Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 22, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » rachana_barve » Feedback » Archive through July 22, 2006 « Previous Next »

Deepanjali
Wednesday, June 21, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना ,
तू काढलेले sketch पाहून हे painting आठवले .
आम्ही टेनसीला Smoky Mountains मधे एक cottage rent केले होते तिथे सगळ्या Red Indian accessories होत्या , त्यातले हे एक painting.



Deepanjali
Wednesday, June 21, 2006 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या native American मुलीचे features मला जरा ऐश्वर्या सारखे वाटले :-)

Dineshvs
Thursday, June 22, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजली, हे चित्र रांगोळीत पण छान दिसेल.

Rachana_barve
Saturday, June 24, 2006 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही हो दिनेश, उलट तुम्ही सगळे माझी चित्र बघता कौतुक करता, suggestions देता. छान वाटते खुप.
deeps हे चित्र मी पण कुठेतरी बघितले आहे. probably grand canyon मध्ये..


Dineshvs
Saturday, June 24, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, मी सुचवलेल्या आदित्य चारींच्या पुस्तकाचे हे मुखपृष्ठ.
वेगळे काहि लिहायला नकोच, जाणकारांचे सोडाच, कुणालाहि मोहित करेल असे पोर्ट्रेट आहे ना हे

ac

Rachana_barve
Thursday, June 29, 2006 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow सही.. नाही हे नाही माझ्याकडे. पुण्यात मिळेल ना?

Himscool
Thursday, June 29, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात मिळते हे पुस्तक... अनमोल किंवा रसिक साहित्यमध्ये..

Shreeya
Thursday, June 29, 2006 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आज पहिल्यांदाच इथे आले अन काय खजानाच सापडला!
खूप गोड आहेत सर्व चित्रे! सर्वच अतिशय आवडले!
एक विचारु का, मला वाटते तुम्हीसुद्धा (माझ्यासारखेच) परिराज्यात अजुन रमता वाटते! (प्लीज रागावु नका)
खूप निरागस विश्व वाटले! अजुन येवु द्या! मी रोज येणार इथे आता!


Rachana_barve
Thursday, June 29, 2006 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीया २ मिनिट मला कळलच नाही की मलाच उद्देशून हे पोस्ट आहे. रागवायच काय त्यात.. मी अजूनही ग्रिमच्या परिकथांची पारायण करते :-) आणि अहो जाहो कशाला?
Thanks for the compliments... :-)

Himscool ok thanks. मी नक्की आणायला सांगणार आहे


Giriraj
Thursday, July 20, 2006 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा रचना! जलरंगात आहे का हे?
(मला खूप आवडतात जलरंगातली चित्रे.. मागे एकदा पुणे टेलिकॉमच्या कर्मचार्‍यांचे एक प्रदर्शन भरलेले.. त्यातही काही खूप सुंदर जलरंगातली चित्रे होति.

मला वाटते की निसर्गचित्रांसाठी जलरंगासारखे माध्याम नाही!)

मि सहज शोध घेऊन पाहिलं तर मॉनेटची बरीचशी चित्रे तैलरंगात आहेत असे दिसले.... तू प्रेरित झालिस त्या चित्राचे नाव काय?

(अरे मी इतके प्रश्न कसा काय विचारू लाग्लो? हाही एक प्रश्नच :-))


Bee
Thursday, July 20, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना तुझ्यासम फ़क्त तू :-) चित्र लय लय आवडले. ये पण एखादी कथा वगैरे पण होऊन जाउ दे ना.. किती दिवस झालेत एखादी चिटुकली कथा लिहायला काय झाले तुला :-(

Dineshvs
Thursday, July 20, 2006 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच जमलेय कि ? या शैलीचे नेमके वैशिष्ठ काय आहे ?

Rachana_barve
Thursday, July 20, 2006 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thankyou बी, गिरी, दिनेश :-) गिरी, बहूतेक मोने च्या ह्या चित्राच नाव by riverside अस काहीतरी आहे. अर्थात त्या चित्रात नदी पण होती. मला जमली नाही ती दाखवायला. आणि हे चित्र पण तैलरंगातच आहे.
दिनेश, हे Impressionist style painting आहे. म्हणजे अगदी दिसतील नजरेला असे ब्रश चे स्ट्रोक्स bold colors आणि धावत्या गाडीतून आपण बाहेर नजर टाकली तर कसे दृष्य दिसते त्या types मध्ये चित्र असतात. आणि बहूतेक चित्र ही landscapes असतात. फ़्रांस मध्ये academic art च्या विरोधात अशी चित्र सुरु


Dineshvs
Friday, July 21, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, मी खुपदा एखाद्या चित्रावर टिका करतो, ती केवळ डोळ्याना कसे दिसतेय, याच निकषावर. कारण अशी खास माहिती आम्हाला नसते. शिवाय या चित्रासाठी कलाकाराने किती मेहनत घेतलीय, याची जाणीवहि नसते.
अशी वेगेवेगळ्या तंत्रांची ओळख करुन दिली, तर खुपच आवडेल. ईथल्या खेळीमेळीच्या वातावरणात, असे ज्ञानकण सहज जमा होतात, मुद्दाम सवड काढुन सगळ्याच विषयावर वाचन होत नाही.


Limbutimbu
Friday, July 21, 2006 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> रचना, मी खुपदा एखाद्या चित्रावर टिका करतो,
ती टीका नसते! तुला त्यातल काय आवडल नाही किन्वा खुपल ते तु सन्गत असतोस!
सच्चा कलाकार ओपन माईन्डेद असेल तर अशा प्रतिक्रियान्चे स्वागतच करतो आणि स्वतःला सुधारुन घेतो! :-)
पण तरीही माझ्या दहा मिनिटात काढलेल्या स्केचेसची तु चिकित्सा करतोस तेव्हा जरा हिरमुसलेपणा येतो हे मान्य करावेच लागेल!
रचना, तुझा बीबी मी आत्ता बघत नाहीहे, जेव्हा बघिन तेव्हा प्रतिक्रिया देईन, आत्ता अतिशय गडबडित हे! :-)
चौकोन अन रेषा कॉपीपेस्ट केलेल्या टेक्स्ट करता दिसताहेत, असे का होत असावे बरे?
:-(

Dineshvs
Saturday, July 22, 2006 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु मी तुला नेहमीच सांगत आलोय कि तु, माऊसपेक्षा पेन्सिल वापरलीस तर आता काढतोस त्यापेक्षा छान चित्र काढशील.
कारण मर्यादा आहेत त्या या माध्यमाच्या, तुझ्या कल्पनेच्या नाहीत.
पण पेन्सिल ने काढलेले चित्र स्कॅन वैगरे करण्याचा खटाटोप आहेच म्हणा.


Limbutimbu
Saturday, July 22, 2006 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, पेन्सिलनी नाय ना जमत मला:-( शेडिन्ग मधी मार खातो!
अन त्याला तेवढा टेम नसतो रे भो!
अन पेन्सिलने हापिसात चित्र काढत बसलो तर माझच चित्र काढुन लावतील भितीवर!
त्यापेक्षा टायपण बर असत! कोड बडवतो हे अस वाटत दुरुन बघणार्‍यान्ना! अन तरीबी माह्या बॉसला सन्शय येतोच! की कपाळाला आठ्या घालत हा येवढा कसला कोड लिहितो हे की दडादडा कीबोर्ड बदडुन काढतो हे!
अन घरला गेल्यावर काय "चित्र बित्र" वगैरे कलोपासनेच्या गोष्टी जमत नाहीत! घरी गेल्यावर फक्त घरकोम्बडा!
बघु, पण मी प्रयत्न करीन!
:-)

Giriraj
Saturday, July 22, 2006 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्या,तुझं ऑफ़िसात टंगलेलं चित्र पाहून मला आनंदच वाटेल!


Limbutimbu
Saturday, July 22, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> लिम्ब्या,तुझं ऑफ़िसात टंगलेलं चित्र पाहून मला आनंदच वाटेल!
चल चल उठ कामाला लाग, माझ चित्र काढायला घे!

Dineshvs
Saturday, July 22, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे माऊस वापरायचा, तर रेषा अगदी नेमक्या आणि जोरकस हव्यात. तु माडगुळकरांची चित्रे बघितली असशीलच ना, किती मोजक्या रेषा असतात त्यांच्या.
रचना, काय मत आहे, त्यांच्या रेखाटनाबद्दल ?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators