|
Milindaa
| |
| Tuesday, September 26, 2006 - 5:02 pm: |
| 
|
अजून एक म्हणजे, तुम्ही एखादा याहू ग्रुप वगैरे तयार करु शकता, ज्याने होईल काय की एखादे गाणे आले आणि पाठविणार्याला त्याचे गीतकार माहिती नसतील तर ते दुसर्या व्यक्तीला (इथे 'प्रिया' असे वाचावे) माहिती असू शकतात, त्यामुळे ते लगेच दुरुस्त करता येईल.
|
Seema_
| |
| Tuesday, September 26, 2006 - 5:42 pm: |
| 
|
विनय मला आवडेल पाठवायला. फ़क्त गाणी जुनीच पाहीजेत अस काही नाही ना?
|
नाही... उलट नवीन हवी आहेत... तेव्हा तू पाठवच... मिलिंद सध्या मी प्रयोग करतो आहे.. सुरुवातीला आम्हीच Correction करू.. नंतर Yahoo Group वापरता येईल.. Check before you type at: http://www.cs.wisc.edu/~navin/india/songs/
|
Priya
| |
| Tuesday, September 26, 2006 - 6:16 pm: |
| 
|
विनय, नवीन गाणी हवी आहेत म्हणता? मग माझं नाव काहो घातलत त्या यादीत? की 'उलट नवीन' म्हणजे जुनीच हवी आहेत? मिलिंदा - तुझं आपलं कैच्या कैच.
|
Karadkar
| |
| Tuesday, September 26, 2006 - 6:50 pm: |
| 
|
Make it google groups - just a suggestion !!
|
Farend
| |
| Tuesday, September 26, 2006 - 8:01 pm: |
| 
|
विनय मलाही त्यात थोडी भर घालायला आवडेल. पण geetmanjusha.com ह्या साईट वर अशी गाणी आणि गीतकार वगैरे पण आहे (मराठी व हिन्दीही). तुमचा आणखी काही वेगळे करायचा विचार आहे का?
|
Thanks .. मी ती साईट पाहिली.. पण त्यावर गाणी दिसतात ती hinglish मध्ये (माझं काही चुकत आहे का?).. मला देवनागरीत गाणी हवी आहेत, आणि वरील साईट सोडली तर फारशी मिळाली नाहीत. तशी Raaga.com वर सुध्दा Lyrics आहेत, पण ती वाचणं हे अत्यंत कंटाळवाणं वाटतं.. म्हणून हा उपद्व्याप... दुसर्या साईट असतील तर मग प्रश्नच मिटला.. प्रिया, तुझ्या एवडी गाणी लिहिणारं मी कुणी बघितलं नाही अजून... (की पुन्हा ती प्रिया वेगळीच? )
|
Milindaa
| |
| Wednesday, September 27, 2006 - 9:09 am: |
| 
|
सुरुवातीला आम्हीच Correction करू<<< म्हणजे कोण कोण? की हे आदरार्थी एकवचन आहे?
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 27, 2006 - 3:37 pm: |
| 
|
विनय, नवीन म्हणजे आपल्या जन्मानंतरची का ?
|
Vinaydesai
| |
| Wednesday, September 27, 2006 - 5:46 pm: |
| 
|
दिनेश, खरं तर नवी, जुनी दोन्ही चालतील... मला Farend यानी www.geetmanjusha.com ही साईट पण दाखवली.. जे आधीच आहे ते पुन्हा करण्यात अर्थ नाही, पण एखादं गाणं इतर Major Sites वर देवनागरीत नसेल, तर ते लिहायला हरकत नाही.. या मागची भूमिका मी लगेच लिहितो... बाकी 'आम्ही कोण म्हणोनी काय पुसता?' ऐकलच असेल. (अरे माझा एक मित्र मला मदत करणार आहे या project वर)... 
|
Giriraj
| |
| Thursday, September 28, 2006 - 6:57 am: |
| 
|
विनय,गीतमंजुषा वर देवनागरीतच दिसते की! आणि मराठी विभाग तर Unicode आहे.. त्यमुळे त्यात Copy paste चालते!
|
Vinaydesai
| |
| Thursday, September 28, 2006 - 12:39 pm: |
| 
|
खरं आहे.. मी Mozilla वापरत होतो.. मग IE वापरल्यावर नीट दिसू लागलं.. Mozilla वर HG पण नीट दिसत नाही... Anyway मी बाकी लिहिलंच आहे.. Geetmanjusha ची यादी पण तोकडीच आहे... आणि मी म्हटल्याप्रमाणे जर गाणं तिथे असेल तर परत नको लिहायला
|
Lalitas
| |
| Thursday, September 28, 2006 - 12:56 pm: |
| 
|
विनय, काही गाणी मला येत असली तरीही... कधी कधी बाकीची माहिती आठवत नाही, जसे गीतकार किंवा संगीतकार. त्यामुळे गाणी लिहू का नको समजत नाहीय.
|
Shonoo
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:01 pm: |
| 
|
विनय अतिशय चांगली कल्पना मांडलीत. फार पूर्वी usenet ग्रूप मधे rec.music.indian.miscellaneous नावाच्या ग्रूपवर एक गाण्यांचं कोडं चालत असे. एखादा विषय निवडून त्यावरच्या गाण्यांचे मधल्या ओळी देत असत आणि मग त्यावरून गाणी ओळखून पाठवायची असत. किती तरी गाण्यांच्या ओळखी झाल्या होत्या त्या वेळी आणि शिवाय गत स्मृतींना सुखद उजाळा मिळत असे ते वेगळंच. आता itrans मधे नसलेली आणि माझ्या कडे असलेलि गाणी परत ऐकली पाहिजेत. मी पण दिनेश च्या धर्तीवर किंवा थोडे पुढे ( मागे) जाऊन म्हणेन की १९५० च्या नंतरची गाणी नवी धरायला पाहिजेत. मी तयार आहे गाणी शोधून शब्द लिहून काढायला.
|
Vinaydesai
| |
| Thursday, September 28, 2006 - 3:12 pm: |
| 
|
ललिता, गीतकार संगीतकार माहीत असणे एवढं महत्वाचं नाही.. कारणे शेवटी Lyrics लागतात.. माहीत असले तर लिहा, कारण पुढे Search साठी उपयोग होईल.. आणि तुम्ही नाही लिहिलत, तरी ज्याना माहीत असतील ते सांगतीलच, साईट सुरू झाल्यावर...
|
Lalitas
| |
| Thursday, September 28, 2006 - 5:18 pm: |
| 
|
ठिक विनय, सुरू करते.....
|
Dineshvs
| |
| Friday, September 29, 2006 - 3:15 pm: |
| 
|
ललिता सारख्या जाणकार व्यक्तीचा सहभाग असल्यावर माझ्या अपेक्षा वाढल्या आहेत. कुठल्याहि गाण्याचे त्याना जाणवलेले वैशिष्ठ त्यानी लिहावे. ( थोडक्यात गाणे त्याना का आवडते ) अशी माहिती सहज कुठेच उपलब्ध नाही. मी एक प्रयत्न करुन बघतो. सिनेमा मुझे जीने दो गायिका आशा भोसले संगीतकार जयदेव कलाकार वहिदा रेहमान आणि सुनील दत्त नदिनारे ना जाओ श्याम पैया पडु पैया पडु श्याम बिनति करु नदिनारे जो जाओ तो जैबे करो बीचधारे न जाओ श्याम पैया पडु बीचधारे जो जाओ तो जैबे करो ऊसपारे न जाओ श्याम पैया पडु ऊसपारे जो जाओ तो जैबे करो संग सवतीया न लाओ श्याम पैया पडु संग सवतीया जो लाओ तो लैबे करो हमका ना दिखाओ श्याम पैया पडु नदिनारे ना जाओ श्याम पैया पडु या गाण्यातले अंगभुत लॉजिक खुपच सुंदर आहे. कितीहि विनवण्या केल्या तरी तो ऐकणार नाही हे तिला माहित आहे, म्हणुन टप्प्याटप्प्याने सवलती देत आहे ती. हे गाणे बहुदा एखाद्या लोकगीतावर आधारीत असावे. जयदेवने लावलेली चाल त्याच बाजाची आहे. आशाने त्यात खास हरकती घेतल्या आहेत. संग सवतीया नंतर तिने ना ना ना, असे म्हणत, नायिकेची खरी भिती छानच टिपली आहे. तसेच प्रत्येक ओळीतले आर्जव छानच दाखवले आहे. याची सिनेमातली चाल आणि रेकॉर्डवरची चाल जरा वेगळी आहे. सिनेमात ती थोडी संथ तर आहेच, त्याशिवाय मधे मधे काहि संगीताचे तुकडे आहेत. शेवटचे कडवे पुर्वी रेडिओ वर लागत नसे. गाण्याची चाल ऐकली तर, त्यावर नौटंकी टाईप नाच असावा असे वाटते. पण वहिदासारखी नृत्यनिपुण कलाकार असली तरी सिनेमात या गाण्यावर नाच नाही. दोघे होडीतुन फ़िरत गाणे म्हणतात. याच सिनेमात आशाचे, आखमे भरलो रंग सखी री आणि लताचे रातभी है कुछ भीगी भीगी, अशी आणखी दोन छान गाणी आहेत. या गान्याचे गीतकार मला माहित नाही. कुणीतरी तेवढी माहिती देणार का ?
|
दिनेश, गाणं छान आहे, पण इथे नको.. प्लीज मेल पाठव... जागेचा प्रश्न नाही, पण ते Gif मध्ये Convert करायला सोपं जातं.. Maaybolifiles नावाचा एक YahooGroup आहे तो सध्या Open केला आहे, इथे तुम्हाला Text Files Load करता येतील.. आणि Connverted GIF पण बघता येतील... Membership बर्याच मायबोलीकरांची आहेच.. नसेल तर मला Mail टाका...
|
Dineshvs
| |
| Saturday, September 30, 2006 - 2:21 am: |
| 
|
विनय फ़क्त उदाहरण म्हणुन लिहिलं. यापुढे तूलाच पाठवीन. पण तूला एकंदरित अश्याच फ़ॉर्म मधे हवी आहेत ना गाणी ?
|
चर्चा झाली, Yahoo Group झाला, फक्त गाणी मिळाली नाहीत... Yahoo Group वर असलेली गाणी तुम्ही Join व्हाल तेव्हा पहालच..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|