Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 30, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through March 30, 2008 « Previous Next »

Lalu
Friday, February 22, 2008 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाहिली होती, मग? :-)
हा माणूस (ओबामा) म्हणे 'स्फूर्तीदायक' भाषणे वगैरे करतो, मग उस्फूर्तपणे डिबेट मध्ये का नाही बोलता येत? स्पीच रायटर्स नी लिहून दिलेले पाठ करुन बोलता येते फक्त. काल बरेच वेळा हिलरी म्हणेल त्याला 'हो हो' करत होता, आणि स्वतःहून जे बोलत होता ते किती विस्कळीत! हे पाहिले की नाही तुम्ही? माणूस?


Anjali28
Friday, February 22, 2008 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ditto लालू. काल अगदीच निष्प्रभ वाटला ओबामा. शिवाय त्याला जास्त झुकतं माप नी सहानुभूती दिली (कारण नसताना) असं वाटलं. 'inspiring speech' करणे आणि वेळ आल्यावर 'inspiring' वागणे यात जमीन्-आस्मानचा फरक असतो हे गेली आठ वर्षे पहातच आहोत आपण. :-)

Maanus
Friday, February 22, 2008 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो डेमोक्रॅटीक पार्टी वाचवत होता, त्यांच्या लोकांमधे भांडण आहे असे दाखवत नव्हता. ह्या उलट हिलरी ने अती पर्सनल जावुन स्वतःच्या नवार्‍याबरोबरची भांडणे पण तीथे मांडली. ref: when were you tested most.

anyway जे ओबामाला साधायचे होते, ते त्याने साधले. स्वतः एकही वाईट शब्द न बोलता, तीलाचा वाईट बोलायला लावले. :-)


Maanus
Friday, February 22, 2008 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण एक मानले पाहीजे, इथे free speech rights खरेच आहेत, काय लोक उठ सुठ बुश ला नाव ठेवतात, असे भारतात कुणी केले तर काय होईल माहीत नाही.

Lalu
Friday, February 22, 2008 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तो डेमोक्रॅटीक पार्टी वाचवत होता, त्यांच्या लोकांमधे भांडण आहे असे दाखवत नव्हता. anyway जे ओबामाला साधायचे होते, ते त्याने साधले. स्वतः एकही वाईट शब्द न बोलता
कालची तुम्ही पाहिलेली पहिलीच डिबेट वाटते! NH प्रायमरीच्या आधीची पाहिली होती का? मग तो काय बोलू शकतो ते कळले असते!
अंजली, मलाही तसंच वाटतं. बोलण्याबरोबरच जे करायचे आहे त्यबद्दल काही ठोस प्लॅन हवा? जे पाठिंबा देतायत ते शब्दांना भुलतायत, जरा तरी healthy skepticism नको का दाखवायला? तो वाईट आहे असे नाही, पण 'काय करणे शक्य आहे आणि काय नाही' याबद्दल अनुभव कमी आहे.



Maanus
Friday, February 22, 2008 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो जाहो! मी तरुण आहे.

नाही आधी च्या पाहील्यात, पण तेव्हा राजकारणामधे मधे जास्त रस नव्हता, पण कार्यालयात माझ्या टोळीत सगळे लोक सध्या राजकारण करत असतात. मग निट लक्ष देवुन ऐकु लागलो.

वा माझे कदाचीत हे पहीले आणि शेवटचे संपुर्ण मराठी परिक्षीदीत लेखण असेल. टाळ्या.


Asami
Friday, February 22, 2008 - 10:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो वाईट आहे असे नाही, पण 'काय करणे शक्य आहे आणि काय नाही' याबद्दल अनुभव कमी आहे. >>अनुभवी मंडळींनी फ़ार दिवे लावलेत इतकी वर्षे तेंव्हा इतरांना chance देउया असा मतप्रवाह आहे सध्या लालू. NYTimes बघत नाहीस का ?

Shendenaxatra
Tuesday, February 26, 2008 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://news.bbc.co.uk/2/hi/americas/7263783.stm
ओबामाच्या फेटेधारी फोटोमुळे खळबळ!

म्हणे कुण्या हिलरीसमर्थकांनी दोन वर्षापूर्वी काढलेला, पारंपारिक अफ्रिकन पोषाखातला हा ओबामाचा फोटो एका राईट विंगी साईटवर टाकवला. (ड्रज रिपोर्ट)
म्हणजे ओबामा कसा वेगळा आहे, त्याची संस्कृती कशी परकी आहे हे लोकांच्या मनावर ठसवून त्याला पराभूत करायला.

अगदी कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन. ह्यामागे खरोखरच हिलरीचा हात होता की नाही ते देव जाणे.


Tanyabedekar
Monday, March 17, 2008 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनिया पुराण.. लेखक (बहुतेक कुमार केतकर)..
http://www.loksatta.com/daily/20080317/edt.htm

Uday123
Monday, March 17, 2008 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांचा जन्मच मुळी खुप उशीरा झाला हेच या अभागी देशाचे दुर्देव ही लेखकाची खंत. लोचट शब्द पण गुळगुळीत वाटतो.

२००४ मधील विजय केवळ सोनियांच्या एकाकी झुंजीमुळे, मग १९९८- ८९ मधील केंद्रात, तसेच २००४ नंतर जी राज्ये गमावली तो पराजय कोणाचा? २००४ चा विजय हा विरोधकांचा फ़ाजील आत्मविश्वास होता हे पण हा भाट विसरल्याचे दाखवतो.



Jaymaharashtra
Monday, March 17, 2008 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांधी नेहरु घराण्यांची हुजुरेगिरी करण्यात धन्यता मानणार्‍या केतकरांच्या या चिरंजीवांकडुन इतर कुठली अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
सोनियांच्या कौतुकाचे पोवाडे जितके कॉंग्रेसजन गात नसतील तितके केतकर गातात.
त्यांचा जन्मच मुळी त्यासाठी झाला असावा! विषाद एकाच गोष्टिचा की या पुत्राने महाराष्ट्राच्या भुमीत जन्म घेतला.


Zakki
Monday, March 17, 2008 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो तो कुमार केतकर सोनियाभक्त!

काही जण साई बाबाबाचे, काही इतर बाबांचे भक्त! त्यांनी पैसे देऊन त्यांच्या बाबांविषयी काही काही छापले तर तेहि छापून येईल.

त्याचे ज्ञान ते केव्हढे, त्याची जगाची माहिती तरी किती! नसेल आले त्याच्या लक्षात.

जरा त्या कुमार केतकराला शांतपणे सांगा की अहो, भारत आता लोकशाही झाला आहे.त्याला म्हणावे आता असे एकाच व्यक्तीचे गोडवे गाणे पुरे. इतके सगळे चांगले लोक आहेत भारतात! तुम्ही उगाच असले काहीतरी लिहून स्वत:चेच हसे करत आहात!

असे नीट समजवा हो त्याला. वयाने मोठा असला तरी बुद्धीची वाढ दोन वर्षाच्या मुलाएव्हढीच आहे हो. दोन वर्षाच्या मुलाला कसे, इकडे तिकडे गेले तरी जरा वेळाने आईच हवी असते! मग हळू हळू प्रेमाने त्याला शाळेत घालतात. तसे करायचे!

इतके हुषार मानसतज्ञ, मेंदूची शस्त्रक्रिया करणारे तज्ञ भारतात असताना कुणाच्याच कसे लक्षात येत नाही हे?

मी कालच कदाचित् पाहिला. आश्विनी भावे यांना घेऊन जा भारतात. नि त्यांच्या मानस शास्त्रज्ञ मित्राला बोलवा. त्या करतील हे काम!

निदान एखाद्या मातेच्या हृदयाला तरी हे समजते ना???




Shendenaxatra
Monday, March 17, 2008 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या गान्धी-नेहरु घराण्याच्या हुजर्‍याचे वरचेवर नेहरु गुणगानही चालू असते.
ह्याच्या मते नेहरुंची तृतीयपंथी आय मीन नॉन अलायिन्ड चळवळ म्हणजे अमेरिकेच्या आणि रशियाच्या साम्राज्याला दिलेला जोरदार शह! ह्या विद्वानाने असाही शोध लावला की नेहरुने आपल्या ह्या चळवळीइच्या जोरावर क्युबा मिसाईल प्रकरणी तिसरे महायुद्ध होऊ घातले होते ते एकहाती टाळले! वा!

ही चळवळ चार दरिद्री राष्त्रांची टाळकी जमवून केलेली. त्यातील भारतासारखी काही रशियाच्या ताटाखालची मांजरे. निव्वळ नावाला तृतीयपंथी. इतक्या दरिद्री, शामळू देशांच्या हालचाली ताकदवान देशांच्या खिजगणतीतही नव्हत्या. पण केतकरांच्या मते नेहरु हे त्यावेळच्या जगताचे अनभिषिक्त सम्राटच जणू.

काय जबरदस्त नशा चढली आहे ह्या माणसाला!
एका वाचकाने केतकरांच्या ह्या लाडक्या मूर्ख विधानाला अगदी अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि चोख उत्तर दिले आहे.




Marhatmoli
Thursday, March 20, 2008 - 6:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजकाल केतकर 'आशंका' सारखे शब्द वापरायला लागलेत. आघाडिच्या (दोन्हि अर्थांनि बरका :-)) मराठि वृत्तपत्राचि हि अवस्था मग मराठिचे होणार काय?

एके काळि कुमार केतकर ह्या नावाला केवढे वलय होते, हे गृहस्थ अतिशय विद्वान आहेत यावर ह्यांच्या सध्याच्या करामतिंमुळे विश्वास ठेवण अवघड होत चालल आहे. काय विचार करुन ह्या माणसानि स्वत्:चि एवढि अधोगति करुन घेतलि देव जाणे.


Zakkas
Saturday, March 29, 2008 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


फ़िटना पाहिलात काय?

'धूम मचा दे' सुरू आहे.

भारतात प्रतीक्रीया काय?

पहा


http://www.unitedamericancommittee.org/

Zakki
Saturday, March 29, 2008 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात काय व्हायचय्? भारतातल्या सगळ्यांना हे असले प्रकार गेली हजार वर्षे माहित आहेत. फारतर केतकर एक लेख लिहीतील लोकसत्तेत, नि म्हणतील, पहा, हिंदू अतिरेक्यांचा अप प्रचार! जोपर्यंत श्री पूजनीय महामाता सोनियादेवी आहेत तो पर्यंत त्यांचे प्रयत्न असफलच होतील. मग कदाचित् सामनावाले काहीतरी खमंग, नि तिखट्ट लिहीतील.

जिथे हुसेनच्या चित्रांचे समर्थन खुद्द हिंदूच करतात, तिथे 'फिटना' चे समर्थन करायला सगळे 'विचारवंत' नि 'सेक्यूलर' लोक अहमहिकेने पुढे येतील.

एखादा धमाल चित्रपट आला की सगळे विसरून जातील.

भारतात बाकी काही होणार नाही.

खरी गंमत मायबोलीवर. काही लोक त्याच्या विरुद्ध लिहीतील. इतर काही म्हणतील, महम्मद पैगंबराचे जोडे उचलायची तरी तुमची लायकी आहे का? मुसलमान धर्म किती चांगला आहे तुम्हाला माहित आहे का? उगाच दहा बारा लाख लोकांच्या कृत्यांवरून सबंध समाजाला दोष देणे चूक आहे! तुम्हाला अक्कल आहे का? हिंदूंनी काय कमी अत्याचार केले का? तुम्ही हिंदूत्ववादी अतिरेकी लोक उगाच लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करताहात, पण जोपर्यंत श्री पूजनीय महामाता सोनियादेवी आहेत तोपर्यंत आम्ही असे होऊ देणार नाही!

वगैरे वगैरे.


Zakki
Saturday, March 29, 2008 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गोष्ट लक्षात आली. त्या लोकांनी ज्यू, ख्रिश्चन, हिंदू, बुद्ध इ. धर्म नष्ट करा, जगावर राज्य करा म्हंटले, पण चीन व रशिया यांच्याबद्दल काय करणार ते नाही सांगितले. त्यांना माहित आहे ना की चीन व रशिया या जगातच आहेत?!

बाकी बुशच्या ख्रिश्चनांची अक्कल नि कर्तृत्व पाहिले की त्यांना ख्रिश्चनांची भीति नाही, ज्यू लोकांशी लढत आहेतच.

हिंदू नि बुद्ध यांच्यात काहीच दम नाही! पुळचट, घाबरट लोक. तेच मुसलमानांना मदत करतील. कुमार केतकर, सोनिया, सेक्यूलर, विचारवंत लोक खूप आहेत भारतात, मुसलमानांना मदत करायला. थोडे पैसे तोंडावर फेकले की हिंदूच हिंदूंना मारतील.

पण चीनला जास्त चिडवले किंवा रशियाला, तर काय होईल त्याचा भरवसा नाही!! म्हणून त्यांना घाबरतात.


Tonaga
Sunday, March 30, 2008 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण चीनला जास्त चिडवले किंवा रशियाला, तर काय होईल त्याचा भरवसा नाही!! म्हणून त्यांना घाबरतात.

>>>>रशियाला कोण घाबरतेय.? त्यालाच स्वत्:चे बूड उचलणे मुष्कील झाले आहे.

Paul
Sunday, March 30, 2008 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोणगा.
मागच्या ८ वर्षातील रशिया ची पुतीन च्या लीडर शीप खाली होत असलेली प्रगती नक्की बघा.


Tonaga
Sunday, March 30, 2008 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पॉल, प्रगती आहेच.पण ती आता लीडरशिप किंवा जगाचा फौजदार होण्याइतकी नाही. झक्की म्हनाले रशियाला लोक घाबरतात म्हणून म्हटले :-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators