Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 03, 2007

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » zakki » Archive through July 03, 2007 « Previous Next »


Monday, January 23, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक प्रश्न या सदरात बायकांवर अन्याय होतो असा काहीसा सूर आहे. त्या निमित्ताने.
ज्यानी त्यानी आपल्या गरजा नि सोयी नि प्रेम नि व्यवहार हे सगळे सांभाळून खंबीरपणे राहिले तरच मनासारखे होते. शिवाय अगदी सग्गळ कसे मला पाहिजे तसे झाले पाहिजे, हे शक्य नाही हो आजकालच्या जगात. तुम्हाला बराच विचार करून ठरवावे लागते, महत्वाचे काय नि काय नाही. ऐ दिल है मुश्किल है जीना यहां
तर कुणि कुणासाठी कसला त्याग करायचा हे लग्नेच्छू लोकांनी आपणहूनच ठरवायचे असते.
नि सगळ्यात महत्वाचे प्रेम आहे हो. म्हणजे काय की जेंव्हा असे वाटेल की तुझ्यासाठी, नि तुझ्याबरोबर मी या दुनियेत अगदी वाळवंटात, जंगलात, परदेशात सुद्धा आनंदाने राहीन. हे असले प्रेम कुठे गेले? मग तिथे तो का ती हा प्रश्न येत नाही. नि तेव्हढे प्रेम नसेल तर तडजोड आलीच. मग जो किंवा जी तडजोड करू शकत नाही त्याच्याबरोबर आयुष्यभर संसार कसा करणार? हा महत्वाचा विषय आहे लग्नापूर्वी. हे आता आपल्या आई बापांना कोण सांगणार?



Thursday, May 24, 2007 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीगणेशायनम:!

धन्यवाद मा. Admin .

आता इथे, 'बा. रा. बा. फ.', व 'विरंगुळा' इथेच लिहावे, इतरत्र उगाचच शब्दाने शब्द वाढत जाऊन विषयांतर होऊन,चर्चेचा बेरंग होतो.








Thursday, May 24, 2007 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्लामी दहशतवादाबद्दल बरेच काही लिहून झाले. त्यानिमित्त सबंध मुसलमान धर्मालाच नि सगळ्या मुसलमानांनाच वाईट ठरवण्यात आले. आप आपसात शिव्यागाळी पण झाली.

पण हा 'दहशतवाद' किंवा हिंसा ही पाचवीलाच पुरलेली आहे भारतीयांच्या!

वाटाघाटींनी प्रश्न सोडवायचे तर थोडे सामंजस्य दोन्ही बाजूला असले पाहिजे. ते आहे का हा प्रश्न आहे.
केंव्हाहि वर्तमानपत्र पहावे तर कुठेतरी कसल्यातरी कारणावरून दंगा, जाळपोळ, मोडतोड, मारहाण!

ताजे उदाहरण म्हणजे पुणे मुंबई मार्गावरील वाकडवाडी येथील मांगीरबाबांचे मंदिर दहा फूट हलवण्यावरून दलित युवक आंदोलन नि लहुजी शक्तिसेना यांनी पालिकेच्या उपायुक्तांच्या कार्यालयात जाऊन केला दंगा! दगड फेकले. बसच्या काचा फोडल्या! त्यावर पोलिसांनी आणखी काही लाठीमार वगैरे केल्याचे वाचले नाही, पण तेहि झाले असते. मंदिराच्या हलवण्यावरून झालेल्या दंग्यात मुसलमान असण्याची शक्यता कमीच.


श्री. छत्रपति शिवाजीमहाराजांच्या इतिहासावर परकीयाने वाईट पुस्तक लिहीले म्हणून भांडारकर ग्रंथालयाची नासधूस! त्यात पण मुसलमान सामिल असण्याची शक्यता कमीच.

एकूण दंगे धोपे, मारामार्‍या असेच चालू आहे झाले सगळीकडे. कारणे वेगळी, प्रमाण लहान मोठे. पण वृत्ति? ती तर तीच ना? उच्च संस्कृति, 'बेष्ट' धर्म आहे पण कृति?



Friday, May 25, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"काय आहे ना, आजकाल मायबोलीवर लोक अगदी संवेदनशील झाले आहेत. कोणाच्या भावना कधी, कुठे, कशा, कशामुळे दुखावल्या जातील आणि वादाला तोंड फुटेल काही सांगता येत नाही."
स्वस्ति यांनी त्यांच्या 'जोजिवसि' या ललितात लिहिलेले एक वाक्य. मला शंभर टक्के पटते. पण असे चांगले लिहिता आले नसते, म्हणून सरळ चोरले त्यांचेच वाक्य.

त्यांची क्षमा मागतो!

व आणखी असे लिहितो की वाद सुरू झाला की लगेच एकमेकांवर वैयक्तिक टीका करायची, मुद्दाम घेतल्यासारखी, अगदी टोकाची, इतरांच्या पेक्षा पूर्णपणे विरुद्ध अशी भूमिका घ्यायची, नि मग देत बसायचे शिव्या!
म्हणूनच असले काही मी फक्त माझ्या स्वत:च्या बातमी फलकावर लिहीतो. म्हणजे इतरत्र चालू असलेले वाद भरकटणार नाहीत.



Friday, May 25, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" V&C वर एक कथा लिहूया का?" असा एक भा. प्र. नंदिनी२९११ यांनी विचारला आहे.

च् च्! हाच मुद्दा मी कितिदा तरी मांडला होता, की V&C वर जे आहे त्यातून एक धमाल विनोदी नाटक किंवा सिनेमा किंवा दोन्ही करायला पाहिजे. पात्रे आहेत, संवाद आहेत, अर्ध्याहून अधिक 'मटेरियल' तर तयारच आहे! मी विचारत होतो अजून कुणाला यात विनोद कसा दिसत नाहीये?
माझी आवडती लेखिका हवा हवाई येत असती तर तिने किमान तीनचार कुजबूज भरतील एव्हढे लिहीले असते!
मला तर एका बातमी फलका वरील मास्तर व लेखिका यांच्या वादावरून 'फायनल ड्राफ्ट' हे नाटक आठवले.

आणखी भन्नाट आयडिया म्हणजे नंदिनी नि अज्जुक्का या दोघींनीहि लिहावे, वेगळे वेगळे. म्हणजे परत आणखी एक दोन अश्याच नाटकांची तयारी!



दोन दिवे दिले आहेत, तेंव्हा दोघींपैकी कुणिही माझ्या विरुद्ध लिहायचे कष्ट घेऊ नका.


Monday, May 28, 2007 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, मी आणखी एक ID , घेणार नाही, किंवा आहे ती पण बदलणार नाही. आहे एक तेवढी पुरे.

मृण्मयी, मला स्वत:ला लिहीता येत नाही, पण वाचायला आवडेल म्हणून तसे लिहीले. त्याचा असा अर्थ होईल अशी कल्पना नव्हती. म्हणूनच मायबोलीवर यायचे. आपल्या नेहेमीच्या परिसरातल्या लोकांपेक्षा इतर तर्‍हेने विचार करणारे लोक भेटतात. एकाच गोष्टीकडे किती विविध दृष्टिकोणातून बघता येते ते कळते.



Friday, June 01, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय झकासराव, कुठल्या कुठल्या जुन्या गोष्टी उकरून काढता?

झक्की हे मुसलमानी नावासारखे आहे. मला इथल्या काही लोकांच्या माथेफिरुपणाबद्दल नि मुख्यत: अक्कलशून्यतेबद्दल चांगलीच माहिती आहे. त्यातल्या कुणी नुसत्या नावावरून मलाच काय इतर मायबोलीकरांना नि खुद्द मायबोलीच्या चालकांना त्रास देतील या भीतिने मी तसा विचार करत होतो.
पण आता ती भीति बरीचशी कमी झाली म्हणून माझे पान पुन: उघडायला सांगीतले चालकांना. नाही म्हंटले तरी बराक 'हुसेन' ओबामा आहेच आपल्या पाठीशी!


एकंदरीत माझ्या पानावरच्या प्रतिक्रियाच जास्त वाचनीय असतात. अनेक 'जुन्या अने जाणत्या' लोकांनी तिथे लिहीले आहे.

आता माझे पुण्याचे अनुभव म्हणाल तर ते मागेच लिहून झाले. तुम्ही फार उशीरा आलात इकडे. एके काळी काय मजा होती या मायबोलीवर राव! आता नुसती भांडाभांडी!

असो. काळाचा महिमा. हटकेश्वर, हटकेश्वर. जय चपेटदान मारुती!



Wednesday, June 13, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल मी राजकारणाच्या बातमी फलकावर काही (च्या बाही) लिहीले. याचे कारण, कुणि मला म्हणाले, काय हे, नुसते झोप नि हादडणे दिवसभर! म्हणून मग वेळ जायला काहीतरी(च) खरडले झाले.

पण त्यानिमित्ताने मला एक सांगावेसे वाटते. मायबोलीवर जेंव्हा धर्म, नि राजकारण यांच्यावर चर्चा होतात, तेंव्हा एक लक्षात घ्यावे की सर्वसाधारणपणे बर्‍याच लोकांची मते पक्की ठरलेली असतात. त्याविरुद्ध कुणि काही म्हंटले की

१. माझ्यासारख्यांचे टाळके सटकते नि ते अद्वा तद्वा लिहू लागतात.
२. काही जण शांतपणे परत परत आपलेच कसे खरे हे सांगायचा प्रयत्न करतात. पण तो यशस्वी होणे कठिण. ज्यांना दलितांबद्दल, मुसलमानांबद्दल अपाऽ र करुणा असते, ते कधी कधी सारासार विचार न करता, केवळ त्यांना आरक्षण द्यावे, ते अतिरेकी नाहीत असे मुद्दे धरून बसतात.

भारतात Supreme Court ही संस्था सर्व पुरावा, घटना इ. गोष्टी लक्षात घेऊन निर्णय देतात. तो अंतिम मानण्यात येतो. ज्यांना असे वाटत असेल की पोलीसांनी खोटा पुरावा दिला त्यांच्यावर जबाबदारी येते की त्यांनी त्यांच्या बाजूचे सर्व पुरावे जाहीर करावे. मग न्यायाधिशांना ते तपासावेच लागतील ना?

पण त्या ऐवजी एकतर नेहेमी प्रमाणे दंगल, जाळपोळ, बोंबाबोंब किंवा इथे येऊन परत परत तेच म्हणत बसायचे (दोन्ही बाजू).

यातून काही निष्पन्न होणार नाही हो. उगीच वेळ नि कष्ट वाया जातात. म्हणून माझे तर म्हणणे असे की जमल्यास आप्ले मत स्पष्टपणे मांडावे, नि पुन: पुरावा नाही, फक्त आपले मत तसे का आहे हे सांगावे. जसे 'तुम्ही काही म्हणा पण आरक्षण द्यायलाच पाहिजे असे माझे मत आहे, कारण मला बाकीच्या गोष्टींशी कर्तव्य नाही, फक्त अपाऽर दयावृत्ति आहे.'

मग यावर काय बोलणार? त्यांना जर इतर गोष्टींशी कर्तव्यच नाही, तर त्यांना काय सांगणार?

अपवाद फक्त निवडणुकीला उभे रहाणार्‍यांचा. त्यांनी प्रश्नांचा सर्वांगीण विचार करून मगच मत बनवावे. त्यांनी हवा तो सर्व पुरावा गोळा करावा. आणि मग आपले मत बनवावे. तो दिवस जर कधि कुठल्या देशात आला तर सगळे जग सुखात नांदेल.



Thursday, June 14, 2007 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकारणाच्या बा. फ. वर म्हंटले आहे की दळभद्री इ. (विजयसायबांसारखे लोक) यांच्यामुळे जुन्या भारतीय विद्येवर संशोधन होऊ शकत नाही म्हणून आपण फार प्रगत होतो हे बर्‍याच जणांना पटत नाही. हे वाचून माझ्या मनातील उद्वेग, खंत उफाळून वर आली.

अहो, पण ते दळभद्री वगैरे लोक इंग्रजांनांतर झाले. तत्पूर्वी हजार वर्षे काय करत होते लोक? परकीयांशी लढत होते? का संकुचित् स्वार्थासाठी परकीयांशी हातमिळवणि करून आपल्याच लोकांचे नुकसान करत होते?

खरे तर युद्ध करत असतील, तर दुसरा प्रश्न. जगातील कित्येक गोष्टी युद्ध काळातील संशोधन, जास्तीत जास्त संहारक शस्त्रे करण्याच्या प्रयत्न इ. मुळे आज उपयोगी ठरलेल्या आहेत. युद्धात बाँब बनवला, पुढे अणूशक्ति. युद्धासाठी जे जे लागले ते ते शोधून काढण्यात आले.

मग आपल्या लोकांजवळ एव्हढे प्रगत ज्ञान होते, ते का नाही वापरले युद्धात, नि त्यातून प्रगति केली? राईट बंधूंच्या आधी तळपद्यांचे विमान उडले. आज शंभर वर्षात राईट बंधूंच्या विमानाची केव्हढी प्रगति झाली आहे. तळपदे यांच्या विमानाचे काय झाले? अमेरिकाहि गेली कित्येक दशके युद्ध करताहेत. तरी प्रगति झाली. भारतातच का नाही? असे प्रश्न उभे रहातात.

आता सुद्धा, बिचारे विजयसाहेब, आत्ता आत्ताचे. ते काय बोलतात नि करतात त्याचा काय परिणाम होणार आहे? सोडून द्या त्यांचा नाद. एकतर ते सगळे विसरून जा, नाहीतर जुने सगळे ज्ञान उकरून काढा, नि पुन: संशोधनाला लागा. बरेच हिंदू श्रीमंत लोक आहेत, संस्था आहेत, त्यांना पैसे मागा. सरकारच्या नादी लागताच कशाला? असे काहीतरी शोधून काढा की हे असले लाचखाऊ नि शेळपट फुडारि जगातून नाहीसे होतील.!



Sunday, June 17, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, V&C वरचे वाद असे संपणार नाहीत.

बाकी शेंडेनक्षत्र नि विजय यांना लय धमाल येत असणार! कुठलाहि पुरावा पुरेसा नाही म्हणायचे की लगेच बाकीचे लोक ऊर फुटेस्तवर परिश्रम करून काही काही माहिती गोळा करतात. पण Ph. D. च्या खडूस प्राध्यापकांसारखे हे म्हणणार, नाही, अजून जास्त पुरावा पाहिजे' किंवा काहि बारीकसे चुकले तरी तेव्हढेच धरून बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. की बिचारे परत कामाला लागतात.

त्यातून हा विषय हि असा आहे, की भारताच्या उज्ज्वल भूतकाळाबद्दलची बरीचशी माहीति आता उपलब्ध नाही. शिवाय जरी तेंव्हा ते सगळे होते म्हणून आता त्याचे काय? आता भारत म्हणजे लाचखाऊ, मुसलमानांचे पाय चाटणारे फुडारि नि निष्क्रिय जनता.

तेंव्हा पूर्वी काही असले तरी मान्य करून अथवा न करून काही फरक पडत नाही.

तर म्हणून आपली गंमत म्हणून कुणि काही म्हंटले तरी आमचा विश्वास बसत नाही म्हणायचे. की लोक आणखी काही लिहीतात, की आणखी मज्जा!



Sunday, June 17, 2007 - 11:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, मी काय केले? काऽहीहि नाही! आणि त्यामुळे इतरांनी काय करावे हे सांगण्याचा मला काही नैतिक अधिकार नाही. तुम्ही या पिढीचे लोक खरोखर काहीतरी करू शकाल. माझा उद्वेग, माझी खंत, हे सर्व आमच्या आणि आमच्या आधीच्या(शेकडो वर्षे) पिढ्यांबद्दल आहे.


Sunday, July 01, 2007 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलास्का ल गेलास्का म्हणेस्तवर, अरे, अलास्का हून आलास्का असे म्हणायची वेळ आली.

आमच्या अलास्का च्या क्रुज वर अनेक मराठी लोक होते. कारण, लगेच सियाटलला BMM चे convention होते. त्यामुळे हा संवाद अनेकदा ऐकायला आला. म्हणून मला वाटले असा एखादा कायदा असावा की असे म्हंटलेच पाहीजे, म्हणून म्हंटले.

अलास्का फारच सुंदर आहे. ते सौंदर्य त्याच्या विशालपणात आहे. डोंगर नि glaciars , सगळीकडे. पण प्रत्येक ठिकाणी त्याचे सौंदर्य वेगळेच.

Anchorage ला रात्र होतच नाही! रात्री बारा वाजेस्तवर सूर्यप्रकाश! पुन: शिपवर रात्र होतच नाही.

सकाळी डेक वर जाउन पहायचे डोंगर नि glaciars . तेच तेच असले तरी दर वेळी नवीन वाटायचे. मी ३७१ फोटो घेतले त्यातले ३५० डोंगर, glaiciar नि समुद्र यांचे आहेत.

बाकी कुणि फोटो घेण्या इतके सुंदर दिसलेच नाहीत. त्यामुळे फोटो इथे टाकण्यात अर्थ नाही.



Monday, July 02, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्तापर्यंत बरीच अधिवेशने पाहिली. आता फारसा interest नही.

एक फोटो अपलोड करून पहातो, जमते का. हा आहे Anchorage जवळच्या एका ग्लेशियरचा. बघा काही दिसते का.
Glacier


Tuesday, July 03, 2007 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक फोटो पहा
Sitka City.


Tuesday, July 03, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियांबद्दल आभार, विशेषत: देवनागरीतल्या.
दिनेश, तुमचा आशावाद फार भरभक्कम दिसतो आहे. अहो, वर्णन काय करणार मी? मुळात शब्दातीत, अवर्णनीय दृष्ये ती. त्यांचा विशालपणा इवल्याशा कॅमेरात काय मावणार? तरी कॅमेरा चांगला नी सौंदर्य भव्य, यामुळे मला सुद्धा काही बरे फोटो मिळाले एव्हढेच.

वास्तविक, सर्वत्र बर्फाच्छादित डोंगर, ग्लेशर, झाडी, नि समुद्र. पण प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच बघतो आहे असे वाटे, नि त्यामुळे फोटो उडवत गेलो. पण त्या टीचभर कॅमेरातून आलेले फोटो पाहिले की सगळे सारखेच दिसतात!

असो. आणखी एक दोन टाकतो.

हे केचिकनमधील तळे. लेक टाहो सारखे दिसते ना? पाण्याच्या रंगाच्या बदलत्या छटा स्पष्ट दिसतात.

Lake in Ketchikan


Tuesday, July 03, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आणखी एक. जुनो जवळ.






Tuesday, July 03, 2007 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे व्हॅंकुव्हर शहर. बोटीतून बघितलेले.



Tuesday, July 03, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोठलेली नदी नि नुसताच बर्फ यात फरक असा की गोठलेल्या नदीवर निळसर छटा असते. कारण? एकच. इंद्रधनुष्याततल्या सर्व रंगांपैकी फक्त निळा रंगच परावर्तित होतो, (किंवा होत नाही?! ज्या कशामुळे रंग दिसतात त्यामुळे!)

अशा गोठलेल्या नदीवर कधी कधी भेगा पडतात.

ही सुमारे १ ते दीड फूट रुंदीची, अनेक फूट लांब व हजारो फूट खोल अशी एक भेग. त्यातला निळा रंग किती गडद झाला आहे! नि त्याची खोली तुम्ही बघू शकता. तळ दिसणार नाही इतकी खोल.




Tuesday, July 03, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक 'शीण', किंवा 'विहंगम दृष्य'. केचिकान जवळ.



Tuesday, July 03, 2007 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगातले सर्वात छोटे वाळवंट. आधी इथे ग्लेशियर होते. ( Global warming ? मुळे) ते जेंव्हा नाहीसे झाले तेंव्हा तळाची वाळू उरली. जवळील बेनेट नदीवरून येणारे ७० मै. वेगाचे वारे सतत वाळू इकडची तिकडे करतात. त्यामुळे इथे फारसे काही उगवत नाही. वास्तविक या भागात बर्फ फुटाने पडतो. सर्व हिवाळ्यात मिळून शंभर दीडशे फूट बर्फ सहज होतो. पडला की सहा फूट, बारा फूट असा पडतो. (नि आपण इथे सहा इंच बर्फ पडला की 'अरे देवा काय हे' असे म्हणून शाळा, ऑफिसला दोन दिवस दांडी मारतो!)




चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators