|
Zakki
| |
| Sunday, March 30, 2008 - 1:56 pm: |
| 
|
शिवाय त्या सर्वाला वेळ फार लागतो. नि चांगली कामे करणार्याला प्रसिद्धि नि पैसा जास्त मिळत नाही. राज पहा बरे कसे झटक्यात प्रसिद्ध झाला. म्हणून राडा, बोंबाबोंब केली की झाले. राड्यात कदाचित् काही लोक जखमी होत असतील, कुणि मरतीलहि, त्यांना स्वार्थत्यागी, हुतात्मे म्हणावे. त्यांच्या पुतळ्यासाठी पैसे गोळा करावे. कामी पडतात, निवडणूक लढवायला. मग निवडून यावे, दादागिरी करावी, जोपर्यंत सत्ता मिळत नाही, तोपर्यंत आणखी राडा करावा. मग पैसाच पैसा. बाकीचे जाईनात का खड्ड्यात!
|
मी इतका वेळ ह्या चर्चेत भाग घेतला न्हवता पण वरच्या लेखाने राहवले नाही. मी मनसे वा सेनेचा कार्यकर्ता नाही पण तुम्ही लेख संतुलीत म्हणता आहात म्हनुन लिहीतो. रविजी गेले ९ वर्ष महा. राज्य गुंतवनुकीत पाठीमागे आहे व गुजरात पुढे आहे. ह्याचा साक्षात्कार गुरुचरण दासला आता झालेला दिसतोय. आता या मुद्द्यावर उगीच शिवसेना व मनसेला जबाबदार धरनार. व्वा रे न्याय. जरा आर्थीक पुस्तके, ताळेबंद उघडुन पाहा म्हणाव गुरुचरण ला. यासाठी जबाबदार आहे विज. ती आपण पुरवली नाही. दुसरे कारण आहे भ्रष्टाचार जो आपले (महा.तिल) राजकीय नेते करतात. हिटलर व राज ठाकरेद्वयांची तुलना करने म्हणजे उघड द्वेष दुसरे काहीही नाही. ठाकरे विरोधात लिखान मी समजु शकतो पण ईतके म्हणजे केवळ स्टंटबाजी. लेख सोडून द्या. तुम्ही स्वत हिटलर व ठाकरे सारखे आहात हे मानता का? मानत असाल तर तुलना करुन दाखवाल का? गुजरात मध्ये तर ती मोठी दंगल होऊनही आर्थीक वाढ होत आहे व म्हा.तील गुंतवनुक तिकडे जात आहे. मुसलमान हिंदु सोबत चांगले जगत आहेत व सो कॉल्ड चिप लेबर तिकडे जात नाहीये तरी ईंडस्ट्रीची वाढ आहे. यावर त्यांचे वा तुमचे उत्तर काय? तिकडच्या निवडनुकां आधी पण असा विचीत्र प्रसार झाला पण काही फायदा झाला नाही. उगीच काहीही लिहायचे व विरोधासाठी विरोध का करायचा. गुरु ला म्हणवा डोळस विरोध कर.
|
Mandard
| |
| Sunday, March 30, 2008 - 3:13 pm: |
| 
|
मुसलमान हिंदु सोबत चांगले जगत आहेत व सो कॉल्ड चिप लेबर तिकडे जात नाहीये तरी ईंडस्ट्रीची वाढ आहे. यावर त्यांचे वा तुमचे उत्तर काय? ============= केदार UP/Bihari लेबर तीथे पण भरपुर आहे. पण कुणाला किती किंमत द्यायची आणि नाकापेक्षा मोती जड होवुन द्यायचा नाही हे गुज्जु लोकांना बरोबर कळते.
|
Zakki
| |
| Sunday, March 30, 2008 - 10:03 pm: |
| 
|
नाकापेक्षा मोती जड होवुन द्यायचा नाही पण महाराष्ट्रातले लोक 'विशाल बुद्धिमत्ता' असलेले 'पुरोगामी विचारवंत' आहेत. त्यांना वाटते की मराठी भाषा बोलणे, मराठी रितीरिवाज पाळणे हे सगळे संकुचितपणाचे लक्षण आहे. आपण सर्वांना आपल्यात सामावून घ्यायचे तर आपण आधी मराठी सोडून इतर भाषांमध्ये बोलले पाहिजे. आपल्या चालीरिति जुनाट आहेत. आपण पंजाबी, बिहारी चालीरिती पाळून स्वतंत्र भारताचे नागरिक बनू. नि इंग्रजी बोलून जगाचे पण!! महाराष्ट्र, महाराष्ट्र काय घेऊन बसला आहात? स्वतंत्र भारतातला तो केवळ एक भाग. शिवाय 'सेवाभाव' आहेच. आपण नेहेमी इतरांची सेवा करावी. त्यांना मदत करावी. महाराष्ट्रियांपेक्षा इतर लोक किती सुंदर गातात, अभिनय करतात, छान छान 'पुरोगामी' विचार मांडतात! महाराष्ट्रीयांचे काय बघायचे? ते आपल्यातलेच. हं, आता जगातल्या इतर कुणि म्हंटले की सचिन चांगला फलंदाज आहे तर आम्ही मानणार, नाहीतर तो कितीदा शून्यावर बाद झाला ते बघणार! उलट गांगुली मात्र कित्ती कित्ती चांगला, कित्ति सामने जिंकले त्याने. वगैरे वगैरे. हे असले मी इतकेदा ऐकले आहे, वाचले आहे, की मला आता तेच खरे वाटायला लागले आहे.
|
संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेली चळवळ संकुचित आणि आपमतलबी नसेल, तर ज्यासाठी ही चळवळ झाली, त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी मी लढायला उतरलो तर माझ्यावर टीका का? ---राज ठाकरे प्रश्न - आपण मांडत असलेला मुद्दा राजकीय, सामाजिक की सांस्कृतिक? राज ठाकरे - हे बघा! निवडणुका आज नाहीत. दर पाच वर्षांनी निवडणुका होतच असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीला राजकीय आणि निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेली असे म्हणून कसे चालेल? प्रत्येक वेळी त्या वेळच्या परिस्थितीनुसार कार्यक्रम घ्यावे लागतात, भूमिका घ्यावी लागते. माझ्या वक्तव्याकडे किंवा कृतीकडे कोणी कसे पाहावे ते मी ठरवू शकत नाही. - आताचा लढा मराठी भाषेसाठी आहे, की मराठी भाषकांसाठी? - व्यक्तीची ओळख त्याच्या भाषेवरूनच होते. भाषा जगली तर माणसे जगतील आणि माणसे जगली, तर समाज. माझ्या आजोबांचे प्रसिद्ध वाक्य आहे, "स्वाभिमानशून्य माणसे स्वाभिमानशून्य समाज जन्माला घालतात. अशा समाजाला भविष्य नसते. तो फार काळ टिकत नाही.' - आंदोलनानंतर परप्रांतीय घरी परतल्याने अनेक कारखाने बंद पडल्याच्या बातम्या आहेत... - म्हणजे, कारखाने बंद पडेपर्यंत घुसवले होते का? इंडस्ट्रीवाले बाहेरचे. ते माणसेही आणणार बाहेरून. महाराष्ट्रात पुष्कळ मनुष्यबळ आहे; पण यांच्या जाहिराती कधी पाहिल्यात मराठी वृत्तपत्रांमध्ये? ते त्यांच्या वृत्तपत्रांत जाहिराती देणार आणि त्यांची त्यांची माणसे भरणार. राज्य सरकारने खरे तर फतवाच काढला पाहिजे. मराठी वृत्तपत्रांत जाहिराती बंधनकारक केल्या पाहिजेत. यांच्यासाठी आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी द्यायच्या? मग ते "एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज'चे फार्स तरी बंद करा. तिथे मराठी मुलांच्या नोंदण्या किती लाखांच्या घरात गेल्यात ते एकदा पाहा. त्यांना कॉल नाहीत आणि इकडे सगळे बाहेरचे घुसलेले. का? तर स्वस्तात काम करतात म्हणून. - नवा पक्ष स्थापन केलात तेव्हा सर्वसमावेशक भूमिका घेण्याचे ठरवले होते ना? - हो. आजही तेच म्हणतोय. हिरवा, निळा हे रंग मी झेंड्यावर जाणीवपूर्वक घेतले. सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण करायचे ठरवले. पण केवळ जाती आणि धर्माच्या नावावर कोणी परप्रांतीय नेत्यांच्या झेंड्याखाली गोळा होत असेल, तर ते कसे सहन करायचे? त्यांनी महाराष्ट्राचे बनून राहावे. आमची काहीच तक्रार नाही. मराठी हेच आमचे अस्तित्व आहे. राष्ट्रीय नेता बनण्याच्या मला आकांक्षा नाहीत. माझी सीमारेषा मी आखून घेतली आहे. मला महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचेच राजकारण करायचे आहे. - तुमचे आंदोलन अचानक सुरू होण्याचे काय कारण? कसली प्रतिक्रिया होती ती? - अचानक कसे? शिवसेनेत असल्यापासून मी हेच बोलत होतो. गेली दोन वर्षे तर स्पष्टपणे माझे विचारही बोलून दाखविले. महाराष्ट्रात "उत्तर प्रदेश दिन' कसा काय साजरा होतो? उत्तर प्रदेशात तरी तो साजरा होतो का? उत्तर प्रदेशच्या जयजयकाराच्या घोषणा देत मुलायमसिंह आणि मायावती इथे कशी काय गर्दी गोळा करतात? त्यांच्या घोषणा ऐकल्यात? काय अर्थ होतो या सगळ्याचा? हे घुसण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यांना महाराष्ट्र काबीज करायचा आहे. पाणीपुरीवाला, रिक्षावाला, इस्त्रीवाला, चणेवाला तुम्हाला "बिच्चारा' वाटतो ना? हाच "बिच्चारा' जातो ना त्या सभांना? आणि देतो ना घोषणा तिथे जाऊन? तेव्हा तो असतो का "बिच्चारा'? स्थानिक मुलांचा रोजगार ओढून घेतो तो. तेव्हा असतो का "बिच्चारा'? - पण त्याला इथे जागा कोण देतो? - भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी. झोपडपट्ट्यांची आणि फेरीवाल्यांची अतिक्रमण होऊ नयेत ही "वॉर्ड ऑफिसर' आणि पोलिसांची जबाबदारी असते; पण तेच चिरीमिरीला विकले जातात. नगरसेवक, आमदारही मतांसाठी तिकडे दुर्लक्ष करतात. - मुंबईतील परप्रांतीयांचे सध्याचे आक्रमण उत्तर भारतीयांचेच आहे असे म्हणायचे आहे का? - नाही. उत्तर भारतीयांचे नाही. बिहारी आणि उत्तर प्रदेशींचे. उत्तर भारतामध्ये पंजाबसुद्धा येतो. त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही. तिकडे खलिस्तानसाठी कारवाया सुरू असतानाही मुंबईतला शीख टॅक्सी ड्रायव्हर सुरक्षित होता. त्याच्या टॅक्सीत कोणीही विश्वासाने बसत होते. यालाच विश्वास म्हणतात. आमचा विरोध छटपूजेलाही नाही. छटपूजेच्या निमित्ताने जी नौटंकी सुरू झाली आहे त्याला आहे. असली शक्ती प्रदर्शनाची नौटंकी मी इथे चालू देणार नाही. मॉरिशसचा पंतप्रधान बिहारी आहे. तिथे चालते का छटपूजा? लाईचना, भोजपुरी सिनेमा - ही सगळी घुसायची निमित्त आहेत. अजिबात घुसू देणार नाही आम्ही. - या आक्रमणाचा मुकाबला करण्याची पद्धत काय असावी? - जशास तसे. सत्याग्रह किंवा लोकशाही मार्ग त्यांना कळत नाहीत. मी हिंसेचे समर्थन करतोय असे समजू नका; पण महात्मा गांधींचा अहिंसेचा मार्ग शिक्षित आणि सुसंस्कृत ब्रिटिशांविरुद्धच चालला. बाकी कोणाविरुद्ध चालला असता, की नाही सांगता येत नाही. - स्थलांतराचा प्रश्न केवळ मुंबई आणि महाराष्ट्रापुरता नाही. देशभर आहे. कसा सोडवायचा हा प्रश्न? - विकासाच्या मार्गाने. पूर्वी दक्षिण भारतातून लोक मुंबईत येत असत. आता ते प्रमाण खूप कमी झाले; कारण विकास. तिथल्या राज्यकर्त्यांनी विकास केला. उत्तर प्रदेशी आणि बिहारी नेत्यांना स्वत-च्या राज्यांचा विकास करायला नको आहे. त्यांना इतर राज्ये बिघडवायची आहेत. इथे काम करायला येणाऱ्यांबद्दल आमची तक्रार नाही; पण इकडे राज्य करण्याची भाषा करू लागलात, तर मोडून काढू. - मराठी माणसाच्या मनात असलेल्या न्यूनगंडाचे काय? तो कष्टाला तयार नाही... - मराठी माणसाने मराठी माणसाचे दोष उगाळण्याचे दिवस आता संपलेत. रोज सकाळी तुमच्याकडे पेपर टाकायला कोण येतो? डबे कोण पोचवतो? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर कोण आहे? पंचतारांकित हॉटेलांमध्ये काम करणारे कोण आहेत? मराठी माणूस कष्टाला तयार नाही, हे खोटे आहे. मराठी माणसाचा जन्म गड्या-नोकरांची कामे करण्यासाठीच झालेला नाही, हे लक्षात घ्या. इथले राजकीय पक्ष लांगूलचालन करतात ते इथल्या परप्रांतीयांचे, अल्पसंख्याकांचे. म्हणून त्याच्यात न्यूनगंड तयार होतो. हे आंदोलन छेडल्यानंतर मात्र फरक पडला आहे. न्यूनगंडाची भावना दूर झाली आहे. आपल्याला व्यासपीठ मिळाल्याचा दिलासा मराठी मनाला वाटतो आहे. - महाराष्ट्राच्या प्रतिमेवर काय परिणाम होईल? - चांगलाच होईल. उत्तर प्रदेश आणि बिहारींविरुद्ध आम्ही घेतलेली भूमिका मुंबईतल्या अन्य बिगर मराठी समाजांनाही मान्य आहे. जी गोष्ट आम्हाला खटकते तीच गोष्ट त्यांनाही खटकते. म्हणूनच त्या सर्वांनी आमच्या भूमिकेचे स्वागतच केले आहे. आमच्या सह्यांच्या मोहिमेत मुस्लिमही आघाडीवर आहेत. मुंबईत गरबा-दांडिया मोठ्या प्रमाणावर होतो. तो कोणाला खटकत नाही. मुंबईत दुर्गापूजा मोठ्या प्रमाणावर होते. मी गेली कित्येक वर्षे शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या दुर्गापूजेला जातो; पण या त्यासाठी कधी ज्योती बसू आलेत का? बंगाली समाजाने राजकीय घोषणाबाजी करत महाराष्ट्र पादाक्रांत करण्याच्या घोषणा दिल्या का? अय्यप्पाचे व्रत कितीतरी मराठी माणसे करतात. ते कधी खटकले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या प्रतिमेचे या आंदोलनाने काहीही नुकसान होणार नाही. महाराष्ट्राच्या भूमीवर आणि संस्कृतीवर कदापि आक्रमण होऊ देणार नाही! मुलाखत - पद्मभूषण देशपांडे
|
अस्मितेची दखल घ्यावी लागेल कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने २००४ च्या संयुक्त निवडणूक जाहीरनाम्यात प्रकल्पग्रस्त "भूमिपुत्रा'स प्राधान्याने रोजगार देण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील परप्रांतीयांच्या विरोधातील राज ठाकरे यांच्या आंदोलनानंतर, "भूमिपुत्र' ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. त्यामुळे, "भूमिपुत्र' या शब्दाऐवजी जनतेला रुचेल असा प्रभावी पर्यायी शब्द सापडेपर्यंत "स्थानिक' या शब्दाचा वापर सरकारदप्तरी सुरू झाला आहे. ही पळवाट असली, तरी पर्यायाने मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हे यापुढे राजकारणाच्या ऐरणीवर आलेले मुद्दे आहेत, हे मात्र स्पष्ट झाले आहे. नव्या "राजनीती'मुळे मराठी माणूस ही एकट्या शिवसेनेची मक्तेदारी राहिलेली नाही. आगामी निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना मराठी अस्मितेची दखल घेऊनच आपापले जाहीरनामे तयार करावे लागतील. "डोक्यावर राजमुकुट' ल्यालेली मायमराठी अंगावर लक्तरे लेऊन मंत्रालयाच्या दरवाजाशी ताटकळते आहे, असे कुसुमाग्रजांनी केलेले भेदक वर्णन गेल्या दशकापासून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुतून राहिलेले आहे. राजमुकुट ल्यालेल्या या मराठीच्या अंगावर "लक्तरां'ऐवजी "राजवस्त्रे' येण्याचा दिवस आता दूर राहिलेला नाही, असे संकेत मिळण्यास मात्र अलीकडच्या राजकारणातून सुरवात झाली आहे; कारण मराठीच्या भवितव्याच्या चिंतेने साहित्य संमेलनांचे मंडप ओलांडून राजकारण्यांच्या तंबूतही शिरकाव केला आहे. - दिनेश गुणे पूर्ण लेख खालील दुव्यावर: http://www.esakal.com/esakal/03312008/Sinhasan3E5C1CB61C.htm
|
आपणच जर का या अस्मितेच्या मुदयां वर उदासीन ता दाखवून परकियांची पाठ राखण केली...आणि दुसरयां च्या लेखाला बद्दल संतुलितता दाखवली...तर मग त्याना रान मोकळेच आहे! अश्याच काही उदासीन लोकांमुळे ही परीस्थिति आज आहे...आज जर आपण मराठी मतदारानी एकत्र येउन भविष्या तिल सरकार वर दबाव ठेवला तरच आपण आपली मायबोली वाचावु शकू...नाहीतर ?....नाहीतर आपल्याला मराठी वेडा म्हणुन नाव ठेउन हेच भैये चिडवतील आणि म्हणतील "तो बघा मराठी मानुस त्याला मराठी लिहायला वाचायला बोलायला आवडते पण त्यांच्या सरकारनेच त्याला रस्त्यावर सोडले आहे...हा हा हा हा!!! और अभी थोडी ही सालों मी हम लालू को ही यह जितवा देंगे और यहा का सी.एम्. बना देंगे फ़िर तो ये सारी भूमि हमारी....हा हा हा हा....और तो और सिर्फ़ कभी कभी मराठी बोला करेंगे... फ़िर ये भी खुश हो के हमारे नेता को वोट दे देगा ....हा हा हा हा..."
|
Zakki
| |
| Monday, March 31, 2008 - 11:45 pm: |
| 
|
आज जर आपण मराठी मतदारानी एकत्र येउन भविष्या तिल सरकार वर दबाव ठेवला तरच आपण आपली मायबोली वाचावु शकू.. छे: छे:, तसले काही होणार नाही. अत्यंत विशाऽऽल दृष्टिकोण असलेल्या मराठी लोकांच्या मनात असले संकुचित विचार कदापीहि येणार नाहीत! आम्ही कुणालाहि मत द्यायला मोकळे आहोत. फक्त मराठी आहे म्हणून मत दिले तर स्वतंत्र भारतात आम्हाला संकुचित मनाचे समजतील, म्हणून आम्ही इतरांनाच मत देऊन दाखवून देऊ की आम्ही विशाऽऽल मनाचे लोक आहोत. भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी. झोपडपट्ट्यांची आणि फेरीवाल्यांची अतिक्रमण होऊ नयेत ही "वॉर्ड ऑफिसर' आणि पोलिसांची जबाबदारी असते; पण तेच चिरीमिरीला विकले जातात. नगरसेवक, आमदारही मतांसाठी तिकडे दुर्लक्ष करतात. अहो पण ते राजकारणी, आमदार हे तुम्हीच निवडून दिलेले असतात ना! मग आधी त्यांना हाकलून द्या ना. नि पोलीस व अधिकारी यांना पकडून देण्यासाठी एकत्र या ना. मुळात लोकांनाच कायदा नको, म्हणून पोलीसाला लाच देऊन आपले काम करून घ्यायचे, नि मग पोलीसला शिव्या द्यायच्या! कोणीऽहि काऽहीहि करणार नाहीत. रिकामटेकडे लोक, राडा करायला धावून येतील. पण पळून गेलेल्या लोकांची कामे करायला या म्हंटले तर येतील का? नाऽही. कारण मराठी माणसाचा जन्म गड्या-नोकरांची कामे करण्यासाठीच झालेला नाही, . मग धंदा बंद पडला तर? सरकार देईल ना पैसे, कर्जमाफी, पगारवाढ सगळे मिळेल. थोडा राडा करा, की झाले. स्वार्थ बघायचा नि बाकी गोष्टींकडे कानादोळा करायचा! सांगितले आहे कुणि, मराठी भाषा नि अस्मिता न काय काय!
|
Farend
| |
| Tuesday, April 01, 2008 - 4:10 am: |
| 
|
गुरूचरण सिंगांचा चा लेख वाचून मलाही त्यांना नक्की काय म्हणायचे आहे कळाले नाही. Da Ali G Show म्हणून एक मूळच्या ब्रिटिश शो ची अमेरिकन आवृत्ती येथे मधे लागायची, त्यात तो रॅपर अली जी अत्यंत नावाजलेल्या लोकांना अत्यंत मठ्ठ प्रश्न विचारत असे. (विषयांतर होईल पण धमाल विनोदी शो आहे तो). एकदा त्याने एडविन (बझ) ऑल्ड्रीन ची मुलाखत घेताना विचारले Ali G: "So what do you think about the controversy that the moon doesn't exist"? Aldrin: (trying to explain that the controversy was not about whether moon exists but was about whether man actually landed there etc etc) "no the controversy wasn't about..." Ali G: (cutting him off midway) "you heard it here, there is no controversy. The moon exists" सिंग साहेबांचे " ordinary, decent Maharashtrian boys " बद्दल मत वाचून याची आठवण झाली. मुळात सर्वसाधारण मराठी लोक असे म्हणत आहेत का की बाहेरच्या लोकांनी येथे (मुंबईत किंवा महाराष्ट्रात) येऊ नये? बाकी सोडा, राज तरी तसे कोठे म्हणतोय? आता ती जाहीर भुमिका आहे व रस्त्यावरची रिकामटेकडी, यातून स्वार्थ साधू पाहणारी किंवा मुळातच कडवी पोरे याचा अर्थ वेगवेगळा लावत असतील हे खरे आणि त्यात जो निरपराध लोकांना (कोणत्याही धर्माच्या, जातीतील, किंवा राज्यातील) त्रास होतो त्याची ही समर्थन नही. पण सर्वसाधारण मराठी लोकांचे मत असे आहे असे चित्र यातून उभे राहते आणि ते चुकीचे आहे. आणि मराठी तरुणांना यांचा सल्ला नक्की काय आहे? बाह्रेरून आलेले लोक अशी कामे करायला तयार होतात जी मराठी मुले करत नाहीत, मग कॉलेजे, तांत्रिक शिक्षण वगैरे घेऊन त्यात कसा फरक पडणार. म्हणजे महाराष्ट्रात काही हजार वगैरे असे लोक आहेत का की जे नीट शिकल्याने सर्व मराठी लोक जास्त कौशल्याची कामे करतील आणि मग उरलेली कामे हे बाहेरचे करतील? मराठी पेपर्स मधे अशी बरीच माहिती छापली जाते ज्यामुळे सर्वसाधारण मराठी माणसाचा असा समज होईल की महाराष्ट्रातच नोकर्यांमधे बाहेरच्या लोकांना प्राधान्य दिले जात आहे. या अशा पत्रकारांकडे बरीच सरकारी 'आकडे' असावेत (नाहीतर रेल्वेने किती तिकिटे विकली हे पेपरमधे वाचले असेल तर माहीत नाही), त्यांनी अशी माहिती खोडून काढली तर ते जास्त फायदेशीर होईल. म्हणजे मुंबईत मध्य रेल्वेच्या २० जागांपैकी १९ जागा अ-मराठी (त्यातही महाराष्ट्रात न राहणार्या) लोकांना मिळाल्या असे छापून आले तर १. ते खरे आहे का २. सिलेक्शन मधे मराठी उमेदवार किती होते ३. पॅनेल वर कोण लोक आहेत आणि तेथे काही पक्षपात झाला असेल का, ४. अशाच उत्तर, दक्षिण वगैरे रेल्वेच्या जागांवर स्थानिक व इतर यांचे प्रमाण किती आहे वगैरे माहिती दिली तर सामान्य लोकांनाही अशा एक दोन बातम्यांतून जनरल मते बनवायची सवय लागणार नाही.
|
Zakki
| |
| Tuesday, April 01, 2008 - 10:25 am: |
| 
|
फारेंड, तुम्ही शेवटच्या पाच सहा वाक्यात जो मुद्दा मांडला आहे तो उत्कृष्ठ मुद्दा आहे. तसे काही संशोधन करूनच हा प्रश्न निर्विवादपणे तडीस नेता येईल. दुर्दैवाने सत्य परिस्थिती अशी आहे की, एव्हढे सगळे करायला कुणाला वेळ आहे? त्यापेक्षा मनात आले, भडक बातमी छापली, लोकांची मने भडकवली की रिकामटेकडे लोक चिकार मिळतात, त्यांना हाताशी धरून एकदम राडाच करायचा, काय? लग्गेच प्रसिद्धी. तसे खोटे आकडे छापून संशोधन केल्याचा भास निर्माण केला तरी वेळ कुठे आहे कुणाला ते तपासून बघायला? मुळात काम न करता, झटपट पैसा ही आजकालच्या जगातल्या यच्चयावत लोकांची इच्छा असते. म्हणूनच अमेरिकेतून Outsourcing , महाराष्ट्रात बिहारी असे 'हे विश्वचि माझे घर' हे स्वप्न साकार होते!!
|
"आपणच जर का या अस्मितेच्या मुदयां वर उदासीन ता दाखवून परकियांची पाठ राखण केली...आणि दुसरयां च्या लेखाला बद्दल संतुलितता दाखवली...तर मग त्याना रान मोकळेच आहे! अश्याच काही उदासीन लोकांमुळे " माझी मानसिकता "उदासीनतेची" आहे हा वैयक्तिक ताशेरा मारावयची काय गरज आहे? तसेच गुरुचरन सिंह हे बाहेरचे आहेत बाहेरचे म्हणजे भारता बाहेरचे का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 02, 2008 - 3:06 am: |
| 
|
मराठी माणसे काम करायला तयार होत नाहीत, असाच माझा अनुभव आहे. पुणे नगर रस्त्यावर एका ठिकाणी एक बरा ढाबा दिसला म्हणून आम्ही थांबलो होतो, एका माजी सैनिकाचा तो ढाबा होता. तिथे एक सुदृढ तरुण होता. व्यायामाने शरिर कमावलेले होते. त्याला बघून कुणालाही जरब बसावी, असाच तो होता. शिक्षण फ़ारसे नव्हते. एका संस्थेचा सिक्युरिटी चीफ़, म्हणून मी त्याला नोकरी देऊ केली. राहण्याची व्यवस्था केली इतकेच नव्हे तर व्यायाम करावा, आजुबाजुच्या मुलाना खेळाची, व्यायामाची आवड लागावी, म्हणून त्याने प्रयत्न करावे, अशीही अपेक्षा दाखवली. प्रत्यक्ष काम फ़ारसे नव्हते. आडगावातल्या ढाब्यावर मिळणार्या उत्पन्नापेक्षा जास्त पगार देऊ केला, तो आला आणि तिसर्या दिवशीच, फ़ार काम असते सांगून निघून गेला. कोकणातही या दिवसात आमरायांची राखण करण्यासाठी, आंबे काढून पेट्यात भरण्यासाठी खुप मनुष्यबळ लागते. पण स्थानिक लोक कामचुकारपणा करतात, न सांगता गावाला निघुन जातात. त्यामुळे या कामासाठी नेपाळी गुरख्यानाच प्राधान्य दिले जाते. ते कष्टाळू आणि प्रामाणिक तर असतातच, पण मधेच सोडून जायची भिती नसते.
|
Ladtushar
| |
| Wednesday, April 02, 2008 - 4:33 am: |
| 
|
- म. टा. प्रतिनिधी मासळी विकणाऱ्या भय्याला अटकाव करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'उत्तरायणा'चा नवा अध्याय सुरू केला. विक्रेत्यावर कारवाईची मागणी करत कार्यर्कत्यांनी पालिका कार्यालयात ठिय्या मारला. पोलिसांनी कार्यर्कत्यांना अटक केली. दादर भागात मासळी विकणाऱ्या भय्याला अमेय खोपकर, संदीप देशपांडे, मनिष चव्हाण, बाळ सुवेर् या मनसे कार्यर्कत्यांनी पकडले आणि थेट जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नारायण पै यांच्या कार्यालयात नेले. विक्रेत्याच्या हाताला मांजर चावले होते. त्यातून रक्त वाहत असताना त्याने मासळी विकणे ग्राहकांच्या आरोग्याला घातक आहे, असे कार्यर्कत्यांचे म्हणणे होते. परवाना नसताना मासळी विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. पै यांनी कारवाई न केल्याने संतप्त कार्यर्कत्यांनी ठिय्या मांडला. अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी सर्वांना व्हॅनमध्ये कोंबून नेले. --- अशी होते राडयाला सुरवात...
|
Ladtushar
| |
| Wednesday, April 02, 2008 - 5:03 am: |
| 
|
>> हा वैयक्तिक ताशेरा मारावयची काय गरज आहे? रविजी, आहो एवढे मनावर का घेता! मी तर कुणाचे नाव देखील लिहिले नाही की कोणाची पोस्ट पण वापरून उत्तर दिले नाही, माझे विधान हे मी इन जनरल लिहिण्याचा प्रयत्न केला जर तुमला स्वतावर ओढून घ्यायचे असेल आणि तुमच्या भावना दुखावाल्या असतील तर क्षमस्व... -तुषार छे: छे:, तसले काही होणार नाही....शेवटी झाकी बोलतात तेच खरे... थोड़े दिवसनी सर्व सगळे विसरून जातील अन मराठीच्या अंगावर "लक्तरां'ऐवजी "राजवस्त्रे' येण्याचा दिवस काही येणार नाही...मराठी भाषा जर का व्यवाहारातुन गेली तर ती फ़क्त विद्यापीठात अभ्यासाला राहणार(तिथे पण किती विद्यार्थी असतील कोणास ठावुक!)...आणि एक दिवस मराठी भाषा मागे का पडली या विषयावर नविन बी बी वर चर्चा चालेल फ़क्त...
|
Uday123
| |
| Wednesday, April 02, 2008 - 5:40 am: |
| 
|
राजवस्त्रे आलीच आहेत, आपले सर्वांचे लाडके राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल यांच्या रुपाने मराठी माणुस सर्व देशावर राज्य करतेच आहे. त्यांचे ८१ व्या मराठी साहित्य संमेलनातील दैदिप्यमान भाषण मला अजुनही आठवते. तो मासळी विकणारा मराठी माणुस असता तर त्याला देखील अशीच वागणुक मिळाली असती कां? की मराठी माणुस असले (दुसर्यांच्या आरोग्यास घातक) कामच करीत नाही? मुंबईत परवा चार वाहन चालकांवर हल्ला केला असे वर्तमान पत्रे सांगतात... त्यांनी कोणता घातक व्यावहार चालवला होता कां?
|
Ladtushar
| |
| Wednesday, April 02, 2008 - 6:43 am: |
| 
|
राजवस्त्रे मराठी माणसाला माफ़ करा नेत्याला आली, भाषेला किंवा मराठी साहित्याला नव्हे. देशाच्या सरकार चे सोडा हो राज्य सरकारनेच मराठीभाषे कडे दूरलक्ष केले होते अत्तापर्यंत, आता कुठे थोड़े जागे होतील ते पण मतांसाठी...जर आपण केले तर... जर का हे असेच चालले तर मराठी भाषा व्यवाहारातुन जायला वेळ नाही लागणार, आणि जर असे झाले तर ती शिकून तरी नोकरी मिळनार नसेल तर कोण शिकेल का ? उदा खूपच कमी इंग्रजी माध्यम ची मुले आवडिने मराठी वाचतात आजकाल. मी काही मनसे चा कार्यकर्त्ता नव्हे पण कुठे तरी मी सुखावतो जेव्हा मराठी अस्मितेच मुद्दा ऐरणी वर येतो...तसा मला ही या राडयाचा तिटकारा येतो पण तो एक उद्रेक असतो काही दुर्लक्षित भावनांचा सामन्य मराठी जनतेचा. आणि ही परिस्थिति काही महाराष्ट्रात च नाही आहे.. दक्षिणेत अन गुजरात किंवा बंगलात तुम्ही जा बर काही बोलून दाखवा तिथे कोणी असे लेख लिहिल का कोणी तिथल्या नेत्याना हिटलर म्हणेल ? मग हे धडे अम्हालाच का ! त्यांचे मायबोली प्रेम हे प्रेम आणि आमचे ते नाझीवाद! असो अशी टिका तर होतच असते पण आपले मराठी लोकच पाठिबां देण्या एवजी पाय खेचातात बघा! अहो इतर राज्यातील नेत्यानी मराठी लोकांबद्दल नको तेवढे बोलल्या नंतर आपल्या मुख्यमंत्र्या चा मराठी बाणा पण किती तरी उशीराने जागा झाला तो पर्यंत मराठी जनतेचा उद्रेक होईल नाही तर काय... तसे ही आपले राष्टपती हे कशा साठी असतात हो ? काही हक्क असतात का त्याना ? त्याना काही करायचे असले तरी तो ठराव मंजूर करावा लागतो म्हणे....असो तो दूसरा विषय झाला... मुद्दा हा नव्हे की मासळी विकणारा मराठी आहे का बिहारी तो अनधिकृत असून पण करवाई नाही झाली, असेच किती तरी अनधिकृत वीक्रेते असतात स्टेशन वर बिनधास्त! आणि त्यांच्या विरुध कारवाईची मागणी केली तर ती न करता मागणी करणारेच तुरुंगात.
|
Mandard
| |
| Wednesday, April 02, 2008 - 8:43 am: |
| 
|
तुषारचे मुद्दे बरोबर आहेत. उदय तुम्ही उगीच विरोधासाठी विरोध करत आहात असे वाटते. राज ठाकरेंच्या कार्य पध्दत चुकीची असु शकते पण मुद्दा नक्किच चुक नाही. इथे ( noida/delhi ) पण तो नाॅन यु.पी. / बिहारी लोकांना (बंगाली, पंजाबी इ.) तो पटायला लागला आहे.
|
लाड्तुशार आधी लेखणी उचलायची,वैयक्तिक घाव करायचे,अन मग क्षमा(?) मागायची, या सगळ्याचा तुम्ही जरा पुनर्विचार करावा.कारण आता मायबोली ही अतिरेक्यांची विरासत होत चालली आहे अशाने लोक लिहायचे सोडून देतील. किती ग्राम्य लिहावे,कुणी कुणालाही,------ला घो म्हणावे,तुमचे डोके ठिकाणावर आहे का पुसावे,हीच का मराठी पणाची सुसंस्कृत लक्षणे?? आणि परप्रांतियांची किंवा माझ्या मापदन्डाने एखाद्या विचाराची दाद देणे वा विरोध करणे हे विचार स्वातंत्र्य मराठी अस्मितेच्या आड केंव्हा पासून येवू लागले??
|
Ladtushar
| |
| Wednesday, April 02, 2008 - 9:47 am: |
| 
|
मराठी माणसे काम करायला तयार होत नाहीत हा फ़क्त एक अनुभव आहे! याच्या विरुध अनुभव असू शकतात आणि असतात ही. हे प्रतेक माणसा माणसा वर् अवलंबून आहे त्या साठी पूर्ण मराठी लोकाना कामचुकार ठरवू नए, माझ्या पाहणया कित्तेक मराठी दिवस रात्र दोन्ही वेळी काम करतात. आणि आपण स्वतः सुधा मराठी असून कामचुकार आहोत का ? प्रत्यक्षात मराठी माणसे काम करायला का तयार नसतात ? मराठी माणसाने सण-वार करू नए का ? तो जर सण वार नाही करणार तर मग मराठी सण कोण साजरे करणार? माझ्या पाहणी प्रमाणे परदेशात त्यांचा सण असला म्हणजे कोणीही कार्यालयात फिरकत सुद्धा नाही. मी सहा महीने इंग्लंड मधे होतो तेव्हा मी सहा महिन्यात एक पण सुट्टी नाही घेताल्याचे ते लोक माझे किती कोतुक करायचे... आणि ऐन ख्रिस्मस ला तर सर्वच पाच दिवस बंद होते अगदी ट्रेन, बस, दुकाने, बेसिक सुविधा पण. अशी अड़वणुक काही मराठी माणूस करत नाही आणि मी तरी पाहिला नाही असो...तर इथे कुणाचा ही विरोध महाराष्ट्रात येउन काम करतात म्हणुन नाही आहे. त्यांनी महाराष्ट्राचे बनून राहावे. आम्हाला आंनद होईल. पण इथे येउन स्वताच्या नेत्याना आणि नेते (अबू ) प्रणीत विचार सरणी ला घुसवु नये व एकत्र येउन स्व्ताच्या नेत्याना आणून इथल्या लोकांवर् दादा गिरी करू नये. इथल्या प्रदेशाला एक संस्कृति आहे तिचे भान ठेवावे, नुसते अतिक्रमण करून लोंडेच्या लोंडे गावावरुन आणू नये जेणे करून इथल्या सुविधान वर् ओझे होईल. ज्या भैयांची इथे कीव होते आहे त्याना मुंबई तिल परिस्थिति माहित नसावी, एक तर इथे सरकार ने स्वताच मराठी माणसाला बाहेर हाकलले आहे. त्यात वर् विरार च्या भैयानी काही महिन्यांन पूर्वी बोरिवालिच्या एका मराठी मुलाला चोप दिलेला का तर तो विरार ट्रेन मधे चडला म्हणुन, एक दिवशी तर चक्क ट्रेन चे दरवाजेच लावून घेतले होते बोरीवली स्टेशन च्या आधी. अशी चालते यांची दादागिरी.आता सगळेच भैये काही असे नसतात याला अपवाद देखील असतो, काही तर चक्क समर्थन करतात राज च्या भूमिकेचे.
|
Ladtushar
| |
| Wednesday, April 02, 2008 - 10:25 am: |
| 
|
रविजी, तुमचा काही तरी गैर समज होतो आहे, इथले माझे विधान हे तुम्हाला किंवा कुणालाही वक्तिगत दुखावणया साठी नव्हते. प्रतेकला इथे विचार स्वतंत्र लिहिण्याचा अधिकार आहे आणि तुमच्या विचारांचे स्वागत आहे. तुमच्या वक्तिगत भावना दुखावल्या म्हणुन मी क्षमा मागितली.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|