|
Zakki
| |
| Sunday, March 30, 2008 - 9:51 pm: |
| 
|
जगाचा फौजदार होण्याइतकी नाही. रशियाला जगावर राज्य करायचे आहे, असे रशियाने म्हंटले नाही. मुसलमानांनी म्हंटले की मुसलमानांना जगावर राज्य करायचे आहे. मी आपले विचारले की रशिया व चीनचा सुद्धा नाश नाही केला तर या मुसलमानांना जगावर राज्य कसे करता येईल? का इथे कुणाला खात्रीलायक माहित आहे की भारत, अमेरिकेनंतर ते चीन रशिया पण बळकवणार आहेत? काही सांगता येत नाही. इथे अनेऽक विद्वान लोक आहेत मायबोलीवर!
|
पंडित नेहरु आरक्षणाच्या विरोधात 12 Apr 2008, 0148 hrs IST म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षणाच्या विरोधात होते. नोकऱ्यांमधले आरक्षण देशाला केवळ दुय्यम दर्जाकडे नेणारेच नव्हे तर घातक आणि मूर्खपणाचे पाऊल आहे, असे मत पंडित नेहरूंनी देशातल्या तमाम राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना २७ जून १९६१ रोजी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केल्याचा खळबळजनक उल्लेख भाजप नेते अरुण शौरींचे नवे पुस्तक आरक्षणाचा दंश मधे प्रकाशित झाला आहे. नेहरूंचे पत्रही शौरींनी आपल्या पुस्तकात प्रसिद्ध केले आहे. पुस्तकातील उल्लेखानुसार पंडित नेहरूंनी या पत्रात म्हटलेल आहे की, अनुसूचित जाती जमातींना मदतीची आवश्यकता आहे याबद्दल कोणाचेही दुमत नाही, मात्र त्यांच्या सहाय्यासाठी जे संकेत आणि नियम रूढ करण्यात आले आहेत, ते त्रासदायक ठरत आहेत. व्यक्तिश: मी (नेहरू) कोणत्याही आरक्षणाचे विशेषत: नोकऱ्यांमधील आरक्षणाचे अजिबात समर्थन करू इच्छित नाही. याचे कारण हे धोरण कौशल्याला मारक असून, देशाला दुय्यम दर्जाकडे नेणारे ठरेल. आरक्षण धोरणाचे दीर्घकाळ समर्थन केले तर हा देश सर्व काही गमावून बसेल.
|
गांधी-नेहरू घराण्याचे स्वयंघोषित भाट, लाळघोटे, लाचार, निगरगट्ट अशी कितीही विशेषणे लावली तरी फिकी पडतील असे कुमार केतकरांचे कर्तृत्व आहे. गांधी-नेहरू घराण्यातल्या व्यक्तींना नसलेले गुण जोडून त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करताना आणि त्याचवेळी भाजपसंघ परिवारावर टीका करताना त्यांची जीभ अतिशय सैल सुटलेली असते. हा अग्रलेख वाचा. प्रियांकाची स्तुती करताना त्यांनी राजीव गांधींबद्दल थापेबाजी केली आहे. म्हणे १९८४ साली कॉंग्रेसचे गुंड शिखांना कापून काढत असताना राजीव गांधी त्यांचे हत्याकांड थांबविण्यासाठी गल्लीबोळातुन फिरत होते. अशी थाप सोनिया गांधींनी सुद्धा मारलेली नाही. राजीव गांधींनी शिखांचे हत्याकांड थांबवण्यासाठी खरोखर प्रामाणिक प्रयत्न केले असते, तर निदान त्यांनी हत्याकांडात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या एच.के.एल. भगत, जगदीश टायटलर, ललित माखन, धरमदास शास्त्री इ. गुंडांना मंत्रीपदाचे बक्षिस न देता तुरूंगात टाकले असते. http://www.loksatta.com/daily/20080417/edt.htm केतकारांचा ढोंगीपणा याच अंकात एका वाचकाने उघडकीला आणलेला आहे. केतकरांनी तो छापून आपण कसे दिलदार आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वाचकाने केलेल्या सूचना अंमलात आणण्याचा ते अजिबात प्रयत्न करणार नाहीत. http://www.loksatta.com/daily/20080417/lokma.htm
|
या हुजर्या केतकराला कॉंग्रेस कुठल पद का देत नाही???तो बिचारा बिनकामाचा हुजरेपणा वर्षानुवर्षे करतोय. बाकी सरळ सरळ खोटेपणा आहे. शिख मारले जात होते तेंव्हा राजीव गांधी आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांबरोबर होते. राजीव गांधींनी 'शिखांना धडा शिकवायलाच हवा' असे म्हटले होते असे म्हणतात.बाकी केतकरांचा जावईशोध हे दाखवुन जातो की राजीव गांधींना कोणीही विचारत नव्हते. कारण ते गल्लिगल्लीत हिंडत होते तरीही शिखांच्या हत्या थांबल्या नाहीतच.
|
परवा ती प्रियांका आणि नलिनीच्या भेटीची बातमी दुरचित्रवाहिनीवर बघितल्यापासुन कधी एकदा केतकरांच्या चिरंजिवानी उधळलेली स्तुतीसुमने लोकसत्ता मधे वाचतेय असे झाले होते.पण काही केल्या ती लोकसत्ताची साईट काही उघडत नव्हती.म्हणुन तोंडसुख घ्यायला अंमळ उशिरच झाला! केतकरांनी त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे हुजरेगिरी केली हे उघड पण काहीही म्हणा प्रियांकाचे टायमिंग जरा चुकलेच किंवा वाहिनीच्या गांधी नेहरु समर्थकांना ही बातमी जरा उशिरानेच समजली. भेटिच्या दिवशीच माहित झाले असते तर झुंबड करुन त्या संवेदनशील भेटिचे थेट प्रक्षेपण दाखवले असते. राजीव यांचा अंत ज्याप्रकारे झाला ते अतिशय दुखदायी होते हे अगदी खरेच पण म्हणुन त्यांना का मारले याचा शोध घेण्याची संवेदना व इच्छा एकदम अचानक त्यांची सोनपुतळी लेक प्रियांका हिच्यामधे कुठुन जागृत झाली देव जाणो? त्याही पेक्षा या भेटिचे कुठल्याही प्रकारचे भांडवल (राजकीय भांडवल)करु नये अशी विनंती तिने प्रसारमाध्यमांना केली होती(असे नुसतेच म्हणायचे बरं का!).पण ते कुठले ऐकायला?ही बातमी लाळघोटेपणा करत सगळ्यात आधी कोण दाखवतो यासाठी स्पर्धाच लागली होती. प्रियांकाने म्हणे शंका बोलुन दाखवली की "तिच्या वडिलांच्या हत्येमागे लिबरेशन टायगर अर्थात लिट्टे बरोबर स्थानीक राजकिय पक्षाचा देखिल हात असु शकतो". आता हे सांगायला प्रियांका कशाला हवी शेंबड पोर देखिल सांगेल. आणि राजीव हत्येचा शोध चालू असताना सध्या जे UPA चे घटक पक्ष आहेत त्यांच्यापैकी काही पक्षाच्या लोकांची नावे देखिल संशयितांच्या यादीत होती. नशीब! प्रियांकानी राष्ट्रिय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यावर राजिव हत्येचा आरोप नाही केला?आणि बहुदा केतकर पण विसरलेच यांची नावे घ्यायला! हे नेहरु गांधी घराणे भारतीय जनतेची दिशाभुल करण्याचा आपला वडिलोपार्जित उद्योग(धंदा असे वाचावे) कधी बंद करणार देवच(सोनीयादेवीच) जाणो बहुतेक केतकर आहेत तो पर्यंत तरी हे असेच चालु राहणार.
|
केतकर आणि सोनियावर अशी टीका करू नका. तो स्वामिनिनिष्ठ टोणगा दावे तोडून इकडे चाल करून येईल. यमसदनातला हा पुंगव सोनियाच्या दावणीला कधी बांधला गेला देव जाणे. असो. केतकरांच्या सोनियानिष्ठेचे आणि संघद्वेष्टेपणाची उदाहरणे द्यावीत तितकी थोडीच. मागे एकदा कुठल्याशा क्रिकेट सामन्यात इरफान पठाणने मोठा पराक्रम केला होता. इरफान हा मुस्लिम व गुजराथचा. त्यामुळे केतकरांना ही एक पर्वणीच होती. मग बातमीचे शीर्षक होते "मोदींचा भगवा झाकोळला" आता त्या पठाणाच्या कामगिरीचा आणि मोदींचा काय संबंध? पण नाही. केतकरांच्या हिशेबी एका गुजराथच्या मुस्लिमाने काही केले की मोदींच्या तोंडाला काळे फासलेच समजावे! असो. कोळसा उगाळावा तितका काळाच. पण कधी कधी मजा येते उगाळायला!
|
टोणग्याने लिहील्येल्या व त्याचा आवडनार्या (नेहरु, गांधी कॉग्रेंस) विषयांना तुम्ही हात घातलात. काही खैर नाही. आदरनिय लोकमान्यांनी एकदा आगरकरांना अग्रलेखात हलकट म्हणले होते त्याची साक्ष घेउन आज मी केतकरांना काय म्हणू हे विचार करतो. बेशरम की लाळघोटी की अपप्रचार करनारा. ' संध्यानंद ' मध्ये पण असे बेमालुम खोटे छापुन येत नाही? काय म्हणता टोणगे बरोबर आहे की नाही.
|
Dinesh77
| |
| Friday, April 18, 2008 - 6:42 am: |
| 
|
काल दुपारी स्टार न्यूजवर "चापलूस नं. १" हा कार्यक्रम दाखवत होते. त्यात काॅंग्रेस पार्टीचा चापलूस नं. १ अर्जून सिंग ह्यांना दाखवले. कुमार केतकरला विभागून हे award द्यायला काही हरकत नाही.
|
प्रियांका अधिकृत परवानगी न घेता तुरुंगात जाऊन नलिनीला भेटली. तिची भेट अतिशय गुप्त राखण्यात राखली होती. तिच्या भेटीची नोंद सुद्धा तुरुंगाच्या अधिकृत पुस्तकांत करण्यात आलेली नाही. तिच्याकरता सर्व नियम धुडकावून लावल्याचे स्पष्टपणे दिसते. या नियमबाह्य वर्तनाचा पुसटसा उल्लेखसुद्धा केतकरांनी केलेला नाही. हेच वर्तन एखाद्या भाजपच्या माणसाने केले असते तर केतकरांनी अत्यंत अर्वाच्य शब्दात निव्वळ ती व्यक्तीच नव्हे तर भाजप, संघ, इ. ची निर्भत्सना केली असती. खालील पत्रे वाचा. http://www.hindu.com/2008/04/18/stories/2008041854781002.htm माधव गडकरी, विद्याधर गोखले असे नामवंत संपादक ज्या वृत्तपत्राला लाभले त्यांच्या जागी अशी व्यक्ती बसलेली पाहून कसेतरीच वाटते.
|
Deshi
| |
| Friday, April 18, 2008 - 4:47 pm: |
| 
|
म्हणजेच काय गांधी-नेहरु फ्यामीलीने कायदे तोडले तर चालतात, नव्हे त्यांची स्तुती केले जाते. त्यांच्यासाठी कायदेच नाहीत पण त्यांचा विरुध्द काही लिहीले की टोणगा आणि विजयराव धावुन येतात.
|
Uday123
| |
| Saturday, April 19, 2008 - 3:45 pm: |
| 
|
म्हणे १९८४ साली कॉंग्रेसचे गुंड शिखांना कापून काढत असताना राजीव गांधी त्यांचे हत्याकांड थांबविण्यासाठी गल्लीबोळातुन फिरत होते. --- असले पत्रकार खरोखरच कधीतरी सत्याचा 'औंश' तरी लिहितील कां? नव्हे असे खोटे लिहुन ते जनतेचा उरलासुरला विश्वास देखील घालवुन बसतात, आणि प्रामाणिक पत्रकारांचे काम अवघड करुन बसतात. बोट क्लब वर १९ नोवेंबर १९८४ ला, राजीवजींचे वक्तव्य, “Some riots took place in the country following the murder of Indiraji. We know the people were very angry and for a few days it seemed that India had been shaken. But, when a mighty tree falls, it is only natural that the earth around it does shake a little.” शेवटच्या वाक्यात मला तर चक्क हिंसेचे समर्थन केलेले दिसते आहे. मला स्वत:ला काहीही वावगे वाटत नाही जर मुलगी आपल्या पित्याच्या हत्या करणार्याला कायद्याच्या चौकटीत भेटली तर.
|
केतकराना कॉन्ग्रेस ने साधे पद सुद्धा दिलेले नाही तरीही ते गान्धी घराण्याची तोन्ड फाटेपर्यन्त नसलेले गुण चिकटवून स्तुती करतात. कर्मण्येवाधिकारस्ते कि काय
|
Tonaga
| |
| Sunday, April 20, 2008 - 3:13 pm: |
| 
|
केतकराना राजकीय महत्वाकांक्षा नसेलच असे नाही.पत्रकाराना राज्यसभेची तिकिटे देण्याची टूम निघाली आहे. आधी प्रीतिश नन्दी, मग संजय राऊत, भारतकुमार राऊत इत्यादि.केतकर हे आणिबाणीपर्वापासून इन्दिरा समर्थक आहेत.मला वाटते त्यानी ज्वालामुखीच्या तोंडावर असे पुस्तकही त्या काळी लिहिले होते... एक्सप्रेस ग्रुप हा कॉन्ग्रेस विरोधकच आहे पण लोकसत्तेत सम्पादक करताना एक्सप्रेसच्या समोर केतकरांचा इतिहास आणि बांधिलकी असणारच.गोएन्कांनन्तर लोकसत्ताने धोरण बदललेले दिसते
|
Chinoox
| |
| Sunday, April 20, 2008 - 6:12 pm: |
| 
|
लोकसत्तेतील हा अग्रलेख केतकरांनी लिहीलेला नाही..
|
Uday123
| |
| Sunday, April 20, 2008 - 7:24 pm: |
| 
|
अग्रलेख म्हणजेच संपदकीय असते असा माझा समज आहे, संपादकीय म्हणजे वर्तमान पत्रातील संपादकाचे मत. सध्या कोण आहे लोकसत्ताचे संपादक?
|
गोपिनाथ मुंडेंनी असा अचानक राजीनामा कसा काय दिला???
|
राजकीय स्टंटबाजी आहे. मुंढे भाजपतून गेले म्हणून मला तरी काऽऽऽऽहीही सुखदु:ख नाही. महाजन, अडवानी, मोदींसारखा हा माणूस मला तरी वलयांकित वाटत नाही. थोडा वेळ नाटक चालेल आणि माध्यमांना चघळायला काहीतरी सनसनाटी मिळेल इतकेच.
|
>>महाजन, अडवानी, मोदींसारखा हा माणूस मला तरी वलयांकित वाटत नाही. हा हा... मस्त विनोद. वा. मग अशा अवलयांकित नेत्याला उपमुख्यमंत्री का केले होते बॉ? वंजारी समाजाची मते पुढे मिळावीत म्हणून की काय? आणि गडकरी, तावडे, राम नाईक वगैरे स्वत:च्या मतदारसंघातूनही नीट निवडून न येऊ शकणार्या धेंडांपेक्षा खरे लोकसमर्थन असणार्या नेत्याची गळचेपी का होते बॉ? तथाकथित वलयांकित महाजनसुद्धा किती वेळा ’पडले’ ते पहा. मीडियाला पैशे दिले की कोणीही वलयांकित होतो. महाजनांचे उद्योग विसरलात वाटतं
|
भाजपला मोठ करण्यात महाजनांचा वाटा मोठा होता यात माझ्यामते तरी काही वाद नसावा. मुंडेंबाबत म्हणायचे तर ते महाराष्ट्र भाजपात सध्या सगळ्यात पॉवरफ़ुल आहेत यातही काही वाद नसावा.
|
Uday123
| |
| Tuesday, April 22, 2008 - 6:05 pm: |
| 
|
premature रुसवे फ़ुगवे... मुंढे साहेबांचा रुसवा पळाला.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|