|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through February 07, 2008 | 20 | 02-07-08 6:09 am |
  | Archive through February 07, 2008 | 20 | 02-07-08 10:54 pm |
  | Archive through February 11, 2008 | 20 | 02-11-08 6:32 am |
  | Archive through February 15, 2008 | 20 | 02-15-08 5:37 pm |
  | Archive through February 19, 2008 | 20 | 02-19-08 12:57 pm |
  | Archive through February 21, 2008 | 20 | 02-21-08 6:35 pm |
  | Archive through February 23, 2008 | 20 | 02-23-08 7:15 am |
  | Archive through February 29, 2008 | 20 | 02-29-08 11:24 am |
  | Archive through March 02, 2008 | 20 | 03-02-08 7:21 am |
  | Archive through March 03, 2008 | 20 | 03-04-08 1:49 am |
  | Archive through March 09, 2008 | 20 | 03-09-08 11:48 pm |
  | Archive through March 12, 2008 | 20 | 03-12-08 9:52 pm |
  | Archive through March 17, 2008 | 20 | 03-17-08 7:00 am |
  | Archive through March 30, 2008 | 20 | 03-30-08 7:25 am |
  | Archive through April 02, 2008 | 20 | 04-02-08 10:25 am |
  | Archive through April 04, 2008 | 20 | 04-04-08 6:54 am |
Dineshvs
| |
| Friday, April 04, 2008 - 8:48 am: |
| 
|
मराठी भाषेपासून दूर जावे लागले तर तिची अधिक ओढ लागते बहुतेक ! माझेही दहावीपर्यन्तचे शिक्षण मराठीमधून. मग दोन वर्षे केवळ एक भाषा. पण भारताबाहेर पडल्यावर मात्र मराठीशी संबंधच संपला. मराठी मित्र जमवले तरी ते भेटणार कधीतरी. नेटवर त्या काळात मराठी फ़ारसे नव्हते. त्यापुर्वीच्या काळात तर नेटही नव्हते. त्या काळात मात्र मायबोली ने मराठीकडे परत वळवले.
|
व्यवहारातिल मराठी! आपल्या महाराष्ट्रात अनेक सरकारी, नीम सरकारी, विद्यापीठे, न्यायालय, कायदा व नागरी सुविधा संस्था, पत संस्था यांन मधे मराठी व्यव्हारात वापरली जाते. व्यवहारात वापरणे म्हणजे सर्व कागद पत्रिय नोंदी, आणि अर्थ व्यवहार हे मराठीतुन केले जातात. काही दिवसांन पूर्वी शहर आणि औदयोगीक विकास महामंडळा ने(सीडको ) नविन शहरी निवारा सेवेचे अर्ज मराठी तुन काढले, तर हे अर्ज मराठी भाषेमधे छापले आहेत, त्यामुळे आमच्या येथील अर्ध्या अधिक अमराठी अन मराठी लोकाना त्या मधील खुप अधिक माहितीचा अर्थच लागत नव्हता. तर असे आहेत हे आजचे मराठी. यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून काय राहणार की हे मराठी चा र्हास रोखाणार म्हणुन?.... आणि इथे रोजच्या धाव पाळित कोण लक्ष देते स्वतः च्या मुलांच्या भाषेबद्दल.... अगदी आपण असे समजू की सर्व मराठी पालकानी जातीने लक्ष देवुन मुलांना मराठी ची ओढ़ लावली तरी हाताच्या पाच बोटा प्रमाने सर्वच मराठी चा छंद जोपासत नाहीत. आजू बजुच्या अमराठी मित्र आणि अमराठी मध्यमाचा खुप प्रभाव पडतो.... माझ्या मते तरी महाराष्ट्रा तिल मराठी वातावरण जर का दूषित होवू दयायचे नसेल तर मराठी मध्यमाचा आग्रह हवाच,आता मराठी मध्यमांचा आग्रह महाराष्ट्रात नाही करायचा तर काय बिहार मधे करणार? अगदी १०० टक्के सरकारी आग्रह नको पण मराठी माध्यमा बद्दलची ही विचार सरणी बदलायला हवी आणि त्या बद्दल सरकार आणि मराठी जनतेने प्रयत्न तरी करावे. शेवटी समाज संस्कार हे विद्यालयातुन च होतात. आणि आजकाल मराठी अभ्यासक्रमात इंग्रजी आणि संगणक हे विषय पहिली पासून असतात जेणे करून मराठी मध्यमातिल विद्यार्थी कुठेही मागे पडू नए. फ़क्त गरज आहे ती या मराठी मध्यमा तील अभ्यासक्रमाकड़े आत्मविशवासाने आणि सकारात्मकतेने पाहाण्याची...
|
Zakki
| |
| Friday, April 04, 2008 - 10:50 am: |
| 
|
आपणच महाराष्ट्रात मराठी बोललो नाही, तर इतर राज्यातून इथे लोक येणारच, कारण भाषेची अडचण नाही. अमेरिकेत, इंग्लंडमधे इंग्रजी, फ्रान्समधे फ्रेंच, जर्मनीत जर्मन आल्याशिवाय कुणाला जाऊन रहाणे जमणारच नाही. कलकत्ता, ग्वाल्हेर, चेन्नई, इथे नोकरीकरता गेलात तरी प्रथम घाई घाईने त्यांची भाषा शिकावी लागते! महाराष्ट्रात तसे नाही. याला काय म्हणावे? महाराष्ट्र अखिल भारतीय अस्मिता स्वीकारण्यात आघाडीवर आहे. त्यांची बुद्धि विशाऽल आहे. त्यांचे विचार 'हे विश्वचि माझे घर' असे मानण्याइतके उदात्त आहेत, की मराठी बद्दल हळहळ करतात म्हणून संकुचित मनाचे आहेत? दोन्ही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. पहिला भाग माझ्या मते स्तुत्य आहे. पण मग मराठी भाषा, त्यातले जुने लेखक, जे मराठीत लिहीत ते मला आवडतात, समजत नसले तरी त्यांचे लेखन वाचून मनाला आनंद होतो. म्हणून मला मराठी भाषा आवडते, लोकांनी बोलावी, त्यात लिहावे असे वाटते. मी मायबोलीकडे त्याच आशेने बघतो.
|
मला मराठी माध्यमात शिकलेले खूप लोक माहित आहेत जे रोजचा पेपरही वाचत नाहीत. साहित्य वगैरे तर दूरच्या गोष्टी. वर कुणी कुणी इंग्रजी माध्यमातील मुले कसे वाईट मराठी बोलतात वगैरे उदाहरणे दिली आहेत. उदाहरणे मीही देऊ शकेन जिथे मराठीत शिकलेले लोक अत्यंत वाईट, अशुद्ध मराठी लिहितात. सामान्य लोकात असे गाळीव नग असणारच. उत्तम कलाकार बनायला थोडे असामान्यत्व लागणारच मग तो लेखक असो कवी असो वा अन्य कुणी. कुठल्याही समाजात ०.१ टक्के तरी असामान्य लोक असतातच. ह्या असामान्य लोकांचे कर्तृत्व ते इंग्रजी माध्यमात शिकलेत का मराठी ह्यावर अवलंबून नाही. अर्थात लोकांचे पुस्तकवाचन, काव्यवाचन कमी होत असेल तर हे प्रतिभावंत लोक अन्य क्षेत्रात आढळतील जसे सिनेमा, नाटक, टीव्ही इ. पण कितीही अध:पतन झाले तरी त्या पतित मराठी शाळांतच असे साहित्यिक बनतील असा गंड बाळगणे चुकीचे आहे. जास्तीत जास्त सुशिक्षित लोक जर इंग्रजी शाळेत मुलांना घालत असतील तर त्यातलाच कुणी चमकेल. मूळ मुद्दे: मुलांना इंग्रजी शाळेत घातले म्हणून तुमचे मराठीप्रेम बेगडी आहे असा दावा करणे साफ चुकीचे आहे. मुलाला वा मुलीला इंग्रजी माध्यमात घातले म्हणून आता तो वा ती मराठी संस्कृतीत काही भर घालू शकणार नाही हा गंड चुकीचा आहे. लोकांची मराठी साहित्याची आवड कमी होत असेल तर हट्टाने मुलांना मराठी शाळेत घालून हे बदलणार नाही. बदलत्या काळात नव्या कला, माध्यमे निर्माण होतील. त्यात कदाचित मराठी चमकेल. भूतकाळात डोकावले तर नक्की जाणवेल की मराठीचे महत्त्व पूर्वी जास्त होते. लोक चांगले मराठी बोलायचे, वापरायचे, निर्माण करायचे. पण हा कल मुलांना हट्टाने मराठी शाळेत घालून बदलणार नाही. त्याने पाल्याचे नुकसान होण्याचीच शक्यता आहे.
|
Uday123
| |
| Friday, April 04, 2008 - 3:41 pm: |
| 
|
फ़क्त गरज आहे ती या मराठी मध्यमा तील अभ्यासक्रमाकड़े आत्मविशवासाने आणि सकारात्मकतेने पाहाण्याची... --- आत्मविश्वास तो हवाच हवा... सुरेख विचार मांडलेत तुषार यांनी. सावरकरांनी भाषा शुद्धी कराणाची मोहीम काढली होती, दैनंदीन वापरातील बरेच (प्रशाळा, आचार्य, धनी, दिनांक, उपस्थित, नभोवाणी, महापौर, विश्वस्थ ई.) शब्द ही त्यांची देणगी आहे nashik.com वरुन. शुद्ध भाषा वाचायला, एकायला, चांगलीच वातते, आजच्या परिस्थितीत ३-४ सावरकरांची अवशक्ता भासते आहे.
|
शेन्डे नक्षत्र जी, मी एवढेच म्हणतो आहे की तुमच्याशी मी सहमत असून ही तुमच्या मुद्याची विरुद्ध बाजू खरी नाही reverse is not true मराठी शिकणे ही प्रेमाची हमी नाही पण मराठीस घातक नक्कीच नाही पण इन्रजी शिकण्याने- प्राथमिक शाळेत थवा माध्यमिक शाळात्- ह्याची संभाअना वाढते
|
शेन्डेन तुमच म्हणन बरोबर आहे पण हेही दिसुन येते की बहुतेक इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी फ़क्त बोलता येतं. त्यांच्यासमोर थोडेसे साहित्यातले शब्द वापरुन बोलल तर त्यांना कळत नाही. पुलंचे एकपात्री अथवा पुरंदर्यांचे शिवचिरित्र वपुंची कथाकथनं न झेपणारे माझे अनेक इंग्रजी माध्यमात शिकलेले मराठी मित्र आहेत. अशा सिडीज लावल्या की हे ५ मिनिटात रुम सोडुन निघुन जातात त्याचबरोबर ही मुले कॉंन्व्हेंटमधे शिकलेलीही नाहीत, साध्या इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकलेली आहेत ज्यांना धड इंग्रजीही येत नाही आणि मराठीही येत नाही. अशी बहुसंख्य मुले आहेत. माझे काहीकाही मित्र हे मान्यही करतात.
|
चिन्या जी तुमच्या निरिक्षणास माझे पूर्ण अनुमोदन आहे. जेंव्हा आपण गाणे ऐकतो वाचतो तेंव्हा आपोआपच आपले मनात रसग्रहण ही सुरू होते व याचा सन्दर्भ आपल्या मनात हृदयात असणार्या त्या अनुभूतीशी असतो.ती अनुभूती त्या भाषेशी असणर्या परिचयातून येते.व परिचय होण्यास त्या भाषेतील शिक्षण पूरक ठरते.
|
शेन्डेन तुमच म्हणन मान्य परंतु जर का फ़क्त ०.१ टक्के असामान्य लोकच मराठी चा वापर करू लागले तर या ०.१ टक्के असामान्य मराठी लेखक व कलाकारानां मराठी वाचक व रसिक वर्ग कसा काय तयार होणार बुआ? >> पुलंचे एकपात्री अथवा पुरंदर्यांचे शिवचिरित्र वपुंची कथाकथनं न झेपणारे माझे अनेक इंग्रजी माध्यमात शिकलेले मराठी मित्र आहेत. अशा सिडीज लावल्या की हे ५ मिनिटात रुम सोडुन निघुन जातात.... अश्या प्रकारेच मराठी वाचक व रसिक वर्ग रोडावत आहे.... मूळ मराठी चा पायाच ज़र का आपण रचाला नाही तर त्यावर मराठी ज्ञानाची मजबूत इमारत कशी उभी राहिल ? ०.१ टक्के असामान्य लोकांच्या पायावर ही वैभव शाली समृद्ध भाषेची परंपरा अत्ता पर्यंत उभी राहू शकली असती का! आणि या पुढे ती किती काळ उभी राहिल... आणि मराठी माध्यमातिल पाल्याचे नुकसान होण्याचीच शक्यता असते आणि इंग्रजी माध्यमातिल नव्हे हे ही काही पटत नाही बुआ! हेच तर मी सांगत आहे आज गरज आहे ती मराठी मध्यमा तील अभ्यासक्रमाकड़े सकारात्मकतेने पाहाण्याची... आज महाराष्ट्रात कोनव्हेंट, इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम, आणि मराठी माध्यम अश्या प्रकारच्या शाळा आहेत.. त्या मधे सर्व दर्जाच्या शाळा आहेत या सर्व शाळेत या सर्व दर्जाचे विद्यर्थि असतात. या सर्व शाळा मिळुन जी आकडेवारी होइल त्या सर्व विद्यार्थ्याँ मधून मराठी वाचक आणि रसिक किती तयार होतील हा जर विचार केला तर यात मराठी मध्यमाच्या शाळा नक्कीच अघाड़ी वर आहेत...
|
मी याबद्दल हेही सांगु इच्छितो की मला ८-१०वी पुर्ण संस्कृत होते. हिंदी फ़क्त ५-७वी होते. माझ्या इतर मराठी मित्रांपेक्षा माझे हिंदी खराब आहे, हिंदी बोलीभाषा व चित्रपट समजतात पण साहित्य,कविता वगैरे झेपत नाही. माझी हिंदीबाबत जी परिस्थिती आहे ती माझ्या मराठी मित्रांची मराठीबाबत आहे. माझ्यामते आपण याबद्दल दक्षिणेकडील राज्यांकडून काहीतरी घेतले पाहीजे. आमच्या येथे असलेल्या सर्व तामिळींना तमिळ चांगले येते. जे इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत त्यांनाही तमिळ चांगले येते. मराठी संपुर्ण महाराष्ट्रातील सर्व माध्यमाच्या शाळांमधे अपरिहार्य करावे व मराठी माध्यमाप्रमाणेच इंग्रजी माध्यमाच्या मराठीचे स्टॅंडर्ड ठेवावे.
|
Ladtushar
| |
| Wednesday, April 16, 2008 - 4:43 am: |
| 
|
शपथविधीप्रसंगी राज्यसभेत भाषांच्या विविधतेचे रंग - म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली राज्यसभेत नव्या सदस्यांच्या शपथविधीप्रसंगी मंगळवारी भारतीय भाषांच्या विविधतेचे रंग पसरले होते. गुजरातच्या नवनिर्वाचित खासदारांनी गुजरातीतून, तामिळ खासदारांनी तामिळीतून, बंगालच्या डाव्या खासदारांनी बंगालीतून, तेलुगु देशमच्या खासदारांनी तेलुगुतून, ओरिसातल्या खासदारांनी उडिया भाषेतून, ईशान्य भारतातल्या खासदारांनी आपापल्या भाषांतून, कोणी उर्दूतून तर कोणी संस्कृत भाषेतून सदस्यत्वाची शपथ घेऊन विविध भाषांचा स्वाभिमान जागवला तर महाराष्ट्रातल्या सात सदस्यांपैकी शिवसेनेच्या भारतकुमार राऊत या एकमेव सदस्यांनी मराठीत गांभीर्यपूर्वक शपथ घेऊन मायमराठीचा झेंडा संसदेत फडकवला. ५५ पैकी ५० सदस्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्रातील मुरली देवरा, राजकुमार धूत, जनार्दन वाघमारे आणि वाय. पी. त्रिवेदी यांनी इंग्रजीतून तर पृथ्वीराज चव्हाण आणि प्रकाश जावडेकरांनी हिंदीतून शपथ घेतली. अहमद सईद मलिहाबादी यांनी उर्दूतून शपथ घेतली. शपथ घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने मोतीलाल व्होरा, रिशांग किशिंग, जयंती नटराजन यांचा समावेश होता. रघुनंदन शर्मा यांनी संस्कृतमधून, जयंती नटराजन तामिळमधून आणि भारतकुमार राऊत यांनी मराठीतून शपथ घेतली तेव्हा काँग्रेससह भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी बाके वाजवून तिघांचे अभिनंदन केले. रघुनंदन शर्मा संस्कृत भाषेतून शपथ घेत असताना 'आयुष्यमान भव' असा आशीर्वादही ऐकू आला. भारतकुमार राऊत यांनी घेतली मराठीतून शपथ
|
Arc
| |
| Wednesday, April 16, 2008 - 5:46 am: |
| 
|
आपण इथे कितीही माथेफोड केली तरी लोक आपल्या मुलाना इग्रजी माध्यमात घालणारच, त्यामुळे ही चर्चा अशीच चालु ठेवण्यापेक्शा अशा मुलाना मराठी नीट यावे (अगदी पु. ल. आणि व. पु. कळण्याइतके)म्हणुन काही उपाय किन्वा ठोस कार्यर्कम नाही का सुचवता येणार?
|
आर्च तुम्ही अगदी खरे बोललात. आज कालच्या इंग्रजी माध्यमातील लहान मुलांना आपण जर वपु, पुल किंवा इतर सहितीकांचे लेखन वाचायला दिले तर ही मुले ते बाजूला ठेवून टीवी वर टाइम पास करणे जास्त पसंत करतात. तेव्हा त्यांच्या साठी त्यांच्या पालकांनी त्याना या अनमोल ठेव्याची ओळख करून देने भाग आहे. तसे ही आजकाल जास्त अभ्यासा मुळे मुले पुस्तकांचा राग करतात, तेव्हा त्याना लहान पणा पासून गोष्टी रुपात ही साहित्ये समजावून सांगावे. किंवा पुल वपु यांचे कथाकथान नित्यनेमाने ऐकवावे. रोज रात्रि जर टीवी ऐवजी जर एखादा पुस्तक वाचनाचा कार्यक्रम केला तर फरक पडू शकेल. पण हे सर्व समाजाला सांगणार कोण, आणि कोण हे व्रत पालन करणार ? त्या साठी शाळांतुन मी वरती सांगितल्या प्रमाणे पुस्तक बाग़ सारखे उपक्रम राबवले पाहिजेत पण यांची जबाबदारी कोण घेणार ? आणि आजकालच्या इंग्रजी मध्यमाच्या शाळा अश्या उपक्रमांना प्रतिसाद देणार का ? आणि हो असा जर का एखादयाला उपदेश करायाला गेलात की तो म्हणतो काय रे तुला राज ठाकरेचा कुत्रा चावला का ? बरा आहेस ना ?
|
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबईसह राज्यातील सर्व व्यापारी दुकाने, औद्योगिक कंपन्यांवर तीन महिन्यात मराठी फलक लावण्याची सक्ती करण्यात येईल. कनिष्ठ कोर्टातील सर्व कामकाज मराठीतून करण्याचा प्रयत्न म्हणून अशा कोर्टासाठी १०० लघुलेखक नेमू. तसेच, मराठीचा अनादर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापू; अशा घोषणा राज्य सरकारने गुरुवारी केल्या. मराठी माणसांची शिडी करून अनेक व्यक्ती आणि पक्ष वर आले. मराठी भाषा ही काही पक्षांची गरज आहे. नव्या पक्षामुळे मते कमी होऊ नयेत म्हणून काहींना मराठीचा झेंडा पुन्हा हातात घ्यावा लागतो, अशी बोचरी टीका करून मायमराठीचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाय योजण्याचे आम्ही ठरवले आहे, असे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मराठीचा १०० टक्के वापर होण्यासाठी विभागीय महसूल आयुक्तांसकट सर्व खालच्या अधिकाऱ्यांनी आपले आदेश हे मराठीतच दिले पाहिजेत, अशा सूचना आजच निघतील. मराठीच्या वापरात कुचराई करणारा अधिकारी कितीही मोठा असला तरी त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई होईल. यासाठी १५ दिवसांत स्वतंत्र कक्ष स्थापू असे पाटील म्हणाले. ' डोक्यावर राजमुकुट, अंगावर फाटकी लक्तरे अशा वेशात मराठी भाषा मंत्रालयासमोर उभी आहे' असे बोचरे वर्णन ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी केले होते. त्यांचा हवाला देत विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी मराठीची गळचेपी, खासगी नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांची उपेक्षा, दीड लाख कोटींचा कर्जाचा बोजा याबाबत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. त्यास अर्थमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देऊन मराठीचा झेंडा उचलून धरला! सरकारी कामकाजात मराठी वापरण्यासाठी सरकारने ३९ वेळा आदेश काढले आहेत. केंदाच्या त्रिभाषा सूत्रानुसार मुंबईसह राज्यातील सर्व विमानतळे, रेल्वे स्टेशनवर मराठी बोर्ड लावण्याची सक्ती करण्यात येईल. नव्या उद्योगधंद्यात ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याची हमी सामंजस्य करारातच घेण्यात येईल. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी उद्योग खाते घेईल, असे ते म्हणाले.
|
Zakki
| |
| Friday, April 25, 2008 - 1:16 pm: |
| 
|
बरे मग? .. ... आजच्या लोकसत्तेतले विनोदी चित्र बघा. http://www.indiapress.org/gen/news.php/Loksatta/400x60/
|
मराठी असे आमुची शिक्षणभाषा.... महाराष्ट्रदिनानिमित्त मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या अनिल अवचट आणि अच्युत गोडबोले यांच्या अनुभवातून मराठीत शिक्षण घेतल्याने आपला फायदा काय झाला ? याविषयीचे अनुभव मराठी अभ्यास मंडळात सांगीतले गेले. त्यांच्या शब्दातच ते ऐका....(http://www.esakal.com/features/2may-marathi_madhyam/index.html) मराठीत शिक्षण घेऊन मानाने समाजातल्या दोन भिन्न क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ.अनिल अवचट आणि संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी मराठी अभ्यास मंडळात मराठी शिक्षण घेऊनही जीवनात कसे समृध्दपण आले. याची केलेली चर्चा मराठी भाषीकांना स्फूर्तीदायक ठरली. ज्ञानाची भाषा आज इंग्रजी आहे. ती यायलाच हवी. पण संस्कृतीची ओळख आणि भाषेची संपन्नता अनुभवण्याठी मराठीतूनच शिक्षण घेण्याची ठाम भुमिका मांडली. अकरावी नंतरचे तात्रिक ज्ञान मात्र परकीय भाषेत असल्याची खंत व्यक्त करून अच्युत गोडबोले यांनी संगणकाची तांत्रीक भाषा मराठीत देण्यासाठी आपण तीन पुस्तके लिहली असल्याचे सांगीतले. चवथे पुस्तक लवकरच येत असल्याची माहिती दिली. मात्र इतर लेखन मात्र मराठीतच करण्याचा आपला निर्धार पुन्हा जाहिर केला. आजचा तरूण वर्ग पैशाच्या मागे लागला असून त्याला जगण्यासाठी अधुनिक सुविधा लागतात. मराठी मातीचा गंध तो वर्ग विसरत चालल्याची खंत त्यांच्या बोलण्यात व्यक्त झाली. मराठी अभ्यास मंडळाच्या कार्याची माहिती करून देताना प्र.ना परांजपे यांनी मराठी शाळेतही उत्तम इंग्रजी शिकविण्यासाठी सरकारने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त केली.. पुण्या-मंबईसह अनेक शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बंद होत असल्याबद्दल खेदही प्रकट केला. http://www.esakal.com/esakal/05022008/Specialnews6F33180D9D.htm
|
शिवतिर्थावरील काल झालेल्या राज यांच्या भाषणाचा सारांश. 'राज'भाष्य ० महापालिका, नगरपालिका, रेशनिंग आणि आरटीओ ऑफिसर यांना नम्रपणे हात जोडून विनंती करतो, छोट्याशा चिरीमिरीसाठी लाचार होऊ नका. महाराष्ट्राचे भविष्य खराब करू नका ते तुमच्या हातात आहे. ० इथे गुजराती राहतात. पण गुजराती नेते भाषणासाठी येत नाहीत. तामिळी राहतात पण कधी करुणानिधी, जयललिता आल्या नाहीत. मग यांचे नेतेच कशाला इथे येतात? ० यूपी बिहारवाल्या भय्यांना बिचारे भय्या म्हणू नका. तुम्हांला इथे राहायचे असेल तर मराठी संस्कृती जपूनच राहावे लागेल. ० मध्यंतरी झालेल्या आंदोलनात अनेकांना जेलमध्ये जावे लागले, त्याचा मला अभिमान आहे. ० हे सारे कशासाठी तर 'मराठियांचे गोमटे' म्हणजे भले करण्यासाठी चालले आहे. ० मराठी अस्मितेसाठी लढण्यास चळवळीत या. ० मराठी माणसावर अन्याय झाल्याचे दिसल्यास आदेशाची वाट पाहू नका. अन्याय झाल्याचे समजल्यावर तुमचे रक्त उसळले पाहिजे. ० प्रबोधनकार म्हणायचे अन्याय दिसेल तेथे तुमची लाथ बसली पाहिजे. मीपण तेच म्हणतो, मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्यांवरही तुमची लाथ बसली पाहिजे! जय हिन्द! जय महाराष्ट्र!
|
गोबेल चा अवतार इथे पहा http://starmajha.com/viewvideo.aspx#story
|
उत्तर प्रदेश तो झांकी है , महाराष्ट्र अभी बाकी है ', अशा घोषणा देणा-या भैय्यांची औकात काय ? अडीच हजार मैलावरून येऊन इथे दादागिरीची भाषा करायची नाय... राहायला देतो हेच उपकार समजा.. अबू आझमी , तू २० हजार माणसं आणच , जाताना फक्त ४० हजार पाय जातील. तुमची मस्ती अशीच सुरू राहिली तर शिवाच्या महाराष्ट्राला तिसरा डोळा उघडावा लागेल . भुसभुशीत जमिनीतच घुशी होतात. त्यामुळे मराठी माणूस ज्या दिवशी दक्षिणेतल्या माणसाइतका कडवट होईल, आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगेल, तेव्हाच त्याचं अस्तित्व टिकू शकेल. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असा विचार सोडून द्या. तुम्हाला किती वेळा पेटवायचं. १९२२ साली प्रबोधनकारांनी हेच लिहिलं होतं, ६६ साली बाळासाहेबांनी तेच केलं, आत्ताही हे सगळं मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी चाललं आहे. शिवरायांनी मालोजी घोरपडे यांना पत्र लिहून मराठी सैन्यात सामील होण्यास सांगितलं होतं. मराठीयांचे गोमटे घडवायचे आहे. राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे होते. त्यामुळे आम्हाला कुणी राज्यघटना शिकवण्याचा शहाणपणा करू नये. राहायला देतो हेच उपकार समजा. इथे जे काय मतभेद आहेत, ते आमचं आम्ही बघून घेऊ, असंही त्यांनी सुनावलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५५ साली लिहिलेल्या एका पुस्तकातील उताराच त्यांनी वाचून दाखवला. उत्तर भारताचं वर्चस्व राष्ट्रीय ऐक्याला घातक असल्याचं मत बाबासाहेबांनी त्यावेळी नोंदवलं होतं, मग मी आत्ता काय चुकीचं बोललो ? बाबासाहेबांनी त्यात उत्तरप्रदेशाचे भविष्यात वर्चस्व निर्माण झाले तर प्रक्षोभ उसळल्यावाचून राहणार नाही, असा इशारा दिला होता. हिंदी ही केवळ एका मताच्या फरकाने राष्ट्रभाषा ठरली, असाही दाखला त्यांनी या गंथातून दिला. इथे राहायचे असेल तर प्रत्येकाला मराठी शिकावीच लागेल. मराठी चित्रपट-नाटक अवश्य पाहा. मराठी साहित्य वाचा. टॅक्सीत बसताना मराठीतच बोला. एखादा टॅक्सीवाला मराठी बोलत नसेल, ऐकत नसेल ते मला येऊन सांगा. सगळीकडे "भैया हातपाय पसरी' अशी अवस्था होती. त्यामुळे राज ठाकरे काल जे शिवतीर्थावर बोलले ते अगदी "सही रे सही' होते. आता "ए भाऊ डोके नको खाऊ' असे धमकावण्याची वेळ आली आहे. .... मराठी बाणा आणि मराठी दणका कुणी तरी द्यायलाच हवा होता; तो राज ठाकरे यांनी दिला हे योग्यच झाले... अशा एक नाही तर अनेक प्रतिक्रिया आज उमटल्या. ' राज ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है...'
|
Trish
| |
| Monday, May 05, 2008 - 4:58 am: |
| 
|

|
या वरील लेखावरील माझी मते वाचा- **तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.** पुर्ण लेख वाचा- http://gandharvablog.blogspot.com/ अथवा माझे 'रंगिबेरंगी' पान.
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2025
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|