Zelam
| |
| Tuesday, January 17, 2006 - 2:01 pm: |
| 
|
काल मी मोट्या हौसेने मूगाची धिरडी करायला गेले आणि सगळी हौस फिटली माझी! मी बहुतेक मूग उकडून वाटले त्यामुळे धिरड्याचे पीठ फार गुळगुळीत झाले आणि पार वाट लागली धिरड्यांची आपल्या सगळ्यांचे अनुभव असतीलच ना स्वयंपाकघरातले की करायला गेलो एक आणि झाले भलतेच. share करायला आवडेल का?
|
Moodi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 2:09 pm: |
| 
|
माझ्या हातुन तर बरेच गोंधळ झालेत, गणतीच नाही. एकदा बिस्किटे करायला घेतली, चुकुन मैदा जास्त झाला, आधीच त्यात थोडे दुध असल्याने तो चिकट होवुन काढताही येईना. मग काय! घाल पाणी, घाल साखर अन ते जास्त झाले की घाल परत मैदा. तसाच चालू माझा सत्यनारायणाचा शिरा. शेवटी वैतागुन ते मळुन तसेच भाजले अन ओव्हन आधी हाय हीट वर ठेवल्याने वरुन नुसते भाजले गेले अन आतुन मात्र कच्चेच. ३ ते ४ मी खाल्ले, नवर्याने सांगीतले पोट बिघडेल दे फेकुन, मग दिले टाकुन. वाईट वाटले पण काय करणार.
|
Supermom
| |
| Tuesday, January 17, 2006 - 3:07 pm: |
| 
|
नवीन लग्न झाल्यावर मी काही काळ एकत्र कुटुंबात राहिले. तशी स्वैपाकाची बरीच सवय होती पण अंदाज नेहेमीच जास्त व्हायचा. असो.तर बटाटेवडे करायला घेतले. पाच माणसांसाठी तीन किलो बटाटे उकडले.(?????) नंतर तीन चार दिवस बटाट्याचे पराठे, भाजी, शिरा असा सप्ताहच साजरा केला. नवरा अजूनही मला अन्नपूर्णा म्हणूनच चिडवतो.
|
Birbal
| |
| Tuesday, January 17, 2006 - 3:07 pm: |
| 
|
मी प्रथमच वाटली डाळ करत होते. चणा डाळ भिजवायची आणि मग मिक्सर मध्ये वाटुन घ्यायची. झाले... मी रुचिरा प्रमाणे सर्व केले पन जेव्हा फोडणीला डाळ टाकली ती काही परतता येइना. सगळा लाडुच्या लाडुच कढईत फिरतो आहे. शेवटी कंटाळुन मी त्या पिठाचे कटलेट बनवले..... गंमत म्हणजे नंतर काही दिवसांनी मला रुचिरा चाळताना त्यात चणा डाळीचे कटलेट हा पदार्थ दिसला आणि मला मजा वाटली कि कमलाबाई ओगले सुद्धा वाटली डाळ करताना चुकल्या असणार.....  
|
Milindaa
| |
| Tuesday, January 17, 2006 - 7:04 pm: |
| 
|
छे.. काही मजा नाही.. अजून एक या क्षेत्रातला दांडगा अनुभव असणारी व्यक्ती यायची आहे
|
Zakki
| |
| Tuesday, January 17, 2006 - 9:04 pm: |
| 
|
माझे एक सुभाषित आहेच. Cooking error is a mother of new recipes!
|
Milindaa कोण आहे रे ती व्यक्ती तु स्वता का लग्ना आधि स्वयंपाकाची मला काही खास आवड नव्हती. एकदा आई-पप्पा ट्रिप ला गेले होते आणि घरी मी आणि माझा भाउ होतो.. आम्हि ठरवले मस्त गरम गरम खिचडी आणि कढी करु. खिचडी केली आणि कढि करायला म्हणुन ताक घेतल, त्यात मस्त आल, मिरची मीठ, बेसन टाकुन ठेवल. थोड्या वेळाने जेवायला बसलो. कढी खायला घेतली पन आम्ही दोघानी तोंड वाकडे केले. काही कळेना. मग डोक्यात प्रकाश पडला की कढी उकळलिच नाही तशीच थंड वाढली. अजुन एक म्हणजे, माझी ताई कुठुन तरी जाम, जेली चे प्रकार शिकुन आली होती, मी आणि तिने पेरु ची जेली करयचे ठरवले. तिने तिच्या receipe प्रमाणे सगळे केले. आणि चमच्या ने ते नीट हालवुन झाकुन ठेवले. काही तासाने ती परत हालवायला गेली तर चमचा असा कही त्या जेली चा चिकटला की तुटुन चक्क तिच्या हातात आला. अर्धा चमचा हातात अर्धा जेली मधे विचार करा ती जेली भांड्या तुन काढायला आणि भांड धुवायला आमच्या बाई ला किती त्रास झाला असेल
|
Daizy
| |
| Wednesday, January 18, 2006 - 9:52 am: |
| 
|
मलाही लग्नाच्या आधी स्वयपकाचा काहीच अनुभव नव्हता. एकदा मम्मी- पप्पा घरात नसतांना मझ्यावर भेंडीची भाजी करायची वेळ आली. काही नाही चिरली भेंडी, मिरची टाकली नी भरपुर पाणि टाकले! झाली तयार ............ काय ?try करुन बघा
|
Sherpa
| |
| Wednesday, January 18, 2006 - 9:59 am: |
| 
|
मी अमेरीकेत असताना एकदा कोबी ची भाजी करायचा प्रयत्न केला होता आणी त्या मधे गोडा मसाला घतला आणि पाणी घातले होते भजी कशी ज़ाली ते सान्गायलाच नको कळी अणी पाणीदार ज़ाली त्या नन्तर परत कधी कोबी आणला नाही
|
Kavysa
| |
| Wednesday, January 18, 2006 - 11:52 am: |
| 
|
हा मी बायकोला वाचायला सागनार. तिला हि समज़ेल कि आपल्या सारख्या ईतर ही आहेत.पन तिने ह्या रेसीपि घरी ट्राय केल्या तर? अरे बापरे नकोच.
|
Bee
| |
| Wednesday, January 18, 2006 - 3:39 pm: |
| 
|
झक्कींचे अगदी बरोबर आहे. चुका करत करतच छान शिकायला मिळते पण काही जण चुकांचा अति बाऊ करतात. चुका करताना आपण काहीतरी adventerous आहोत असेच वाटते माझ्या एका रुमीला मी फ़ोनवरून खिचडी कशी करतात हे सांगितले. त्याने ती कूकर मधे केली पण कूकरच्या तळात पाणी घालायचे असते हे मी त्याला सांगितले नाही. घरी आल्यानंतर कळले कूकर कामातून गेले
|
Supermom
| |
| Wednesday, January 18, 2006 - 4:23 pm: |
| 
|
माझ्या आईच्या एका मद्रदेशीय मैत्रिणीने आईला सांगितले की मी खूप प्रयत्न केले पण तुझ्यासारखी मऊ साबुदाण्याची खिचडी होतच नाही. नीट कृती विचारल्यावर आईला कळले की साबुदाणा भिजवणे या प्रकाराला ती पूर्णपणे फ़ाटा देत असे.
|
Pama
| |
| Wednesday, January 18, 2006 - 4:42 pm: |
| 
|
ही ही ही.. आहेत मझ्या सारखे अनेक हे वाचून खूप बर वाटल. एकदा अगदी हॉटेल सारख जेवण बनवायच ठरवल मस्त chicken curry बनवली. पण हॉटेल म्हणजे रोटी/ नान शिवाय कस होणार. मग कमलाबाई ओगले धावून आल्या. सगळ अगदी साग्र संगीत पुस्तकात दिल्याप्रमाणे नान बनवायच ठरवल. नेहमीप्रमाणे नवरोजी पचकलेच. oven मधे कसा होईल नान, त्याला भट्टीच लागणार. मी तरी हट्टाने केला. म्हटल कमलाबाईंनी सांगितल म्हणजे व्हायलाच पाहिजे. पण कुठल काय? oven temperature मधे गडबड केली वाटत मी. जवळपास ३० मिनिट झाली तरी नान बेटा व्हायला तयार नाही. शेवटी भाजल्या गेल्या सरखा वाटला म्हणून जाम खुशीत वाढला. आधीच उशीर झाला होता, त्यामुळे धीर धरवत नव्हता. एक घास तोडला आणि कळल कि तो इतका चिवट झालाय कि ४ घास खाई पर्यत दात आणी जबडा दुखायला लागला. कसे बसे चार घास खाल्यावर पुढे मात्र खाववे ना, मग भात टाकला आणि जेवण केल. त्यानंतर नवरा मला चिडवायची एकही संधी सोडत नाही( नवराच तो!). काही नवीन बनवायच म्हटल की लगेच अगदी गयावया केल्याच्या आविर्भावात म्हणतो, नको नको... मी सगळी काम करतो घरातली, पण मला नान नको देऊ..
|
Prajaktad
| |
| Wednesday, January 18, 2006 - 4:48 pm: |
| 
|
हो! खरतर दुसर्याला पाकक्रुति सांगणे हे फ़ार जोखमिचेच काम... कॉलेजला असतानाचि गोष्ट,आमच्या ग्रुप मधे एक केरळी मैत्रिण होती तिला साबुदाणा खिचडी फ़ार आवडायची एकदा इरेला पेटुन तिने सगळी रेसिपी लिहुन घेतली... दुसर्या दिवशी डब्याला साबुदाणा खिचडीच आणते असा निस्चय करुन होत्या madam " साबुदाणा धोके भिगाने का!. ". ...तिने रात्रभर वाटिभर साबुदाणा ग्लासभर पाण्यात भिजवुन सकाळी तुपावर पाण्यासहित फ़ोडणिला दिला होता. आणि पाणि आटायचि वाट पाहत बसली. अर्ध्या तासाने मला फोन..मग सगळाच उलगडा झाला.माझ्या अफ़लातुन हिन्दिने तिचा मात्र पार विचका झाला होता.
|
mukman2004, नाही, मिलिंदा सांगतोय त्या व्यक्तीकडे सोडा घालून पाव भाजी,बिन पाण्याच्या फ़क्त तेलात भिजवलेल्या पुर्या अशा अनेक अनुभवी recipes आहेत रार, ये ग लावकर, खोल दे अपने recipes का पिटारा
|
Megha16
| |
| Wednesday, January 18, 2006 - 6:48 pm: |
| 
|
अरे बापरे माझ्या सारख्या खुप जणी आहेत हे कळ्ल्यावर खुप आंनद झाला. माझी ही अशीच तुमच्या सारखी गत होती नवीन लग्न झाल्या नंतर त्यात माझ लग्न माझ कॉलेज च शेवट च वर्ष सुरु असताना च झाल.मग काय नवीन नवीन काय मजा होती,आणी एकत्र कुंटुब असल्याने स्वयपाक करायची वेळ आली नाही. पण जेव्हा आम्ही बंगलोर ला गेलो तेव्हा मात्र हालत खराब झाली. बोर्डाची परीक्षाले पण इतकी हालत खराब होत नाही,इतकी त्या दिवशी झाली. पहिल्या दिवशी हॉटेल मधुन आणल दुसरया दिवशी नवरा ऑफीस ला जाताना म्हणला की आज तु आज मस्त स्वयपाक करुन ठेव.तस मी पाककलेच पुस्तक नेल होत.म्हणुन मी ही जोश मध्ये हो हो, अस सांगीतल. संध्याकाळी सुरवात केली पोळ्याच कणीक मळण्यापासुन पासुन,१ तास झाल तरी कणीक काही घट्ट होत नव्हत,जेव्हा झाल त्यानतर आम्ही ते कणीक २-३ फ्रीझ मधे ठेवुन त्याच्या पोळ्या केल्या. भात केला तोही आम्ही २-३ खाल्ला तेल टाकुन कारण झणकेदार झाला होता.भाजी काही खाता आली नाही मीठ जरा जास्त झाल होत,किती ते तुम्ही समजु शकता. पोळ्या होत्या की पापड ते मला पण कळाल नाही,आणी नकाशा पण. स्वयपाक करताना मी माझ्या आईला कितीदा फोन करुन विचारल हे माझ्या नवरोबांना मोबाईल च बिल आल तेव्हा कळाल. असा माझा फीला प्रयत्न होता. त्यानतर ते युस मध्ये येई पर्यत हालत खराबच होती. मायबोली आणी नेट यांच्या मुळे आता बराच फरक पडला आहे.
|
Maetrin
| |
| Wednesday, January 18, 2006 - 6:50 pm: |
| 
|
ह्या सन्क्रातीला, पहिल्यान्दीच तिळगूळ केला. दोनदा ट्राय मारला, एकदा वडी खूप मऊ झाली, एकदा कडक. शेवटी दोन्ही मिक्स करून खातो आहोत! 
|
DJ काय बिनपाण्याच्या तेलात भिजवलेल्या पुर्या?????????? ही ही ही! कोन आहे ही
|
Ramani
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:40 am: |
| 
|
वा! बरेच जण आहेत की इथे. एकदा मी शळेत असताना आईने मला कुकर लावुन ठेवायला सांगितला. मी सर्व काही नीट केले आणि भरला कुकर गस वर चढवला. बराच वेळ शिट्टी होण्याची वाट बघुन आत गेले तर लक्षात आले कि खाली गस पेटवलाच नव्हता. How to write gas?
|
माझ्या वडलांनी एकदा कुकरला भात लावला. त्यांचे दोस्त जेवायला आले होते. शिट्या झाल्यावर शेगडी बंद करून जेवायला वाढले. भातावर आल्यावर कुकर खाली उतरला आणि लक्षात आले की धुतलेल्या तांदळांचा डबा कुकर मध्ये ठेवायचा राहून गेला होता!
|
Storvi
| |
| Thursday, January 19, 2006 - 4:03 pm: |
| 
|
आई बाहेर गेली की मला वाटायच मज्जाच मज्जा कारण बाबा स्वयंपाक करताना मला बरोबर घ्यायचे आणि formula 44 असं म्हणत स्वयंपाक करायचे. मला वाटायचं आई पेक्षा ते चांगले स्वयंपाक करतात. जसं जसं स्वयंपाकातलं कळायला लगलं तसं लक्षात आलं की formula 44 म्हणजे प्रत्येक भाजीत तोच मसाला घालायचा आणि तशीच करायची एकच formula वापरुन 
|
Maetrin
| |
| Thursday, January 19, 2006 - 4:19 pm: |
| 
|
gajanan bhau .... sagLyaat best!  
|
Maetrin
| |
| Thursday, January 19, 2006 - 4:46 pm: |
| 
|
एकदा कढी करताना ताकामधे चण्याचे पीठच घालायला विसरले.कढी फुटली पण कारणच कळे नाही. कढी एव्हढी पातळ का झाली आहे ह्यावर आम्ही विचार करत बसलो.मग डोक्यात प्रकाश पडला.
|
Sas
| |
| Thursday, January 19, 2006 - 8:54 pm: |
| 
|
सगळ्यांचे अनुभव सहिच आहेत. माझि मात्र १ पोळी पुर्ण गोल होति. ६ वि पासुनच स्वंपाक यायला लागला,आईच बघुन बघुन सार करायला लागले. मग काय जर आई busy असलि कामात तर बर्याचदा मला पोळ्या वेगरे कराव लागायच. बाईच्या हातच घरात कोणालाच आवडायच नाहि. चांगल आहे जे उशिरा स्वयंपाक शिकलेत,शिकत आहेत त्यांच. मी कधि लाडु ई. नाहि केल अजुन पर्यंत पण पंजाबि , गुजराथि ई. काहि मेनु येतात आणि स्वयंपाक येत असल्याने खाण्याचे कधि हाल नाहि झाले.
|
mi ekda kolhapuri misal karat hote recipe baghun..tyat kanda gas var bhajayala sangitla hota..ani mag mixer madhun vatun ghya ase sangitle hote..mi sagla tasach kela..nantar baghte tar kat kaala zhala hota..mag tubelight petli..kanda bhajun zhalyavar saal kadha ase recipe madhe lihile navthe..mi saal na kadtach kanda vatla hota mixer madhe!!!
|
Maetrin
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:24 pm: |
| 
|
renutai, bhannaaT kissa aahe! misal ekdam khamang zhaali asel naahii??
|
Maetrin
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:28 pm: |
| 
|
sas, सहाव्वी पासून स्वंपाक?? बरे झाले माझी आई हे वाचत नाही, नाहीतर तुमचे उदाहरण देऊन हैराण केले असते!! 
|
agdi khamang!!"friends" kuni baghta ka?tyat rachel english trifle pudding madhe beef ghalte..sagle agdi ummm mhanat khatat..tasa zhala majhya misalicha
|
Zakki
| |
| Friday, January 20, 2006 - 2:11 am: |
| 
|
अग, Friends काय बघतेस? बिघडशील बर! अगदी अश्लील आहे तो शो. हटकेश्वर. हटकेश्वर. त्यापेक्षा फ़ुटबॉल, बास्केटबॉल बघ.
|
Psg
| |
| Friday, January 20, 2006 - 6:18 am: |
| 
|
साख्रेचा पाक करणे म्हणजे एक दोकेदुखीच कौशल्याचे काम.. रव्याचे लाडु करायला घेतले, रवा भजून साखरेचा एक तारी पाक केला आणि त्यात रवा टाकला. लगेच गॅस ब.द करण्याऐवजी ते मिश्रण उकळत ठेवले.. आणि मग परिणाम व्हायचा तोच.. खडा डाव! पाक इतका पक्का झाला की लाडवातून डाव बाहेर यायलाच तयार नाही.. अक्शरश्: रवा उकरून खाल्ला.. चव चांगली झल्यामुळे संपले!
|
Milindaa
| |
| Friday, January 20, 2006 - 12:47 pm: |
| 
|
तरीच, अचानक मिल्याची विडंबनं आटली.. बिचारा उकरा उकरी करत होता तर..
|
Moodi
| |
| Friday, January 20, 2006 - 12:59 pm: |
| 
|
ऑं!!! म्हणजे psg म्हणजे मिल्याची सौ की काय? मला खरच माहीत नाही हं. मिलिंदाने लग्गेच ही पोस्ट टाकली म्हणुन विचारले, psg ~DD. 
|
Maitreyee
| |
| Friday, January 20, 2006 - 1:06 pm: |
| 
|
Psg !! डाव बाहेर यायला तयारच नाही >> btw , moodi बरोबर आहे तुझा अन्दाज
|
सागळ्यांचे अनुभव वाचल्यावर वाटले आपणही शेअर करावे एकदा माझ्या बहीणीने केक पहील्यांदाच्) करायला घेतला कुठे चुकले तेही कळ्ले नाही पन पदार्थ इतका बिघडु शकतो?...शिवाय आम्ही शेजारी मैत्रीणींना सगळीकडे सांगुन ठेवले होते. केक खायला या म्हणुन थोड्या वेळाने शेजारच्या मावशी आल्यावर आम्ही त्यांना दारातल्या गायी ला टाकलेला दखवला नी संगीतले आज तीचा बर्थ डे असल्यने आपला केक पुढच्या वेळी मावशी खी खी हसत सुटल्या... नी काय समजयचे ते समजल्या.
|
Manuswini
| |
| Saturday, January 21, 2006 - 5:10 am: |
| 
|
एकदा एक family ला एथे USA ला जेवायला बोलवले एतर काही माझ्या friends ने खुप माझी तारिफ़ केली होती की मी जेवण चांगले करते म्हणुन ती तारिफ़ खरिच होती त्याच्या अनुभवानुसर्) आणि नेमक तेव्हाच gammat झाली... मी चोले भटुरे केले होते घाईमधे मी त्यात मोहन घालायला विसरले जेवायला मी बसले तेव्हा मी taste करायच्या आधी माझ्या मैत्रिणिच्या नवरयाची प्लेट मधे भटुरे तोडताना मारामारी बघितली आणी त्याच्या चेहर्यावरिल ते सुचित smie बघुन मला कळेच्ना काय problem आहे मैत्रिण मात्र उगाच छान झाले हां म्हणत होती भटुरे एतके चिवट होते ना कि तुटता तुटत न्हवते.... शेवटी जाताना तिचा नवरा म्हणला लोकाच्या सागण्यावर विश्वास असु नये ते बरोबर आहे आणी जोरात हसला बाकी चोले छान होते हा हे मात्र सांगीतले
|