, 2006 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुमोदन पुरु.....
आपण कुणालातरी हवे आहोत ही कल्पनाच ख़ूप छान आहे......:-)
कित्येक वेळेला नैराश्यातून बाहेर यायलाही फ़क्त हेच शब्द उपयोगी पडतात....


Meenu
Friday, May 19, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनिया काहि दिवसांपुर्वी माझ्या भावाचं बाळही जन्मानंतर आठवडाभरात गेलं फार दु:खद प्रसंग आहे खरा...

माझी वहिनीही खुपच ढासळली होती..

पण तुला सांगु का.. तु स्वत:ला सावर नवर्‍याकडे लक्ष दे.. पुरुषांनाहि याचं खुपच दु:ख होतं ग, मी माझ्या भावाच्या अनुभवावरुन सांगते...

दोघही एकमेकांशी वेगवेगळ्या विषयांवर खुप बोला.. शक्य तो एकत्र फिरायला चालायला जा....

आणी हो शक्यतो एखादी नोकरी बघ... कामात मन गुंतवलस.. नवीन लोकांना भेटलीस की बर वाटेल बघ तुला..

शक्यतो sad असं काही वाचु किंवा पाहु नकोस.. विनोदी पुस्तकं वाच किंवा cinema पहा....

पु. लं. च साहित्य अशा वेळी चांगला हात देतं....

धीरानी घे गं


Robeenhood
Friday, May 19, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुमोदन पुरु? पुरुचे तर एकही पोस्टिंग दिसत नाही इथे.....

माऊडी


Maudee
Monday, May 22, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

robeenhood ,
in fact मला तुमचे नाव लिहायचे होते....
काय झाले की मी दुसर्‍या कुठल्यातरी bb वर असे लिहिले.....आणि या bb वर आल्यावर बहुतेक तसच लिहिले.:-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators