Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 12, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » UP/Bihar Versus Maharashtra: punha ek raajkaaraN » Archive through March 12, 2008 « Previous Next »

Raviupadhye
Monday, March 10, 2008 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नितिश कुमारांचे पत्र विचार करू लावणारे आहे;याहून जास्त काही लिहिण्याची भिती वाटते-:-(

Ladtushar
Monday, March 10, 2008 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज यांचे विचार मांडणारा लेख इथे देत आहे ! जरूर वाचून पहावा.
http://www.loksatta.com/daily/20080309/sun05.htm

image/x-bmp
RajLoksataa01Mono.bmp (89.7 k)


Ladtushar
Monday, March 10, 2008 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उर्वरित :

image/x-bmp
RajLoksataa02_mono.bmp (97.5 k)


Ladtushar
Monday, March 10, 2008 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही अधोरेखित मुद्दे !

>>> Further, Biharis have contributed immensely to the economic growth of Mumbai and Maharashtra.

मुंबई कुणी घडवली या वादावर राज यांचे उत्तर!


पुढील मुद्दा:



Chinya1985
Monday, March 10, 2008 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माढेकर आता बोला-

भारतकुमार राऊत, धूत यांना राज्यसभा उमेदवारी
10 Mar 2008, 1656 hrs IST
मुंबई,
मटा ऑनलाइन प्रतिनिधी

‘ महाराष्ट्र टाइम्स ’ चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत तसेच व्हिडिओकॉन उद्योगसमुहाचे राजकुमार धूत यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी याबाबतची घोषणा केली.

शिवसेनेचे एकनाथ ठाकूर आणि राजकुमार धूत यांची राज्यसभेची मुदत येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे. यापैकी धूत यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात येणार आहे. तर ठाकूर यांच्याऐवजी आता भारतकुमार राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सूनबाई आणि चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे या देखील इच्छुक होत्या. परंतु रविवारी रात्री उशिरा मातोश्रीवर झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत राऊत यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले.

शिवसेनेचे संसदेत प्रतिनिधित्व करणारे भारतकुमार राऊत हे सहावे पत्रकार असणार आहेत. यापूर्वी प्रितीश नंदी, संजय निरुपम, संजय राऊत यांना शिवसेनेने राज्यसभेवर पाठविले. तर ज्येष्ठ पत्रकार विद्याधर गोखले आणि नारायण आठवले यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. ते दोघेही लोकसभेवर निवडून आले होते. त्यानंतर आता भारतकुमार राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे स्वतः पत्रकार असून, त्यामुळेच शिवसेनेच्या वतीने जास्तीत जास्त पत्रकारांना संधी देण्यात आल्याचे बोलले जाते.



Satishmadhekar
Monday, March 10, 2008 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी शिवसेनेला शहाणपणा सुचलेला दिसतो आहे. विजय मल्ल्याचे नाव अजूनही चर्चेत आहे. निवडणुकीच्या दिवसापर्यंत कशाचीही शक्यता नाकारता येत नाही.

राजकुमार धूत यांना मराठी मानता येईल का? महाराष्ट्रात अनेक वर्षे वास्तव्य करणे हा काही मराठी असण्याचा पुरावा होऊ शकत नाही. नाहीतर युसुफखान उपाख्य दिलिपकुमार, अमिताभ बच्चन, जया बच्चन हे आयुष्यात एकदा तरी मराठी बोलताना आढळले असते. मला धूत यांच्या विषयी फारशी माहिती नाही, परंतू गेल्या सहा वर्षात ते राज्यसभेचे खासदार होते हे कधीच जाणवले नाही. त्यांनी राज्यसभेत शिवसेनेच्या तिकिटावर बसून शिवसेनेकरता किंवा महाराष्ट्राकरता काही केले असेल तर ते कळवा. ते उद्योगपती आहेत आणि शिवसेनेचे तिकिट त्यांना परत मिळत आहे यावरून सर्व काही स्पष्ट होत आहे.


Uday123
Monday, March 10, 2008 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवसेनेच्या तिकिटावर बसून शिवसेनेकरता किंवा महाराष्ट्राकरता काही केले असेल तर ते कळवा.
----हे सर्वात महत्वाचे. नाहीतर नुसते 'ठोख़ळ्या" सारखे बसुन संपुर्ण कार्य-काळात एकही प्रश्न न विचारलेले (तसेच चर्चेत सहभागीच न झालेले) महाभाग असतात, मग ते (अ)मराठी असुनही काय फ़रक पडतो? आता तर लट्ठा-लट्ठी (शरीर सुधृढ, बलदंड ई.) करता यायला हवी हे पण एक परिमाण आहे.


Chinya1985
Monday, March 10, 2008 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्योगपती,साहित्यीक,चित्रपट सृष्टीतील लोक,कलावंत मग ते कुठल्याही पार्टीचे असोत,कुठल्याही राज्याचे असोत ते राज्यसभेत फ़ार काही करतात अथवा बोलतात असे मला तरी वाटत नाही. लता मंगेशकर पण राज्य सभेच्या खासदार होत्या त्यांनीतरी काय केल???असो शिवसेनेने मराठी पत्रकाराला तिकिट दिले आहे ही चांगली गोष्ट आहे.

Nandini2911
Tuesday, March 11, 2008 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं की राज्यसभेचे हे खासदार राजकीय क्षेत्रातले नसावेत असा काहीतरी नियम आहे... (नागरिकशास्त्र फ़क्त २५ मार्काला ठेवणार्‍या देशात शिकली बालके. :-)
जरा याबद्दल काही माहिती मिळू शकेल का?


Uday123
Tuesday, March 11, 2008 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्य-सभेच्या दोनशे पन्नास पैकी बारा जागा या कला, क्रिडा, विग्यान, साहित्य, समाज्-सेवा या मधे विशेष कार्य केलेल्या व्यक्तिस राष्ट्रपती निवडतात. उर्वरित २३८ जागा ह्या विधानसभा-विधानपरिषद सदस्य मतदानाने निवडतात. दर दोन वर्षांनी ०.३३% सदस्य निवृत्त होतात, कार्यकाल ६ वर्ष.

Tonaga
Tuesday, March 11, 2008 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकुमार धूत हे अस्सल महाराष्ट्रीयन आहेत. त्यांचे गाव औरन्गाबाद जिल्ह्यातील गंगापूर. अजूनही ते स्थनिक पातळीवर गंगापूरवाला हे नाव लावतात. व्हिडीओ कॉन ही त्यांची कम्पनी. त्यांच्या सगळ्या इन्डस्ट्री अहमदनगर आणि औरन्गाबाद येथे आहेत. त्यामुळे त्यांच्या मराठी पणाबद्दल शंका असू नये.
अर्थात त्यांची खासदार होण्याची 'पात्रता' आणि त्यानी पार्लमेन्टमध्ये केलेले काम अथवा स्वताच्या इन्डस्ट्रीचा करून घेतलेला फायदा हे निश्चीत वादाचे विषय होऊ शकतात....

आणि असल्या'दळभद्र्या' आक्षेपाना शिवसेना किंमत देत नाही.... :-)


Raviupadhye
Tuesday, March 11, 2008 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://timesofindia.indiatimes.com/A_brief_history_of_Thackerays_rants/articleshow/2848622.cms
please read -i am appalled/feel ashamed by the charges made

Giriraj
Tuesday, March 11, 2008 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठीत 'महाराष्ट्रियन' असा शब्द आहे का? आपण सरळ 'मराठी' हाच शब्दप्रयोग करायला हवा!

Chinya1985
Tuesday, March 11, 2008 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो उपाध्ये,हे TOI वाले नेहमीच सेना,संघ,भाजप बद्दल biased असतात. मराठीतुन इंग्रजी अथवा हिंदीत भाषांतर करताना कसा अर्थाचा अनर्थ केला जातो हे तर गेल्या दिड महीन्यात कळलच आहे. हा लेखही त्याचाच एक भाग आहे. एखाद वाक्य कुठल्या संदर्भात लिहिल गेलय त्याच्या मागेपुढे काय लिहिलय हे महत्वाच असत. फ़क्त स्टेटमेंट्स देउन काहीतरी बातम्या छापायच्या. बाकी हेच लोक 'फ़्रीडम ऑफ़ स्पीच' आणि 'फ़्रिडम ऑफ़ एक्स्प्रेशन' बद्दल बोलतात. हुसेनला देवीदेवतांचे घाणेरडे चित्र काढायला परवानगी द्या म्हणतात आणि ठाकर्‍यांच्या संपादकीय वर कारवाई करा म्हणतात. यावरुनच त्यांचे double standards कळतात. आता याच लेखात इतर संपादकांविरुध्द लिहिल्याबद्दल ठकरेंवर कारवाई व्हायला हवी म्हणतात पण स्वत्:च एका संपादकाविरुध्द लिहित आहेत हे विसरतात. सामना पेपर म्हणुन जेमतेमच आहे. पण संपादकीय वाचनिय असत. इतर पेपर्समधील संपादकीय पेक्षा सामनातील संपादकीय वाचनिय असते.

Uday123
Wednesday, March 12, 2008 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7287007.stm

हात कलम केलेल्या फ़ोटो सकट ही बातमी आहे, वाचुन मला दु:ख झाले. हे लज्जास्पद कृत्य पुण्यात, 'विद्येच्या माहेरघरी', घडले आहे? ते देखील आपले भाऊ-बंदच आहेत मग एव्हडा दुस्वास का? एक कृती हजारो-लाखो लोकांना आपल्यापासुन दुरावते. आता आपण काय म्हणणार ईंग्रजी माध्यमं पराचा कावळा करतात?

Satishmadhekar
Wednesday, March 12, 2008 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही बातमी ५-६ दिवसांपूर्वी सकाळ (किंवा सकाळ हेरॉल्ड) मध्ये आली होती. बातमीमध्ये असे म्हटले होते की या व्यक्तीच्या बोलण्यात खूपच विसंगती होती. त्याने जबाबात पुष्कळ गोष्टी चुकीच्या सांतितल्या. एकूणच ही घटना संशयास्पद वाटते असे बातमीदाराने लिहिले होते.

खरेखोटे काय ते कुणास ठाऊक?


Raviupadhye
Wednesday, March 12, 2008 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माढेकर साहेब,या कृतीचा निषेध अपेक्षित आहे."नरोवा कुंजरोवा" ही भूमिका कशी बरे घेता येईल?

Satishmadhekar
Wednesday, March 12, 2008 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कोणत्याही निरपराध सजीवाला शारिरीक किंवा मानसिक इजा करण्याच्या विरोधात आहे. ही घटना नक्कीच अमानवी आहे. या घटनेमागे नक्की कोण आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही असे मला म्हणायचे होते.

Zakki
Wednesday, March 12, 2008 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनेऽक वर्षांपूर्वी कुणा दत्ता सामंत का कुणितरी कापड गिरणि कामगारांचा संप घडवून आणला. परिणाम? कापड गिरण्या मुंबईतून दुसर्‍या प्रांतात गेल्या. महाराष्ट्रीय बेकार झाले.

आता हा माणूस इथले उद्योगधंदे बंद करणार का? कारण महाराष्ट्रीय कामे करत नाहीत म्हणूनच मुळात ते लोक इकडे आले, त्यांनी काही जबरदस्ती केली नव्हती!

या सगळ्यात मला एक प्रश्न आहे की जे बिहारी सोडून गेले, त्यांची कामे आता कोण करताहेत? कारखान्यांमधे, इतरत्र? आले का तिथे महाराष्ट्रीय? की बिहारी ऐवजी, ओरिसा, पंजाब, तमीलनाडू, तेलुगु इ.

तसे झाले तर?


Savyasachi
Wednesday, March 12, 2008 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी, सतीश तीच कृती मुळात झाली होती की नाही यावर संदिग्धता आहे अस म्हणत आहेत. तेच कारण असेल कृतिमागे तर निषेध आहेच. पण राजकारणी आणि मिडीयादेखील कोणाकडून पैसे देऊन काय करून घेतील याचा नेम नाही.
झक्की, त्यांना तिकडे काम मिळत नाही म्हणून ते इकडे आले. काम आणि दाम तिकडेच मिळत असते तर कशाला आले असते?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators