|
Storvi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 10:04 pm: |
| 
|
मैत्रेयी अगदी बरोब्बर.. कित्ती जुळतात नाही आपली मतं? 
|
कृष्णावरचा लेख मस्तय रचना.
|
निषेध raza.com चा नाही , झी नेटवर्क चा इंडियन चॅनल वर पाकिस्तान झिन्दाबाद चे नारे दाखवल्या बद्दल . मागे झी वर एकदा पाकिस्तानी movie लागला असताना त्यातले पाकिस्तान झिंदाबाद चे नारे mute केले होते त्यांनी . खाली translation आल्यामुळे समजले .
|
Storvi
| |
| Thursday, August 17, 2006 - 5:23 pm: |
| 
|
दीजे नाही एकदा company ने national borders रोस्स केल्या की असे करता येत नाही. म्हणुन तर आमची company इस्राईल मधली असुन देखील अत्तच्या परिस्थिती बद्दल काहीही भाष्य करत नाही. आणि म्हणुनच CNN वगैरे बद्दल लोकांनी (अरुंधती रॉय) नी बोंबा मारल्या होत्या जेव्हा ते अमेरिकेचे झेंडे फ़डकवत reporting करत होते.... एकदा multinational झाली की company ceases to belong to one nation, and neither do it's loyalties.
|
Aaftaab
| |
| Friday, August 18, 2006 - 4:47 am: |
| 
|
कृष्णाबद्दल कुठेतरी वाचल्याच आठवतं की गोकुळातला नटखट कृष्ण वेगळा आणि महाभारतातला अर्जुनाचा सारथी, संस्कृतमध्ये गीता सांगणारा तो कृष्ण वेगळा.. खरे खोटे कृष्णच जाणे. पण आपण इतक्या मोठ्या, हरहुन्नरी, विद्वान, युद्धकुशल माणसाला लगेच देव करून टाकतो आणि स्वत्:ला धन्य मानतो झालं
|
Bee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 2:02 am: |
| 
|
रचना, आमच्याघरी मला नाही, पण माझ्या भाच्यांना प्राण्यांचे अति वेड आहे. मला वाटतं मुलींना प्राण्यांवर प्रेम करणे अगदी सहज जमते की काय. माझी भाची उठल्याउठल्या कुत्र्याचे पापे काय घेते, त्याच्या कुशीत काय शिरते. पण कुत्रे मोठी झालीत की त्यांची देखरेख करणे त्यांना स्वच्छ ठेवणे हे फ़ार कठिण काम होऊन बसते. घरी आयांना तर असेल धंदे नकोच असतात. कारण घरचीच कामे त्यांना पुरत नाही तर कुत्रे कुठे पाळतील आणि ठेवू देतील. आमचा कुत्रा मारवाड्यांच्या घरी खातो आणि रात्री आमच्याघरी झोपायला येतो. एकदा एक छोटे पिल्लू घरी आणल्या त्यावेळी त्याने घरी येणे बंदच केले. त्याने आपला राग प्रगट केला. आठ दिवस तो बाहेरून येरझारा घालत राहिला आणि मग भाचीने छोट्या पिल्लाला घराबाहेर काढून दिले आणि मग तो गेटवरून उडी मारुन टुनकन आत शिरला. तिला हे कळले, पण आम्हला कळून काय करावे उमगले नाही. मग पिल्लाचे काय करावे म्हणून शेजारीच ते रुळले. आम्ही मग घरून त्याला दुध भात पोळी ब्रेड इतके पाठवणे सुरू केले. पण घरात त्याला घेतले तर मोठ्या कुत्र्याचा मालकी हक्क हिसकावला गेला की काय असे त्याला वाटत असे. किती कळते ना प्राण्यांना आपलेआपले घर. आमचा हा मोठा कुत्रा कुठेही असला तरी रात्री १०ला आई बाहेरचे गेटची कडी खणखण हलवते की तो आवाजाने आई त्याला बोलावते आहे म्हणून धापा टाकत पळत येतो आणि गेट उघडेपर्यंत त्याचा इतका आकात चालतो की तिथल्यातिथेच तो लाळ टपकतो काय, जमिनिवर अंग घासतो काय. आई त्याला घरात घेते कारण चोराची तिला भिती वाटते. पण ती त्याला अंगाला हात लावत नाही आणि तो तिच्या अंगावर उडी मारते. माझी भाची तर आईसोबत तू खूप खाष्ट आहेस म्हणून सारखी ओरडत राहते. तसेच आमच्याघरी पोपट पण आहे. पोपट कितीही उघड्यावर ठेवला तरी हा कुत्रा त्याला त्रासही देत नाही. एकदा तर तो रात्रीचा उडून कुठेतरी गेला. आम्ही बॅटर्या घेऊन शोधले पण शेवटी आमच्या ह्या कुत्र्यानीच त्याला वासानी हुंगले आणि शोधून काढले. बिचारे हे प्राणी.. आता एक बकरी देखील आमच्या भाचीला मिळाली. कुठेकुठे ती शोधत बसते तिलाच माहिती.. मी तिचा तो फोटो इथे टाकणार आहे. तो अवश्य बघशील रचना..
|
Moodi
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:58 pm: |
| 
|
छान अनूभव लिहीलेस रचना. माझे पण असेच अनूभव आहेत. असेच एकदा एक पोपटाचे पिल्लु आम्हाला सापडले, त्याला जास्त उडता येत नव्हते म्हणून आम्ही पिंजरा आणला, त्यात त्याला ठेवले. रात्री डास चावायचे म्हणून वर एक छोटा चादरीचा तुकडा पण टाकायचो. एकदा त्याने पाय आपटुन स्वतःला जखम करुन घेतली, रक्त आले म्हणून आईने त्याला हळद लावुन चिंधी बांधली. तो पाय वर करुन सारखा चिंधीकडे बघायचा आणि आमच्याकडे बघायचा. मग बरा झाल्यावर त्याला बाहेर सोडले तर मग उडुन गेला. दुसरा आणला होता तो गाणी पण शिकला, माझे बाबा गाणी म्हणायला लागले की हा शीळ घालुन कैवल्याच्या चांदण्याला सुद्धा म्हणायचा. मला तर अजूनही मांजर, कुत्रे यांची छोटी पिल्ले फार आवडतात, पण सांभाळणे शक्य नाही होणार. एकदा शेजारच्या मांजरीने २ छान पिल्लांना आमच्याकडेच जन्म दिला, पण त्यातले एक पिल्लु बोक्याने मारले, तेव्हा मी खूप रडले. जाम टेंशन येते मला असले काही झाले की. म्हणून ते दूरुनच बरे असे वाटते. म्हणून मी आपली Animal planet, NGC च बघणे पसंत करते.
|
Upas
| |
| Wednesday, August 23, 2006 - 7:33 pm: |
| 
|
Awsome.. सहीच आहे ही कल्पना.. मी सुद्धा पहिल्यांदा इ मेल मध्ये अशी चित्र बघितली तेव्हा वेडाच झालो होतो.. बोटीवर शिडी किंवा रस्त्यावर चित्र रंगवणारा माणूस असं बरच काही होतं.. नेट वर पण अशी चित्र शोधून काही काळ मी मंत्रमुग्ध झालो होतो.. खरच हे खूप कठीण आहे हे नक्की.. पण तुला जमूही शकेल.. very best luck :-)
|
!!! !! !! !!
|
Kandapohe
| |
| Thursday, August 24, 2006 - 1:30 am: |
| 
|
रचना, तुझे चित्र बघितले आणि सेम असेच चित्र एका मित्राने काढले होते त्याची आठवण झाली. इथे जाउन बघ. तुला रेफरंस करता बघता येईल. 
|
Dineshvs
| |
| Thursday, August 24, 2006 - 3:30 am: |
| 
|
रचना, सुंदर प्रयत्न. मी पण ती चित्रे बघितली होती. ईथे गोव्यात कला अकादमीमधे भिंतीवर अशीच निसर्गचित्रे चितारली आहेत. शिवाय मुख्य नाटकगृहात, मारियो मिरांडाच्या कार्टुन्सची लाईफ़साईज कटाऊट्स आहेत. ती पण खुप जिवंत वाटतात.
|
Giriraj
| |
| Thursday, August 24, 2006 - 6:12 am: |
| 
|
रचना,छानच!एक नवीन विषय माहित करून दिल्याबद्दल धन्यवाद! अशी काही चित्रे पाहिली होती मात्र याचा इतिहास माहीत नव्हता!या Trompe L'oiele चा उच्चार कसा करतात?
|
Bee
| |
| Thursday, August 24, 2006 - 7:55 am: |
| 
|
रचने.. काहीतरी नविन ह्यावेळी..
|
Thankyou सगळ्यांना... गिरी, it sounds something like trum-plou.
|
Prajaktad
| |
| Thursday, August 24, 2006 - 2:44 pm: |
| 
|
रचना!चित्र अप्रतिम चित्र आहेत हि!तुझा प्रयत्न हि चांगला आहे.मला हि तु उल्लेख केलेली ई- मेल आलि होती. पेटि उघडुन बघत होते पण काही सापडलि नाही जरा नेटाने शोधते मिळालि तर पाठवते तुला...
|
Moodi
| |
| Thursday, August 24, 2006 - 8:32 pm: |
| 
|
रचना छानच जमलयं की गं. तो सुपरमॅन तर फार सुरेख आलाय. आता जेव्हा परत प्रयत्न करशील तेव्हा त्यालाच अशा फ्रेममधून झेपावतांना दाखव. हुबेहुब काढलायस तो. 
|
thankyou हो ग प्राजक्ता मी पण कधीतरी ती डिलीट केली. even कोणी काढली होती त्याच नाव देखिल मी शोधून काढल होत. सापडेल सापडेल .... मुडी गुड idea .. ... ...
|
Seema_
| |
| Friday, August 25, 2006 - 8:04 pm: |
| 
|
मस्तच झालय हे paintings ! तु oil paint पातळ करण्यासाठी medium म्हणुन काय वापरतेस ग?लिन्सीड oil का?
|
thanks seema हो ग लिन्सीड oil आणि Safflower Oil पण.. Safflower Oil ने पिवलसर छटा कमी येते
|
Arch
| |
| Friday, August 25, 2006 - 8:36 pm: |
| 
|
मस्त ग रचना. मीपण घेईन विकत. एकदम cute आहे. तू आता एक प्रदर्शनच भरवून टाक.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|