Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 08, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through May 08, 2008 « Previous Next »

Satishmadhekar
Tuesday, May 06, 2008 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> भारतात व चीनमधे सुबत्ता आल्यामुळे जास्त लोक पौष्टिक, सकस अन्न खाऊ लागले म्हणून जगात अन्नटंचाई आली आहे.

---इति बुश

शेतकर्‍यांचे कैवारी, जाणता राजा, फुले-आंबेडकरांचे खरेखुरे वारसदार, निधर्मी विचारवंत, क्रीडाप्रेमी, राजकारणापेक्षा खेळाच्या मैदानावर रमणारे, महाराष्ट्र व भारताचे भाग्यविधाते, प्रजाहितदक्ष इ. असलेले, मा. शरद पवार, यांनी काही दिवसांपूर्वी "दाक्षिणात्य भात खाण्याची परंपरा सोडून पोळ्या खाऊ लागल्यामुळे भारतात गव्हाची टंचाई निर्माण झाली आहे" असे अत्यंत विनोदी आणि भंपक विधान काही दिवसांपूर्वी केले होते. भारतात शेतकर्‍यांचा गहू पडून असताना परदेशातून दुप्पट किंमत देऊन सडक्या गव्हाची आयात करण्याचे समर्थन करताना त्यांनी हे विधान केले.

Jui_flower
Tuesday, May 06, 2008 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे पण आपलि सरकार बुश च्या या वाक्यावर काहि बोलत का नाहि?

Chinya1985
Tuesday, May 06, 2008 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाभिमान हा कॉंग्रेसच्या रक्तातच नाही. सतत हुजरेगिरी करण्याची सवय असलेले काय अमेरिकेला विरोध करणार???
काल सामन्यात बातमी होती की १ अमेरिकन भारतियांपेक्षा ६ पट जास्त खातो.


Shendenaxatra
Tuesday, May 06, 2008 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकन माणूस सरासरी जास्त अन्न खातो पण हे पूर्वीपासूनच आहे. अमेरिकेची समृद्धी जुनी आहे. भारताची व चीनची नवी आहे. त्यामुळे हे नवोदित देश जास्त गोष्टी उपभोगू लागले आहेत हे खरे. उत्पादन व वापर ह्याची नवी समीकरणे तयार होत आहेत. पण अन्न वगैरे बाबतीत ह्या उदयोन्मुख देशांचे उत्पादनही वाढले आहे. तेव्हा निव्वळ त्या देशांना दोष देऊन चालणार नाही.

ह्या मठ्ठ अध्यक्षाने आपला हट्ट पुरा करायला इराकवर हल्ला केला. तिथे महिन्याला अब्जावधी डॉलर गट्ट होतायत. तिथल्या तेलविहिरी असुरक्षिततेमुळे पुरेसे तेल बनवत नाहीत. त्यामुळे इतका खर्च करून अमेरिकेच्या हातात काहीच पडत नाही आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाला चटके बसत आहेत.
पण आपली चूक कबूल करायचा मोठेपणा ह्या माणसाकडे कुठे आहे? तसे करणे हे दुबळेपणाचे वाटते ह्याला. त्यामुळे खापर कुठल्यातरी बाहेरच्याच्या डोक्यावर फोडावे असे ह्यांनी ठरवले आहे. चीनने दूषित माल पुरवल्यामुळे आणि भारताने रोजकार हिरावल्यामुळे दोन्ही देशांविरुद्ध पुरेसा राग आहेच. त्यात थोडी भर पाडता आली तर बघू असा विचार केला असावा. तेव्हा ही टीकाटिप्पणी अमेरिकन जनतेकरता आहे. अन्य लोकांकरता नाही.


Deshi
Tuesday, May 06, 2008 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हे खरेच कळले नाही की त्या दोन्ही युध्दांचा दोष फक्त डुब्याला देऊन कसे चालेल. तो फक्त अध्यक्ष आहे पण युध्दाला जान्याचे मत पुर्ण कॉंग्रेस (अमेरिकन) आहे मग फक्त त्याला दोष देऊन काय फायदा. दोष पुर्ण अमेरिकेचा आहे. त्यांना वाटले ईराक दोन आठवडे व अफगाण एक आठवडा असे काम होईल. अनायासे संधी आलीच आहेतर जगभरात आपली कॉलर टाईट करता येईल (परत) म्हणून हे लोक तिकडे घुसले तर पायच अडकडुन बसलाय आता. येत्या पन्नास वर्षात अमेरिका नं १ राहानार नाही हे आता स्पष्ट होत चाल्लय. एकतर हिंदी नाही तर चिनी लोक नं १ वर असनार हे येथल्या लोकांना कळायला लागल्य म्हणुन हा ओरडा.

Shendenaxatra
Tuesday, May 06, 2008 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अफगाणी युद्धाचे कारण निदान मी समजू शकतो. तालिबान सरकारवर हल्ला केला म्हणून मी तरी अश्रू गाळणार नाही.

पण इराकवरील हल्ला हे बुश आणि त्याच्या टोळीचे पूर्वीचे स्वप्न आहे. तो हल्ला करण्यात बुश, चेनी व टोळीचा सिंहाचा वाटा आहे. सिनेट व कॉंग्रेसचे विरोधी पक्षाचे लोक षंढासारखे वागले हे खरे. पण युद्ध करण्याचा पुढाकार नि:संशय ह्या रेम्याडोक्याचाच.
२००४ च्या निवडणुकीत विरोधी पक्षाने निस्तेज, मध्यममार्गी, रटाळ बोलणारा, अनाकर्षक, बोटचेप्या उमेदवार निवडला आणि अमेरिकन जनतेने मूर्खपणा केला. ती वरलिया रंगा भुलली आणि बुशलाच पुन्हा निवडले हा जनतेचा दोष. डेमोक्राटिक पार्टीने एखादा स्पष्टवक्ता, तडफदार उमेदवार निवडला असता तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते.
मात्र बुशने आपली चूक कधीही मान्य केली नाही. उलट उर्मटपणे तो असेच म्हणतो आहे की मी जे केले ते योग्यच. आजही माघारीची भाषा नाहीच. असो.


Tonaga
Wednesday, May 07, 2008 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्ड्या लेका तुझ्या काही काही पोस्ट फारच सेन्सिबल असतात अन मला पटतातही.त्या बाबतीत तू केदार जोशीच्या जवळ पोचतोस. महाराष्ट्रातील मुंड्याच्या नाटकानन्तर तुझ्या पोस्ट वास्तवाचे भान ठेवणार्‍या होत्या. तेव्हा प्रतिक्रिया द्यायची राहून गेली.तू विचारवन्तासारखा विचार करतो. पन माढेकर, चिन्या च्यायला,उदय,हे अतिरेकी कार्यकर्त्यासारखा विचार करतात. अन सन्तु माणूसच नसल्याने त्याचा विचार करण्याचे कारण नाही...
बुश बोलतो आहे तो पैसा आहे, रिसोर्सेस आहेत म्हणून
beggers are not choosers ...

असो बरेच दिवस केतकरांचा विषय नाही घेतला ते? ..:-)



Satishmadhekar
Wednesday, May 07, 2008 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉंग्रेस व शरद पवारांवरील टीका श्री. टोणगा यांना फारच झोंबलेली दिसत आहे. कटु सत्य त्यांना पचवता येत नाही असं दिसतंय.

धाकटे बुश आणि शरद पवार यांच्या वक्तव्यात काही फरक आहे का हे श्री. टोणगा सांगू शकतील का?


Tonaga
Wednesday, May 07, 2008 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीच फरक नाही.शरद पवार यांची विधाने आणि वर्तन भम्पकच आहेत.तुम्हाला कोणी सांगितले मी कॉन्ग्रेस आणि पवार यांचा समर्थक आहे? कुठे आहे असे?. मी फक्त म्हटले होते की मी नेहरू आणि गांधी(म्हणजे आद्य गांधी जे तुम्हालाही प्रत्: स्मरणीय वाटले होते)यांचा चाहता, समर्थक आहे..याचा अर्थ त्यांच्या सगळ्या औलादींचा मी समर्थक आहे हे तर्क शास्त्र वाजपेयी अडवानी,चुकुच शकत नाहीत असे गृहीतक मानलेलेच लढवू शकतात. तेवढा फरक शेन्ड्या करू शकतो येवढेच मला म्हणायचे होते. इव्हन केतकरांची सगळी विधाने साफ चूक असतात काय? हो, ती तुम्हाला न आवडणारी असू शकतात.पण आह्माला जसे दिसते तेच सगळ्यानी पाहीले पाहिजे दुसरा विचार यात असूच शकत नाहीत ह्या असहिष्णू पणामुळेच तर लोक तुमच्या दैवताना जवळ करीत नाहीत हे गेल्या ६० वर्षात तुम्हाला उमगलेले नाही. आणि तुमच्या सुशिक्षीत पिढीतही तुम्ही हीच झापडबन्द दृष्टी तुम्ही अंगीकारावी हीच कमाल आहे. शरद पवार माझा काका की मामा? त्यांचेवरील टीका मला का झोम्बावी? पुलोद च्या वेळी चांगले असणारे शरद पवार आता फारच वाईट झालेले दिसतात....

असो शरद पवार यांचे ते विधान दक्षिण भारतातल्या गव्हाच्या खपाच्या आकडेवारी वरून केलेले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.... ते तुम्ही मानायचे की नाही हा वेगळा प्रश्न आहे...


Satishmadhekar
Wednesday, May 07, 2008 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आणि गांधी(म्हणजे आद्य गांधी जे तुम्हालाही प्रत्: स्मरणीय वाटले होते)

तुम्हाला म्हणजे कोणाला? मला स्वतःला आद्य गांधी दिवसाच्या कोणत्याही वेळी स्मरणीय वाटत नाहीत.


>>> इव्हन केतकरांची सगळी विधाने साफ चूक असतात काय?

त्यांचे गेल्या ५-७ वर्षातले एखादे चूक नसलेले विधान सांगता येईल का?



>>> ह्या असहिष्णू पणामुळेच तर लोक तुमच्या दैवताना जवळ करीत नाहीत हे गेल्या ६० वर्षात तुम्हाला उमगलेले नाही.

आमच्या म्हणजे कोणाच्या? ही दैवते कोणती?

तुमच्या स्वतःच्या दैवतांच्या (आद्य गांधी आणि नेहरू) अविचारी व महाभयंकर चुकांमुळे भारतातल्या आजच्या बहुतेक सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत हे अजून तुम्हाला उमगलेले दिसत नाही.


माझे कोणते विचार तुम्हाला अतिरेकी कार्यकर्त्यांसारखे वाटले?

कटु सत्य पचविणे तुम्हाला अतिशय जड जाते. त्यामुळेच तुम्ही बेताल आरोप करत आहात. परंतू माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून तुम्ही सत्य झाकू शकत नाही (ते कितीही कटु असले तरी).





Limbutimbu
Wednesday, May 07, 2008 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> गांधी(म्हणजे आद्य गांधी जे तुम्हालाही प्रत्: स्मरणीय वाटले होते)
प्रातःस्मरणाच माहित नाही, पण महिना अखेरीला पैशान्ची टन्चाई जाणवली की कॉन्ग्रेस कृपेने हिरव्या, निळ्या पिवळ्या गान्धीबाबान्ची फार म्हणजे फारच निकडीने, कसोशीने आठवण होते हो! :-)
(आज अजुन पगार व्हायचा हे! आठ तारखेशिवाय फुटकी कवडी हातात असायची नाही, काहून गान्धीबाबाची आठवण देवुन जखमेवरची खपली काढून राहीले हो तुमी????)

गेल्या साठ वर्षात बाकी काही नाही पण जिकडे तिकडे सगळ्यान्ना गान्धी बाबा दिसत रहातील याची व्यवस्था कॉन्ग्रेसी सरकारने अगदी हिटलरच्या गोबेल्सलाही लाजवेल अशा पद्धतीने करुन ठेवली हे! किती उदाहरणे हवित???
तर या "दैवतान्चे असे बाजारीकरण" झाल्यावर काय होणार?
कडकी आली की गान्धीबाबा आठवतो, कोणालाही, अगदी रस्त्यावरच्या फेरिवाल्यालाही विचारुन बघा!
DDD

Satishmadhekar
Wednesday, May 07, 2008 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबूटिंबू,

तुमचा सुद्धा अतिरेकी कार्यकर्त्यांच्या यादीत समावेश करण्यात येत आहे.


Uday123
Wednesday, May 07, 2008 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदय,हे अतिरेकी कार्यकर्त्यासारखा विचार करतात
--- अहो तोणगा महाशय, मला माझ्या दोन पोस्ट तरी दाखवा ज्यामुळे तुम्ही वरिल प्रकारचे मत बनवले.

सन्तु माणूसच नसल्याने
--- अगदी बरोबर बोललात, सन्तु माणुस नाहीच आहे.... तो तर महान-माणुस आहे.

दोन्ही पोSट चांगल्या गुगली आहेत.


Uday123
Wednesday, May 07, 2008 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहरू आणि गांधी(म्हणजे आद्य गांधी जे तुम्हालाही प्रत्: स्मरणीय वाटले होते)यांचा चाहता, समर्थक आहे..
---चाहता, समर्थक आहे म्हणुन त्यांचे विचार सदैव पाळायलाच हवेत हे बंधन मी मानीत नाही. काही निवडक ठिकाणि झालेल्या हल्यांचे, तोडफ़ोडीचे मी समर्थन देखील करतो. आज आद्य गांधी असते तर त्यांना देखील, तुमच्या सारखे चाहते समर्थक आहेत हे बघुन दु:खच झाले असते.


Jui_flower
Wednesday, May 07, 2008 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग़ान्धि आनि अविचरि..... एकदम पटल बुवा मला.
नाहि तर काय म्हने एका गालावर मारले तर दुसरा गाल पुधे करा... आहो असे करुन त्याना काय हे सान्गायचे का कि आम्हि घाबरट आहे ते....
aani lokana kapade nahi mhanun tyani apale Kapade utarvile....ka dyayache hote na mag kapade lokana...

Vijaykulkarni
Wednesday, May 07, 2008 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या स्वतःच्या दैवतांच्या (आद्य गांधी आणि नेहरू) अविचारी व महाभयंकर चुकांमुळे भारतातल्या आजच्या बहुतेक सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत हे अजून तुम्हाला उमगलेले दिसत नाही.

सर्व समस्या?

हे जरा अतीच झाले.

हा पहा मणी शन्कर अय्यर यान्चा लेख


http://www.countercurrents.org/ie-aiyar180304.htm



Satishmadhekar
Thursday, May 08, 2008 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> सर्व समस्या?
हे जरा अतीच झाले.
हा पहा मणी शन्कर अय्यर यान्चा लेख

कुलकर्णी काय हे! तुम्ही अतीच करता. मण्या नंतर तुम्ही मला केतकरांचा लेख सुद्धा वाचायला सांगाल! काय म्हणावं तुम्हाला! :-)


Tonaga
Thursday, May 08, 2008 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी काय हे! तुम्ही अतीच करता. मण्या नंतर तुम्ही मला केतकरांचा लेख सुद्धा वाचायला सांगाल! काय म्हणावं तुम्हाला!

सतीश, हे तर काहीच नाही. केतकरांनन्तर कुलकर्णी तुम्हाला थेट सोनिया गांधींचे (लिहिलेले )भाषणच वाचायला देणार आहेत. आहे की नाही खाशी युक्ती?
(बाय द वे, तुम्ही केतकराना एकेरी सम्बोधन न लावता चक्क आदरार्थी सम्बोधन वापरलेय ये बात कुछ हजम नही हुयी...)


Tonaga
Thursday, May 08, 2008 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला म्हणजे कोणाला? मला स्वतःला आद्य गांधी दिवसाच्या कोणत्याही वेळी स्मरणीय वाटत नाहीत.>>>>>तुम्हाला म्हणजे तुमच्या वैचारिक गुरु असलेल्या केन्द्राला. इतकेच काय त्याना निवडणूकीच्या अजेन्ड्यात चक्क गान्धीवादी समाजवादाचाही आश्रय घ्यावा लागला होता. काळाने उगवलेला सूड दुसरे काय?

Tonaga
Thursday, May 08, 2008 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gandhian Socialism has been one of the first principles adopted by the Bharatiya Janata Party in India, during some part of its history, since the 'eighties. It has been used as a prime principal, in association or competition, with the other concept of integral humanism
... from wikipidia

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators