Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 26, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » rar » Feedback » Archive through June 26, 2006 « Previous Next »

Naatyaa
Monday, January 23, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yep. And they deserve to take it all too. Defeating no. 1,2,3 seeds in their own backyards. Amazing performance.

Congratulations to Steelers and all the Steelers fans.

Abedekar
Monday, January 23, 2006 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Orissa Steelers win Division I PHL

Bhagya
Friday, January 27, 2006 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, माझ्या दोन प्रश्नांची, हरकत नसेल तर उत्तरे देशील का?

१. बाबांकडून जैत रे जैत च्या shooting चे किस्से...
तुझे बाबा चित्रपट सृष्टिशी associated आहेत का? जैत रे जैत हा मझा आवडता चित्रपट.

२. तू कशात PhD केलीस?

छानच लिहितेयस, तू लिहिलेले काही ग्रामीण जीवनाचे हृदयदावक अनुभव मी पण घेतलेत. आणि वाईट वाटतं, अशावेळेला आपण या लोकांसाठी काही करू शकत नाही.


Nandya
Monday, February 06, 2006 - 3:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Party केव्हा तेवढे सांगा :-) Congratulations to you and to all the Steeler's fans on HG!!

Nandya
Saturday, April 29, 2006 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Congratulations once again!
चौकोनी टोपी फ़िरवा नीट अन उडी मारताना जरा जपून :-)

Vinaydesai
Wednesday, May 24, 2006 - 12:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हरवले ते' हे पुस्तक मलाही वाचायला मिळालं... खरंच कितीतरी गोष्टी अश्या आहेत की ज्या आता वापरात नाहीत, आणि हळूहळू लोप पावत आहेत.
कदाचीत काही वर्षानी त्या वस्तूसंग्रहालयात बघायला मिळतील..


Dineshvs
Wednesday, May 24, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, पोस्टाने मिळु शकेल का मनी ऑर्डर करीन. शक्य असेल तर पत्ता हवाय.

Rar
Friday, May 26, 2006 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, पुस्तकाबद्दल उत्सुकतेने विचारल्याबद्दल धन्यवाद.
पुण्यात 'राजहंस प्रकाशन' हे पुस्तकाचे प्रमुख विक्रेते आहेत. त्यांचा पत्ता

राजहंस प्रकाशन
१०२५, सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे ४११०३०
phone # (०२०)२४४७३४५९,२४४६५०६३


Dineshvs
Thursday, June 08, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, पुस्तक मागवलेय. मग कळवीनच.
भुगोल माझा पण अत्यंत आवडीचा विषय.
आपले नकाशे सोडले तर जगात कोणीच POK भारताचा भाग म्हणुन दाखवत नाही. या फोटोतपण तसेच दिसतेय.


Rar
Thursday, June 08, 2006 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुमचं निरीक्षण बरोबर आहे. नकाशा पाहिल्यावर मी पण पहिल्यांदा कोणती गोष्ट पाहते तर 'भारत कसा दाखवला आहे?'
दोन आठवड्यापूर्वी मी sunnyvale, California इथे 'कोमला विलास' नावाच्या hotel मधे भारताचा चांगला नकाशा पाहिला. त्यात POK भारतात दाखवला होता. शिवाय झारखंड आणि उत्तरांचलच्या सीमा पण योग्य दाखवल्या होत्या. खूप दिवसांनी भारताचा एक योग्य नकाशा पाहिला मिळाला.
मी राहते तिथे Little India नावाचे एक shop आहे, त्यात लावलेल्या नकाशात भारतातून POK वगळला आहेच पण आसामचाही काही भाग कापलाय... "Little India" केलाय literally !


Lopamudraa
Thursday, June 08, 2006 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, भारताच्या नकाशाचा हाच अनुभव आला सगळ्या ठिकाणि इथे तर चक्क एका पन्जाबि होटेल मध्ये मी खलिस्थान चा मोठ्था नकाशा बघितला.. अणि भारताचा.. खलिस्थान वगळलेला.. अरे बापरे मला त्याठिकाणि जेवणच गेले नाही...!!!

Dineshvs
Thursday, June 08, 2006 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच तो भाग आपण गमावला. पण लहानपणापासुन तसा नकाशा बघायची सवय असल्याने आता कुणी हे सत्य समोर आणले तर आपल्या देशाचे शिरच कुणीतरी तोडल्यासारखे वाटते.
लहानपणी मला तो भाग म्हणजे ईंदिराजींचा चेहरा वाटायचा.


Robeenhood
Friday, June 09, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश कोणाच्या लहानपणी?इन्दिराजींच्या की तुझ्या? ए.भा.प्र.

Ninavi
Friday, June 09, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, छान लिहीतेस गं. पुस्तकही आता गेले भारतात की नक्की घेईन.

Dineshvs
Saturday, June 10, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थात ईंदिराजींच्या रे. माझे लहानपण मला कुठे आठवतेय ?
मला तर अजुनहि ईंदिराजी आणि पंतप्रधानपद ही युतिच आवडते.
पुढे काय, आनंदच आहे ?


Dineshvs
Wednesday, June 21, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rar यावेळी मुंबईहुन हरवले ते हे म वि सोवनींचे पुस्तक घेऊन आलो.
खरेतर एकाच बैठकित वाचुन संपवले पण अशी पुस्तके परत परत चाळायची असतात ना ?
यात वर्णन केलेल्या ९८ टक्के वस्तु मी स्वतः वापरल्या आहेत. त्यामुळे तश्या माहितीतल्याच आहेत, तरिहि त्या वस्तुंबद्दल अनोखी माहिती आहे या पुस्तकात.
सगळ्याच लेखांच्या शेवटी जी हळहळ व्यक्त केलीय, ती आज अनाठायी वाटते. कालौघात जुने ते मागे पडणारच. नव्या नव्या वस्तु येणार त्या जुन्याना मोडीत काढतच ना ?
पण माझ्यापेक्षा वयाने लहान असणार्‍याना मात्र या वस्तु अनोख्या वाटतील. शिवाय चित्रे असल्याने, वस्तुची कल्पना येतेच.


Rar
Wednesday, June 21, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय दिनेश, यातल्या खूप वस्तू मी पण पाहिल्या आहेत, वापरल्या आहेत.
लहानपणी परिक्षेच्या काळात हमखास दिवे जायचे, आणि त्यावेळी जो काय 'दिव्याच्या उजेडात' मी अभ्यास केलाय तो ह्या पुस्तकाच्या cover वर असलेल्या दिव्याच्या उजेडात.
पण माझ्या माहीतीत खूप लोक आहेत, की ज्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या नाहीयेत.
आणि somehow research field मधे असल्याने असेल पण documentation, compilation किती महत्वाचे आहे हे आता खूप जास्त पटायला लागलय. त्या दृष्टीने मला स्वत्:ला ह्या पुस्तकाची कल्पना आवडली.
आता एक नवीन project चालू आहे, ते म्हणजे गेल्या ५०० वर्षात 'महाराष्ट्रातले पोषाख' कसे बदलत गेले त्याबद्दल. विषेशत: 'नाटकासाठी, सिनेमासाठी' जेव्हा 'त्या त्या विशिष्ट काळातल्या dresses चे references लागतात' त्यासाठी हा project नकीच उपयोगी होईल असं वाटतय.

पुस्तक घेऊन वाचल्याबद्दल आणि आवर्जून सांगीतल्याबद्दल खरच thanks :-)


Dineshvs
Thursday, June 22, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना पोषाखांचे पण दस्ता ऐवजीकरण व्हायलाच पाहिजे.
मी तर शाळकरी मुलींच्या भाषेचा पण मुद्दा मांडला आहे. बाबाना एखादी लेखिका गाठायला सांगायला हवी.
त्या वयात काय असते कि मुलीना ते शब्द सिक्रेट ठेवायचे असतात आणि सगळ्याच मुलीना ते शब्द माहित असल्याने, त्याचे अर्थ लिहुन ठेवायची तसदी कुणी घेतलेली नसते. आणि कालांतराने ती भाषा जाऊन दुसरी भाषा येते.

आणि असे एखादे वेगळ्या विषयावरचे पुस्तक आले कि मी ते घेतोच. यापुढेहि अवश्य घेईन. फक्त मला ईथे मिळत नसल्याने, मला मुंबईच्या वारीची वाट बघावी लागते.



Kedarjoshi
Tuesday, June 27, 2006 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रार.
सिनेमे वजा जाता राहील काय? याच नादामूळे मी कित्येक फालतू पिक्चर पण पाहीले आहेत. येउ देत, वाचायला मजा येईल.


Raina
Tuesday, June 27, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार,
मस्त ! पिक्चरचा ट्रेलर आवडला- आता पिच्कर पाहायची उत्सूकता आहे.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators