|
मी म्हटले तसेच झाले. अग अग म्हशी मला कुठे नेशी म्हणत मुंढे स्वगृही परत.! औट घटकेचा नाटकी रुसवा फुगवा सगळा. महाजन, मुंढे आणि वाजपेयी ह्या नेत्यांबद्दल माझा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. कॉंग्रेसी नेत्यांइतकेच हे वाईट आहेत वा होते. वाजपेयीचे पाकबद्दलचे मुळमुळीत धोरण, महाजनांचा व्याभिचार त्यांच्या चिरंजिवांनी लवलेले दिवे, मुंढेंची शेलकी प्रकरणे, प्रमोद महाजन खून खटल्यात त्यांनी केलेली अरेरावी हे बघून सगळे नेते एकाच माळेचे मणी असे वाटते. यापुढे कधी मी भाजपला मत देईन असे वाटत नाही. वलयांकित बोलायचे तर कोण कुणाला वलयांकित वाटतो हा वैयक्तिक प्रश्न आहे.
|
अरे सगळे लोक मुंढे काय लिहित आहेत????ते गोपिनाथ मुंडे आहेत. शेन्डेन,वाजपेयी भारी होतेच. महाजनांचा व्यभिचार ही त्यांची private गोष्ट आहे(हेच नेहरू आणि माउंटबॅटन यांच्या प्रेमाबद्दल पण) जोपर्यंत त्यांच्या या गोष्टी निर्णयक्षमतेच्या आड येत नाही तोपर्यंत. बाकी हा व्यभिचाराचा आरोप होता.
|
मुंढे नसून मुंडे आहे हे लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. विषयांतराबद्दल क्षमस्व. पण एक भाऊ दुसर्या भावाची गोळी घालून हत्या करतो ह्यामागे तसेच काहीतरी जोरदार कारण असले पाहिजे. इतके अतिरेकी कृत्य भावाविरुद्ध करायला तीव्र वैरभावना असणार. का झाले बरे असे? अजून कुणी काही उघड म्हटलेले नाही. दाल मे जरूर कुछ काला है. हा वैयक्तिक मामला असला तरी संघपरिवारातून निघालेल्या नेत्याकडून मी तरी स्वच्छ चारित्र्याची अपेक्षा करतो. ते तसे नसेल तर माझ्या लेखी त्या नेत्याची किंमत उतरणारच. यांनाही कॉंग्रेसी मापदंड लावायचे असतील तर कॉंग्रेसच बरी की.
|
Zakki
| |
| Wednesday, April 23, 2008 - 2:32 pm: |
| 
|
काहो, हे मुंडे नि ते दुसर्या एका पक्षाचे राणे ह्यांचे कोणत्या मुद्द्यावरून बिनसले? केवळ वैयक्तिक मामला की पक्षाच्या धोरणाबद्दल मतभेद. मुळात पक्षांच्या जनहिताबाबत भूमिका, धोरणे काय आहेत? इथे कसे, पक्षांची धोरणे अगदी जाहीर असतात. नि क्वचितच कुणि पक्ष सोडून जातात. जसे लिबरमन, इराक युद्धाबद्दलची त्याची भूमिका नि डेमोक्रॅटिक पक्षाचि भूमिका वेगळी असल्याने त्याने पक्ष सोडला.
|
अहो झक्की मुंडे आणि राणेंचे बिनसले आहे अस तुम्हाला कोणी सांगितल???ते दोघे एका पक्षात नव्हते. मुंडे भाजपात तर राणे शिवसेनेत होते. शेंडेन त्या भावाबद्दलच शंका येते. काहीही कार्ण असले तरी स्वत्:च्याच भावाचा खुन करणे चुकिचे. शिवाय त्या भावाला प्रमोद महाजनांनी खुप मदत केली होती.
|
Zakki
| |
| Wednesday, April 23, 2008 - 11:56 pm: |
| 
|
माझ्या लिहिण्यात चूक झाली. मला विचारायचे होते की मुंडे हे भा. ज. प. वर नाखूष झाले, नि राणे त्यांचा कुठला पक्ष असेल तो(कॉंग्रेस?), त्यावर. प्रश्न असा, की कारण काय? काही जनहिताच्या मुद्द्यासंबंधी पक्षाशी मतभेद की आपले उगीचच?
|
>>काहीही कारण असले तरी स्वत्:च्या भावाचा खून करणे चुकीचे. त्याबद्दल त्याला शिक्षाही झाली आहे. अशी एक किंवदंता आहे की प्रमोद महाजनांचे प्रवीण महाजनांच्या बायकोशी अनैतिक संबंध होते. त्यामुळॅ हे महाभारत घडले. मात्र मुंड्यांनी आपले सगळे सामर्थ्य वापरुन ही गोष्ट गुप्त राखली. निदान कोर्टासमोर येऊ दिली नाही. कदाचित असल्या प्रकरणामुळे राहुल महाजन असे दिवटे निघाले असतील.
|
प्रमोद महाजन कुणी सन्त नव्हते. पण तरीही त्यान्च्यासारख्या अफाट वाचन असलेल्या बुद्धीमान माणसाबद्दल ही किन्वदन्ती किन्वदन्तीच वाटते.
|
मला काहीही पुरावा नसताना 'त्या' दोघांमधे लावलेला संबंध पटत नाही. असे असते तर प्रविणने आपल्या बायकोला आधी मारल असत किंवा दोघांनाही मारल असत.पण कोर्ट केस चालु होती तेंव्हाही त्याच्या बायकोबरोबर तो बोलत असे,त्याला शिक्षा सुनावली गेली तेंव्हा तो बायकोच्या शेजारी बसला होता. ही पुर्णपणे अफ़वा असायचीही शक्यता आहे. मी शाळेत होतो तेंव्हा सलमान खानला एड्स झालाय ही अफ़वा चांगलीच पसरली होती(८ वर्षापुर्वी). अशी बातमी 'सुबह सवेरे' वर सांगितली होती असे म्हणायचे. कोणी ऐकली अस विचारल की म्हणायचे की मित्राच्या मित्रानी पाहिली. मी अनेकांना विचारल पण सगळे म्हणायचे मित्राच्या मित्रानी पाहीली होती. काही लोक म्हणायचे त्याला एड्स नाही तर ब्लड कॅन्सर झालाय आणि तो दर महीन्याला अमेरिकेला जाउन पुर्ण रक्त बदलुन येतो. सलमान खान १ वर्षापेक्षा जास्त जगणार नाही असे मात्र सगळे म्हणायचे. झक्की,त्या दोघांचे बंड हे पुर्णपणे स्वार्थासाठी झालेले होते.आपली राजकिय अस्तित्व संपू नये म्हणुन मुंडेंनी बंड केले तर मुख्यमंत्रीपद मिळाव म्हणुन राणेंनी बंड केले
|
Zakki
| |
| Thursday, April 24, 2008 - 11:35 pm: |
| 
|
हे असले धंदे करत बसल्यावर त्यांना जनहिताची कामे करायला वेळ कसा मिळतो? या प्रकरणांमधे सरकारचे कामकाज अडले तर जबाबदार कोण? कामे करण्यासाठीच ते निवडून येतात ना? ते निवडून द्या म्हणतात, तेंव्हा काहीतरी करण्याचे आश्वासन देत असतीलच ना? मग निवडून आल्यावर ते पूर्ण केले की नाही हे कोण बघतो? कुणि हिशेब ठेवतात का? की पूर्वी जसे 'आम्ही एनरॉनला अरबी समुद्रात बुडवून टाकू' अशी प्रतिज्ञा करून निवडून आलेल्या लोकांनी उलट एनरॉन चालूच ठेवले, इतकेच नव्हे तर नंतर त्याच पक्षाच्या उर्जामंत्र्यांनी एनरॉन बंद करा म्हंटले तर त्यांना बाजपेयी च्या मत्रिमंडळातून पक्षानेच काढून टाकले!! त्या प्रकरणी एकंदर निवडून आलेल्या पक्षाने किंवा त्यांच्या नेत्याने एनरॉनकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाच घेतली असेहि बोलले जाई. ख. खो. दे. जा. उद्धवा, अजब तुझे सरकार!! धन्य धन्य. माझा भारत महान!
|
Tonaga
| |
| Friday, April 25, 2008 - 4:50 am: |
| 
|
माझा भारत महान? कसला तुमचा भारत? तुमचा भारताशी काय संबंध? तुम्ही अमेरिकन ना? कशाला इथल्या उचापती करता? भारताचा उपयोग फक्त लाथा घालण्यासाठीच करीत आहात तुम्ही. नुसती हेटाळणी अन कुत्सित वाक्ये. मी कसा शहाणा म्हणून तो घाणेरडा देश सोडून इकडे आलो आहे. बघा बघा ते नालायक लोक अजूनही ही सुधारले नाहीत अशी चर्चीलीय मनोवृत्ती तुमची आहे... आहोत आम्ही आणि आमचे नेते मूर्ख बरे मग पुढे? ते आमच्या हिताची कामे करतात की नाही हे ते आणि आणि आम्ही बघून घेऊ ना... त्यासाठी तुमची खवट चिंता आयात करण्याची का ssssssss ही गरज नाही.(असला अवग्रह तुम्हाला फार आवडतो म्हणून मुद्दाम serve केला आहे.)तुमच्या त्या अमेरिकेत लाच नाही का? असेल तर आपल्या नाकाचा शेम्बूड पहिला पुसा ना. मग आमच्या गरीब भ्रष्ट, धूळभरळ्या, नालायक देशाची टिंगल करा....
|
Zakki
| |
| Friday, April 25, 2008 - 12:18 pm: |
| 
|
आजच्या मराठीत "अबे, तुम तो म्येरा राडाच करनेकू निकले! यकदम personal लेके ठेन्श्यन नही लेनेका, क्या??" तुमच्या त्या अमेरिकेत लाच नाही का? फाऽऽर फाऽऽऽऽरच मोठ्या प्रमाणावर आहे. तसे अमेरीकेत बरेच काही वाईट आहे, नि त्यावर काय कमी टीका होते का? जास्तीत जास्त आधी नि जास्तीत जास्त कठोर टीका अमेरिकनांचीच. पण त्याबद्दल टीका करणार्यांवर रागावून लोक थांबत नाहीत. बहुमताला आवश्यक वाटली तर त्या दृष्टीने पावले उचलली जातात. नि नाही केली सुधारणा (इराक युद्ध, कर्ज) म्हणून इतरांनी टीका केली तरी त्याचा कुणाला त्रागा करावासा वाटत नाही. तुम्ही मात्र वैयक्तिक माझ्यावरच घसरलात! एव्हढे काय रागावता? जे पेपरात वाचून गंमत वाटली त्यावर लिहीले. थोरामोठ्यांना असा राग येत नाही. असे म्हणा: "आम्ही जुनी भारतीय संस्कृति, भाषा, चालीरिती, खेळ इ. धुडकावून लाऊन परदेशी खेळ, भाषा अंगिकारली आहे. इंग्रजीशिवाय स्वत:च्या आईशी सुद्धा बोलता येत नाही अशी परिस्थिति आहे. आज आम्ही आमच्या देशातल्या हुष्षार, कर्तुत्ववान अश्या लोकांपेक्षा बाहेरच्या देशातल्या खेळाडू, नाच्या पोरी यांनाच पैसे देऊन बोलावून घेऊ शकतो. आमच्याकडे अत्यंत हुषार, कर्तुत्ववान असे लोक आहेत. पण बाहेरच्या देशांनी त्यांचा जेव्हढा चांगला उपयोग करून घेतला तेव्हढा आम्ही करून घेणार नाही. कारण, स्वार्थ, थिल्लरपणा, नालायकपणा ही आजकालची भारतीय संस्कृति आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे" असे म्हणा, काय? रागावू नका!
|
Tonaga
| |
| Friday, April 25, 2008 - 1:55 pm: |
| 
|
इंग्रजीशिवाय स्वत:च्या आईशी सुद्धा बोलता येत नाही अशी परिस्थिति आहे.>>>>> कोण म्हणतो असे? ते काय भारताचे प्रातिनिधिक चित्र आहे काय? किंवा गेला बाजार माहाराष्ट्राचे? अहो अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली अन तिकडे पश्चिमेकडे नजर लावून बसलेल्यानाच मराठी बोलणे ब्याकवर्ड की काय वाटते. किंवा पुण्यामुम्बैच्या वूड बी अमेरिकनाना.आमच्या वडगाव बुद्रुक अथवा ऐतवडे, उमरेडातल्या लोकाना इंग्रजी ऐकायलाच मिळाले नाही तर बोलणार काय कपाळ.तुमचा जेवढा संबंध येतो तोच महाराष्ट्र आहे असे समजण्याचे कारण नाही.दीड दोन टक्के बाटग्यांवरून तुम्ही सर्वाना कसे काय झोडपता?विद्यापीठांचे आवार, मॅकडोनाल्दचे काऊन्टर, बरिस्ता किंवा कॉफी डेचे अड्डे अथवा बालगंधर्व, एन सी पी एचे प्रांगण म्हणजे महाराष्ट्र नव्हे....
|
Zakki
| |
| Friday, April 25, 2008 - 4:14 pm: |
| 
|
अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली अन तिकडे पश्चिमेकडे नजर लावून बसलेल्यानाच मराठी बोलणे ब्याकवर्ड की काय वाटते. किंवा पुण्यामुम्बैच्या वूड बी अमेरिकनाना. माझ्या उद्वेगाचा रोख त्यांच्यावरच आहे. वडगाव बुद्रुक किंवा ऐतगाव वगैरेचे लोक चांगलेच आहेत. पण जे स्वत:ला शिकले सवरलेले, श्रीमंत समजतात ते असे परकीय देशांकडे नजर लावून बसतात, त्यांचीच संस्कृति मी वर्णन केल्याप्रमाणे आहे. माझ्या मते भारतात प्रगति होत आहे, चांगलीच वेगाने होऊ शकते, पण जरा राजकारण्यांना ताळ्यावर आणा. नि ते काम श्रीमंत, शिकलेलेच करू शकतात. पण दुर्दैवाने त्यातले फार थोडे यात लक्ष घालतात, याची खंत.
|
विषयाला धरुन बोला!!!!!! बाकी 'महाजन असते तर भाजपात नसते' असा 'शोध' भाजपाच्या कुठल्यातरी संशोधकाने लावलाय. पण तो संशोधक कोण आहे हे वृत्तपत्रात आलेलेच नाही. नुसतेच 'वरिष्ठ नेते' अस लिहुन आलय. हा वरिष्ठ नेता कोण आहे???
|
Uday123
| |
| Friday, April 25, 2008 - 6:17 pm: |
| 
|
टोणगा यांनी त्यांचा उत्साह आवरायला हवा होता असे मला वाटते, टोकाची वैयक्तिक टिका वाचायलाही चांगली वाटत नाही, काही वाक्य तर खुपच अर्थहीन आहेत. तुम्ही प्रत्येक मताशी सहमत नसालही पण म्हणुन मुळ मुद्दा (येथे एनरॉन किवा महाजन) सोडुन वयक्तिक पतळीवर लिहणे शोभत नाही. मला स्वत:ला वाचुन यातना झाल्यात. प्रत्येक मायबोलीकराची लेखन शैली वेग-वेगळी असते, काही मते तुम्हाला पटतात, काही नाही पटत. पण येथे येणार्या प्रत्येकाची मनापासुनची तळमळ ही "आपला देश, आपली भाषा, आपली माती" यात (आहे त्या परिस्थीतीत) सुधारणा घडावी हीच असते असे मी मानतो. आणि बरेचवेळा ती होताना दिसत नाही म्हणुन आपला त्रागा देखील होत असतो, असो.
|
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2986375.cms आपलया जबरदस्त कर्तृत्वाने कोंग्रेसचे नेता बनलेले परम आदरणीय, बुद्धीवान, रूपसुंदर, तरुण, तडफदार, बाणेदार, कर्तव्यकठोर नेता राहुल गांधी यांनी मला युवराज म्हणू नका असे आसपासच्या लोकांना सांगितले. ह्या एकाच कृतीने ते विवेकानंद, गांधीजी, नेहरु, इंदिराजी, राजीवजी, संजयजी, टिळक, सुभाषचंद्र, राम, कृष्ण, येशू, शिवाजी, राणा प्रताप, गुरु गोविंदसिन्ग, नानक, महर्षी कर्वे, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास, गौतम बुद्ध, महावीर, आंबेडकर, फुले ह्यांच्यापेक्षा कैक पटीने थोर असल्याचे निर्विवाद सिद्ध झाले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू असल्याचे ऐकिवात असल्याचे कळते. त्यांना भारतरत्न द्यावे व प्रत्येक शहरात किमान एक मोठा रस्ता वा एक मोक्याचा चौक ह्यांना त्यांचे नाव द्यावे असा प्रस्तावही जोर धरतो आहे. बहुधा लवकरच तसा ठराव लोकसभेत पास करण्यात येईल. धन्य तो भारत देश ज्याला असा थोर्थोर नेता मिळाला आणि धन्य त्या माताजी जिने असे रत्न भारताला दिले. भक्त केतकर ह्यावर अग्रलेख लिहितील तेव्हा त्यांच्या लेखणीवर साक्षात सरस्वती नृत्य करेल आणि षड्रसांना पूर येईल ह्याची खात्री आहे.
|
मटा आणी लोकसत्ता वाचणे आता बन्द केलेलेच बरे. त्याना बातमी आणी सम्पादकीय मल्लिनाथी यान्ची सरमिसळ करू नये ही साधी गोष्ट कळत नाही. त्यापेख़्शा सकाळ पुढारी सारख्या प्रादेशिक व्रुत्तपत्रान्चा दर्जा चान्गला आहे.
|
Zakki
| |
| Monday, April 28, 2008 - 1:03 pm: |
| 
|
मी नेहेमी म. टा. वाचतो. त्यातले हसा लेको हे सदर मला आपल्या मायबोलीवरील विनोद या सदरापेक्षा जास्त चांगले वाटते. त्याच प्रमाणे सकाळ मधले चिंटू, व्यंगचित्र हेहि चांगले असतात. लोकसत्ता मधील व्यंगचित्रहि मी पहातो. तसेच आजकाल फक्त इस्रो चे दहा उपग्रहांचे एकदम प्रक्षेपण, मोठी दुर्बीण भारतात बनवली, रस्ते बुजवण्यासाठी नवीन तंत्र वापरणार, अश्या सकारात्मक बातम्या फक्त वाचतो. पूर्वी क्रिकेट बद्दल पण वाचत असे, पण आता गावगुंडांच्या मारा मार्या नि नाच्या पोरींचे तमाशे, यात क्रिकेट कुठेतरी हरवून गेले आहे. बाकी काही वाचले तर तर टाळकेच सटकते, नि मग अद्वा तद्वा लिहील्या जाते. बाकी शेंडेनक्षत्र, अहो तुम्ही जरी उपहासाने लिहीले असले तरी त्यातला शब्द नि शब्द खरा होईल हो भारतात! काय भरवसा नाही!
|
http://ia.rediff.com/news/2008/may/03food.htm भारतात व चीनमधे सुबत्ता आल्यामुळे जास्त लोक पौष्टिक, सकस अन्न खाऊ लागले म्हणून जगात अन्नटंचाई आली आहे. ---इति बुश अध्यक्ष होण्याआधी अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांची नावे घेताना ततपप करणारे हे गृह्स्थ आता निदान दोनचार देशांची नावे आत्मविश्वासाने घेऊ शकतात हेही नसे थोडके. पण ही कारणमीमांसा नवीनच आहे. मग अध्यक्ष महोदयांनी ह्या देशांत म्याक, केम्फ्राचि वगैरे कचरान्न विकणारी (जंक फूड) रेस्टॉरंटे मोठ्या प्रमाणात उघडायला उत्तेजन देऊन चोख उत्तर द्यावे!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|