अगदी अगदी मैत्रेयी... इथे Indy आणि Bloomington IN मधे परब नावाच्या मुंबैकराची Restaurants आहेत... तिथे चांगले मिळते जेवण.. पण service अतिशय खराब.. गोर्या लोकांना तेवढी एकदम prompt service आता पर्यंत मला US मधे हे दोन सोडून.. NJ मधले Chutney Manor हे एकच देशी Restaurant आवडले.....
|
तशी बरीच चांगली Restaurants आहेत NJ मध्ये, आणि खाणं आणि सर्वीस पण चांगली असते. पण चुकून गेलो खरे एकदा. आता परत नाही जाऊ शकणार... नायगार्याच्या बहुतेक भारतीय खानावळी यथातथाच आहेत... MR आज मराठी कार्यक्रम नव्हता त्यामुळे बहूदुधी पुरली असती... 
|
अरे मस्त गोष्टी आहेत की विनयच्या. पण इंडीयन रेस्टॉरंट म्हणलं की मला आता फ़क्त calif-freemont मध्लं spice-hut आठवतं. इतकी अस्सल बिर्याणी मी पुण्याच्या दुर्गा बिर्याणी हाऊस मधेच खाल्ली होती. ईस्ट कोस्ट ला सगळ्याच हॉटेलमधे(भारतीय) करीची चव एकच आणि प्रत्येक भाजीत तीच करी कशी असते हा मला कायमचा पडलेला प्रश्न आहे. एक छोटासा अपवाद म्हणजे सिनसिनाटीचं उडीपी. तिथले छोले भटुरे औरच असतात... इडली मात्र मूड प्रमाणे चांगली बनवतात. pittsburgh च्या देवळातले राईस सुद्धा छान होते.
|
कधी ओरलॅंडो ला आलात डिस्नी किव्वा युनिवर्सला, तर नक्की वूडलंड हॉटेलात जा. हे अस्सल शाकाहारी दक्षीण भारतीय खाण्याचं ठिकाण आहे. (आता छोले भटुरे वगैरे सुरु केलेत). पण बाकी दाक्षिणात्य पदार्थ उत्तम. या ठिकाणांपासून हे हॉटेल ५-६ मैलावर आहे. (वीक डेजला दुपारी बुफे!!!!)
|
मला वाटलं घरी बोलावशील....
|
Zakki
| |
| Monday, June 19, 2006 - 4:59 pm: |
| 
|
विनय, असे वाटलेच कसे तुम्हाला? माहित नाही का काही गावातले लोक म्हणतात, 'बादशाहीत आजकाल छाऽन जेवण मिळते. आम्ही तिथेच जातो बरेचदा! पुढल्या वेळी, एव्हढ्या लांब आमच्याकडे येण्यापेक्षा तिथेच जेवण घेऊन बघा!

|
विनय, तु लिहील्यावर मला वाटल की अजुन कोणीच यावर कस काय लिहील नव्हत amway च्या गळेपडू लोकांना काय काय उत्तर देऊन पळवून लावल होत त्याची आठवण झाली. लिहीत रहा.
|
Sayonara
| |
| Friday, June 23, 2006 - 7:30 pm: |
| 
|
बापरे, आता स्वतहून बोलायला येणार्या भारतीयांपासून चार हात दूरच राहिलं पहिजे
|
तरी मी तुला स्वतः म्हणून मेल पाठवली होती... आता Appointment कधी देतेस?
|
Sayonara
| |
| Friday, June 23, 2006 - 7:59 pm: |
| 
|
मी बोलायला येणार्या भारतीयांबद्दल बोलते आहे, मेल करणार्या नाही. बरं ह्या मंडळींना ओळखण्याची आणखी काही खूण?
|
१. मॉल मध्ये स्वतःचे काम सोडून तुमच्या पाठी पाठी येणं. २. Hi-Hello झालं तरी तुमची पाठ न सोडणं. ३. कारण नसताना तुमची आणि तुमच्या जोडीदाराची ओळख करून घेणं, आणि स्व्तःच्या जोडीदाराची ओळख करून देणं. ४. तुमच्या मुलां विषयी अतिप्रेमाने बोलणं. ५. आपण धंदा करतो, Networking, Marketing करतो किंवा फलाणा ढकाणा करतो हे मोठे मोठे शब्द वापरून सांगणं फक्त काय धंदा करतो हे न सांगणं. ६. आपलं Visiting Card तुम्हाला देणं आणि फोन नंबर मागणं. ७. ज्या दिवशी भेटलात त्याच्या तिसर्या दिवशी रात्री आठ, सव्वाआठला फोन करणं.. अशी कितीतरी लक्षणं आहेत या जमातीची.. आणि मुळात त्यांचे Product तुम्हाला घरी बोलावून विकले तरी हे सगळं तुम्हाला बकरा बनवून आत ओढण्यासाठी असतं... त्यांच्या भविष्याची पेंशन तुमच्या Grocery तुन्न येणार असते..
|
Abhijit
| |
| Friday, June 23, 2006 - 10:24 pm: |
| 
|
बे एरियातील लेटेस्ट अनुभव.. ८. वाॅलमार्ट मध्ये विचारले, "इथे जवळपास टारगेट कुठे आहे का?". आणि टारगेट मध्ये बरोबर उलटे विचारले!! एकदा मला ३० मिनिटात ५ जण असे भेटले! तोच प्रश्न.. पहिल्या एक दोघांना "माहित नाही" म्हणून सांगितले, नंतर मात्र खरा प्रकार माझ्या लक्षात आला. टाळकेच सटकले आणि एक दोघांना "टारगेट कुठे?" या प्रश्नाचे उत्तर "गेट लाॅस्ट" असेच दिले! आणि आश्चर्य म्हणजे त्यातील कुणालाच त्याचे काहीच वाटलेले दिसले नाही. ते दुसरा कुणी मिळतो का ते पहायला निघून गेले.. म्हणजे किती निर्ढावलेले आहेत बघा.. आणि यात मुली सुद्धा होत्या.. यापुर्वीचा अनुभव ३-४ वर्षांपूर्वीचा असल्याने मला हा मात्र एक धक्का होता.. माझ्या २-३ मित्रांनाही असेच अनुभव फ़्राईज एलेक्ट्राॅनिक्स मध्ये आले. एक दिवस असे होईल, की देशी माणूस दुसर्या देशी माणसाला मदत करणार नाही. हे मात्र वाईट होईल..
|
सिनसिनाटीला एक jungle jim's म्हणुन world food market आहे. तिथे विकेंड ला गेलं की हमखास २-३ जण भारतीय सेक्शन मधे हिंडताना दिसायचे. आविर्भाव तर असा असायचा की काहीतरी खरेदी चालू आहे. हातात एक छोटीशी बास्केट आणि त्यात दर वेळी एकच ब्रेड. एक दिवस आम्ही डाळीची पाकीटं ट्रॉलीमधे टाकत असताना एक बर्यापैकी प्रौढ गृहस्थ आले आणि एकदम "सही है.. दाल वगैरा बनाना सिख लिया" ह्या वाक्यापासून सुरू झाले. त्यानंतर "आपण कोण, आपलं गाव कुठलं... हॉनर्सचा कोर्स म्हणजे काय डिफ़ीकल्ट असतो" वगैरे चालू केलं... शेवटी कार्ड दिलं स्वत:चं आणि गायब झाले. नंतर एकदा वॉलमार्ट मधे अशीच एक बाई भेटली होती. तिनी पण असंच स्वत:चं कार्ड दिलं. ते वाचल्यावर कळालं की हे दोघे नवरा बायको आहेत... आमचा फ़ोन नंबर घेतला होता तिनी, एकदा फ़ोन ही आला. माझ्या मित्रानी तिला सरळ सांगितलं... "तुमचं असलं काही काम असेल तर पुन्हा कधीही फ़ोन करू नका"
|
Badbadi
| |
| Thursday, June 29, 2006 - 3:01 am: |
| 
|
hmmm... jungle jim हा एक छान TP होता w/e ला... तिकडे गेलं कि आरामात ३ तास जायचे. नशीब तिकडे कोणी कार्ड देणारं मला भेटलं नाही
|
Apurv
| |
| Thursday, June 29, 2006 - 5:09 pm: |
| 
|
माझ्या बहिणीला असेच walmart मध्ये एक मराठी जोडपे भेटले होते. दोन तीन दिवसानी तीला call आला पण काही कारणास्तव ती घेउ शकली नाही, नंतर voicemail ऐकला " आम्ही amway करत नाही, त्यामुळे कृपया गैरसमज करू नका " मलापण असे बरेच अनूभव आहेत, आणि ही लोक phone करताना, मुद्दामून ID लपवून किंवा आपल्याला दिलेल्या number पेक्ष दूसर्याच phone वरून call करतात. सादाहरण प्रश्न म्हणजे, तुम्हाला job चा कंटाळा आहे का, किंवा नविन संधी च्या शोधात आहात का वगैरे वगैरे
|
असा काय problem असेल त्या माणसाला ? अश्या वेळी आपण काही करू शकत नाही ह्याची नेहेमी खंत वाटते
|
Ninavi
| |
| Monday, July 10, 2006 - 6:48 pm: |
| 
|
मी एडिसनमधे असताना माझं दार ठोकत अश्याच एक आज्जी आल्या होत्या. दारावर तोरण बघून भारतीय लोक आहेत इतकं कळलं त्यांना. जवळपास असंच घर शोधून द्यावं लागलं. पण तू त्या माणसाची reaction लिहील्येस ती मात्र वाईट वाटलं वाचून.
|
Seema_
| |
| Monday, July 10, 2006 - 9:02 pm: |
| 
|
श्या , माणस अशी का वागतात ? माझ्या मैत्रीणीचे मामा मामीनी आपल्या म्हातार्या आईला इथे केवळ daycare चे पैसे वाचावेत म्हणुन इथे आणलेल . इतके वाईट वागवत आजीला . आजी नेहमी रस्ता चुकायच्या आणि मामाच्या शिव्या खायच्या . काही नाही करु शकली माझी मैत्रीण इच्छा असुनही .
|
त्या आजींचे हाल वाचून वाईट वाटलं
|
Arch
| |
| Monday, July 10, 2006 - 9:38 pm: |
| 
|
आईग! इथे येऊन काहिंच जीवन खरच कानकोंड होत
|