|
मी शाळेत असताना एकदा मला आईने भाजी आणायला पाठवले तिने मला कोबिचे कांदे आणायला सांगितले होते आणि मी मुर्खासारखे कांदे घेवुन आले आणि ते देखिल फ़क्त दोनच, कारण मला कोबिचे दोन कांदे आणायची आज्ञा झाली होती. घरी आल्यावर आईने माझी पुजा बांधलि नाहि हेच माझे नशिब.! पण कोबीची भाजी ज्या दिवशी पानात असे तेंव्हा बाबा मला खुप चिडवत असत. असाच किस्सा एकदा कुवेत मधे घडला. सुलतान सेंटर मधुन भाजि विकत घेताना एकदा मी न बघता फ्लॉवर विकत घेतला.सामान ठेवताना सहज लक्ष गेले असता त्या फ्लॉवरचि किंमत १.५ kd म्हणजे २२५ रु एव्हडी बघितल्यावर मी फ़क्त किंचाळायची बाकी होते . "अहोनि" येवुन जेंव्हा निट खातरजमा केली तेंव्हा समजले को तो फ़्रेंच फ़्लॉवर होता.(फ़्रांस मधे पिकलेला म्हणुन एव्हड महाग?) आठवडाभर तरी त्याची भाजी पुरवुन पुरवुन करायची असे ह्यांना सांगितले आणि हसत सुटले...............................!
|
Zakki
| |
| Tuesday, March 20, 2007 - 1:50 pm: |
|
|
त्यापेक्षा तुम्ही एका विशिष्ठ गावच्या दोघांनाच जेवायला बोलवावे. भरपूर बटाटे घालून त्याची भाजी करावी. नि जेवताना म्हणावे, 'फ्लॉवर काय महाग झाला आहे आजकाल? पण आमचे म्हणजे, कुणाला जेवायला बोलवायचे तर चांगली भाजी करायला नको का? खूप महाग असला फ्लॉवर म्हणून काय झाले? घ्या की आणखी थोडी भाजी. अहो, आता फ्लॉवर खूप महाग म्हणून त्यात बटाटे खूप घालायचे असे नाही करत आम्ही. असेना का फ्लॉवर महाग!' म्हणजे तुम्ही कित्ति कित्ति थोऽर आहात, श्रीमंत असूनहि लोकांना मानाने वागवता, अशी तुमची किर्ती दिगंतात पसरेल. हे असे करायला नि बोलायला मी त्या विशिष्ठ गावात रहात असतानाच शिकलो बरे का!
|
झक्की काका नेहमिप्रमाणे तुमचा सल्ला आवडला पण ईथे कुणाला जेवायला बोलावणार?येउन जाउन आपल्याच मराठी मित्रपरिवारातल्या लोकांना? फ़्लॉवर जरा लोकांना कमिच आवड्तो तेंव्हा तो मीच घरी खाउन खाउन संपवला.
|
Gsumit
| |
| Tuesday, October 02, 2007 - 8:13 pm: |
|
|
मी म्हंजे पहिल्यापासुनच खादिष्ट (खादाड नका म्हणु बरका... ) अन त्यात आइ-बाबा बाहेर गेले की काय काय (प्रयत्न) करुन खायची आवड... एकदा आइ नसतानी बटाट्याची भाजी करायचा ट्राय केला... बाकी काही प्रॉब्लेम नाही झाला, फ़क्त तेल जास्त झाले... भाजीच्या ऐवजी फ़िंगर चिप्स म्हणुन खावे लागले...
|
mi 8th la asatana pahili chapati keli. Gharchyanpaiki konihi khalli nahi. Shevati ti kutryala ghatali. Te nusate tond laun gele. Bhau mhanala "Tuzi chapati kutra suddha khat nahi".
|
Chyayla
| |
| Monday, October 15, 2007 - 7:27 am: |
|
|
आई ईकडे अमेरिकेत असताना शेजारच्या रुबीने पिझा घरी कसा करायचा हे शिकवले. त्यासाठी आणलेल सामान होतेच. म्हटल आता आई ईथे नाही ती भारतात गेली तेव्हा आपणच पिझा बनवुन पहावा. Google वर एक Video पाहुन आपण तसेच करायचे ठरवले. त्यासाठी मैदा घेतला त्यात Yeast टाकलेले पाणी घातले पण हाय रे देवा ते पाणी जास्त झाले त्यामुळे मैदा एकदम पातळ झाला आता मैदा जास्त घालायचा तर तो नेमका सगळा घातला म्हणुन सम्पला होता. पाणी जास्त झाले म्हणुन उरलेले पाणी घातलेच नाही त्यामुळे yeast तळाला तसेच राहिले व मैदामधे मिसळले नाही व मी तो मैदा तसाच Rise होण्यासाठी म्हणुन ठेवला व दरम्यान Asiana मधे मैदा आणायला कार पिटाळली. तिकडे रुबीला फोन लावला आणी विचारले हे Rosemery काय आणी कुठे मिळत? तीला काही कळाले नाही. म्हटल Rosemery मुलीच नाव नाही ते काही तरी मसाला असतो ना ते. ते ऐकुन बाजुची पोरगी जाम हसायला लागली कारण मी माझा पिझा प्रकरणाचा घोळ सगळ सविस्तर सांगत होतो, की मैदा कमी पडला सैल झाला वैगेरे यामुळे तीची बरीच करमणुक झालेली मला ते माहित नव्हते पण सोबतचा मित्र सांगत होता. शेवटी मैदा घेउन व Rosemery न घेताच घरी आलो त्या सैल मैद्यात अजुन मैदा मिसळला पण तरीही तो काही फ़ुलला नाही, मग तसाच लाटुन Oven मधे टाकला २० मिनट झाली पाहिले तर खालचा तळ भाजल्याच नाही गेला ना पिझा फ़ुलला, मग परत २० मिनट ठेवला आणी आता त्याचा मस्त टणक दगड होउन बाहेर आला. शेवटी आपल्याच कर्माच फळ म्हणुन थोडा कसाबसा खाल्ला. आता ऑफ़िस मधे आलो आणी पोटात असे विविध आवाज ऐकु येत आहेत ना की.. तर मित्रहो अशा प्रकारे माझ्या पिझ्याचा फज्जा झाला.
|
Zakasrao
| |
| Monday, October 15, 2007 - 8:26 am: |
|
|
सम्या अरे मी परवाच उप्पीट करत होतो. हाती असलेल्या सामग्रीसहीत. पाणी आणि मीठ घालताना नेमक कळेना प्रमाण किती ते. मीठ अंदाजे घातल जरा कमीच. मनात म्हणल लागल तर वरुन घेवु. पण पाणी घालताना १ ग्लास जास्तच झाल असाव. कारन माझ अख्खी बुगी वुगी बघुन संपल तरी उप्पीटमधील पाणी संपेना. शेवटी पातळसर तिखट अशी रव्याची खीर समजुन खाल्ली सगळ्यात मोठा पोपट तर त्या knorr च्या सुपमुळे झाला. टॉमॅटो सुपच पाकीट आणल मला आवडत म्हणुन. आणि त्यांच्या सुचनेप्रमाणे केल तर ते जरा कमी रस्सम अस तयार झाल. शेवटी कस बस पिउन टाकल. त्यावेळीपासुन त्यांची सुप्स ची पाकीट आणत नाही.
|
Chyayla
| |
| Monday, October 15, 2007 - 8:55 am: |
|
|
शेवटी पातळसर तिखट अशी रव्याची खीर समजुन खाल्ली
|
Dineshvs
| |
| Monday, October 15, 2007 - 9:00 am: |
|
|
झकास, माझी पुर्ण सहानुभुति आहे तुला. आधी चार पदार्थ चिकुन घेतले असतेस, तर अशी धांदल नसती उडाली रे. जवळ असतास तर डबा पाठवला असता.
|
Swa_26
| |
| Monday, October 15, 2007 - 9:33 am: |
|
|
दिनेशदा... एकदम बरोबर बोललात!! आणि काही त्याला डबा वगैरे देऊ नका, शिकु दे जरा त्याला!! आल्यावर कविताला surprise मिळेल!!
|
Zakasrao
| |
| Monday, October 15, 2007 - 9:43 am: |
|
|
जवळ असतास तर डबा पाठवला असता. >>>> तसे चार पदार्थ येतात हो मला. त्या दिवशी फ़क्त पाण्याचा अंदाज चुकला. कारण नेहमी विचारुन घालत होतो. त्या दिवशी एकटाच. बर तुम्ही पुण्यात या बघु नोकरीला. मग आपण दोघे मिळुन माझ्या घरीच बनवु. स्वाती मी बनवत असतो अध्ये मध्ये घरी पन सुपरवायजर असतो सोबत.
|
Manjud
| |
| Tuesday, October 16, 2007 - 10:00 am: |
|
|
झ, एक ग्लास नाही चांगलं ३ - ४ ग्लास पाणि जास्त झालं असणार. त्याशिवाय खीर नाही बनायची. झकुल्याचं खाणं बनवायची प्रॅक्टीस करायला लागलास म्हणजे तू..... चला आता काही दिवस ह्या बीबीवर झ चे किस्से वाचायला मिळतील तर...
|
झकुल्याचं खाणं बनवायची प्रॅक्टीस करायला लागलास म्हणजे तू.....
|
Maanus
| |
| Thursday, January 24, 2008 - 5:31 am: |
|
|
काय किचन मधे काहीच नविन घडले नाही का ईतक्यात.
|
Zakki
| |
| Thursday, January 24, 2008 - 4:53 pm: |
|
|
आमच्या घरी घडले ना! परवा सौ. फुलकोबीची भाजी करत होती. फोन आला म्हणून फोन घ्यायला गेली. मी स्वैपाकघरात आलो तर भाजीवर झाकण नाही. म्हणून लगेच झाकण घातले. मला वाटले सौ. म्हणेल 'बरे केलेत हो'. कसचे काय नि कसचे काय? सौ. ओरडली अहो झाकण का ठेवलेत? शी:, आता एव्हढ्या सुंदर जमलेल्या भाजीचा गिच्च गोळा होणार! खरे तर चहाचा रिकामा कप सुद्धा उचलून स्वैपाकघरात नेऊन न ठेवण्याचे कारण की तो कप सिंकमधे ठेवायचा, की सरळ डिश वॉशरमधे याबद्दल स्पष्ट सूचना नसतील, तर तो स्वैपाकघरात सुद्धा नेऊ नये, असे मी शिकलो आहे!
|
Jyeshth
| |
| Thursday, February 14, 2008 - 8:47 pm: |
|
|
एकदा आई घरी नव्हति आणि मी भिण्डी ची भाजी कराच बेत घेतल... वान्गि कापुन कस पाण्यात टाकतो तसाच भिण्डी कापुन पाण्यात टाकलो, आणि कान्दा वगरै परतुन भिण्डी घालाची बारी आली तर पाण्यातुन कढ्ली तर एकदम चिकट.. अण्ड्याच पान्ढरा भाग कस अस्तो आगदि तसाच.. फिरुन कधि भिण्डी चा नाव घेतला नही...
|
नमस्कार मी हितगुज मधे नविन आहे मी, मराठी ब्लोग काढला आहे ज्याच नाव आहे व्व्व.खौघर.ब्लोग्स्पोतओम जरुर भेट द्या.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|