Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Feedback

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » punyanagarikar » Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 19, 200620 08-19-06  5:48 am
Archive through August 23, 200620 08-24-06  2:14 am
Archive through August 26, 200620 08-26-06  8:39 pm

Zakki
Saturday, August 26, 2006 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरवले ते गवस लेका, गवसले ते हरव लेका!


Raina
Tuesday, August 29, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढे दोन वर्षं तिची नोकरी करायची धडपड. त्यात नोकरी न मिळणं. मग नोकरी न करण्याचिच सवय होणं. पुढे दोन तीन वर्षात मूल होणं. मग त्यात बिझी. वगरे. >>
अगदि अगदि!!
सर्वच लेखन आवडले.


Bee
Tuesday, August 29, 2006 - 5:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्य, ताट अगदी नीटनेटक जमल.. मला असे जेवन दोन ठाव चालतील :-)

Moodi
Tuesday, August 29, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खी खी खी मांजराने मोबाईल लपवला, धमालच दिसतयं. मला आवडला हा प्रसंग.
मागच्याच आठवड्यात National Geography वर अमेरीकेतील काही घटना दाखवल्या. त्यात एका ठिकाणी सगळ्यांचे रोजचे पेपरच गायब व्हायला लागले, मग शोध घेतल्यावर कळले की लहान पिल्लांचे थंडी, दव, बर्फ आणि पावसापासुन संरक्षण व्हावे म्हणून कोल्ह्यांची जोडपी ते पेपरचे गठ्ठे नेऊन पिल्लांजवळ ठेवत होते. काय डोके लावले त्यांनी! पेपरमध्ये ऊब असते ना, ती त्यांना कळली. पण चिकोच्या डोक्यात काय आले असेल?

btw बी तू एकटा नाहीयेस जेवायला, मी पण आहेच. मी सकाळी जेवेन अन तू संध्याकाळी जेव.


Hawa_hawai
Wednesday, September 06, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PN दोघिन्ची गोष्ट वाचली. तु म्हटले आहेस की यावरचे तुमचे विचार ऐकायला आवडतील. पण खरं म्हणजे ही गोष्ट वाचून माझ्या मनात तरी काहिही विचार आला नाही.

Maitreyee
Wednesday, September 06, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या २ जोड्यांचा एकमेकशी काय संबन्ध? एका प्रोजेक्ट वर होते एवढाच? बाकी तसे काही विशेष घडलं च नाही असे वाटले मला तरी. बहुधा तुला काय सुचवायचे ते मला कळले नाही!

Deshi
Wednesday, September 06, 2006 - 7:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक तिला निनाद ने कसे वेगळी वाट घेत प्रमोशन मिळविले व वेळ येताच शालीना ला व प्रसाद ला कटविले. करियरच कसे महत्वाचे वैगरे.

निनाद सारखे असखं लोक ईकडे व भारतात दोन्ही कडे आहेत तसेच शालीनी सारखे ढ लोक पण आहेत. माझ्या कंपनी अनेक भुरटे गुलटी आहेत (हे अशासाठी लिहितोय की software मधील s आले की यांना एकाच वेळेस c, oracle blah blah येते असे सांगत फिरतात व नोकर्या मिळवतात.

पण पुण्य्- असे बरेचदा घडत असतेच त्यामुळे त्यात काही विशेष आहे असे मलाही वाटले नाही.


Shonoo
Thursday, September 07, 2006 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्य:

काही फारसं काम येत नसताना सुद्धा, मोठ्या project वर आहेत म्हणून, किंवा एकन्दरीत स्वभावाने मनमिळाऊ आहेत म्हणून, कोणीतरी फार उच्च्पदस्थ व्यक्ती godfather आहे म्हणून किंवा थेट कोणातरी वरिष्ठांशी affair आहे म्हणून कामावर टिकवुन ठेवलेले अनेक लोक दिसतात. बायका, पुरुष, देशी, गोरे, इतर परदेशी सर्व प्रकार आले. तू ज्या चौघांबद्दल लिहिलयस त्यांची नावं बदललीस तर भारतातून off shore काम करणार्‍यांच्या ऐवजी Accenture सारख्या कम्पनीच्या लोकांबद्दल सुद्धा ही गोष्ट सत्य असू शकते.

तुला यातून कोण बरोबर, कोणाचं काय चुकलं अशी चर्चा तर अपेक्षित नाही ना?



Raina
Thursday, September 07, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यनगरीकर- गोष्ट वाचली.. हे आणि याहून मुळासकट हलवून टाकणारे बरेच गेल्या काहि वर्षात s/w companies मध्ये पाहिले आहे.
तू लिहीलेली गोष्ट प्रातिनिधीकच म्हणावी लागेल.
शिवाय थोडासा- कर्मधर्मसंयोगाचा भाग ही याच्यात असतोच असे वाटते का? म्हणजे हीच ४ पात्र देशात कदाचित वेगळी वागली असती.. पण परदेशात एकमेकांच्या पायात पाय (किंवा हातात हात) घालणे, परिस्थितीवश आणि alienation च्या भावनेने नको ईतके संबंध वाढवले जातात.
कधी कधी अशा लोकांना पाहून असे वाटते की खरच यांचे प्रेम आहे का की, त्यावेळेच्या थोड्याशा choice अभावीच्या नुसत्या भावनेच्या ओलेपणाला हे प्रेमाबिमाचे लेबल लावतात? is it just a function of being in a particular place at a particular time? पण मग स्वत:चे तारतम्य लोकं का वापरत नाहीत?


Punyanagarikar
Thursday, September 07, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे, मी बहुदा नीट explain करू शकले नाही मला काय सांगयचं होतं ते. तस म्हटलं तर रैना ला pretty much got what I wanted to say . ही गोष्ट फ़क्त representative आहे. मला अस म्हणायचं होतं की आपण आयुष्य जवळ जवळ similar terms वर सुरु करून सुद्धा, ( हे मी life as adults बद्दल म्हणते आहे. ) परिस्थिती, नशीब, स्वभाव ह्या सगळ्यां मुळे आपण कुठे वहात जातो हे सांगणं अशक्य आहे.
रैनाच्याच भाषेत सांगायचं तर नशीब म्हणजे a function of being in a particular place at a particular time? तर नाही न ? बरीच वर्ष मला अस वाटत असे, की फ़क्त आपणच आपल अयुष्यं घडवतो. पण आता त्या फ़क्त वरती तेव्हढा विश्वास उरला नाही.

प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद


Dineshvs
Friday, September 08, 2006 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया,
गेल्या २५ / ३० वर्षात ईतक्या घडामोडी घडताहेत, कि कुणाचेच आयुष्य रुढ मार्गाने जाऊ शकत नाहिये. अगदी नेमके सांगायचे तर आपल्याकडे आणीबाणी नंतर फारच बदल होताहेत.
आमचा कॉलेजमधे एक ग्रुप होता. त्यावेळी आम्ही बघितलेली स्वप्ने, केलेले प्रयत्न आणि आता ज्या परिश्तितीत आम्ही आहोत, यात जमीन अस्मानाचे अंतर आहे.


Meggi
Friday, September 08, 2006 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, आजच तुझ BB वाचला.. छान लिहिलं आहेस.. मोबु ची गोष्ट तर मस्तच.. खुप हसले मी...
कॉपी क.Cट ची गोष्ट पण आवडली.. आम्च्य कडे पण एक असच couple आहे.. त्यांची आमचाशी आणि त्यांच्या शेजर्‍यांशी compitition असते.. अगदी अशिच.. म्हणजे त्यांच्या शेजारणीच्या pregancy नंतर ३ महिन्यनी स्वतः ची pregnancy declare करणे वगैरे... मस्त करमणुक करतात असे लोक..:-)


Megha16
Friday, September 08, 2006 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया,
काय छान लिहल आहेस तु. सगळेच लेख छान आहेत. कॉपी क.ट लेख वाचुन तर खुपच खुप हसायला आला. असे लोक असतात हे एकुन होत आता कळल पण.


Meggi
Saturday, September 09, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आवडत्या गोष्टी
१. थंड हवेची झुळुक आणि आणि तिच्या बरोबर येणारा रातराणीचा सुवास
२. आईच्या पदराला तोंड पुसताना होणारा तिच्या पदराचा मऊ स्पर्श
३. आपण यशश्वी झाल्यावर आईच्या डोळ्यातले आनंदाश्रु
४. इतरांसमोर नवर्‍याने केलेला support
५. ' मावशी.. गोष्ट !! ' म्हणुन माझ्या भाचीचं मला बिलगणं
६. झर्‍याचा खळखळ आवाज


अजुन बर्‍याच आहेत.... अजुन तुमच्य पण येउ द्या...

Manuswini
Saturday, December 30, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्या तुझी ती copy cat ची गोष्ट वाचली.
अगदी अगदी अशी लोकं असतात बघ.
खरे तर आपण मनमोकळे होवुन एखादी गोष्ट sharE करतो .. (तुझे ते पदडे) Example पण हे लोकांना complex असतो का jealousy कळत नाही.

माझ्या भावाचा एक मित्र आणी त्याची बायको.
ते अगदी असेच घरी येत नी प्रत्येक गोष्टीची चौकशी करत अगदी steel चा colander कीतीला आणला ikea मध्ये काय आणखी मिळते
TV ची rack सगळे सगळे matching

पण 'ही' मित्राची बायको इतकी jealous होती हे आम्हाला नंतर कळले. .. भाउ india ला गेला असताना घराची चावी दीली होती कारण बघीच्यातील फुलांना Watering करायला. तीला ही बाग खुप आवडयची आणे सेम तशीच फुले आणुन तीने तिच्या घरी प्रयत्न केला होता .. 'अनंत' हे झाड तिच्याकडे न्हवते, तेव्हा ह्या काळात तीने ते झाड चक्क पळवले नी भाऊ परत आल्यावर सांगीतले कशाने तरी झाड मेले आणी मेलेले झाड ठेवु नये म्हणून तीने फेकुन दीले. कुंडी कुठे गेली तर म्हणाली फुटली ती.
भावाला खरे वाटले(मुले सहसा खोलात शिरत नाहीत).
मला खुप विचित्र वाटले तीची ही गोष्ट एकुन. त्या नंतर तीने सहसा घरी येणे केले नाही की आम्हाला बोलवले नाही. दर Weekend ला न विचारता येणारे"ही" लोक बंद का झाली? ह्या विचारत असताना एकदा grocery store मध्ये दिसली केसात अंअन्ताचे फुल माळुन. बहिण म्हणाली मिळाला असेल ग तीला 'अनंत' खुप शोधत होती ना ती.. मी म्हटले अंनत हा तीला शोधुन मिळाला न्हवता मग आता कुठुन मिळाला सरळ जावुन हाक मारली नी विचारले नी आग्रहच केला की घरी जावुन मला तिचा हा अंनत बघायचा चेहरा इतका त्रासला नी बर्‍Yआपैकी घाबरलेला दिसत होता कुठे मिळाला हा 'अनंता'? .. काहीच उत्तर नाही... आम्ही बहिणी समजायचे ते समजलो.


Bee
Monday, January 08, 2007 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच अनुभव प्रिया. आधीचे घर विकले आणि आता NJ मधे! अभिनंदन!!!!!

NJ वासी झाली आहे तेंव्हा तिथले अनुभव पण येऊ देत. छान वाटतात वाचायला.


Zakki
Monday, January 08, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यनगरीकर, घर विकल्या जाण्याबद्दल अभिनंदन. आता NJ वासी होणार तर मराठी विश्व चे सभासद व्हा अशी आवर्जून विनंति. ३ फेब्रुवारीला 'झलक' नावाची शास्त्रीय संगीतावर आधारित नाट्यस्पर्धा आहे, तिला जरूर या. त्याची माहिती ' marathiwishwa.org ' वर मिळेल.
NJ त स्वागत! अणि अनेक शुभेच्छा!


Lopamudraa
Monday, January 08, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहिलय, काही वाचल काही राहिलय..!!!

Sayonara
Wednesday, January 10, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्य, welcome to NJ .
झक्की, ती साईट
www.marathivishwa.org अशी आहे.

Zakki
Wednesday, January 10, 2007 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सायोनरा. माझी चूक झाली!

Maitreyee
Wednesday, January 10, 2007 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! घर विकायचा अनुभव सही आहे.
आता Nj मधे कुठे गं?


Punyanagarikar
Monday, February 05, 2007 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी लोकहो, उत्तर द्यायला उशीर झाला. माझ्या मुलिला रोटावायरस च infection झाल्यामुळे तिला दोन दिवस hospitalize कराव लागलं होतं. आणि नवीन घर असल्यामुळे घर लागे लागे पर्यंत वेळ गेला. दोन्ही गोष्टिं मुळे फ़ार वेळ मिळाला नाही.

आज काल मला आजु बाजु चां शी जरा सांभाळून बोलावं लागत - नाही नाही म्हणता तुमच्या पैकीच एक कोणितरी असयच !


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators