Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 20, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » bee » Feedback » Archive through September 20, 2006 « Previous Next »

Supermom
Wednesday, August 16, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, फ़ारच छान लिहिलं आहेस.
पण मलाही सिंगापूरला कधी होमसिक नाही वाटले. उलट खूपच आवडले.
छोटासा देश, टॅक्सीने वा ट्रेन ने कुठेही जाण्याची सुविधा नि मुख्य म्हणजे अतिशय कमी क्राईम रेट.जवळजवळ नाहीच.
फ़ार एंजॉय केले आमच्या कुटुंबाने सिंगापूर.


Dineshvs
Wednesday, August 16, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, माझ्या बाबतीत जिथे जिथे राहिलो ते माझे घर झाले. ईतके सवंगडी जमवले कि आठवण तरी कुठल्या घराची काढु, आजोळचे माणसानी भरलेले घरहि माझेच आणि गोव्यातल्या एका निर्जन जागेतले गिर्‍याचे घरहि माझेच.
सगळ्या घरांच्या आठवणी अजुनहि ताज्या आणि त्या घरानी मला जे दिले, ते वाटुन टाकण्याचा माझा स्वभाव. मला वाटते, या दोन गोश्टी मला होमसिक होवु देत नाहीत.


Lalitas
Wednesday, August 16, 2006 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, मी म्हणतेच आहे की "हम न घर के न घाट के".
इथे देखिल घर माझंच आहे... भारतात देखिल कित्येक घरं मी माझी आहेत असं सर्रास म्हणू शकते. पण काही दिवस गेले की भारतातून परत स्वीसमध्ये आपल्या घरी यायची आस लागतेच. मला असंख्य मित्रमैत्रिणी आहेत... पण कुठेतरी एक अतूट भावनिक ओढ असते, ती वाटून कशी टाकता येईल किंवा वाटून कशी कमी होईल?
जाऊ दे, प्रत्येकाची विचार करण्याची पध्दत व ऍप्रोच वेगळा असतो.


Dineshvs
Thursday, August 17, 2006 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती बहिणाबाईची कविता आहे ना, कि लेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते, तशी गत आहे माझी.
अनेक मायबोलिकराना माझे घर म्हणजे हक्काचे माहेर वाटते.

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देण्यार्‍याचे हात घ्यावे,
ते असे. हो ना ?


Lalitas
Thursday, August 17, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही! तुम्ही जे आता लिहिलं आहे ते "होमसिक होणे" या विषयाला धरुन आहे का हेच मला कळत नाहीये...

बीच्या हक्काच्या पानावर असं असंबध्द संभाषण चालू ठेवण्यांत मला रस नाही... माझ्याकडून मी हा संवाद संपवते आहे.


Lalu
Thursday, August 17, 2006 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>फ़िरुन वाटते ते ह्या चिमुकल्या प्रसंगाविषयी की इतका परिचित स्वानुभव तरीही कुणाची homesickness आपणहून जाणवली कशी नाही..
असं होतं. काही काळानंतर आपण नवीन ठिकाणी रमून जातो आणि या सुरवातीच्या भावना विसरतो. मिळणारा मोकळा वेळही कमी होतो, तरी कोणी आपलं म्हणून बोलायला आलं तर थोडा तरी वेळ द्यावा असं वाटतं. कोणी नवीन लोक मराठी बोलताना दिसले तर नवीन आलात का, इथे किती दिवसापासून आहात, ओळखी झाल्यात का एवढी माहिती विचारावी. मराठी मंडळ असेल तर मंडळाची माहिती द्यावी.
चांगलं लिहीतो आहेस.


Shonoo
Friday, August 18, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
छान लिहितो आहेस. एकटाकी लिहीत असावास असं वाटतंय. का परिच्छेदा मागे पैसे जास्त लागतात इथल्या पानांवर? :-)
लिहीत रहा सवड काढून


Dineshvs
Friday, August 18, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी, ललिता, माझ्यामुळे दुखावल्या गेला असाल तर. मीही हा संवाद थांबवतोय.

Jadhavad
Friday, August 18, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,
अरे भेटु रे एकदा, गणपती आधी.
अमित


Bee
Friday, August 18, 2006 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमित, आता नाटकाला आणि गणेशोत्सवाला काहीच दिवस उरलेत. २६ ला नाटक मग २७ पासून पुढे ५ दिवस गणपती इथे बसत आहेत भवन्स स्कूलमध्ये. तेंव्हा नाही इतक्यात जमले तर मग नाटकाला भेट. आम्हाला गणेशोत्सवाला भरपूर स्वयंसेवक हवे आहेत. तेंव्हा जमल्यास जोडीने या काम करायला. ग्रंथालयालाही भरपूर स्वयंसेवक हवे आहेत. तू ही निकड तुझ्या मित्रांमध्ये सांग. त्यापासून काहीतरी फ़ायदा होईलच. पुढल्या वर्षी तुमचाकडेही गणपती बसोत :-)

Aandee
Sunday, August 20, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,छान लिहलय सुख दुःखाना वाहत केलकी मनावरचे ताण हलके होतात

Jayavi
Sunday, August 20, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, सुरेख लिहितो आहेस. अशा मनातल्या कितीतरी अनुभवांना अशा लिखाणातून बाहेर पडता येईल. लिहीत रहा.

Vaaghobaa
Thursday, September 07, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेंव्हा जमल्यास जोडीने या काम करायला. >>
पासून काहीतरी फ़ायदा होईलच.>>
पुढल्या वर्षी तुमचाकडेही गणपती बसोत :-) >>



Giriraj
Friday, September 15, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह बी!
घरव्याकूळता खूपच छान शब्दात माडलीस! :-)


आणि हे एक बरे आहे.. e- धिरडे असल्याने चाखावे लागत नाही!


Manuswini
Tuesday, September 19, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,,

ही आंबोळी आहे की अडई??
छान दिसतात...................

मला सांग की नक्कि कोणता प्रकार आहे


Bee
Tuesday, September 19, 2006 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, ही धिरडी आहेत. मी उडदाची डाळ आणि आंबेमोहर तांदूळ समप्रमाणात घेऊन थेट मिक्सरमधेच एक रात्र भिजवले आणि दुसर्‍या दिवशी न आंबविता धिरडी केलीत. अढई आंबोळी हा प्रकार मी नंतर करुन बघणार आहे. एकदमच सगळे प्रकार करुन बघितले तर पदार्थांची मजा येत नाही..

Deepanjali
Tuesday, September 19, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ,
मला तरी ते बिन कांदा मिरचीचं plain अंड्याचं ऑम्लेट वटते आहे .


Arch
Tuesday, September 19, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deeps तेउला fried egg म्हणायच आहे का?

बी तू आता एक छानशी बायको करून आण म्हणजे ती देईल तुझ्या सगळ्या recipe च्या प्रश्णांना उत्तर. किंवा ती छानशी असल्यामुळे तुला प्रश्णच सुचणार नाहीत.

Bee
Wednesday, September 20, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण अशीच दिसायला हवीत ना धिरडी.. इतकेच नाहीतर ज्यांनी ज्यांनी कृती दिली त्यांनीही तसेच लिहिले आहे की छान जाळी येते धिरड्यांवर. आली आहे की जाळी मी केलेल्या धिरड्यांवरही. मी ह्यात वरतून काहीच घातले नाही. मला फ़क्त धिरड्यांचीच चव हवी होती म्हणून..

Milindaa
Wednesday, September 20, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण ते fried egg सारखे दिसले
बी, धिरडी अजून भाजली पाहिजेत


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators