Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 23, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » punyanagarikar » Feedback » Archive through August 23, 2006 « Previous Next »

Mrinmayee
Saturday, August 19, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, तुझं श्वान पुराण मला खूप खूप आवडलं. माझी स्थिती पाळीव प्राण्यांच्या बाबतीत फारच दयनीय आहे:-). अगदी कुत्र्याच्या पिल्लाचीपण मला भिती (?) वाटते. नवर्‍याला अन मुलाला खूप हवंय असं पिल्लु. तुझा लेख वाचून मला माझा विरोध असा कमी झाल्यासारखा का वाटतोय? :-)

Shonoo
Saturday, August 19, 2006 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया

मी सोळा वर्षांपूर्वी मुम्बईमधली चांगली नोकरी सोडून MS करण्यासाठी अमेरिकेत आले. ओळखीचं कोणी नाही, इतर भारतीय विद्यार्थी माझ्यापेक्षा बरेच लहान, शिवाय भारतात असताना पासून एकमेकांना ओळखणारे. त्या काळाची आठवण झाली. apartment मधून South East दिशेने बघितलं की बेन्जामिन फ़्रॅन्कलिन ब्रिज दिसत असे. आज इतकी वर्षं झाली तरी तो ब्रिज दिसला की घरची आठवण दाटून येते.

शिकतानाच्या आठवणी जाग्या झाल्या तुझा लेख वाचून!


Dineshvs
Sunday, August 20, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, मला मिकि चा लेख खुपच आवडला. आम्हाला शाळेत काळुराम नावाचा एक धडा होता, त्याची आठवण झाली.
मलाहि स्वतःला कुत्रे आवडतात, लहानपणी भरपुर पाळले होते. त्यातला एक मला चावला होता, तरिहि मी कुत्रे पाळणे सोडले नव्हते. आता मात्र ते शक्य होत नाही.


Punyanagarikar
Monday, August 21, 2006 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयंत, खरं सांगू का ? आम्ही एवढा विचारच केला नव्हता. एव्हढा प्रवास drive करून कराय्चा म्हणजे खरच daring बाज काम होतं. पण त्या वेळी तसं आम्हाला मुळिच वाटलं नाही. उलट गाडि बंद पडणे वगरे सारखे काही exciting झाले असते तर आजुन मजा आली असती. वयाचा दोष हो, आता जबाबदारी पडल्यावर असलं काही करणं आम्ही सोडुन दिलं आहे :-)

मृ, धन्यवाद. अग तुझ्या सारखिच माझ्या नवर्‍याची स्तिती होती. ती भिती नसते, its a lack of socialization with dogs . लहान पणी तू कुत्र्यांशी फ़ार contact मध्ये नसशील. असो. कुत्रा पाळायचा तर अगदी जरूर पाळ. पण मुलाला हवा म्हणुन नको. कुत्र्याचं खुप काम पडतं आणि ते मुलं इछा असून सुद्धा करायला कमी पडतात. especially puppies च्या बाबतित. तुम्हाला सगळ्यांना घ्याय्चा असेल, तरच कुत्रा घ्या, आणि always adopt from a rescue organization . तुला ह्या बाबतित काहिहि मदत हवी असेल, तर मला अगदी नक्की सांग :-)

मेधा, मला वाटतं ( आणि हे आता वाटतं, तेव्हा एव्हढा समज नव्हता ) की घरा बहेर पडलो कीच आपली खरी ओळख होते आपल्याला. मला इतका त्रास झाला तरिही मी हेच म्हणिन की सर्वांनी काही काळ तरी वेगळ, आणि जमल्यास एकट रहावं. स्वतः ची नव्याने ओळख होते. its like a rite of passage .
तुम्ही सोळा वर्षां पूर्वी हे सगळं केलं हे खरच creditable आहे हो. तुमचा पण अनुभव हाच आहे का ? की तुम्ही त्या stay मुळे बदललात ? ( म्हणजे for the better )

दिनेश, माझी आई त्याला काळुरामच म्हणते. :-) का बर आता कुत्रे पाळणं शक्य होत नाही ? busy असता असं म्हणू नका, तुम्ही इतकं वाचन करता, इतक्या गोष्टींची माहिती आहे तुम्हाला, एखाद कुत्रा adopt करायला काहीच त्रास नाही. puppy stage मध्ये खुप महिनत लागते, adult कुत्र्याच्या wants and needs खरच खुप कमी असतात. बघा पुन्हा विचार करून :-)

प्रतिक्रियां बद्दल मना पासून धन्यवाद. पुढचा लेख येइलच थोडे दिवसात.


Dineshvs
Monday, August 21, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, कुत्रे नको तेवढा जीव लावतात. जो मला चावला होता, त्याने घरापासुन दुर जाऊन, रेल्वेखाली आत्महत्या केली. ( मी असेच समजतो, कारण मला चावला, म्हणुन सगळेच त्याचा रागराग करु लागले होते. )
पुढे माझा एक आणि माझ्या भावाचा एक असे दोन कुत्रे घरात आले. माझ्या भावाच्या कुत्र्याला मी जवळ करत नसे, त्यानेहि माझ्याच पायाशी येऊन मरण पत्करले.
अश्या मुक प्रेमाला प्रतिसाद, देणे अवघड वाटतेय आता.


Rachana_barve
Monday, August 21, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त ग पुण्य.. मला पण जाम आवडतात कुत्री. लहानपणी मी दिसेल ते बेवारशी कुत्रे घरी आणायचा सपाटा लावलेला होता. असो, मस्तच लिहिते आहेस

Bee
Tuesday, August 22, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय, तुझ्या मिकिचा परिचय, इथली प्रतिक्रिया, त्यांचे उत्तरे सगळेच वाचून बरे वाटले. असे अनुभव संग्रही करुन ठेवायचे. जसे आपण जुने छायाचित्र जपूण ठेवतो आणि त्यांना बघून बर वाटत तसच जुने आपले लेख वाचताना मजा येते.. तेन्व्हा खरच ह्या सर्व गोष्टी विस्मरणात नको जाऊ देउस.

शोनू, तुझे अनुभव वाचायला आवडतील.. खरच लिहतेस का?


Gs1
Tuesday, August 22, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रिया मिकीवरचा (आणि रचना तुझा पण) छान लेख आहे. माझ्याही कितीतरी आठवणी जाग्या झाल्या तुमचे लेख वाचून.


Lalitas
Wednesday, August 23, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, आम्ही १५ एप्रिल २००६ पासुन आम्ही goldan retriever आणला आहे. तू जे लिहिलं आहेस तसंच आम्ही अनुभवतो आहोत. त्याला आम्ही breeding house मधून विकत घेतला. तिथे त्याचं नाव Quando ठेवलं होतं. स्वीसमधे प्रत्येक कुत्र्याच्या कानांत चीप इन्जेक्ट करतात. चीपमध्ये त्याच्या मालकासकट त्याची सर्व माहिती असते, त्यामुळे स्वीसमधे प्रत्येक कुत्र्याची सरकारकडे यादी असते. चीपमुळे त्याचं नाव आम्हाला बदलणं शक्य नव्हतं. मला स्वत:ला कुत्री तितकीशी आवडत नाहीत, पण नवर्‍याला अतिशय वेड, त्याने रिटायर झाल्यावर लगेच क्वांडोला घरी आणला.

क्वांडोची लव सोनेरी आहे व डोळे काजळ घातल्यासारखे काळेभोर आहेत. आणला तेव्हा १२ आठवड्याचा होता, वजन ९ किलो होतं. त्याची वाढ फार वेगाने होते आहे... आता ७ महिन्यांचा झाला आहे आणि वजन २५ किलो! पूर्ण वाढ झाल्यावर त्याचं वजन म्हणे ३५ ते ४० किलोपर्यंत जाईल असं कळलं! (रेफ: त्याचा डॉक्टर!)

पहिले दोन महिने मी खरंच फार टेन्स होते, आता त्यानेच लळा लावला आहे. त्याची शाळा असते, तिथे कुत्र्यांना शिस्त कशी लावायची याचं शिक्षण देतात. प्रायमरी पास झाला... ऑगस्टमध्ये हायस्कूलमध्ये गेला आहे. शाळेचा खूपच फायद होतोय आम्हाला! त्याचं सोशलायझेशन होतं.... शाळेत इतर कुत्र्यांशी संपर्क आल्यामुळे फिरायला गेल्यावर जर दुसरे कुत्रे भेटले तर इतका छान खेळतो की त्या कुत्र्यांच्या मालकांना क्वांडो खूपच आवडतो. शाळेतले कमांडस विशेषत: रस्त्यावरुन चालतांना, घरी पाहुणे आले असताना, खाण्याच्या सवयी लावताना फार उपयोगी पडतात. शाळेमुळे वळण लावणं सोपं जातं.

सध्या आमची दिनचर्या क्वांडोच्या भोवती व क्वांडो आमच्याभोवती! त्याचं खाणं, शी-शूसाठी बाहेर घेऊन जाणं, फिरायला नेणं, त्याच्याशी खेळणं.... यांत दिवस कसे निघून जाताहेत कळत नाही! माझ्या नवर्‍याला निवृती नंतरचे डिप्रेशन येणं तर दूरच.... क्वांडोमुळे स्वत:बद्दल विचार करायला फुरसत नसते!

आता पुरे! नाहीतर पु. लंच्या कुत्र्यांच्या मालकांच्या यादीत मी जाऊन बसेन!


Bee
Wednesday, August 23, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सांगतेस ताई हे, खरच की काय कुत्र्यांची शाळाबिळा असते. thats really awesome!!!! केवढ्या सोयी केल्यात काही देशांनी.. फ़िया पण असतात का ह्या शाळेसाठी? किती दिवस शाळेत जाव लागत? काय काय शिकवतात? परिक्षा कशी घेतात? तू डबा देतेस का त्याला? सगळं काही लिहू शकशील तर फ़ारच उत्तम..

Lalitas
Wednesday, August 23, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अरे शाळाच काय पण आमच्या गावांत Cynology Association आहे. या संस्थांमधुन कुत्र्यांवर प्रशिक्षण घेतलेली माणसं काम करीत असतात. हे शिक्षक अगदी नावापुरती फी आकारून कुत्र्यांची शाळा चालवतात. इथल्या शिक्षकांचा पोटाचा व्यवसाय दुसरा असतो, हे काम ते विना मोबदला करतात. फी संस्था चालवायला व कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी जी साधने लागतील त्यावर खर्च होते. या संस्थेचं खूप मोठं आवार आहे. तर्‍हेतर्‍हेचे खेळ आहेत. आवार नदीच्या काठावर असल्याने कुत्र्यांना पाण्यांतही सोडतात. सगळे कुत्रे मस्त मजेत एकेमेकांसोबत पोहतात.

कुत्र्याचं पिल्लू असतांनाच त्याला शिक्षण देणे, वळण लावणें हे लोक जरुरीचं समजतात. त्याचा फायदा होतो हे आम्ही अनुभवतो आहोत. कुत्र्याने मालकाच्या सांगण्याकडे एकाग्रतेने लक्ष देणे ही पहिली महत्वाची पायरी आहे, पण ते शिकवणे कौशल्याचे शिवाय अत्यंत जिकिरीचे आहे. शाळा आठवड्यांतून एकदाच असते. कुत्र्याचा मालक बरोबर जातो. दोन तास प्रशिक्षण असते. कुत्र्यांची बुध्दी काही आपल्यासारखी नसते हे लक्षांत घेऊन मालकाने कुत्र्याकडून शाळेत शिकवलेले पुढे करून घ्यायचे असते.... गृहपाठच म्हण! कुत्र्याकडून गृहपाठ करुन घ्यायला संयम आणि चिकाटी दोन्हीची अत्यंत जरुरी आहे. थोडक्यांत कुत्र्याबरोबर मालकाचंही शिक्षण! डबा देत नाही पण बरोबर कुत्र्यांची बिस्किटं न्यायची असतात. कुत्र्याने शिकवलेले नीट केले की त्याला एक बिस्किट देऊन प्रोत्साहन द्यायचे असते. तसंच गृहपाठ करतांना बिस्किटाची बक्षिसी दिली की कुत्रा ते लक्षांत ठेवतो.

दुसरी महत्वाची गोष्ट... कुत्र्याने कुठेही केलेली शी अगदी जंगलांतसुध्दा उचलायची सक्ती आहे. ठिकठिकाणी रॉबी डॉग नावाच्या हिरव्या पेट्या उभारलेल्या असतात. त्यांत काळ्या रंगाच्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या ठेऊन दिलेल्या असतात. त्या हाताला लावून शी उचलून त्याच डब्यांतील मोठ्या पिशवीत टाकून द्यायची असते. या पिशव्या व्यवस्थित मोठ्या असतात. आपले हात एकदम सुरक्षित राहातात. शेतांतदेखिल कुत्र्याने शी केली तर ती उचलावी असा तिथे फलक लावलेला असतो. कुत्री पाळणारे इमाने इतबारे हा नियम पाळतात!


Bee
Wednesday, August 23, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, ही प्रतिक्रिया तुझ्याच पानावर पुढे घे.. कारण खूप सुंदर आणि सलग माहिती होईल ती. एक suggestion ..

Punyanagarikar
Wednesday, August 23, 2006 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता ताई, अगदी बरोबर, तुम्ही जे लिहिलं आहे, तसेच नियम आम्हाला सुद्धा आहेत. दुसरा एक नियम म्हणजे इथे कुत्र्यांना ( जे pound मधुन नाहीतर rescue मधून आणले आहेत ) spay/neuter करणे जरूरीचे समजतात. आणि इथे सुद्धा हे सगळे volunteers काम करतात. मी त्यांची जिद्दं आणि चिकाटि खूप appreciate करते. आम्ही ही मिकी ला microchip करायचा विचार करतो आहे. पण इथे microchip वर फ़क्तं त्याचा ID number , डॉक्टरांचं नाव आणि मालकाचं नाव असतं. आणि ID ची लिंक national database मध्ये असते. ह्या पैकी कुठलीही माहिती डॉक्टरांच्या दवाखान्यत बदलता येते.
तुमचं पोस्ट वाचुन मिकी च्या puppy days ची आठवण झाली :-) फ़ार पटकन मोठी होतात हो ही पिल्लं. enjoy every minute with them . नंतर इतकी समंजस होतात न, की आपल्यालाच वाटतं ह्यांनी थोडि मस्ती करावी !

बी, अरे कुत्र्याची शळा, ही खरी कुत्र्याच्या मालकासाठी असते. खरी महिनत मालकानीच करायची असते. आमचा सगळ्यात पहिला धडा होता की dogs don't obey you because they love you, dogs obey you because they respect you . हे वाक्य रोज एकदा म्हणायचं असा गृहपाठ ही होता :-)

दिनेशदा, तुमच्या दोन्ही कुत्र्यांचे अनुभव वाचून अतिशय वाइट वाटले. मी जे पाहते आहे, त्यावरून अस वाटतं की इथे कुत्रे पाळण्याची कारणं भरतात बघितली त्या पेक्षा वेगळी असतात. थंडी मुळे कुत्र्याला घराबाहेर ठेवणं शक्य नसतं. तेव्हा बहुतेक कुत्रे हे indoor dogs असतात. पुन्हा spay/neuter केल्यानी आणि ट्रेन केल्यानी बहुतेक socialiation केलेल्या कुत्र्यांची चावायची शक्यता कमी असते. अर्थात कोणतिच guarantee नसते.
ह्या एव्हढ्या सोई आहेत, म्हणुनच कुत्रा पाळायचं धाडस केलं. मी भारतात असते तर इछा असून सुद्धा कदाचित कुत्रा पाळू शकले नसते.


Dineshvs
Wednesday, August 23, 2006 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, आमच्या घरी आईला सोबत म्हणुन कुत्रे पाळले होते.
आजकाल भारतात मनेकाबाईंच्या कृपेमुळे ईतके कुत्रे झालेत कि माणसाना धोका निर्माण झालाय.
माझे एक मजेदार निरिक्षण. कुत्रा बसताना सहसा गोल फेरी मारुन, शेपटी हलवतच बसतो. पुर्वी तो जंगली प्राणी असताना, पालापाचोळा नीट तुडवुन बसायची सवय अजुन गेली नाही, म्हणायची.
पण आता हा प्राणी, ईतका मानवी सोबतीला सरावलाय, कि तो स्वतंत्रपणे जगुच शकत नाही.
बटाटे, गहु हि पिके पण मानवी हस्तक्षेपाशिवाय जगु, वाढुच शकत नाहीत.तसेच झालेय.


Ldhule
Wednesday, August 23, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, तुझे सगळेच लेख छान असतात. copy cat तर टु गूड.

ती तुझी मैत्रीण तुला आदर्श मानते याचा अभिमान वाटला पाहिजे तुला...
तिला मायबोली विषयी सांगितलस नाही ना..... ? जरा जपुन.
:-)

Maitreyee
Wednesday, August 23, 2006 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटलं कुत्रा झाला आता मांजराबद्दल लिहिलयस की काय:-O
मस्त ग! सिमिलर अनुभव मला भारतात आलाय, त्याची आठवण झाली:-)


Moodi
Wednesday, August 23, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया खरच कौतुक वाटतयं, दोन बाळे सांभाळलीस. पाळिव प्राण्यांचे प्रेम कमी होता होत नाही.
आणि ह्या आत्ताच्या लेखाबद्दल मला असे वाटतयं की त्या जोडप्याला तुम्ही आदर्शच वाटले असाल. परदेशात आल्यावरच काय भारतात सुद्धा असे दुसर्‍याच्या रहाणीमानाची कॉपी करणारे खूप आहेत. कारण तुमच्या घरातील सजावट, डौल यांनी ते आकर्षित झाले असतील. घरातुन कधी जास्त बाहेर न पडलेली ती, तुझ्या व्यक्तीमत्वाने भारुन गेली असणार.


Shreeya
Wednesday, August 23, 2006 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, आजच तुझे पान वाचले. छान लिहिले आहेस. मिकिवरचा लेख तर खूप आवडला. मला माझ्या माहेरच्या कुत्र्याची आठवण आली आज १०-१२ वर्षांनी तर तो एकदम घरचा मेम्बर होऊन गेला आहे. आणि माझ्या नवर्‍याचाही तो खूप लाडका आहे.
लिहित रहा.
copy cat तर काय सगळीकडेच असतात. अन जर नातेवाईकांपैकीच एखादे असेल तर खरेच खूप विचित्र वाटते. एखाद्याचे काही आवडले तर सांगणे वेगळे,पण सर्वच बाबतीत बरोबरी करणे म्हणजे कधी कधी शुद्ध वेडेपणा वाटतो. त्रास वगैरे काही होत नाही पण अवघडलेपण वाटते अश्या लोकांशी वागतांना! अन सर्वात महत्वाचे म्हणजे हसुही येते की जगात इतके सुंदर आदर्श असतांना हे लोक इतक्या छोट्या गोष्टींचेही आदर्श कसे काय मानु शकतात?


Storvi
Wednesday, August 23, 2006 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

copy cats असतात पण हे जरा अतीच होतंय बरंका. जपूनच रहा...

Bee
Thursday, August 24, 2006 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच प्रिया मलाही शिल्पासारखेच वाटते आहे. हे जरा अतिच होते आहे. जरा जपूण. इतके लक्षात येईल असे अनुकरण करणे चांगले नाही.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators