Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 03, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » UP/Bihar Versus Maharashtra: punha ek raajkaaraN » Archive through March 03, 2008 « Previous Next »

Zakki
Sunday, March 02, 2008 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाच stand जर अमेरिकन लोकानी घेतला तर??? भारतीयांच्या बाबतीत? आणि माझ्या माहितीप्रमाणे body shoppers नी पाठ्वलेले बहुसंख्य भारतीय IT मधील अंग मेहनतीचे काम करणारेच नाही का?

असे अमेरिकेत होणे अजून बरीच वर्षे दूर आहे. सध्या तरी बर्‍याच अमेरिकनांना अजून असे वाटते की भारतीय चांगले असतात. मुख्य म्हणजे भारतीय इथे तरी चांगले वागतात. यायचे तर कायदेशीर परवाना घेऊन येतात, नि परवाना संपला की परत जातात. इंग्रजीत बोलतात, रस्त्यावर वाहतुकीची शिस्त पाळतात. रांगेत घुसत नाहीत. कायदे पाळतात. लहान सहान बाबतीत लाचलुचपत करत नाहीत. जे अनेक वर्षे रहाण्यासाठी आले आहेत, ते समाजात सामावून जाण्याचा प्रयत्न करतात.

बिल गेट्स सारखे लोक म्हणतात, भारतीय आहेत म्हणून आमचा धंदा चांगला चालला आहे.

बर्‍याच सुशिक्षित नि चाळीशी पुढले लोक म्हणतात, भारत नि चीन आहे म्हणून बरे आहे. तेच इथे येऊन त्यांनीच काही केले तर आपल्या देशाचे आर्थिक, नि तंत्रज्ञानातील वर्चस्व टिकून राहील.

मला वाटते, महाराष्ट्रातील उद्योगधंदे चालवणारे लोक असेच म्हणत असतील. अंबानि, टाटा हे जरी मालक असले तरी त्यांच्या धंद्यात उच्च जागी बरेच महाराष्ट्रीय लोकच असतील. ते हुषार असतात, मुख्य म्हणजे बहुभाषिक असतात. इतर राज्यात इतके सर्वगुणी लोक मिळणे तेव्हढे सोपे नाही. मुंबई हे वायूमार्ग, लोहमार्ग व समुद्री मार्ग यांना सर्वात जास्त सोयीचे आहे. जगभर संपर्क साधण्यासाठी सुद्धा. म्हणून सगळे महाराष्ट्रात येतात. या सुविधांचा उपयोग महाराष्ट्रीयांनी पण करून घ्यायला हरकत नव्हती, पण त्यांनी नाही केले, त्यांना नोकरीचा मार्ग परवडला.

आता तर श्रमाच्या कामाचाहि त्यांना कंटाळा! मग काय करणार?

शेवटी जगात रहायचे तर असे सतत धडपडतच राहिले पाहिजे, नाहीतर, कित्येक मराठी लोकांची घरे सुद्धा परराज्यातील लोकांच्या ताब्यात गेली आहेत. किती मराठी सापडतात गिरगाव, मलबार हिल वर? पूर्वी होते. आता कुठे गेले?


Uday123
Sunday, March 02, 2008 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याच एका पुर्व शिक्षिकेने मला सांगितले की शहाणी असशील तर आपल्या शाळेत घालू नकोस कारण शाळेचा दर्जा पुर्णपणे घसरला आहे.
---हीच तर चिंतनाची बाब आहे, का घसरतो आहे शाळेचा दर्जा? कोण जबाबदार आहे? अ-मराठी लोकं शाळेच्या व्यावस्थापनात आहेत का? आपलेच (मराठी) लोकं, आणी आपलेच मराठी सरकार असतांना ही दुर्दशा का?

जय महाराष्ट्र: तुमची ८ फ़ेब ८:०१ ची पोस्ट, तुम्ही एक उदा म्हणुन आज ठाण्यात ८० टक्के रिक्षा चालक हे उत्तर-भारतीय आहेत असे दिले आहे. हे वास्तव आहे, तुम्ही दिलेले उदा मला पटते, मी या वर्षी च्या भेटीत अनुभवले देखील. पण अशी परिस्थितीच कां आली? मुळ मालक मराठी आहे, पण काही (लाज वाटणे असो, किंवा अजुन इतर व्यावसायात हातपाय मारुन अजुन पैसा...) कारणाने हे उपजिविकेचे साधन तो उत्तर-भारतीयाच्या हातात देतो. स्वत: कष्ट करुन मेहेनत करण्यापेक्षा काहीच न करता दिवसा दोन्-अडीचशे मिळतात हा (चलाख) उद्देश असावा. इथे कोण जबरदस्ती करत आहे त्यांना स्वत:चा चालता बोलता व्यवसाय सोडायची?




Zakki
Monday, March 03, 2008 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मी म्हणतो, त्यांना रिक्षा चालवायला इतर मराठी लोक मिळत नाहीत का? की सगळेच मराठी लोक अत्यंत श्रीमंत होऊन, त्यांना आता रिक्षा चालवण्यासारखी कामे करण्याची गरज नाही?


Bee
Monday, March 03, 2008 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्णी, आपल्यावेळेस मराठी शाळा खरच खूप उत्तम होत्या का? की त्यावेळी आपल्याकडे इतर काही सोयी नव्हत्या म्हणून मराठीमधेच शिकावे लागले? आईवडीलांनी खूप लाड केले नाहीत म्हणून काहीतरी बनायची प्रेरणा आणि गरज दोन्ही गोष्टी होत्या. तेंव्हा आपण शिकलो. हल्ली ते दिवस नाहीत. केवळ मराठीच शाळांचा दर्जा घसरला नाही तर सगळ्याच भारतीय भाषांचा दर्जा घसरला आहे.

Satishmadhekar
Monday, March 03, 2008 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> माझा स्वतचा अनुभव सांगते.मी जेंव्हा माझ्या मोठ्या मुलाच्या प्रवेशा करता माझ्या स्वतच्या मराठी शाळेत गेले तेंव्हा माझ्याच एका पुर्व शिक्षिकेने मला सांगितले की शहाणी असशील तर आपल्या शाळेत घालू नकोस कारण शाळेचा दर्जा पुर्णपणे घसरला आहे.तुमच्या वेळचे प्रामाणिक शिक्षक नाहित आणि विद्यार्थी देखिल नाहीत.

मराठी शाळांचा दर्जा घसरल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे?

का

विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे मराठी शाळांचा दर्जा घसरला आहे?


Jaymaharashtra
Monday, March 03, 2008 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(शेवटी जगात रहायचे तर असे सतत धडपडतच राहिले पाहिजे, नाहीतर, कित्येक मराठी लोकांची घरे सुद्धा परराज्यातील लोकांच्या ताब्यात गेली आहेत. किती मराठी सापडतात गिरगाव, मलबार हिल वर? पूर्वी होते. आता कुठे गेले?)
झक्कीकाका,याला उत्तर सध्या बहुतांश गिरणगावातील मराठी माणसे सध्या डोंबिवली व ठाणे येथे स्थायिक झाली आहेत.

उपाध्ये!
कसली भयानक विधान करताय तुम्ही!तुमच्या बहुतेक सगळ्या शंका झक्कीकाकांनी दुर केल्या असाव्यात आता पावेतो?
तुम्ही म्हणताय की सगळ्या मराठी माणसांनी जे भारतातील इतर राज्यात वा परदेशात स्थलांतरीत झाले आहेत त्यांनी देखिल म्हाराष्ट्रात परत यावे का? अहो काय बोलताय याचे तरी भान ठेवा. अमेरीके मधे कुठला अशिक्षित मराठी माणुस स्थायिक झाला आहे? आणि मला असा एखादा तरी मराठी माणुस दाखवा जो महाराष्ट्रात काम मिळत नाही म्हणुन आपल्या कुटुंबकबिल्यासोबत सगळा बाडबिस्तरा गुंडाळुन प्रसंगी विनातिकीट प्रवास करुन इतर राज्या मधे स्थालांतरीत झाला आहेत व झोपड्या बांधून रहात आहेत?
तुमचे वा तुमच्या तथाकथित कंपनीचे आर्थिक नुकसान झाले म्हणुन काय तुम्ही काहिही बोलावे आणि इतरांनी ऐकुन आणि समजुन घ्यावे अशी तुमची अपेक्षा आहे का?
एकदा भाषावार प्रांतरचना केल्यावर भुमिपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे त्या राज्यांच्या सरकारांचे आद्य कर्तव्य आहे व हा अधिकार देखिल भुमिपुत्रांना घटनेनेच दिला आहे.स्वतच्या राज्यात अशांतता व बेरोजगारी आहे म्हणुन दुसर्‍या राज्यांमधुन स्थलांतरीत व्हायचे आणि तेथिल स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणुन त्यांच्याच मानगुटीवर बसायचे,व पुन्हा शक्तीप्रदर्शन करायचे ही कुठली वृत्ती? कुठ्ला मराठी माणुस अश्या प्रकारचे वर्तन करतो?तुमच्या माहितित असेल कुणी तर आम्हाला देखिल कळु द्या? आणि आज आवाज उठतो आहे कारण बाहेरुन येणार्‍या काही लोकांनी (मी सगळेच म्हणत नाही आहे)स्थानिकांवर अरेरावी करुन कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
फ़ार दुर कशाला जायला हवे धोनीचे उदाहरण घ्या ना.संघाचा कर्णधार झाल्यावर क्रिकेटचा सर्वेसर्वा असल्याच्या आवेशात सचिनवर शरसंधान करायची संधी त्याने सोडली नाही आणि गांगुली,द्रविड सारख्या गुणी खेळाडुंना संघातुन बाहेर बसवलेच ना? ही जी स्वतबद्दल फ़ाजिल श्रेष्ठत्वाची भावना येते ना या "उ भा" मधे तीचीच चीड येते.आणि यासाठीच ह्या आंदोलनाची गरज निर्माण झाली.
समीर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करते आहे.
१)ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला तो?
उत्तर्-हो नक्कीच आणि देशातील वा परदेशातील कुठल्याही भागात वास्तव्य करुन देखिल ज्याने महाराष्ट्राशी आपले ऋणानुबंध जतन केले आहेत असा तो
२)जन्म महाराष्ट्राबाहेर झालेला आहे पण नंतर तेव्हापासुन महाराष्ट्रात राहात आहे आणि शिकत आहे तो?
उत्तर्- जन्मभुमी वेग़ळी असुनही ज्याने महाराष्ट्रात शिक्षण घेवुन येथिल संस्कृती आत्मसात केली आहे असा जो तो.
इतर प्रश्नांवर विचार करणे क्रमप्राप्त आहे.
"राजना" च विचारुन सांगते.


मला देखिल मी भारतीय आहे याचा अतिशय अभिमान आहे. आणि माझा सगळ्या भैय्यांवर मुळीच राग वगैरे नाही.पण एकट्या महाराष्ट्राचीच प्रगती व्हावी आणि भारतातील इतर काही राज्ये मागासलेली रहावित हे एक देशप्रेमी असल्याकारणाने बुद्धीला आणि मनाला रुचत आणि पटत नाही. विकास हा सगळ्या भारतात एकाच प्रमाणात व एकाच वेळी व्हावा जे चिनने करुन दाखवले आहे.
पण ९ मुले जन्माला घालुन त्यांच्या उदरनिर्वाहाची तरतुद करण्यातच १५ वर्षे सत्ताउपभोगणारे नेते असल्यावर कसली प्रगती आणि कसला रोजगार?
जसे सर्व भारतीयांना मुंबईचे आकर्षण आहे तसेच भविष्यात मुंबईकरांना व महाराष्ट्रीय जनतेला लखनौ व पटणा अश्याच व तत्सम इतर राज्यांच्या राजधान्यांचे देखिल आकर्षण वाटावे इतकीच माफक अपेक्षा आहे. या जन्मी ही इच्छा पुर्ण होइल असे वाटत नाहि जगलो वाचलो तर "याची देही याची डोळा" बघु असे कधी घडतय का ते? नाहितर पुढचा जन्म आहेच?

उपाध्ये!
एक राहिलच.
(कारण आर्थिक परिस्थिती देखील स्वछ्यतेच्या सवयी बदलते. )
तुमच्या या विधानाशी तर मी अजिबात सहमत नाही आर्थिक परिस्थितीचा व स्वच्छतेचा दुरान्वयाने देखिल संबंध नाही त्यासाठी स्वच्छतेची आवड व त्याचा स्वतला व परिसराला उपयोग या दोन्ही बाबींची माहिती व जाण असणे अत्यंत आवश्यक असते.

उदय!
मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी काय करता येईल? हा एक परिसंवादाचा विषय आहे.
निदानपक्षी प्रत्येक मराठी माणसाने मराठीतुन संभाषणाचाच आग्रह धरला आणि मराठीतुन बोलण्याची लाज वाटुन घेणे सोडले तरी पुष्कळ झाले.
आणि उद्योगधंद्या बद्दल बोलायचे तर मराठी माणसाची या बाबतितली उदासिनताच त्याच्या मुळावर उठते.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Raviupadhye
Monday, March 03, 2008 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GOD FIRGIVE THEM FOR THEY KOW NOT WHAT THEY ARE DOING- :-) - :-) - :-) - :-) - :-)

Raviupadhye
Monday, March 03, 2008 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GOD FORGIVE THEM FOR THEY KNOW NOT WHAT THEY ARE DOING -:-)-:-)-:-)-:-)-:-)

Raviupadhye
Monday, March 03, 2008 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

-GOD FORGIVE THEM FOR THEY KNOW NOT WHAT THEY ARE DOING -:-)-:-)-:-)-:-)-:-)

Jaymaharashtra
Monday, March 03, 2008 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GOD FORGIVE THEM FOR THEY KNOW NOT WHAT THEY ARE DOING -----
उपाध्ये!
तीन तीनदा पोस्ट करण्याची गरज खरेच नव्हती अहो! अणि यातला don't कुणी गिळला?
तुम्हास GOD FORGIVE THEM FOR THEY DON'T KNOW WHAT THEY ARE DOING ----- असे म्हणायचे आहे का? अहो मग निट लिहा की. शुद्ध मराठित "भगवंता त्यांना माफ कर त्यांना माहित नाहि ते काय करत आहेत ते"

इंग्रजी एकदा वाचल काय किंवा ३ दा वाचल काय अर्थ थोडाच बदलणार आहे?उगिच वेळेचा अपव्यय.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Raviupadhye
Monday, March 03, 2008 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

THIS IS THE ORIGINAL BIBLICAL QUOTE AND I DO NOT HAVE ANY AUTHORITY TO ALTER IT -:-(

Zakki
Monday, March 03, 2008 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय काही लोकांच्या मते, बायबलमधले, इंग्रजीतले लिहीले की ते एकदम निर्विवाद सत्य होते. मराठीतून काही लिहीले तर त्यावर वाद करण्याचा हक्क असतो त्यांना.


आता हा बिहार, महाराष्ट्र प्रश्न मोठ्या प्रमाणावर राजकीय आहे. राजकारणात अभिमान, लाजलज्जा, आई, मातृभाषा इ. 'फालतू!' गोष्टींना जागा नसते. सत्ता नि पैसा हे महत्वाचे. बाकी सर्व मिथ्या. म्हंटलेच आहे सत्ता सत्यं जगन्मिथ्या!

त्यासंबंधी इथे वाद घालून काही उपयोग नाही.

मायबोलीवर तरी मराठी भाषेचा वापर कसा वाढवता येईल, दोन मराठी माणसे बोलताना मधून मधून इंग्रजी, हिंदी शब्द नि शब्दप्रयोग का वापरतात, त्यांना समर्पक असे (नुसते भाषांतर नव्हे) शब्द मराठीत शोधून काढता येणार नाहीत का? इंग्रजीत जसे इतर भाषातले शब्द सामावून घेतले आहेत, तसे अधिकृत मराठी चा शब्दकोष करून त्यात हे नवीन शब्द सामावून घ्यावेत का? अश्या मराठी संबंधीची चर्चा केली तर जास्त बरे असे मला वाटते.

मागे श्री. सावरकरांनी मराठीत नवीन शब्द तयार केले होते, पण ते फार संस्कृतप्रचूर असल्याने लोकप्रिय झाले नाहीत.

मला वाटते लोकांनाच आता मराठीचा कंटाळा आला आहे, पटकन् हिंदी किंवा इंग्रजीच बोलायला, लिहायला सुचते त्यांना! नि त्यात बहुधा गंमत वाटते त्यांना!


Jaymaharashtra
Monday, March 03, 2008 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाव बदलुन व नविन आयडी घेवुन काहि जुन्याच व्यक्ती येथे वावरत आहेत अशी शंका घ्यावी का?
झक्किकाका लाखातले बोललात.यांना बायबल्च आठवणार कारण यांची देवी सोनियामाता ना! मग अजुन कुठले दाखले देता येणार यांना.


Ladtushar
Monday, March 03, 2008 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाकी, तुमचे म्हणणे, पटते आहे, आणि असा उपक्रम स्तुत्य आहे.

परंतु या बा फ वर मी इथे एक वास्तव सांगु इच्चितो, आज चा मराठी माणूस या दोन विविध विचारसरणी मधे अडकला आहे
१) मराठी अस्मितेची ध्येय उराशी बाळगुन, ती जतन करण्या साठी, मराठी अस्मिते चे ध्येय असणारया पक्षाला पांठिबा देणे. राज च्या भूमिकेचे जवळ जवळ सर्वच मराठी समर्थन करत आहेत पण ते फ़क्त मनातूनच, कृतितुन नव्हे. कारण ही कृति करण्या साठी त्याना त्यांच्या रोज च्या दिन क्रमा मधे येणारया प्रेतेक गोष्टीत तडजोड़ करावी लागेल जी प्रत्यक्ष रित्या वाटते तेवढी सोपी नव्हे. उदा अमराठी ला पांठिबा न देणे, (non cooperative movement against non maharashtrians) आणि असे जर वागायचे ठरवले तर रोज आपल्या बरोबरच्या काम करणारया आणि शेजरच्यां मधे ग्रुप पडतील.

किंवा
२) राष्ट्र वादाचे ध्येय असणारया पक्षाला पांठिबा देणे. जो पक्ष मराठी अस्मिते बद्दल एक ही शब्द काढित नाही.

हे दोन प्रमुख प्रश्न आजच्या मराठी लोकांचे भवितव्य ठरवतिल!

Raviupadhye
Monday, March 03, 2008 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाखला
अरसिकेषु कवित्वं निवेदेन शिरसि मा लिख मा लिख मा लिख

हे मात्र महाकवि कालिदासांनीच तीन दा लिहिले आहे.


Chinya1985
Monday, March 03, 2008 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी शाळांबद्दल म्हणायच झाल तर आज अनेक मध्यमवर्गीयांना अशी भिती वाटते की मराठी शाळेमधे आपला मुलगा वाया जाणार नाही ना गुंडगिरीच्या मार्गाला लागणार नाही ना. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत टाकत नाहीत. शिवाय इतर लोकांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधे जातात मग आपला मुलगा मराठी माध्यमात जातो सांगणे कमीपणाचे वाटते. सर्व बाबतीत भैय्यांना दोष देउन उपयोग नाही मराठी माणसांनी आत्मपरिक्षणही करायला हवे. मी गेले ४-५ वर्ष मुंबईकरांबरोबर रहात आहे. यातले अनेक मराठी मुंबईकर एकमेकांशी बोलताना हिंदीत बोलतात. यात भैय्यांचा काय दोष??? काही हिंदी भाषिकांना मराठी येते ते माझ्याशी मराठीतच बोलतात मात्र आपले अनेक मराठी लोक त्यांच्याशी हिंदीतच बोलतात. मुंबईतील अर्ध्याहुन जास्त मराठी टॅक्सी मालकांनी स्वत्:च्या टॅक्सी भाड्यानी दिल्या आहेत(मुख्यत्वे भैय्यांना). यातही भैय्यांचा काय दोष??मी भैय्यांच समर्थन करत नाहीये मात्र दोष फ़क्त भैय्यांचा नाही. मराठी माणसाला अनेक कामे कमी दर्जाची वाटल्याने तो ती करत नाही. शिवाय काम केल्यास तो मोबदलाही भैय्यांपेक्षा जास्त मागतो. बाकी राजने लोकप्रभातील मुलाखतीत महाराष्ट्राला युरोपाच्या पुढे वगैरे नेण्याची गोष्ट केली होती. युरोपाने स्थलांतरीतांना कमी मोबदला देउन काम करुन घेतले आणि प्रगती साधली मात्र महाराष्ट्रातुन स्थलांतरीतांना हाकलुन देउन युरोपासारखी प्रगती साधता येईल का यावर चर्चा व्हायला हवी.

Satishmadhekar
Monday, March 03, 2008 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मराठी शाळांबद्दल म्हणायच झाल तर आज अनेक मध्यमवर्गीयांना अशी भिती वाटते की मराठी शाळेमधे आपला मुलगा वाया जाणार नाही ना गुंडगिरीच्या मार्गाला लागणार नाही ना.

गुंडगिरी ? ? ? :-(

Jaymaharashtra
Monday, March 03, 2008 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


उगिच काहि तरिच काय बोलतात माणसे?
मराठी शाळांमधे पाल्यांना न पाठवणे याचे कारण मराठी शाळांमधुन मुले गुंडगिरी करतात हे नसुन शिक्षणाचा व शिक्षकांचा निकृष्ट दर्जा कारणीभुत आहे.बहुतेक खाजगी संस्थांच्या मराठी शाळांना जेंव्हा सरकारचे अनुदान मिळते तेंव्हाच त्या शाळांचा दर्जा घसरायला सुरुवात होते. याला कारण शिक्षणाचे झालेले बाजारीकरण आणि एकदा अनुदान स्विकारले की सरकारच्या सगळ्या अटी व नियम यांचे लागु होणे हल्ली शिक्षकांच्या तोंडी शुद्ध मराठी ऐकायला मिळणे दुर्लभ झाले आहे. आनी पानी बानी या शिवाय भाषा नाही.
त्यातच स्पर्धेचे युग असल्याकारणाने पालक आपल्या पाल्यांच्या बाबतित खुपच दक्ष जागरुक झाले आहेत. इतर अनेक कारणे असु शकतिल पण गुंडगिरी हे कारण नक्कीच असु शकत नाही.


Zakki
Tuesday, March 04, 2008 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनी पानी बानी या शिवाय भाषा नाही

मागे, म्हणजे १९६० पूर्वी (म्हणजे जेंव्हा तुम्ही तर जन्मला नव्हताच, पण तुमचे बाबा सुद्धा बोळ्याने दूध पीत होते, नि मी मात्र दहावीत होतो, तेंव्हा) पुण्यात सणस नावाचे एक मेयर झाले. ते म्हणाले "माझे नाव 'सनस' आहे, सणस नाही. आजकाल जास्तीत जास्त लोक 'कनिक लोनी अनिक पानी आन' असे म्हणतात. तेंव्हा हेच बरोबर मराठी आहे असे मी म्हनेन!"

प्रश्न: बहुसंख्य लोक जेंव्हा संस्कृत ऐवजी प्राकृत नि नंतर मराठी बोलू लागले तेंव्हा मराठी भाषा झाली. पूर्वी ती संस्कृतप्रचूर होती. आताशा सहजपणे लोक उर्दू, नि इंग्रजी शब्दहि मराठी बोलताना वापरतात. व्हिक्टोरिया टर्मिनसचे छत्रपति शिवाजि 'टर्मिनस' च केले नि त्याला सि एस टी असेच म्हणतात. मग आनि पानि लाच का आक्षेप?



Peshawa
Tuesday, March 04, 2008 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला कारण शिक्षणाचे झालेले बाजारीकरण आणि एकदा अनुदान स्विकारले की सरकारच्या सगळ्या अटी व नियम यांचे लागु होणे हल्ली शिक्षकांच्या तोंडी शुद्ध मराठी ऐकायला मिळणे दुर्लभ झाले आहे. आनी पानी बानी या शिवाय भाषा नाही. >>>

शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. पण मला ते तसे झाले ह्यात वावगे व वाईट दोन्ही वाटत नाही. बाजारीकरण झाले तरच उत्तम service मिळु शकेल. शासकीय अनुदान हा बाजारीपणा नसून भारतीय सरकारच्या अगम्य व प्रतिगामी शैक्षणिक धोरणाचा नमुना आहे. मराठी शाळातून सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्श होते हे वस्तव आहे. व ज्या शाळा तो सर्वांगीण विकास देतात तिथे गर्दी. इग्रजी भाषेकडे दुर्लक्श आणि एकंदरीत भाषा शिकवण्याच्या चुकिच्या पद्धती ह्यामुळे मराठी शाळा बंद होत आहेत. मुख्यता इंग्रजी शाळा आणी मराठी शाळा असे वर्गिकरण करणेच मुर्खपणाचे आहे. दोन्ही भाषा उत्तम शिकवणार्या शाळांची गरज आहे. पण असे करायला मराठी माणुस पुढे येत नाही. स्रकारी धोरण (?) आणी चुकिच्या ठिकाणी मराठी भाषा प्रेम हेच ह्या प्रष्णाला जबाब्दार आहे. ज्या शाळा इतर भाषिक चालवतात त्यांना इंग्रजी माध्यम पुरते!

रहीला आनि, पानि चा प्रष्ण तर मराठी बोली भाषेचा तो एक प्रकार आहे. ह्या सारखे अनेक बोलिभाषेचे प्रकार शाळेत शिकवले पाहिजेत... अनि, पानि वरून एखाद्याला हिणवणे हे पुर्णपणे चुकीचे व व्यक्तीला कमी लेखणारे आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators