|
बी, सुंदर लिहील आहेस रे! खरंच लहान भावंड अशीच असतात. मग असल्या त्यांच्या अनुभवांनंतर आई-ताई ला थोडीशी काळजी वाटते पण खात्री असते मुला-भावा बद्दल, सगळं सुरळीत होईल ह्याची, हो ना?
|
Dineshvs
| |
| Monday, July 31, 2006 - 4:50 pm: |
| 
|
बी, तुझी घराची ओढ आम्हा सगळ्याना चांगलीच माहीत आहे. लिहित रहा.
|
Lalu
| |
| Tuesday, August 01, 2006 - 1:33 am: |
| 
|
पोळं बांधलं वाटतं. Queen Bee कधी येणार? तू गद्य पण एवढं चांगलं लिहितोस हे माहित नव्हतं.
|
Gs1
| |
| Tuesday, August 01, 2006 - 7:04 am: |
| 
|
बी, छान लिहिलं आहेस, रैनाने वर म्हटले आहे तसे एकदम प्रामाणिक वाटले कथन.
|
Bee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 7:39 am: |
| 
|
हा लेख मी पाच मिनिटात लिहून संपविला तेंव्हा ह्याला कुणी वाचेल की नाही ह्यात शंका होती. लिहिताना मनात इतके काही साचून आले होते की पुढची ओळ विचार न करताच सुचत गेली. आता इतक्या प्रतिक्रिया वाचून असे वाटते आहे.. मी अजून टायपायचे असते :-) आता आणखी पुढे लिहीन वेगळ काहीतरी. तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल अगदी मनापासून मी आभारी आहे. खूप खूप बरं वाटल मला..
|
>>>> पाच मिनिटात लिहून संपविला तेंव्हा ह्याला कुणी वाचेल की नाही ह्यात शंका होती. अगदी अगदी, अस्सच होत बघ माझ प्रत्येक पोस्ट वेळेस! बोट कीबोर्डला टेकवली रे टेकवली की भरारा खटखटत टायपायला होत! अन मग कोण वाचेल नाय वाचेल की अनुल्लेखेल, काय की! मी तो विचार करीत नाही! मी प्रॅक्टिस करत असतो! विचार उत्पन्न करण्याची, विचारान्च्या सुसुत्रतेची, टायपिन्गची.... वगैरे वगैरे! नियमित लिहित जा! कोण वाचेल की नाही याची काळजी तू नाही करायची! 
|
>>>> तू गद्य पण एवढं चांगलं लिहितोस हे माहित नव्हतं. म्हन्जे??? बी च पद्य कुठ हे? की बीच्या किचनमधल्या उपद्व्यापान्ना तु पद्य सम्बोधतेस? DDD
|
Prajaktad
| |
| Tuesday, August 01, 2006 - 11:03 am: |
| 
|
बी चांगल लिहतोस! लिही अजुन
|
Maitreyee
| |
| Tuesday, August 01, 2006 - 11:16 am: |
| 
|
छान लिहिलय. एकदम मनमोकळे. पण ' आता एकटेच अयुष्य काढायचय' असा निराशावादी सूर का! Bee +ve
|
Seema_
| |
| Tuesday, August 01, 2006 - 3:25 pm: |
| 
|
बी छानच रे . आवडल एकदम . लिहित रहा . नव्या घरासाठी शुभेच्छा
|
Shreeya
| |
| Wednesday, August 02, 2006 - 2:05 am: |
| 
|
बी, मस्तच लिहिले आहेस रे! लिहित रहा...
|
Ldhule
| |
| Wednesday, August 09, 2006 - 12:16 am: |
| 
|
बी, छान लिहिलयस. सध्या खुप मज्जा असेल ना सिंगापुरात. नाटक काय, रक्षाबंधन काय. गणपतीची तयारी पण जोरात सुरु असेल. प्रशांत दामलेंचा कार्यक्रम आहे अस ऐकलय.
|
Bee
| |
| Tuesday, August 15, 2006 - 7:20 am: |
| 
|
धुळे तुम्ही आहात कुठे मग? इथे नाहीत का? मागेच तुमचा एक मेसेज वाचून तुम्ही इथे नाहीत असे वाटले होते मला.. आता परत. सध्या इथे बरेच कार्यक्रम चालले आहेत. आत्ताच एक स्थानिक कलाकारांचे नाटक झाले. आता २६ला एक नाटक आहे पुणे-मुम्बई नावाचे. सुधीर गाडगीळ आणि प्रशांत दामले सादर करणार आहे. नंतर पाच दिवसांचा गणपती. मुलांचे सांकृतीक कार्यक्रम. शेवटच्या दिवशीचे जिलबीचे जेवन.
|
Ldhule
| |
| Tuesday, August 15, 2006 - 2:05 pm: |
| 
|
बी, सध्या मुक्काम न्यु जर्सी. वर्ष होत आल सिंगापूर सोडून. पण आठवणी काय सुटत नाहीत.
|
Sayonara
| |
| Tuesday, August 15, 2006 - 2:13 pm: |
| 
|
बी, किती सुंदर लिहिलं आहेस रे. तरीही सिंगापूर मध्ये 'homesickness' जरा कमी जाणवत असावा बाकीच्या देशांपेक्षा. नाही कां? माझ्या मैत्रिणीच्या कॉम्प्लेक्स मध्ये १५० इंडियन फॅमिलीज होत्या. वाटायचंच नाही भारताबाहेर आहोत म्हणून.
|
Lalitas
| |
| Tuesday, August 15, 2006 - 2:29 pm: |
| 
|
बी, छान लिहिलं आहेस... होमसिकनेसमधून आपण सगळेच जातो जेव्हा घर व देश सोडतो. आम्ही तर आधी आधी कुठलाही भारतीय माणूस बघितला की बोलायला धावत असू. त्यात मराठी बोलणारा? अगदी दुर्मिळ.... त्यावेळी मराठी स्वीसमध्ये खूप कमी होते, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच. सुधीर गाडगीळ व प्रशांत दामलेच्या नाटकाचा वृतांत लगेच लिहू शकशील? ते दोघेही स्वीसला २ सप्टेंबरला कार्यक्रम करणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचे शिर्षक आहे 'मैफल शब्द सुरांची'. मला उत्सुकता आहे तुझ्या अभिप्रायाची.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 15, 2006 - 5:03 pm: |
| 
|
बी, छान लिहिलेस. का कुणास ठाऊक, मला कधी फारसे होमसिक वाटले नाही. कुठल्याहि मातीत पटकन रुजतो मी.
|
Lalitas
| |
| Tuesday, August 15, 2006 - 7:08 pm: |
| 
|
दिनेश, मी अजुनही होमसिक होते. विशेषत: सणांच्या दिवसांत, कधी जुनं गाणं ऐकताना भारतातील त्या काळातील आठवणी मनात जाग्या झाल्यावर... आपला समाज, माणसं, संस्कृती इतकंच काय निसर्ग, ऋतु, समुद्र, शाळा-कॉलेजमधले रंगीबेरंगी दिवस, उन्हाळ्याच्या सुटीत केलेली धमाल, पहिला पाऊस, बघितलेले नाटक-सिनेमे.... आणखी किती सांगू? हम तो 'न घर के न घाट के'!
|
Kandapohe
| |
| Wednesday, August 16, 2006 - 1:29 am: |
| 
|
बी, छान लिहीले आहेस. मला तर अनेक वेळा देशातल्या घरी पाउल ठेवले की जाणवते आपण कीती होमसिक झालो होतो हे. इथे घरी गेल्यावर आणि देशात घरी गेल्यावर लगेच फरक जाणवतो. जे होमसिक झाले आहेत त्यांनी `वो कागज की कश्ती, वो बारीश का पानी`, `चिट्ठी आयी है` या गाण्यांच्या वाटेला सुद्धा जावु नये. 
|
Bee
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:27 am: |
| 
|
अरे वा धुळे तुमची बढती झाली. NJ ला जायला मिळालं! इथल्या तुलणेने तिथे बरे वाटते की असेच वाटते? तिथले महाराष्ट्र मंडळ कसे आहे? लेख वाचल्याबद्दलं सर्वांचेचं आभार. ललिताताई, येत्या २६ ला आहे तो कार्यक्रम. त्याबद्दल मी तुम्हाला नक्की सांगीन.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|