|
Moodi
| |
| Thursday, July 20, 2006 - 8:47 pm: |
| 
|
वा प्रिया नवीन घरात आज प्रवेश केलास त्याबद्दल अभिनंदन. आता लिहीत जा जमेल तेव्हा.  
|
Chinnu
| |
| Thursday, July 20, 2006 - 10:51 pm: |
| 
|
अभिनंदन पुण्य! आता येउ द्या!!
|
अरे वा, तुम्ही आलात त्या बद्दल धन्यवाद. ह्या वीकेंड ला लिहायचा प्रयत्न करते
|
Karadkar
| |
| Thursday, July 27, 2006 - 5:43 am: |
| 
|
punya, good luck girl..... देव मागच्यावेळी पाठीशी होता तसा यावेळीहि असेल...
|
Bee
| |
| Thursday, July 27, 2006 - 10:03 am: |
| 
|
प्रिया, छानचं लिहिला अनुभव आणि स्माईली टाकत लिहिलास म्हणजे बहादूर दिसतेस. ह्यावेळी आमच्या शुभेच्छा आहेत तुझ्या पाठिशी तेंव्हा सुखरुप प्रवास होईल. तरीही काळजी घे..
|
Moodi
| |
| Thursday, July 27, 2006 - 10:14 am: |
| 
|
पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. खरच हौसेने अन प्रेमाने जमवलेल्या वस्तू पण टाकणे जीवावर येते. आता मागच्या अनुभवाने पुढे काळजी घ्यालच. 
|
thanks , शुभेछां बद्दल धन्यवाद
|
Moodi
| |
| Friday, August 18, 2006 - 4:51 pm: |
| 
|
तू तुझ्यासाठी लिहीलस तरी मी वाचले की ते. आवडले मला ते, जरी माझे शिक्षण यातले नाही, अनूभव नाहीत, आधी कुठे परदेशात यायची वेळ आली नाही तरी खूप आवडल. का तर तू अनूभवातुन आणि अथक परीश्रमातुन हे शिकलीस याचेच कौतुक वाटतेय, आणि सगळे मोकळेपणाने लिहीणे हे ही तितकेच कौतुकास्पद आहे. असे म्हणतात की प्रत्यक्ष गुरु आणि शिक्षकांपेक्षा आई आणि जगात आलेले बर वाईट अनूभव हेच आपले गुरु असतात. तुला ते मिळाले याचाही आनंद आहे. घरापासुन दूर गेल्यावरच घर म्हणजे काय हे ही कळते आणि मग तावुन सुलाखुन मन परीपक्व बनते. 
|
Lalu
| |
| Friday, August 18, 2006 - 5:04 pm: |
| 
|
>>तुमच्या patience ची धन्य आहे आमच्या कसल्या, तुझ्याच patience ची धन्य आहे. छान लिहिलंयस. कन्या आणि श्वान पुत्राबद्दल पण लिही वेळ काढून.
|
Asami
| |
| Friday, August 18, 2006 - 5:08 pm: |
| 
|
विस्कळित असले तरी एकदम प्रांजळ असल्यामूळे चटकन भावते.
|
खरय, बर्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लिही अजून
|
Seema_
| |
| Friday, August 18, 2006 - 5:59 pm: |
| 
|
प्रिया चांगल लिहिलयस ना. अस का patience वगैरे!! शिकताना येणारे अनुभव खरच खुपच वेगळे असतात.मी देती आहे ना सद्ध्या एकेका आघाडीला तोंड.
|
Farend
| |
| Friday, August 18, 2006 - 8:50 pm: |
| 
|
प्रिया, लेखन आवडले. आमचा पेशन्स पाहावयाचा असेल तर अजून लिही इथे कंपन्यांना जसे 'लग्न झाले आहे की नाही' यावरून नोकरीप्रमोशन नाकारता येत नाही, तसे नियम रिसर्च साठी असते तर बरे झाले असते! आणि ते मूव्हिंग कसे झाले त्याची उत्सुकता अजून आहे, हे मला मधले १-२ एपिसोड गाळून पुढचे बघितल्यासरखे वाटले
|
प्रिया, खूप छान लिहीलंय! शेवटी सगळे दिवस सारखे नसतात हे खरं. अजून बरंच राहीलय इथे टाकायचं असं वाटतंय. कधी लिहीणार?
|
छान लिहिलंयस पुण्य.. आमचा patience असा टेस्ट करणार असशील तर तुला अजून खूप लिहावे लागेल
|
खरच, तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया वाचुन खुप बर वाटलं. गेल्या काही दिवसात मला अस जाणवत होतं की आपण त्यावेळी खाललेल्या खास्ता सुखवस्तू जीवनात विसरत चाललो आहे. ते धडे विस्मरणात जाऊ नये, म्हणुन तो लेख लिहिला. आजुन बरच लिहायचं आहे. रोज नियमीत पणे लिहायचा प्रयत्न करते. वाचत रहा.
|
Dineshvs
| |
| Saturday, August 19, 2006 - 1:26 am: |
| 
|
प्रिया, खुप छान लिहिले आहे. खरे तर सगळे हे अनुभव विसरायचा प्रयत्न करतात. किंवा ईतराना सांगायचे टाळतात. पण हे लिहुन काढले ते चांगले झाले, आता त्या आठवणीतला कटुपणा राहणार नाही. पण मला वाटते यापेक्षाहि जास्त वाईट आणि अर्थातच चांगलेहि अनुभव आले असतीलच ना. आता ते आमच्यासाठी लिहायचे.
|
दिनेशदा अस विसरून कसं चालेल ? हेच अनुभव तर आपल्याला शिकवून जातात. मीही इतके दिवस ते सांगायचे टाळत होते, पण ते बोलुन टाकले म्हणजे मन हलकं होतं. म्हणुन इथे लिहिले. अरे moving बद्दल कोणि विचारलं होतं ? आजुन नाही move झालो आम्ही. तयारीच चालू आहे आजुन
|
Dineshvs
| |
| Saturday, August 19, 2006 - 5:01 am: |
| 
|
विसरायचे नाहीच, फ़क्त कटुता ठेवायची नाही, प्रिया. आजचे यश हे त्याच पायावर उभे असते ना ?
|
Jayvijay
| |
| Saturday, August 19, 2006 - 5:48 am: |
| 
|
Punyanagarikar तुम्ही तो ३००० किमीचा प्रवास फक्त दोघांनीच केला व तुमच्या यजमानांनी एकट्याने ड्रायव्हिंग केले ही खरोखरच अफलातून गोष्ट आहे. असे ठरवायला आणि ठरवुन करायला गट्स लागतात. अभिनंदन. अर्थात पुढच्या वेळेस अधिक काळजी घ्या. या प्रवासात तुम्हाला गाडी बंद पडणे किंवा चोराचिलटांची, वाटमारीसारख्या प्रकारांची भिती नाही का वाटली?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|