|
A_sayalee
| |
| Thursday, August 24, 2006 - 5:14 am: |
| 
|
Punya हे आवडलेल्या व्यक्तिने भारावून जावून तिला ape वैगरे करणं, थोडंसं teenage मधलं वर्तन वाटतंय. जर व्यक्तिमत्व विकसीत झालंच नाही तर, आपण कोण ह्याचा शोध लागलाच नाही तर? संबंधित लोकांना nuisance तर आहेच, पण तिला स्वत:ला तरी काय सुख लागत असेल असे मनात आले.
|
Lalitas
| |
| Thursday, August 24, 2006 - 8:00 am: |
| 
|
प्रिया, जपून रहा.... मी असा एक अनुभव घेतलाय. थोड्यांच दिवसांत हे लोक तुमचा दु:स्वास करू लागतात. आमच्याबाबतीत ही व्यक्ती दक्षिण भारतीय होती. नंतर मुलं मोठी झाल्यावर मुलांमध्ये त्यांनी चढाओढ सुरू केली. स्वाभाविक मुलांत मग भांडणं होतात. मग मद्राशीण त्यांत हस्तक्षेप करायची, धादांत खोटं बोलायची. खूप मन:स्ताप झाला. असे copy cats स्वत: निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा निर्णय चुकण्याची भिती वाटते. माझी बया तर विंटर कोटदेखिल कॉपी करत असे. ती माझ्यापेक्षा खूप बुटकी होती, साहजिकच माझ्यासारखे outfits तिच्यावर विसंगत दिसत असत. मी मोठी कॉलर असलेला कोट घेतला की ही पण विकत आणायची, पण मोठी कॉलर तिला अजिबात शोभत नसे.... लहानखुरा बांधा असल्याने नुसती कॉलरच दिसे... खूप वैताग दिला या लोकांनी. तिच्या नवर्याला शिकागोला नोकरी मिळाली व आम्ही सुटलो.
|
Psg
| |
| Thursday, August 24, 2006 - 10:13 am: |
| 
|
पुण्य, सर्वच लेख मस्त लिहिले आहेस... आवडले
|
श्श्याऽऽऽ, हे कॉपी कॅट म्हन्जे त्रान्गडच हे की! तरी बर! देशातल्या सारखी चाळीत रहात नाहीस तू! नायतर येता जाता डोकावुन जाणार्या साळकाया म्हाळकाया काही कमी नाहीत आमच्या शेजारी सुद्धा! कधि कधि लिम्बीला सान्गाव लागत की आता हे येत असलेल "प्रकरण" थाम्बवल पायजेल, तिच अन माझ एकमत होत! पण तरीही, अशा वागण्यामागे, कसलीतरी भावनिक गरज असावी! याच विश्लेषण केल पाहीजे! बुट टेक केअर!
|
Dineshvs
| |
| Thursday, August 24, 2006 - 4:20 pm: |
| 
|
प्रिया, याचा त्रास होतोय हे मान्य आहे, पण दुर्लक्ष करणेच योग्य. आता मायबोलि वर अशीच आयडी घेऊन, असेच लिखाण करणार का, हि बाई ?
|
Sahi
| |
| Thursday, August 24, 2006 - 7:41 pm: |
| 
|
Priya,abt copycat I think may be ethe aaplee roots naslyane je insecurity feel hote tyachach tar ha parinam asel ka? Goryanshi as in stanikanshi exposure nahi mag desi lokanchyat je naveen- fancy watat tenna copy karaych ani "cool" aahot asa aabhas nirmaan karaycha mala tar tyanchi keev yete ,asa namuna mazyakadehi aahe farak haach ki amchya babies chya activity ani ti kiti yogya mother aahe hyacha naamgajar chalu asato. aata maze pillu jara tichya bala peksha rangani ujal aahe assal kokanasta navra ;). tila kay tyacha duswaas aahe ....tiche tond baghne nako etpat mi ani tarihi relations thevoon ahot karan inmean teench families aahot so aaliya bhogasi laksh n dene ani minimum contact is the key..
|
Sahi
| |
| Thursday, August 24, 2006 - 7:46 pm: |
| 
|
नवीन आहे मन्डळी साम्भाळून घ्या..देवनागरीत लिहिण्याचा प्रयत्न पुढच्या वेळेपासून नक्की करीन
|
प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद. मलाही ललिता ताइं सारखाच अनुभव आहे. ते खुप खोटं बोलतात. उगीचच बढाया मारतात. वगरे वगरे बरच. मी त्यांना आधी pregnancy च कारण देऊन आणि मग बाळ लहान असल्याचं कारण देऊन avoid करते. आता move होतो आहे म्हणुन फ़ारशी काळजी नाही आहे. असो, परत लिहीन सवडीने
|
Shonoo
| |
| Friday, August 25, 2006 - 1:46 am: |
| 
|
प्रिया, ललिता कॉपी कॅट परवडले म्हणायची वेळ आणतात काही परिचित. तुम्ही कुठलीही वस्तु घेतली की तुम्हाला कशी महागात मिळाली, ग्रॅनाइट पेक्षा कोरिआन कसे चांगले, आणि कोरिआन पेक्षा होमडेपो मधे मिळणार MDF चे counter कसे चान्गले, होन्डा पेक्षा फ़ोर्ड कशी स्वस्त आणि टिकाऊ. अगदी अन्त नसतो यांच्या उपदेशाला. तुम्ही जर म्हटलं की एखादी गोष्ट तुम्ही डॉलर स्टोअर मधून आणली तर ते म्हणणार की त्यांनी तीच वस्तू गराज सेल मधून २५ सेंट्स ना घेतली. असो. तुकोबांनी (की रामदासांनी) म्हटलंय ना 'निन्दकाचे घर असावे शेजारी' ते असल्या कॉपी कॅट ना वैतागूनच लिहिले असावे.
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 5:21 am: |
| 
|
आता मायबोलि वर अशीच आयडी घेऊन, असेच लिखाण करणार का, हि बाई ? >>> असे झाले तर तिला कसे कळणार..
|
Lalitas
| |
| Friday, August 25, 2006 - 7:01 am: |
| 
|
दिनेश, काय असतं ना की परदेशांत इनमिन भारतीय माणसं असतात आपल्या सभोवती... कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी शक्य होत नाही. मुलांची गुंतागुंत झाली की आईला नक्कीच फार मन:स्ताप होतो. कसं दुर्लक्ष करणार जेव्हा तुम्ही बघता की खोटं बोलून तुमच्या मुलांना मॉब केलं जातंय! तरी आम्ही दोघं खूप पडतं घेत असू कारण आम्हाला वाटे की अडल्या पडल्याला कुणीतरी या परक्या देशांत हवं... तेच चुकलं असं आता वाटतंय.
|
Dineshvs
| |
| Friday, August 25, 2006 - 8:39 am: |
| 
|
ललिता, कदाचित हे अनुकरण असुयेपेक्षा भितीपोटी होत असावे. म्हणजे हि माणसे आधीपासुन आहेत. सुखात दिसताहेत, आपणहि त्यांच्याप्रमाणे वागावं, म्हणजे आपणहि सुखी होवु वैगरे. असा प्रकार परदेशातच का, नविन लोकेलिटीत रहायला गेल्यावरहि आपल्याकडेहि होतोच. अगदी गणेशोत्सवाची वर्गणी देतानासुद्धा, शेजार्यानी किती दिलीय, ते बघितले जाते.
|
Lalitas
| |
| Friday, August 25, 2006 - 9:07 am: |
| 
|
असेल कदाचित् तुम्ही म्हणता तसं दिनेश... पण आमच्या आधी हे लोक इथे राहात होते. ही एकच फॅमिली अशी विचित्र होती, म्हणुन इतक्या वर्षांनंतर प्रियाचे अनुभव वाचून त्यावेळचे प्रसंग मनात परत ताजेतवाने झाले.
|
हो आमच्या कडे सुद्धा माझ्या अनुभवात तरी हिच एक family अशी आहे. म्हणजे जढाओढ सर्वांच्यातच होते, पण असं स्वतः ची बाजू वरचढ दाखवण्या करता खोट बोळणं वगरे फ़क्तं ह्यांच्यातच. घराची किम्मत वाढून सांगणे, त्यांना मुलगी झाली तर तिला आमच्याच मुलीचं नाव देणे ( हे ही आम्हाला सांगितलेलं ) , माझ्या नवर्याला माझ्या वागण्या वरून टोमणे मारणे वगरे. असो. माझ्या बहिणीला हे सगळं सांगितल्यावर तीनी काय म्हणावं " तुला किती वेळा सांगितलं आहे की भलत्या ठिकाणी पैसे वाचवायचा प्रयत्न करू नकोस म्हणुन ? सस्ता रोए बार बार प्रिया, मेहेंगा रोए एक बार. पुढल्या वेळी महागड्या salon मध्ये केस काप " पुढचा लेख येतोच आहे मंडळी
|
hmmmm its scary ... इतका complex असतो का कोणाला?
|
too much! मुलीचे नाव पण copy ?? !
|
Prajaktad
| |
| Saturday, August 26, 2006 - 9:33 am: |
| 
|
मुलगी झाली तर तिला आमच्याच मुलीचं नाव देणे ( हे ही आम्हाला सांगितलेलं ) , माझ्या नवर्याला माझ्या वागण्या वरून टोमणे मारणे वगरे. >>>बाप रे!कठिणच असतात काहि लोक! , शक्यतो अशा लोकांना टाळावे... शक्य असल्यास contact कमि करुन पुर्णच तोडुन टाकावे.
|
Giriraj
| |
| Saturday, August 26, 2006 - 11:31 am: |
| 
|
वाह! मस्तच लिहिलेय! खूपच छान!
|
Dineshvs
| |
| Saturday, August 26, 2006 - 2:59 pm: |
| 
|
प्रिया, मोबाईलची कथा खुपच क्युट आहे.
|
Paragkan
| |
| Saturday, August 26, 2006 - 8:39 pm: |
| 
|
heheh .. good one!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|