Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 01, 2005

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » vinaydesai » Feedback » Archive through December 01, 2005 « Previous Next »

Giriraj
Wednesday, November 23, 2005 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दि.२१ नोव्हे २००५ ला आपले मायबोलीकर श्री.विनय देसाई यांच्या “परदेसाई” या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा पुणे येथील “पाथफ़ाईंडर” येथे संपन्न झाला. पुस्तकाचे प्रकाशन मराठीतील ज्येष्ठ लेखिका सौ.मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत अभिनेते श्री. मोहन आगाशे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रकाशक श्री.श्रीराम रानडे उर्फ़ रानडेकाका यांनी भारद्वाज प्रकाशनाविषयी आणि “परदेसाई” च्या पुस्तकरुपात येण्यापर्यंतचा रोचक किस्सा सांगितला. त्याचबरोबर या पुस्तकाचे अमेरीकेत प्रकाशन झाले असल्याचे सांगतांना “अमेरीकेत नोंदणी विवाह झाला असला तरी भारतातल्या वैदिक विवाहाला तितकेच महत्त्व असल्याचे” आपल्या शैलीत सांगितले.
सौ.मंगला गोडबोले यांच्या हस्ते एका आगळ्यावेगळ्या पद्धतिने पुस्तकाचे प्रकाशन केले गेले.भारद्वाज प्रकाशनाच्या परंपरेप्रमाणे एका सुबक लाकडी पेटीतून पुस्तकाच्या प्रति बाहेर काढून मंगलाताईंनी प्रकाशन झाल्याचे जाहीर केले. त्यांनी केलेले भाषण उत्तम निरीक्षण आणि खुसखुशीत विनोद यांचा भरपेट फ़राळ होता. ‘देसाईंना त्यांच्या लेखनाच्या पहाटेच “भारद्वाज” दिसला’ अशी सुरवात करून त्यांचे भाषण उत्तरोत्तर रंगत गेले. विनयच्या लेखनाबद्द्ल गौरवाने उल्लेख करतांना अनेक उदाहरणे त्यांनी दिली. भाषणाचा समारोप करतांना उपस्थितांना पुस्तक ‘विकत’ घेऊन वाचण्याचे आवाहन केले.

त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते श्री.मोहन आगाशे यांचे भाषण झाले.विनोदी ढंगाने विविध विषय हाताळत केलेले हे भाषण श्री.आगाशे उत्तम अभिनेते म्हणून का ओळखले जातात त्याचीही एक झलक होते. मंगलाताईंनी पुस्तक ‘विकत’ घेण्याच्या आवाहनाला त्यांनी ‘पुणेकर हौशी वाचक असल्याने विकत बिकत घेत बसत नाहीत ‘ म्हणून कोपरखळी मारली. त्यांच्या भाषणानंतर “परदेसाई”मधील काही भागांचे अभिवाचन आणि विनय देसाई यांची मुलाखत असा कार्यक्रम झाला. अभिवाचन श्री.अजित सातभाई यांनी केले.विनय यांनीही त्यांच्या आवडीचा एक भाग वाचून दाखवला.त्याचबरोबर मायबोलिचाही आदरपूर्वक उल्लेख या कार्यक्रमात केला गेला.

संपूर्ण कार्यक्रमात विनय देसाईंची कन्या जुई हिने camera चा flash चमकता ठेवला होता. तिच्या बाल-उत्साहाला मध्ये मध्ये बांध घालण्याचे कामही विनय अतिशय हसत्मुखाने पण आतल्या आत रागवून करत होते. कार्यक्रमाच्या काही वेळ आधी तिच्या dress चा धागा एका खिळ्याला अडकून त्यानंतर ती फ़िरेल तिकडे आणि लक्षात येईपर्यंत दोन तीन खांबांना गुंडाळून छानच गुंता झाला होता.
हे दोन प्रसंग वगळता विनय पूर्ण कार्यक्रमात उत्साही आणि आनंदी दिसत होते.:-)

या कार्यक्रमाला मायबोलितर्फ़े मी,GS,आरति,sravi,सई,अभिश्रुति,प्रसाद शिरगांवकर यांनी हजेरी लावली होती.साधारणतः दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाच्या आठवणी कायम मनात रेंगाळत राहतील .एका मायबोलिकराच्या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यात आम्हीही ‘मायबोलिकर’ असल्याचा अभिमान वाटत राहिला.





Sandeep_bodke
Thursday, November 24, 2005 - 5:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ho..chaan...sakal madhe pan waachli hi baatmi aaj http://www.esakal.com/20051124/pune13.html

Vinaydesai
Thursday, November 24, 2005 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


Thanks Giri AaiNa saMdIp..



Nalini
Thursday, November 24, 2005 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, म्हणजे मी खुप काही मिस करतेय.. :-(
(आणखी पुढचे तिन वर्ष.)


Saee
Thursday, December 01, 2005 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

igarIÊ caaMgalaM ilahIlaMyasa ro.

maI AsaM eoklaM hÜtM kI puNyaat rhat Asalaolyaa ikMvaa saQyaa kamaainaima<aanao / sau+Iinaima<a Aalaolyaa baáyaaca maayabaÜlaIkraMnaI Aamhalaa ivanayanaa BaoTayacao Aaho Asao kahI jaNaaMnaa saaMgauna zovalao hÜto... iktIjaNa yaotIla kahIca klpnaa nasalyaamauLo gaPpa maarNyaasaazI AamhI saMBaajaI baaga ho izkaNa zrvalaMÊ pNa mauLat maa~ AamacyaapOkI kÜNaacyaa trI GarI BaoTayacaMca kahIjaNaaMcyaa manaat hÜtM. p`%yaxaat maa~ bahutok jaNaaMnaI TaMga idlaI AaiNa Kupca kmaI laÜk Aalao. Kup AaQaI maola kÉna sagaL\yaaMnaa dÜnhI kaya-ËmaaMcaI maaihtIhI idlaI hÜtIÊ pNa trIhI ho AsaM kaÆ kahI kLt naahI... AsaÜ. jao Aalao %yaaMnaI maa~ Kup majaa kolaI AaiNa ivanayaXaI Kup gaPpa maarlyaa.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators