|
Sayonara
| |
| Tuesday, March 20, 2007 - 6:36 pm: |
| 
|
अरे वा, thanks मधुरा. बघते तिकडे सर्च करुन.
|
छान लिहीत आहेस रार! माचिस पहायचा राहून गेलाय... आता या वीकेंडला.... आणि सुरेश वाडकरांबद्दल... अगदी, अगदी! मलाही "तुमसे मिलके ऐसा लगा..." किंवा "हुजूर इस कदर भी न इतरा के चलिये..." किंवा "सीने में जलन, आंखों में तुफान सा क्यों है..." नंतर आता 'तुज नमो' येणार की काय असं नेहमी वाटतं ऐकताना! 
|
Bee
| |
| Tuesday, April 03, 2007 - 4:10 am: |
| 
|
वा छान लिहिलस माचिसबद्दल.. चांगली depth घेतलीस ह्यावेळी..
|
Zakasrao
| |
| Tuesday, April 03, 2007 - 5:25 am: |
| 
|
तुझे लेख मग तो कोणत्याही विषयावर असो आवडतात. अगदी puzzle पासुन films पर्यंत. खुप छान शैली आहे लिहिण्याची.
|
रार, मस्त लिहित आहेस ग. माचिस चा प्रभाव खूप आहे मझ्यावर. तुझे लिखाण वाचुन पाणी आले डोळ्यात. तू म्हटल्याप्रमाणे, त्या काळातील इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असलेला हा चित्रपट. निदान मझ्यासाठी तरी दहशतवाद आणि त्याचे परिणाम याचा विचार करायला नुकतीच सुरुवात असतानाचे वय, त्यात गुलज़ार ची मान्डणी अणि हताळणी अणि विशाल भारद्वाज चे सन्गीत! मनावर कायमचा कोरला गेला आहे हा movie दहशतवादच्या परिणमांची इतक्या intensity नि जाणीव याच movie मुळे झाली. Also, I think Gulzar himself has suffered through the partition, hence the presentation happens so intense and subtle. It's like a person expressing his own pain in some form
|
Gs1
| |
| Tuesday, April 03, 2007 - 8:24 am: |
| 
|
वा रार, काय छान लिहिल आहेस, माचीस मलाही खूप भावला होता ...
|
Mandard
| |
| Tuesday, April 03, 2007 - 9:31 am: |
| 
|
माचिस मला पण आवडला होता. पण आमच्या शेजारच्या सरदार कुटुम्बाच्या मते तो पाहिल्यावर जखमेवरची खपली काढल्यासारखे वाटते त्यांना.
|
Psg
| |
| Tuesday, April 03, 2007 - 10:10 am: |
| 
|
रार, मस्त लिहत आहेस.
|
Farend
| |
| Wednesday, April 04, 2007 - 1:47 am: |
| 
|
Rar सॉलिड! आता हा चित्रपट पुन्हा ही माहिती डोक्यात ठेऊन बघितला पाहिजे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 04, 2007 - 5:45 pm: |
| 
|
सुंदरच लिहिलय रार. त्यावेळी गुलजारने या विषयाला का हात घातला, असे सगळेच म्हणत होते. पण शेवटी गुलजार तो गुलजारच ना. त्यावेळी चप्पा चप्पाच जास्त प्रमोट झाले होते, त्या मानाने बाकिची गाणी वाजवत नसत. त्यातल्या शब्दांची ताकद मग जाणवु लागली. आता गुलजारच्याच हु तु तु बद्दल लिहिणार ना ?
|
Rar, the more you write, the more we have started expecting अनाहत पाहिलास? आवडला होता? आवडला असेल तर कधी त्याविषयी पण लिही ना
|
Ruchita
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:16 am: |
| 
|
अतिशय सुरेख लिहिले आहे...मी अगदि मनापासुन तुमचे आभार मानते....माझ्या प्रोफ़ेशन मध्ये मला या लेखाचा खुप उपयोग होइल...मला तुमचा ओन्तcत नम्बर मिळेल का?....ऋचिता..Zऍऍ ट्V
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 05, 2007 - 11:02 am: |
| 
|
माचिस एक सुंदर आणी विलक्षण अनुभव आहे... माझा हा चित्रपट बघण्याचा योग असाच अचानक आलेला...पडेल आर्ट म्हूवी म्हणून संभावना झालेला पिक्चर लागला, तोही एका एकदम डंपर थिएटर ला..( tax free ना)...आम्ही ४ डोकि मिळुन १५ टाळकी असतिल..पिक्चर सुरु व्हायच्या आधी मी मैत्रीणीला जाम पिडले होते जिच्या डोक्यातुन ही टुम निघाली.... रार तुला जुना चित्रपट ही इतका लक्ख आठवतोय..तुझ्या शब्दात वर्णन वाचुन मजा आली...परत एकदा बघायला पाहिजे..
|
रार, निशांत, अंकुर (आणि अर्धसत्य, जरी बेनेगलचा नसला तरी) बद्दल देखील लिहा ना. मंडीप्रमाणेच अर्धसत्यदेखील सूर्य नावाच्या एका १५-२० पानी लघुकथेवरुन बनवलेला चित्रपट आहे. श्रीदा पानवलकरांची लघुकथा आणि विजय तेंडुलकरांची पटकथा आहे.
|
Bee
| |
| Monday, September 10, 2007 - 10:35 am: |
| 
|
ह्यामधील 'अर्धसत्य' ही कविता दिलिप चित्रेंची आहे. ह्या चित्रपटातील काही भाग छान आहे. खास करून समाजात आपले नैतिक कृत्य काय आहे हे सांगायचे म्हणून कुठल्या तरी चळवळीत एका महिलेचे भाषण दाखविले आहे आणि स्मिता पाटिल हे भाषण ऐकत असते. मग त्यातील एकेक शब्द ती कसे लक्षात घेते.. तो भाग मला खूप आवडला होता. पण एक पोलिस ऑफ़ीसर म्हणून ओम पुरी कुठेतरी चुकतो. तो कायद्याचे उल्लंघन करतो आणि स्मिता पाटिल त्याला काहीतरी समजवून सांगते. तो गुन्हेगार व्यक्तीवर गोळी घालतो. माझ्या मते तुमची philosophy कितीही चांगली असेना पण प्रामाणिक मनुष्याचा तोल जाऊ शकतो हे खरे नाही का.. ओम पुरी एक प्रामाणिक ऑफ़ीसर असतो. तो शेवटी बंदूक चालवितो. कायद्याच्या दृष्टीने जरी ही चूक असली तरी त्यामागची त्या व्यक्तीची मानसिकता इथे लक्षात घेतली गेली नाही. मात्र, समाजात राहताना, आपली भूमिका कशी असावी ह्यावर काही भाष्य देणारे चित्रपट मी तरी अद्याप पाहिलेले नाही. हा एकमेवच बघितला आहे.. किंवा लक्षात राहिला असावा.. कारण अभिनय!!!!!! असो.. ओम पुरीचे खूप चित्रपट बघून काही भाग कळत नाही पण खूप भिडतात.. त्याचा अभिनय जिवंत असतो म्हणून.
|
रार, माचिसबद्दल खूपच छान लिहिलं आहेस. मी खूप वर्षानंतर मायबोली परत पहायला लागलो आहे. लिहीत रहा. संदीप -- www.atakmatak.blogspot.com
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|