Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 17, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » UP/Bihar Versus Maharashtra: punha ek raajkaaraN » Archive through March 17, 2008 « Previous Next »

Raviupadhye
Thursday, March 13, 2008 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची- ह्या सर्व कूटनीती मागे कोण आहे? who started this charade?

Raviupadhye
Thursday, March 13, 2008 - 6:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jhakkeeeझक्की, जे सोडून गेले त्यान्ची कामे कोणीही करत नाही आहेत. उद्योग धन्दे फार वाईट रित्या बाधीत आहेत. साले राजकारणी मानोत वा ना मानोत. मराठी माणसाला न्याय देण्याच्च्या aware करण्याच्या नुसत्या फुशारक्या मारल्या. आज पावेतो कोणी माई चा लाल इथे problem solve करायला वा भुमीपुत्रांना न्याय द्यायला उपटला नाही ये. सर्वे "सन्तु" निरामय:

Jaymaharashtra
Thursday, March 13, 2008 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरीच सुधारणा झाली आहे येथील सदस्यांच्या भाषेत!
प्रगती आहे.


Jaymaharashtra
Thursday, March 13, 2008 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीही बदललं तरी... हृदय अजून मराठी आहे...

विदेशी कपडे घातले... तरी हृदय अजून मराठी आहे...
तोडून तुटत नाहीत... या मजबूत रेशीम गाठी आहेत...

पिझा, बर्गर खाल्ल्यावरही... पोट पुरणपोळीच मागतं...
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी... मन मराठी चारोळीच मागतं...

मातृभुमी सोडली की... आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं...
भाषा सोडली की... अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं...

वडाची झाडं मोठी होऊनही... परत मात्रुभूमिकडे झुकतात...
कितीही दूर गेलं तरी... पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात...

काहीही बदललं तरी... हृदय अजून मराठी आहे...


जय महाराष्ट्र!


Zakki
Thursday, March 13, 2008 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, हृदय तर भरून आले. आता पोटापाण्याचे कसे? त्यासाठी तरी काम करायला पाहिजे का नको?
कंपन्या आता जाहीरातीवर जाहीराती देत असतील! लोकांचे लोंढे धावत असतील कंपन्यांकडे! सगळे मराठी!

वा, वा. आनंद झाला!


Uday123
Thursday, March 13, 2008 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण राजकारणी आणि मिडीयादेखील कोणाकडून पैसे देऊन काय करून घेतील याचा नेम नाही.
--- हा शब्दांचा "खेळ" आहे आणि ही शक्यता देखील असु शकते. पण त्यामुळे मराठी लोकांचे नाव खराब होणार आहे. उद्या कोणी मराठी माणुस (सरकारी, खाजगी) कामासाठी जरी बिहार मधे गेला तर त्याचे स्वागत कसे होणार? सिवान मधील प्रत्येक माणुस आज आपल्याला नावं ठेवत असेल. त्यातील किमान एक परिवार महाराष्ट्राला तर जन्मभर विसरणार नाही.

एका घरात दोन बहीण/ भाऊ (समानतेचा परिणाम) आहेत, एका कडे काही कमी आहे (आजारी आहे असे समाजा) पण मग दुसरा बहीण्/ भाऊ मदतीचा हात देतोच ना, ति/ त्याने तो द्यावा ही अपेक्षा केली जातेच नं? भारताला माता म्हणायचे, पण उप-बिहारी मानवाला भाऊ नाही मानायचे हे धोरण कसे? जर भाऊ मानायचे तर मग
SHARE करतेवेळी मागे का? मुलांना नेहेमी खेळणी SHARE करण्या बद्दल प्रत्येक पालक सांगत असतो, आता लहान मुले मोठी झालीत, पण सग़ळं विसरली. ही अशीच आत्म घातकी (माझं माझं तुझं तुझं) विचारसरणी चालत राहीली तर पुढे काय होणार? जेव्हा एका घरातच रहायचे आहे तर थोडी-फ़ार झळ ही लागणारच.

हाताच्या पाचही बोटांची मुष्टी होते, (जेव्हा शत्रु दारात येतो त्यावेळी) एक-एक बोट खुप काही करु शकत नाही.


Uday123
Thursday, March 13, 2008 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हृदय तर भरून आले
---हृदय भरून आले, (मातृभुमीच्या आठवणिने) डोळे पण भरुन आलेत, पण पोट तर रिकामेच आहे. पहिल्या दोन गोष्टी अर्थ-हीन आहेत. दुर्देवाने हे जग पोटावरच चालते, त्यात बराच अर्थ आहे.



Sameer_dk
Friday, March 14, 2008 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

uday123 तुम्हि बरोबर लिहले आहे,मि पण सध्या महाराश्ट्रा बाहेर काम करतो आहे इथले लोक पण मला हेच विचारतात कि मराठि माणुस इतका शिकलेला आहे पण त्याला हे नाहि समजत का कि कोणचेहि राज्य पुर्णपणे आजुन तरि आत्मनिर्भर झाले ले नाहित त्यान्या कशाचि तरि गरज दुसर्‍या राज्या कडुन पुरि कारावि लागते आणि हे पण खरे आहे कि लेबर हे आपल्या राज्यात कमि आहेत.
बरेच जण तर साहेबान्चे "बजाओ पुन्गि भगाओ लुन्गि"आन्दोलनाचे उदाहरण देतात आणि विचारतात कि आजुनहि सा.इ. आहेतच आणी साहेबांनि हि सगळि धोरण मागे घेतलिच न? मग पुतण्याला काहि शिकवले नाहि का?
मराठि माणसाचा एवढा पुळका फ़क्त मुंबई करिताच का? विदर्भातिल शेतकरि मराठि माणुस नाहि कि माणुसच नाहि? मग त्यांच्या करिता का नाहि काहि अश्या बोल्ड स्टेप्स सुचत?
फ़क्त मुंबई करता आंदोलन म्हणजे ज्यांनि "मुंबई सह महाराष्ट्र झालाच पाहिजे" करता आंदोलन केले त्यांचा अपमान नाहि का?
त्या पेक्षा महाराष्ट्रात धारा ३७० का नाहि लावत


Ladtushar
Friday, March 14, 2008 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन भावान मधे, मोठयाने नेहमी मोठे पणा दाखवुन लहान भावाला जवळ करावे मान्य !! इथल्या मराठी संस्कृती चा आदर करून जे राहतील त्यांचे आम्ही नेहमी आदर तिथ्य करू! आणि करत आले आहोत हे सांगावे लागत आहे मुंबई ने नेहमीच आसरा दिला आहे)

परंतु, लहान भावाने उठ सुट, मोठ्या भावावर निर्भर राहू नए. बिहारी नेत्यानी स्वताच्या राज्यात धुमाकुळ घलावा आणि इकडे येउन आमच्या राज्यताले फुटपाथ घाण करू नए. लहनानी देखील मान ठेउन मोठ्यां चा आदर करावा. रोज लोकल ट्रेन मधे दादागिरी करू नए, आणि वर स्वताचे नेते इथे आणून, शक्ति प्रदर्शन करू नए!

आणि हो सहेबांच्या त्या अदोलाना मुळे च मराठी माणुस आज थोड़ा फार उरला आहे, मुंबई बाहेर च्याना बोलणे सोपे आहे परंतु रोज इथे मराठी माणुस किती हतबल होते ते त्याना कळनार नाही... शठम प्रतिशाठ्यम!

प्रत्यक्षात, मराठी व स्थानिक कामगार याला जास्त पैसे द्यावे लागतात म्हणून काही बेसिक पगाराचा, वेळेचा कायदा न पाळता, दिवस रात्रि कामा साठी काही कंत्राटर बिहार हुन कामगार आणतात आणि मग इथे त्याना रस्त्यावर रहयाला सोडतात. ही सत्य परीस्थिति डोळ्याआड़ होते आहे किंवा केली जात आहे इतर प्रसीद्धी मध्यमान कडून !


"पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी"...

http://www.dekhona.com/videos/fafafpqrr

Jaymaharashtra
Friday, March 14, 2008 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मराठी मी मराठी

म्हटलं तर

का पडली इतरांच्या

कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी.....

बसायलाच हवी होती अशी

या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...

दूर केलीच पाहीजे ही

त्या लोकांची दमदाटी....

आता फुटली आहे मराठीपणाच्या

सहनशीलतेची पाटी...

ही राज नीती खरंच नाही बरं का

मराठी मतांसाठी ..

हा तर खरा आवाज आहे

मराठी अस्तित्वासाठी...

बोलतंय कुणीतरी आता

मराठी माणसासाठी...

राज तर पुकारतोय लढा

मराठीच्या रक्षणासाठी...

पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे

मराठी माणसाची गोची...

रोजच्या रोज माणसे येवून येवून

मुंबई भार सहन करेल तरी किती?

मुंबईच काय, ते तर शिरलेत आता

मुळा मुठा नदीच्याही काठी...

द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या

गुदमरलेल्या जीवासाठी ...

त्यासाठी आपण विजयी करायलाच हवी

ही 'राज'नीती ....


Raviupadhye
Friday, March 14, 2008 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काव्य पुरे!!! कन्टाळा आला वाफेचा!!

Zakki
Friday, March 14, 2008 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी.....

तसे होणार नाही! दुकानदारांना पैसा हवा असतो, तो गिर्‍हाईक देतात. गिर्‍हाईकेच हिंदी बोलतात, इंग्रजी बोलतात. काही फॅशन म्हणून, गंमत म्हणून, आपण किती विद्वान आहोत हे दाखवण्यासाठी, आपण किती सेक्यूलर आहोत हे दाखवण्यासाठी. नि अर्थात बरेचसे, त्यांना मराठी येतच नाही म्हणून.

तर मग आता कय करावे बरे? दुकाने घातली ती पैसे मिळवण्यासाठी. सतत पैसे मिळत नाही राहिले तर धंदा करता येत नाही, निदान लहान दुकानदारांना! मग ते आपले गिर्‍हाइक जी भाषा बोलेल ती बोलतात! ते सोडा, पण एव्हढा राडा चालू असताना सुद्धा विधानसभेत हिंदी भाषा वापरावी असे विधायक येऊ शकते, नि चार दोन मराठी 'नेत्यांचा' पाठिंबाहि मिळतो त्याला! कारण सत्ता! नि त्याबरोबर येणारा पैसा!

तेंव्हा आधी त्या मराठी बोलणार्‍यांना कामाला लावा. त्यांना पैसे मिळू देत. मग त्यांना सांगा की जे लोक हिंदी बोलतात त्यांच्याशी व्यवहार करू नका. मग सगळे शिकतील मराठी मुकाट्याने.

पुण्यात प्रभात रोड का आपटे रोड वर एका सरदारजीची लॉंड्री आहे. तो स्पष्ट नि पुणेरी मराठी बोलतो. तो म्हणाला बर्‍याच वर्षांपूर्वी तो पुण्यात आला, तेंव्हा सगळे लोक मराठीच बोलत होते, म्हणून मग मला शिकावीच लागली. हे उदाहरण!



Jaymaharashtra
Friday, March 14, 2008 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही वाचाव म्हणून लिहिले नाही.
आणि मला इथे माझे विचार हव्या त्या मार्गाने व्यक्त करण्याची मुभा आहे.
तुम्ही वाचावी अशी माझी अपेक्षा नाही,आणि वाचुन तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होईल अशी अशा देखिल नाही.


Raviupadhye
Saturday, March 15, 2008 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकारात्मक आणि नकारात्मक हे दृष्टिकोन सापेक्ष आहेत.इतर अनेक सभासदांच्या व माझ्या अनेक post वरून हे जाहीर आहे.
स्वत्: चीच भूमिका सकारात्मक असण्याचा दावा मी करू इच्छित नाही.पण सन्तुलीत असण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. नारेबाजी ने फारसे साध्य होत नाही त्यामागे कृती ची अपेक्षा आहे.


Raviupadhye
Saturday, March 15, 2008 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकारात्मक दृष्टिकोन
"फ़ार दुर कशाला जायला हवे धोनीचे उदाहरण घ्या ना.संघाचा कर्णधार झाल्यावर क्रिकेटचा सर्वेसर्वा असल्याच्या आवेशात सचिनवर शरसंधान करायची संधी त्याने सोडली नाही आणि गांगुली,द्रविड सारख्या गुणी खेळाडुंना संघातुन बाहेर बसवलेच ना? ही जी स्वतबद्दल फ़ाजिल श्रेष्ठत्वाची भावना येते ना या "उ भा" मधे तीचीच चीड येते.आणि यासाठीच ह्या आंदोलनाची गरज निर्माण झाली. "


Jaymaharashtra
Saturday, March 15, 2008 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळ पुरुषी स्वभाव जात नाही हेच खर!
तुम्ही करा काथ्याकुट


Trish
Monday, March 17, 2008 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

INJUSTICE TO MARATHI
-- Devendra Jogdeo
http://www.esakal.com/esakal/03172008/Pailtir64B5CCF464.htm

I have one complaint against all the FM Radio Stations in Mumbai and Pune.
These channels play only Kannada Songs on Radio Mirchi Bangalore, you play only Tamil songs on Radio Mirchi Chennai; BUT WHY THEY DO NOT PLAY A SINGLE MARATHI SONG ON MIRCHI IN PUNE AND MUMBAI?? IT IS IMPORTANT TO PLAY MARATHI SONGS ALSO, AS IT WILL INCREASE THE POPULARITY OF MARATHI MOVIES.
THIS IS TOTAL INJUSTICE TO MARATHI LANGUAGE AND MARATHI PEOPLE.
It is my humble request to you to publish my concern on your website. This is not only my concern, but the concern of all the marathi people.


Ladtushar
Monday, March 17, 2008 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Uday123
Monday, March 17, 2008 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्रिश्: तुमचे मराठी बद्दलचे प्रेम समजु शकतो, हिच कळ-कळ मराठी मधुन व्यक्त करता येते. तुम्ही नवीन दिसत आहात, पण मराठीत लिहणे फ़ार अवघड नाही आहे, प्रयत्न तर करा, मदतीला मायबोलीकर तत्पर आहेत.

Jaymaharashtra
Monday, March 17, 2008 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा घ्या मुजोरी आणि माजोरीपणाचा अजुन एक नमुना!
http://www.loksatta.com/daily/20080317/mp05.htm

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators