Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 12, 2007

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » vinaydesai » Feedback » Archive through January 12, 2007 « Previous Next »

Vinaydesai
Thursday, November 09, 2006 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणेकरानो... तुमच्या पैकी कोणी ( Itsme, Pha क्षिप्रा, मयुरेश...) आपला दिवाळी अंक Print करून रानडेकाकांपर्यंत पोहचवू शकेल का?
आता PDF मध्ये आहे


Bee
Friday, November 10, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, मला फ़राळपेक्षा तो ट्रे आणि त्यातील वेगळ्या आकाराच्या plates खूप आवडल्यात. कुठे मिळाला इतका सुंदर set?

Pha
Tuesday, November 14, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, मी या वीकेंडला जाऊन देऊन येऊ शकेन. फक्त इतर कोणी अगोदरच किंवा येत्या वीकेंडपूर्वी दिला असेल/ देणार असेल, तर याच बीबीवर कळवा.

Vinaydesai
Tuesday, November 14, 2006 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, Thanks ... मला अजून कुणीच उत्तर दिले नाही, त्यामुळे तू please ते करच.. नाहीतर मी इथुन Post करणार होतो..


Swaateemumbhai
Saturday, November 18, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय देसाई मी तुमचे परदेसाई वाचले हो. असेच लिहित रहा.

Swaatee_ambole
Saturday, November 25, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, कुठायत रे फोटो?

Milindaa
Saturday, November 25, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणीतरी विरोध केला म्हणून काढले असतील

Arati_halbe
Wednesday, December 06, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, छान आहे हो game . आम्ही कधी कधी एकच शब्द घेउन तो शब्द मुखड्यात येइल अशी गाणी म्हणतो. जसे की "मन" घेतला तर

१. छूकर मेरे मन को
२. रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन
३. मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा

अन्ताक्षरी हल्ली bore होते. कारण सर्व गाणी exhaust होइपर्यन्त खेळायला वेळ नसतो. मग डोके चालवायला अशा युक्त्या चान्गल्या असतात.


Jayavi
Tuesday, January 09, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय...तुझी भागमभाग बघून मलाच दमायला झालं रे....:-)

Lalu
Tuesday, January 09, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाहुण्यांच्या आधी पोचलास ना, मग झालं तर! तेवढा चहा नसता घेतला तर जरा कमी धावपळ झाली असती.
छान लिहिलंय. :-)


Zakki
Tuesday, January 09, 2007 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय लालू, त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की त्यावेळी चहा पिण्याची हवा होती!

खरेच एव्हढी भागम भाग केलीत, की ही एखादी गोष्ट आहे?

माझ्या मते, अजून काही वर्षांनी त्यांना अक्कल येईल, की कुठे जातो हे मुळी बायकोला सांगायचेच नाही. सांगितल्यावर ग्रोसरी आणा म्हंटल्यावर जमणार नाही, मग परत जाऊ, असे म्हणायचे. किंवा यादीतल्या अर्जंट,नि लवकर सापडल्या तरच, जास्तीत जास्त, एक दोन गोष्टीच आणीन, असे सांगायचे! वर, तू तरी अशी कशी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबतेस ग्रोसरी आणायला असे म्हणून त्यांना खजिल करावे!

नंतर लवकरच ग्रोसरी आणण्याचे काम पुन: कधीहि सांगणार नाहीत!

शिकाल, विनय. तुम्हीहि शिकाल हळू हळू!!


Vinaydesai
Wednesday, January 10, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, अहो ' Ideal संसारा विषयी माझ्या कल्पना' हा BB वाचला आणि 'करायला गेलो एक' ला पोहोचलो...

आता तुमचा सल्ला मनावर घेतो.. बघू काही फरक पडतो का

(गोष्ट खरी आहे, अगदी नक्की)


Mrinmayee
Wednesday, January 10, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, आयडीयल संसाराच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवताना झालेली दमछाक दिसतेय हा लेख म्हणजे! :-) छान लिहिलाय!
इथल्या नवर्‍यांना बाजारहाट टाळायच्या बाकी क्लुप्त्या माहिती नाही असं दिसतंय! बरंय!
यादीतल्या फक्त अर्ज़ंट, लवकर सापडणार्‍या दोनचार वस्तु आणण्याखेरीज माझ्या नवर्‍याची आणखी एक ट्रिक मला कळली:
दुध, दही, अंडी, ब्रेड, भाज्या अश्या जीवनोपयोगी वस्तु आणायला त्याला पाठवावं. घरी येऊन पिशव्या उघडल्या की नेमक्या तेव्हड्या गोष्टी सोडून बाकी फालतु सामान बाहेर निघतं. दुकानात ज्याज्या पदार्थांचं सँपल मिळतं ते खाऊन ते पदार्थ बरोबर घरी घेऊन येतो. त्यात फिश नगेटपासून चीजकेकपर्यंत सगळं काही असतं! वैतागून आपणच मग बाहेर पडावं हवं ते सामान आणायला.
बरंय तो मायबोलीवर येत नाही!


Zakki
Wednesday, January 10, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोर लोकांचे लक्षणच हे आहे की, केवळ जीवनावश्यक गोष्टींपलिकडील गोष्टींचा विचार करणे, नि त्याबाबतीत काही करणे!

Vinaydesai
Thursday, January 11, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Idea माहीती आहेत पण वेगळ्या... म्हणजे टोमॅटो, पाव अश्या गोष्टी पिशवीत खाली घालून, बटाटे कांदे वरती ठेवायचे.. वगैरे वगैरे..


Sashal
Thursday, January 11, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय छान जमलीय 'भागमभाग' ..

पण का बर अशा ideas ची गरज भासावी .. उद्यापासून बायकांनी स्वैपाक न करण्याच्या 'ideas' शोधून काढाव्यात काय?


Vinaydesai
Thursday, January 11, 2007 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, सगळ्याच बायका घरी स्वयंपाक करतात असं तुम्हाला कोणी सांगितलं... :-)

माझ्या माहितीत एक गृहस्थ आहेत, त्यानी कोणताही पदार्थ मागितला, की त्यांची बायको 'बाजारातून आणा' ही रेसिपी वापरते. म्हणून ते असल्या idea करतात....

दिवे घ्यालच...


Maitreyee
Friday, January 12, 2007 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय हे नविन देशी दुकान कुठलं रे डेटन चं का(..कुणाला काय वाचनीय वाटेल...):-O

Vinaydesai
Friday, January 12, 2007 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. त वरून ताकभात... हो MT तुझी शंका बरोबर आहे... ते Dayton चं अपना बाजार...

(बाकी Wawa, Stop N Shop चे Clue मी दिलेच होते...)

कुणी लेखातून काय घ्यावं..? (अहो मी चटणी कलरचे पडदे म्हणत होते ना, ते तसले..... )
:-)

Maitreyee
Friday, January 12, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोब्बर विनय

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators