Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 16, 2006

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » kitchen किस्से » Archive through March 16, 2006 « Previous Next »

Mepunekar
Wednesday, January 25, 2006 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mazya maitrinicha kissa sangte.
Tila tichya aai ne tomato dhun anayla sangitle. Teva tine te swaccha honyasathi, saban lavun dhun aai la dile....


Manali_frd
Saturday, January 28, 2006 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा पुलाव करतान्ना त्यात मला वाटाणे मटार्) टाकायचे होते. मी ते सरळ फ़ोडणीत टाकले. मस्त उडाले ओट्यावर!!!!
माझी चुलत बहीण केक करायला शिकली होती. भावचा वाढदिवस म्हणुन तीने केक करायचा असं ठरवलं. सगळं अगदी मोजुन विकत आणलं. दुकानवाल्यालाही कळालं आज केकचा बेत आहे तर. :-)
केक भाजुन झाला आणि खायला घेतला तेव्हा कळलं तळाकडुन जळालेला आणि वरवर कच्चा.
तिचा भाउ अजुनही चिडवतो " ती केकची मेहरबानी नको " म्हणुन.




Rachana_barve
Friday, February 03, 2006 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अगदी पहिल्यांदा कोणालातरी जेवायला बोलावले होते. ज्या काका काकूंना बोलावले होते त्यातल्या काकू जाम सुगरण होत्या. नेहमी मला जेवायला बोलाऊन काय काय पदार्थ खाऊ घालायच्या.
म्हणून मग मी त्यांना बोलाऊन पालक पनीर, पोळ्या भात आणि आमटीचा बेत केला होता. ६ पोळ्या करायला साधारण दिड तास, पालक पनीर वाडगाभर बनवायला एक तास, आमटी बनवायला अर्धा. आणि माझ्या मते मी प्रचंड प्रमाणात पदार्थ बनवले होते. पण १० च मिनिटात सगळे संपल्यावर काकांनी मला अजून एक पोळी वाढ ग म्हंटले तेंव्हा काय झाले असेल माझे :-(


Manuswini
Saturday, February 04, 2006 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढोकळा हा प्रकार हा मला कधिच जमत नाही
किती ही आईचि copy मारली तरी काय तो ढोकळा तसा होत नाही जसा जाळीदार,हलका आईच्या ढोकळ्यासारखा का दुकानातल्यासारखा

आतापर्यन्त मी तिनदा प्रयन्त केला पण जेव्हा पहिल्यांदा करणार होते तेव्हा खूप advertisement केली स्वःताची आणी friend ना बोलवले, चार पाच वेळा आईकडुन recipe घोळुन घेतली. चणा डाळ भिजत घालून, आंबट दही, आले, मिरची वगैरे वगैरे

पिठ तयार केले, मैत्रिणी बाहेर बसुन होत्या, एकदम excited होत्या कारण घरि बनवलेला ढोकळा from scratch And using authtic recipe म्हणुन.
पिठ कूकर मधे घालून शिट्या जेवढ्या काढायला सांगितले होते आईने काढल्या
झाकण उघडून बघते तर लहान्पणी मिळायची ना तशी 501 कपड्याच्या साबणाची बुळबुळीत वडी
चव पिठाची चांगली होती पण जड आणि बुळबुळईत.

सगळ्या मैत्रिणी नुसत्या किंचाळून हसत होत्या तेव्हा बहिण हि घरी असल्याने खूप फजिती उडवली, साबण खावून उलट्या होतील बाबा आम्हाला.

नंतर दोनदा घरी एकटीच्(लोकलजेसाठी एकटी असताना) असताना केला काही म्हणून यश येत नाही.
आई तर सोडा सुद्धा टाकत नाही तरि जाळिदार हलका होतो. आई करायची तेव्हा लक्ष कधिच घातले नाही, आणि जेव्हा आई भेटते घरी तेव्हा ढोकळ्याचा mood नसतो.


Psg
Thursday, February 16, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू, ढोकळा हा फक्त आयांनीच करावा अस दिसतय! कारण माझे अनुभव म्हणजे ditto तू जे वर लिहिल आहेस तेच! :-) आणि अजून वाइट म्हणजे, हे सगळ सासरी! :-) सगळ्यांसमोर इज्जतका फालूदा! :-) गंमत म्हणजे माझ्या बहिणीलाही ढोकळा जमत नाही, आणि आई नेहेमी म्हणते की किती सोपा आहे, कसा काय जमत नाही तुम्हाला? :-)

Manuswini
Saturday, February 18, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

psg
अग हो ग काय कळत नाही चार चार वेळा प्रमाण, आईची style विचारून करते आईला

च्यायला काय यश येत नाहे.

दोन्ही वेळेला अगदी पेटून उठले की काहीही करून ढोकळा करेन पण छे
आई अगदी गप्प असते पलिकडे phone वर अग असा कस तुला जमत नाही एकदा शांत चित्तने करायचे म्हणतेय यश आले तर सांगते तुला आणी matching मह्णजे बहिणीला सुद्धा येत नाही आणि तिच्या नवर्याला ढोकळ आवडतो


Varadakanitkar
Wednesday, February 22, 2006 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्विनी माझा ढोकळा झाला आईसारखा. ढोकळा कूकर मधे ठेवण्याआधी ५ मिन. त्यात इनो घालुन खूप जोरात फ़ेट आणी मग बघ किती छान होतो ते.

Mita
Wednesday, February 22, 2006 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरदा किती वेळ ठेवायचा कुकरमधे?? मी २-३ वेळा केला होता तेव्हा spongy झाला होता पण मधे बरोबर शिजला न्हवता. मी साधारण १२-१३ मिनीट ठेवला होता..
हे विचरण्याची ही जागा नाही हे महिती आहे पण अगदिच रहावल नाही.. sorry


Divya
Friday, February 24, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या BB वरचे अनुभव वाचुन मजा आली. मलाही ढोकळा हा प्रकार कधीच जमत नाही. आता तर प्रयोग करायची भीती वाटते दोनदा तर सगळ फ़ेकुन द्यवे लागले आहे.
मी कॉलेज मधे असतानाअची गोष्ट, तसा स्वयपाक करायला आवडायचे पण रेसिपी बघुन कधी चायनीज, पजाबी डिशेस करण्याकडे कल. रोजच्य जेवणातले पदार्थ भाज्या, आमटी फ़ारसे कधीच केले नाही. आई गावाला गेली होती. आत्याच्या सासर्याचा मुक्काम होता, ते अचानकच आले, पोळ्या करायला येणार्या बाईने भाजी पण करुन ठेवली आत्याने फ़ोनवर सागीतले कि त्याना जेवणात कढि लागते कढि शिवाय जेवत नाहीत जमलीतर कर नाहीतर राहु दे. कढी कशि करायची ते विचारुन घेतले कढिला लावायच्या डालीच्या पीठाचे प्रमाण अन्दाजे लावयच अस सागीतले अणि मी माझ्या अन्दाजाने लावले व त्या दिवशी कढी ऐवजी कढीतले पिठले खायला मिळाले, वडिल डोळे वटारुन बघत होते एवढी लग्नाला आलेली आणि कढि येत नाही आत्या सातवीत असतानाच स्वयपाक शिकली वैगरे भरपुर एइकायला मिळाले.


Moodi
Friday, February 24, 2006 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिव्या मला ढोकळा मस्त जमतो, ये खायला.

मिता साधारण १२ मिनिट विकतच्या पीठासाठी लागतात. गिटसचा खमण आण.
मिलिंदा रागवेल मला आता..


Geeta1
Friday, March 03, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही नविन घर घेतल्यावर झालेली एक मजा येथे सांगत आहे.

नवीन घरातील पहिली दीवळी, म्हणजे तुम्ही समजु शकता की किती उत्साह असेल दीवळीचा फ़राळ करायला?

झाले, माझ ठरल की कोणाचीही मदत घेयची नाही. चकल्या, लाडु सगळे काही एकटीनेच करायचे.

त्याप्रमाणे, चकलीची भाजणी दळुन आणली, आणि चकल्या करायला घेतल्या. अर्थात आधी अग आइ आणी अहो आइ दोघीनाही क्रुती विचारलीच होती.

चकल्या अगदी छान वळल्या गेल्या. तळुनही छान निघाल्या. मला वाटले की कशाला ह्या बायका चकल्यांचे एवढे कूउतुक करतात देव जाणे. मी केलेल्या चकल्या तर किती छान दिसत आहेत. आणि ते ही पहिल्याच प्रयत्नां मध्येच.

चकली गार झाल्यावर, सहज म्हणुन चव बघितली.

काय साण्गु तुम्हाला, अहो मी केलेली चकली म्हणजे चकली च्या आकारची भजी झाली होती.

सन्ध्याकाळी आमचे हे' ओउफ़ीस मधुन आल्यावर त्याना कूउतुकाने भजी' खायला घातली.

पण आता मत्र ठरवले आहे, की एकत्याने प्रयोग करुन बघणे, छे नको रे बाबा तो वीचार.


Cater
Tuesday, March 07, 2006 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केटरिंग व्यवसायात आहे
माझा १ किचन किस्सा असा

मी एका Catering ला गेलेले
ज्यांच्या कडे Catering ला गेले त्यांना छोले बनवुन
हवे होते पण त्यांच्या घरात टमाटे नाहि, मसाला नाहि,
(पावभाजि मसाल्याची व इतर मसल्याची प्रत्येकी ३-४ पाकिट)

किचन Platform वर भांडि, पिशव्या, फळ
ई.पसारा,किचन मध्ये जणु वस्तुंचि नेमकि जागाच नाहि.

Main Burner खराब.TV चा मोठा आवाज.
आणि त्यांना घाई , सारख घड्याळ बघण सुरु.

मि जितका वेळ काम केल त्याच्या पेक्शा
कमी वेळेचे पैसे दिलेत बाकिचे अजुन यायचेत,
आता मला आशा हि नाहि पैसे येतिल याचि.

Anyway Main thing is that:-
Tomato ला Option म्हणून मि त्यांच्या कडे असलेला
Expired Sauce वापरला,होता ; त्यांच्या म्हणण्यावर
and result was छोले खारट.



Maitreyee
Tuesday, March 07, 2006 - 10:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण असं कसं, त्यांना आधीच लिस्ट दिली नव्हती का काय काय लागेल त्याची :-)

Karadkar
Tuesday, March 07, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग Cater तु पण fremont मधे catering करतेस का? कारण तिथे SAS पण करते catering.



Cater
Wednesday, March 08, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maitreyee

छोले करायचेत हे मला माहित होत, मी विचारल हि होत
Essential Ingredients आहेत ना म्हणुन.

ति लोक विसरलित आणायला(राहुन गेल)
त्यांना माहित नव्हत Tomato संपलेत अस, (फ्रिज जरा,थोडा
Managed असेल तर कळेल ना काय संपलय काय नाहि)

दुसर अस अग कित्येकदा Catering ला जाण्या अगोदर
मला माहित नसत , तिथे काय बनवायचय, एथे लोकांना
वेळ नसतो in advance सांगायला,
" what they are planning to ask me to cook"

मी जाते आणि मग आम्हाला आज हे हे करुन हवय अस
लोक सांगतात and I cook it.

घरात Basic Cooking Material नको का?
आणी छोल्यां शिवाय भाजी, आमटि etc. पण
करायचि होति, त्यात हि Tomato हवे होते ना.

Main thing Payment तरी बरोबर मिळायला हव ना मेहनतिच, काम केल्याच.

घाई घाई त काम करुन घ्यायच, चमचे, Pan यांचा हि
जागेवर पत्ता नाहि, गोंघळ, गड्बड यात काम कस करणार कुणी.





Cater
Wednesday, March 08, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका South Indian कुटंबाच Catering करायलाहि
जाते मी. नवरा South Indian आणी Wife र्जमन चि
(युरोपियन)पण Kitchen मध्ये सार व्यवस्थित आहे.

She knows and has all Indian things, Masalas
Pans; and every thing is well arranged.

Isn't it Great.

I have made Chole at her place
also and she said Yummy Chole!!!!

Cater
Wednesday, March 08, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Karadhkar

In Fremont there are many people/
Famales who do catering.

Lot aahe Caters chaa Frmt madhye


Karadkar
Thursday, March 09, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Cater मी त्या एरीआ (झिप कोड ९४५५५) मधे ६ वर्षे राहिलेय. अगदी परवा पर्यंत तेव्हा मला तरी सांगु नका की किती लोक तिथे स्वयंपाक करुन देतात. :-)



Cater
Thursday, March 09, 2006 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Really या Area त खुप जण Catering करतात
२-३ तर माझ्या ओळखिच्या आहेत,आणि माझ्या
Clients ने त्यांच्या क्ष-Caters बद्दल सांगितल हो!!!!



Cater
Thursday, March 09, 2006 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Karadkar

Now where do u stay?
in CA or in any other State.

Mahaguru
Friday, March 10, 2006 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Cater , tumachaa vyavasaay asel tar tumachi maahiti miLu shakel kaa? pudhe mage upayogi padel.
email ne kaLavali tari chalel . dhanyavad

Bhutataki
Tuesday, March 14, 2006 - 8:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Majhya navryasarakha visralu manus jagat nasel....asa mala tari vatata.
Tyachach ek prakram....mi deshat gele hote tyamule 'aaho'na potpujechi vyavastha swat:ch karavi lagat hoti. Ekada cooker chya dabyat tandul dhuvoon thevale aani cooker chadhavalaki gas var.???
lakshat aala ka? Tandool asalela daba baherach aani cooker basalay gasvar.Nantar thodyavelane ajun shitti kashi zali nahi baghayala gela tar prashna padala he tandool ajun baherach kay kartayat.Thank god cooker madhye paani tari ghatala hota, nahitar majhaya navakorya cooker cha kaay zala asata kon jane.

Yogesh_damle
Thursday, March 16, 2006 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बाहेरगावी राहणारा विद्यार्थी. एक तर आधीच मी पुरुषजातीवर कलंक असल्याचं माझे मित्र म्हणतात कारण मोदकाची मुरड घालण्यापासून (पोळ्याखेरीज) सगळा शाकाहारी स्वयंपाक करण्याची माझी सिद्धता. बाहेर राहून जिथे अंघोळीचं पाणी मनाप्रमाणे तापवायची सोय नाही तिथे पुढच्या गोष्टीच खुटल्या :-( (होय. कारण विजेवर चालणारं कुठलंही यंत्र चालणार नाही असं घरमालकांनी खडसावून सान्गितलं आहे.)

आताचा आमचा फराळ माहितेय कसा असतो ते?

म्यागी (त्या नूड्ल्सच्या नावाची मी टान्ग तोडली आहे, पण इलाज नाही. योग्य 'की' सापडत नाही) ची भेळ. 'म्यागी' (आई गं !!) चं एक 'प्याकेट' न उघड्ताच आतील नूडल्स कुस्करून घ्यावेत. 'पाकीट' (आता कसा छान शब्द सापडला !!) वरून हलकेच कापून टेस्ट्मेकर काढून घ्यावं. त्या गतप्राण नूडल्सवर बारीक चिरलेला कान्दा, लिम्बू, लाल तिखट आणि चवीप्रमाणे टेस्ट्मेकर त्या पाकीटातच कालवून पाकीटतूनच खावेत. असे केल्याने एक भान्डे खरकटे होण्यापसून वाचते

पदार्थ वाट्तो तितका वाईट किवा भयंकर नाही. खरंच फक्त पोटात जात असलेल्या मैद्याकडे कानाडोळा करावा. लहानपणी नाहीतरी आईचा डोळा चुकवून किवा धपाट्यान्ची 'जकात' चुकवून कच्चे नूड्ल्स फस्त करायचोच की आपण शेवटी काय हो, घरापसून शेकडो मैल दूर 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हेच खरं :-)


Food in Pune is not at all an indulgance for the taste buds. It's merely a part of an 'outsider's' survival kit. At the end of the day, one is (atleast I am) too tired to fuss over what's on my plate. Aata gharee gelo ki swatahchya haatcha karun aai_la khaau ghalen. Aamha doghana titkach ek break/ 'ruchipaalaT' !!!

kalave, loabh asava,
Cheers !!!

Yogesh Damle

Moodi
Thursday, March 16, 2006 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॅगी असे लिही. ma.cgee चला मला आता दुसरा कच्चा विद्यार्थी सापडला..

Yogesh_damle
Thursday, March 16, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

By the way, अननसाचा गर आणि पेरू चा गर (पेरू अतीशय पिकलेले पिवळेजर्द हवेत) एकत्र शिजवून 'pulp' करवून घ्यावेत. मग त्यांच्यात cornstarch, (2 tbsp), sugar for syrup and mass, baking soda एक चिमूट घालावेत. रटरटून दाट झाले की आवडत असल्यास इलायची पाव्डर किवा तत्सम flavouring घालून वड्या थापाव्यात.

ह्या टॉफ़ीज़ च्या बळावर वर 'योगेशदादा'
building मधील बच्चेमंडळीत आणि कॉलेजातल्या पोरापोरींत भाव खायचा. पोरींत मात्र सुदैवाने 'दादा' नाही!!! ;)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators