Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 02, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » UP/Bihar Versus Maharashtra: punha ek raajkaaraN » Archive through March 02, 2008 « Previous Next »

Jaymaharashtra
Friday, February 29, 2008 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे बिहार वरुन एक विनोद पोस्ट करतेय.
once upon
2 ppl went to narak loka
one fellow called up mumbai
he got bill of STD charges
other called up his home in bihar
he got local charges
he asked why???
STd fellow replied.................
..............................
..........................
..........................
FROM BIHAR TO NARAK IS LOCAL CALL.



Zakki
Friday, February 29, 2008 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या बातमीफलकाच्या विषयाचा संबंध राजकारणाशी अत्यंत घनिष्ठ आहे. नि राजकारणाबद्दल इथे वाद घालून काय उपयोग होईल, याबद्दल मी साशंक आहे.

खरे तर मायबोलीवर चर्चा व्हावी ती, हिंदी किंवा इंग्रजी शब्दांना नि शब्दप्रयोगांना मराठीत समर्पक प्रतिशब्द कसे करता येतील, त्या शब्दांचा वापर नेहेमीच्या बोलण्यात कसा लोकप्रिय करावा, या विषयांवर चर्चा झाली तर मला बरे वाटेल!

ती जास्त सयुक्तिक नि उपयोगी होईल, असे मला वाटते.

कुणाला राज ठकरे नि मराठी साहित्य संघ यांचे पत्ते माहित असल्यास कृपया मला कळवा, मी त्यांना लिहीन. (अर्थात्, मराठी आणि इंग्रजीतूनच. नुसतेच मराठीत लिहीले तर एकतर त्यांना बरेचसे समजणार नाही, नि त्यांना वाटणार नाही की मला काही अक्कल असेल! 'हं, इंग्रजीत लिहीता येत नाही वाटते? ')


Marhatmoli
Friday, February 29, 2008 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालि लिंक दिलिय तो लेखहि जरूर वाचा. विचार करण्यासारखि गोष्ट आहे. राज ठाकरे सारखे लोक इतरांच्या (मराठि) मुलांचि आयुष्य पणाला लावताना कचरत नाहित पण स्वत:च्या मुलाना मात्र मराठि शाळेत घालायला मात्र तयार नसतात. मराठि माणुस इतका महत्वाचा आहे याचा विचार रमेश किणि प्रकरणात कुठे होता? माझ्या आठवणिप्रमाणे राज ठाकरे आणि त्याचा अमराठि builder सहकारि हेच रमेश किणि यांनि त्यांचि रहाति जाग सोडवि म्हणुन प्रय्त्न करत होते ना?

http://www.loksatta.com/daily/20080224/lokkal.htm

Jaymaharashtra
Friday, February 29, 2008 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकसत्ताचे कुमार केतकर आणि बादरायण संबध जोडणे या मधे हातखंडा आहे.
स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवावे लागत असल्याची इतर अनेक कारणे असु शकतात.पण म्हणुन मराठीचा मुद्दा उचलायची त्यांना मुभा नाही असे होत नाही. शेवटी काही निर्णय परिस्थिती नुसार घ्यावे लागतात.
मला स्वतला माझी मुले मराठी शाळेत शिकावीत अशी इच्छा होती.पण परदेशात कुठे मराठी शाळा मिळायला? पण म्हणुन जातीने लक्ष देवून मुलां मधे मराठीची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे इतके तरी करता येतेच की?


Shendenaxatra
Saturday, March 01, 2008 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला जय महाराष्ट्रचे म्हणणे पटते.
मराठीचा आग्रह धरणार्‍याने आपली मुले मराठी माध्यमाच्या शाळेतच घातली पाहिजेत हा आग्रह का म्हणून?

त्याची मुले मराठी बोलतात का? त्यांना मराठीबद्दल अभिमान आहे का हे बघितले पाहिजे.

काही लोक हौसेने मराठी वाचतात, काही ऐकतात, काही निव्वळ चित्रपट वा नाटके बघतात. प्रत्येकाने सगळे काही केले तरच तो खरा मराठीचा अभिमानी असे म्हणणे मूर्खपणाचे आहे.

इंग्रजी माध्यमात शिकून कुणी मराठीतला उत्तम नट, दिग्दर्शक, बनणार नाही असे आजिबात नाही.
आपल्या ऐपतीप्रमाणे, निवडीप्रमाणे, कुवतीप्रमाणे मुलांची शाळा निवडायचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असले पाहिजे.




Marhatmoli
Saturday, March 01, 2008 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा लेख कुमार केतकर यांनि लिहिला नसुन शुभदा चौकर यांनि लिहिला आहे. कुमार केतकर हे जरि सोनिया गांधिंचे भक्त असले तरि लोकसत्ता मध्ये लिहिणारे सगळेच तसे आहेत असा निष्कर्ष का म्हणुन काढायचा?

दुसरि गोष्ट म्हणजे परदेशात वास्तव्य असेल तर मुलांन मराठितुन शिक्षण देता येउ शकणार नाहि हे मान्य पण राज ठाकरे यांना अशि कुठलिहि अडचण नाहिये.ते काहि परदेशात रहात नाहित ते दादर मध्ये रहातात तिथे मुलांसाठि मरठि माध्यम उप्लब्ध आहे.

इंग्रजि शिकण्याचि आजच्या काळात गर्ज आहे हा वादाचा मुद्दाच नाहिये पण इंग्रजि शिकायला इंग्रजि माध्यमाचि गरज आहे का? मराठि लेखक मराठि साहित्य या सर्वांचि ओळख इंग्रजि माध्यमातुन खरच
होउ शकेल का? इंग्रजि माध्यमातुन शिकणार्याना ५५, ६३ अशे मराठि आकडे चतकन समजत नाहित तर मग मराठि साहित्य वगैरे खुपच दुरचि गोष्ट आहे.ज्या भाषेतुन तुम्हि शिकता त्या भाषेत तुम्हि विचार करायला लागता असा सर्वसाधारण अनुभव आहे. मराठि मुलांनि मराठितुनच विचार करावा म्हणुन मराठि माध्यमाचि आवश्यकता आहे.


मुख्य मुद्दा हा आहे कि राज,उद्धव, बाळासाहेब हे सगळे मराठिचे स्वयंघोषित तारणहार आहेत मग रमेश किणि हा मराठि माणुस होता याचि आठवण कुणालाच कशि झालि नाहि तेंव्हा? "रमेश किणि म्हणजे काय महत्मा गांधि आहे का कि मी त्याच्या मृत्युबद्दल खेद व्यक्त करावा?" असे खुद्द बाळासाहेबांचे उद्गार मी त्यावेळि वाचले आहेत. ज्यांचा त्यानि इन्कार केला नव्हता!


Uday123
Saturday, March 01, 2008 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मावशी मुंबईला एका मराठी शाळेत काम करते. मागच्या महिन्यात भेटीचा योग आला. तिच्या म्हणण्यानुसार, शाळेतील मुलांची संख्या रोडावत चालली आहे (१९९० मधे १२००, आज ४००). मला प्रथम धक्काच बसला, सगळीकडे लोकसंख्येचे आकडे वाढत आहेत आणी मग या शाळेत मुले कमी कशी होत आहेत? काही वर्षा नंतर या सर्व मराठी शाळा बंद पडतील अशी भिती वाटते.


Shendenaxatra
Saturday, March 01, 2008 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी संस्कृती म्हणजे निव्वळ भाषा नव्हे. समजा मराठी लिहिण्या वाचण्यात कच्चा असला तरी मराठी इतिहास माहित असू शकतो, सणवार, गाणी, आरत्या, अभंग, लावण्या ह्यांची आवड असू शकते. टीव्हीवरील मालिका, सिनेमे, नाटके ह्यांचा आनंद घेऊ शकतात.

माझ्या माहितीतले कित्येक मराठी माध्यमात शिकलेले लोक रोजचा पेपरही वाचत नाहीत. साहित्य वगैरे तर दूरच. चालायचेच.

अट्टाहासाने दुय्यम दर्जाच्या मराठी शाळेत घालून मुलांची वाट का लावा? मुलांमधे मराठीची आवड घरी दारी निर्माण करता येते. इंग्रजी माध्यम ही एक तडजोड आहे. शिवाय महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी हा विषय असतो.

ठाकर्‍यांच्या किणी प्रकरणात नक्कीच काळेबेरे होते. त्या बाबतीत त्यांचा निषेधच केला पाहिजे. पण मुले इंग्रजी माध्यमात शिकतात म्हणून राळ उडवायचे कारण नाही.



Jaymaharashtra
Saturday, March 01, 2008 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा स्वतचा अनुभव सांगते.मी जेंव्हा माझ्या मोठ्या मुलाच्या प्रवेशा करता माझ्या स्वतच्या मराठी शाळेत गेले तेंव्हा माझ्याच एका पुर्व शिक्षिकेने मला सांगितले की शहाणी असशील तर आपल्या शाळेत घालू नकोस कारण शाळेचा दर्जा पुर्णपणे घसरला आहे.तुमच्या वेळचे प्रामाणिक शिक्षक नाहित आणि विद्यार्थी देखिल नाहीत.इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालुन देखिल आपली मातृभाषा तु त्याला जातीने लक्ष देवून शिकवु शकतेस. तरी देखिल मी सरस्वती मराठी शाळेत प्रवेश मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण त्या भागात रहात नसल्यामुळे आणि शिधा पत्रिका त्या विभागतिल नसल्या कारणाने माझ्या मुलाला प्रवेश नाकरण्यात आला.यानंतर मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याला घालण्यावाचुन दुसरा पर्याय नव्हता.

सध्या तर भारताबाहेर वास्तव्य असल्याकारणाने इंग्रजी शाळेतच जातात मुले.पण तरीही माझा मुलगा उत्तम मराठी बोलतो आणि वाचतो देखिल.भारतात गेल्यावर बर्‍याच जणांना प्रश्न पडतो कि इतके अस्खलित मराठी मुले कशी बोलतात. आपण आपल्या मायबोलीचे संवर्धन जसे जमेल तसे नक्कीच करु शकतो. आभाव आहे तो इच्छा शक्तिचा अशी बरीच कुटुंबे माझ्या माहितित आहेत कि जे फ़क्त काही काळासाठी अमेरिका आणि तत्सम कुठल्या देशात राहुन आले आहेत.पण त्यांना आपले हात गगनाला टेकले असे वाटत असते सतत इंग्रजी शिवाय मुलांशी बोलत नाहीत.
विषयांतर झाल्याबद्दल क्षमस्व.
जय हिंद
जय महाराष्ट्र!


Raviupadhye
Saturday, March 01, 2008 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो जय महाराष्ट्र;मी इतका वेळ काय शंख करतोय,मराठी माणसालाच स्वाभिमान नाहिये मग दाद कुणाकडे मागताय,कमीत कमी बिहारी आणि यू पी चे लोक मातृभाषेत अस्खलीत पणे बोलतात तरी

Zakki
Saturday, March 01, 2008 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बंगलोरला असताना आमच्या वर्गात ९ मुले होती. सर्वजण निरनिराळ्या ठिकाणांहून आले असल्याने इंग्रजीतून बोलायचे. त्यातला एक कानपूरचा होता. त्याला इंग्रजी नीट येत नसे. तो म्हणाला, कॉलेजमधे शिक्षक हिंदीतून शिकवायचे!

पण त्याने इंग्रजी बोलण्याची सवय केली नाही. दुसर्‍या वर्षी वर्गातले सर्वजण आप आपसात हिंदीतून बोलत होते! असा त्याचा प्रभाव.

या उलट चार मराठी नि पाच इतर भाषिक असते तरी सगळे मराठीत बोलले नसते. बहुधा मराठी लोकांना आपल्याला इतर भाषाहि येतात हे दाखवण्यासाठी, आपले (हुच्च) विचार सर्वांपर्यंत पोचलेच पाहिजे या अट्टाहासाने, ते इतर भाषा बोलतात!

असे आपले मला वाटते.


Jaymaharashtra
Saturday, March 01, 2008 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवीजी!
मी तुमची कळकळ समजु शकते.पण तुम्ही तर मराठी माणसाच्या कार्यशक्ती वरच शंका घेतलीत.जे निदान मला तरी पटणे अशक्य आहे.
उत्तरभारतीय अंगमेहनतीच्या कामात सक्षम आहेत आणि या बाबतीत मराठी माणसे उदासीन आणि अकार्यक्षम आहेत असे तुमचे म्हणणे म्हणजे परिस्थितिचा विपर्यास करणे नाही का?
मला एक सांगा? जे लालुप्रसाद यादव भारतीय रेल्वेचा उद्धार केल्याच्या गप्पा मारतात,हवे तर या क्षणापुरते मानुन चालु कि त्यांनी भारतीय रेल्वेचा कायापालट केला( जरा पचवायला आणि बुद्धिलाअ पटायला अवघड आहे) ,पण मग त्यांची हिच कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती बिहारचे मुख्यमंत्री असताना कुठे शेण खायला गेली होती?...........................
उत्तरभारतिय बुद्धिने नक्किच तल्लख आहेत त्यांची कार्यशक्ती अफाट आणि अचाट आहे, तसेच ते कष्टसाध्य देखिल आहेत.पण त्याचा उपयोग त्यांच्या स्वतच्या प्रदेशाला उत्तमप्रदेश बनविण्यात ते किती करतात? हाच मोठा प्रश्न आहे.
मुंबई व महाराष्ट्रात येवुन येथिल पायाभुत सुविधांवर भार होण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या प्रदेशाची प्रगती कशी करता येईल याचा विचार करावा. जर उत्तरभारतिय मुंबई व महाराष्ट्राची इतकी प्रगती करु शकतात(हा एक संशोधनाचा विषय आहे) तर मग त्यांच्या जन्मभुमीच्या प्रगती साठी त्यांनी वचनबद्ध असायला नको का?
मग जर त्यांचा आवाज उठवण्यासाठी त्यांना कुणी "राज ठाकरे" त्यांच्या स्व-राज्यात मिळत नसेल तर हा त्यांचा कमनशिबीपणा म्हणायला हवा! तुमच्यात धमक असेल तर तुमच्या लालु,मुलायम सारख्या राज्यकर्त्यांना प्रगती करण्यास भाग पाडा.मग त्यासाठी शस्त्र उचलावे लागले तरी हरकत नाही.एकंदरीत सध्याच्या बातम्यांवरुन तरी उत्तरप्रदेश व बिहार या सारखी राज्ये म्हणजे आय एस आय चे व दहशतवाद्यांचे अड्डे बनले आहेत असे लक्षात येते.त्यामुळे शस्त्रास्त्रांची कमतरता भासणार नाही आणि तसे देखिल या दोन राज्यात बाकि काहि पिकत असेल अथवा नसेल दारुगोळा व बंदुका प्रचंड प्रमाणात उत्पादीत होतात...............
लालु व मुलायम सारखे नतद्रष्ट व तथाकथित सेक्युलर राज्यकर्ते असल्यावर अजुन काय होणार! आणि गरीब बिचारी जनता तरी काय करु शकते म्हणा? "यथा राजा तथा प्रजा" या उक्ती प्रमाणे एखाद्या जळू प्रमाणे सत्तेला चिकटुन रहायचे आणि प्रजेचे शोषण करायचे.त्याच प्रमाणे त्यांची उत्तरभारतीय प्रजा देखिल इतर राज्यांमधे स्थलांतरीत होवुन त्या राज्यांचे व प्रदेशांचे व संबंधित भुमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणुन त्यांचे शोषणच करते आहे.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Jaymaharashtra
Saturday, March 01, 2008 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मुंबई आमचीच' चित्रपट आजपासून
मराठी विरुद्ध परप्रांतिय' विषयावर आधारलेला 'मुंबई आमचीच' चित्रपट शुक्रवारपासून नाशिकच्या 'दामोदर' चित्रपटगृहात प्रदशिर्त होत आहे. चित्रपटाची कथा व मनसेच्या आंदोलनात साम्य असले, तरी त्याचा थेट काही संबंध नसल्याचे चित्रपटाचे निर्माते, लेखक अभिनेता व दिग्दर्शक अॅड्. शरद बनसोडे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितले.

' प्रदर्शनाच्या मार्गावर असल्यापासूनच चित्रपटाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. सेन्सॉर बोर्डाने नकार दिल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले. न्यायाधीशांनी परवानगी दिल्यानंतरही पुन्हा बोलावले गेले. त्यानंतर प्रदर्शनाची वाट मोकळी झाली. मुंबईकरांचे रोजचे जगणे, त्यांच्या समस्या आणि अपेक्षांचे वास्तव या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे', असेही अॅड्. बनसोडे सांगितले. समाजातील वास्तव चित्रपटातून अधिक प्रभावीपणे मांडले जाते, म्हणून या चित्रपटातून मराठी तरुणांनी काहीतरी बोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

.....

घटनेचा आधार घेणे शक्य

' परप्रांतियांचा प्रश्न मराठी तरुणांच्या उदरनिर्वाहावर उठला आहे. हा प्रश्न सोडवायचा असेल, तर आहे त्या परप्रांतियांना मराठी माणसासारखे रहायला सांगून, नवीन येणाऱ्यांना प्रतिबंध करण्याचा अथवा परप्रांतियांना माघारी पाठवण्यापैकी कुठल्याही एका पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. मूळ घटनेत 'राज्यातील जनतेच्या हितासाठी' बाहेरच्यांना प्रतिबंध घालण्याची तरतूद केली गेली आहे. राज्य शासन त्यासाठी घटनेचा आधार घेऊ शकते', असे मत अॅड्. बनसोडे यांनी व्यक्त केले. सध्या मराठी विरुद्ध परप्रांतिय वाद सुरू असल्याने मुंबईत हा चित्रपट अद्याप प्रदशिर्त केलेला नाही. चित्रपट बघितल्यानंतर राज ठाकरे यांची पावती मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.



Sameer_dk
Saturday, March 01, 2008 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jaymaharashtra
अंगमेहनतिचे उदाहरण Raviupadhye ह्यांनि नाहि मि लिहिले होते त्यात मि असे म्हट्ले नाहि कि मराठि माणुस अंगमेहनतिच्या कामात अकार्यक्षम आहे पण मला योग्य शब्द आठ्वत नव्हता तो तुम्हि बरोबर लिहिला "उदासिन".
पण हे खरे आहे कि तो उदासिन आहे. आणि फ़क्त मराठिच नाहि तर आपापल्या राज्यात तेथिल स्थानिक निवासि हा अंगमेहनतिच्या कामात कामचुकार पणा करतोच. हा माझा अनुभव आहे. अर्थात सगळ्या गोष्टिंना अपवाद पण आहेच.
काहि विचार माझ्या मनात आहेत, हे कोणाहि एका व्यक्तिला उद्देशुन नाहियेत,मि महाराष्ट्राबाहेर राहात असल्याने माझ्या मनात काहि गोंधळ होतोय कि मराठि माणुस म्हणजे नक्कि कोण?
१)ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला तो?
२)जन्म महाराष्ट्राबाहेर झालेला आहे पण नंतर तेव्हापासुन महाराष्ट्रात राहात आहे आणि शिकत आहे तो?
३)ज्याला निट मराठि बोलता येते तो? कि ज्याचे शिक्षण महाराष्ट्रात झाले आहे असा माणुस?
४)ज्याचे पालकांनि स्वताःचे आयु ष्य महाराष्ट्रात काढले पन पाल्य नोकरिकरिता महाराष्ट्राबाहेर गेला तो आता मराठि माणुस आहे का?
५)मराठि नाहि पन नोकरि करिता महाराष्ट्रात आला होता आहे नीट मराठि शिकला. तर त्याला किति वर्षानंतर मराठि माणुस म्हणायचे?
६) माझा जन्म, शिक्षण महाराष्ट्रात झाले आहे पण माझ्या वयाचि जस्तितजाश्त वर्षे महाराष्ट्राबाहेर गेलि आहेत मग मि मराठि माणुस आहे का?
७)हे जे आंदोलन सुरु आहे ते फ़क्त कामगार,दुधवाले,भाजिवाले आणि सामान्य लोकांविरुध्य आहे कि नंतर अंबानि,टाटा,मोठे औद्योगिक घराणि,आन्तररास्ट्रिय कारखाने कार्यालये ह्यांच्या विरोधात पण होणार आहेत?

हे मझ्या मनातिल गोंधळ आहेत कोणालाहि दुखवण्या करिता नाहि,उत्तरे मिळाल्यास म. न. से कडुन कि विरोधात? आणि महाराष्ट्रात नोकरि मिळालि तर यावे कि नाहि ते ठरवता येइल.
आणि मुलाला पण तो मराठि माणुस आहे कि नाहि ते सांगता येइल


Raviupadhye
Saturday, March 01, 2008 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक प्रश्न्-- आमच्या नाशिकच्या पोलिस ट्रेनिंग सेंटर च्या सन्चालिका यू पी च्या आहेत.कलेक्टर तामिळ्नाडू चे आहेत. अनेक धनाढ्य व्यापारी बिहारी व पंजाबी आहेत. स्वर्णकार मारवाडी आहेत, या ठाकर्‍यांच्या आन्दोलनात यांच्या नखाला ही धक्का लावायाची बिशाद त्यांच्या अनुयायी मन्डळीत नव्हती.पसरीचा,कृपाशन्कर सारखे लोकही यांच्या मारहाणीतून सुटले. शेवटी काय सिद्ध झाले? पैसा आणि अधिकार बोलतो्ए लोक विकले गेलेत हो!!
आणि माझा मुद्दा हाच आहे.गांधीजींच्या आन्दोलनात एकसूत्रता होती.जर परकीयांविरुद्ध आवाजच उठवायचा असेल तर विकले जावू नका.
आणि कुठे तरी लक्षात असू द्या की माझ्या सारखे बरेच मराठी लोक अनेक वर्षे यू पी,बिहार,हिमाचल सारख्या राज्यात उमर काढून आलेत त्याना स्थानीय लोकांकडून अशी अपमानास्पद वागणूक कधीच नाही मिळाली,हे ही मी अनुभवलेले सत्य आहे. अशाने आपण देश तोडतोय
आता अंग मेहेनती च्या कामाबद्दल.जर कामाची गरज निकडीची असली आणि पगार तोच असला तर मराठी माणूस कदाचित थोडे दिवस ते घे ईल.पण कटकट करेल,टाळंटाळ करेल या विरुद्ध भैय्ये अन बिहारी दिवसेंदिवस बिन तक्रार ते करतील. हा माझा प्रत्येक राज्यातील अनुभव आहे.
बाय द वे.जय महाराष्ट्र तुम्हाला यू पी व बिहार्‍यान्चा एवढा राग का आहे?ते भारतीय नाहीत का? आणि लालू च्या एवढेच मूर्ख लोक महाराष्ट्रात किम्बहुना भारताच्या प्रत्येक राज्याच्या state assembly त नाहित का? आपले अंतुले वा स.का काय कमी स्वार्थी नाहीत्नव्हते का?


Jaymaharashtra
Saturday, March 01, 2008 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवीजी!
तुमचे म्हणणे काही अंशी पटते.पण मुळातच हा लढा समस्त उत्तरभारतीयांन विरोधात आहे हा तुमचा समज पुर्णपणे चुकीचा आहे. तुम्ही उत्तरभारतातील राज्यात वास्तव्य करुन आलात व तेथे तुम्हाला कुणी कधी अपमानस्पद वागणुक दिली नाही याला कारण तुमचे योग्य वर्तन तसेच नेहमी मराठी व्यक्ती ही निरुपद्रवी माणसांमधेच गणली जाते. "आपण बरे आणि आपले काम बरे" अश्या प्रकारची प्रवृत्ती मराठी माणसाची असते. तुम्हाला ते घाटि म्हणुनच संबोधतात हे देखिल सत्यच आहे.. या बाबतीत तरी तुम्ही माझ्याशी सहमत असाल अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.
लालुप्रसाद यादव या व्यक्तीबद्दल आदर वाटावा असे काही गुण त्यांच्यात आहेत असे निदान मला तरी वाटत नाही. नैसर्गिक दृष्ट्या अतिशय संपन्न अश्या बिहारचे वाटोळे होण्यास हिच व्यक्ती जास्त प्रमाणात जबाबदार आहे.
उर्वरित भाग नंतर.


Raviupadhye
Sunday, March 02, 2008 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"जय महाराष्ट्र"
"उत्तरभारतिय बुद्धिने नक्किच तल्लख आहेत त्यांची कार्यशक्ती अफाट आणि अचाट आहे, तसेच ते कष्टसाध्य देखिल आहेत.पण त्याचा उपयोग त्यांच्या स्वतच्या प्रदेशाला उत्तमप्रदेश बनविण्यात ते किती करतात? हाच मोठा प्रश्न आहे. "
हाच stand जर अमेरिकन लोकानी घेतला तर??? भारतीयांच्या बाबतीत? आणि माझ्या माहितीप्रमाणे body shoppers नी पाठ्वलेले बहुसंख्य भारतीय IT मधील अंग मेहनतीचे काम करणारेच नाही का?
आता मला आणखी एक माझी tube light पेटल्याचा अविष्कार झाला ते म्हणजे "हे आंदोलन फक्त उत्तर प्रदेशिय लोकाविरुद्ध नसून सर्व महराष्ट्रीयेतर जनते साठी आहे.
मी एवढेच म्हणेन "महाराष्ट्र जगो भारत मरो""-:-( :-(
काय शोकान्तिका आहे, --- - double standards!!!!!!! मराठी माणूस बाहेर कुठेही काम करू शकतो पण संविधानाने दिलेली ती संधि इतरांस देणार नाही.
hmt,hero honda,maruti,tata motors-jamshedpur,lucknow इथे या मापदंडाप्रमाणे कोणिही काम करू शकत नाही.
घाटी ही संज्ञा कुठेही मुम्बई व महाराष्ट्रा च्या इतर भागात सोडून प्रचलीत नाही. काही ठिकाणी त्याना "मद्रासी"म्हटले जाते.
सुशिक्षित महाराष्ट्रीय व इतर राज्यातील तत्सम लोक व अशिक्षित महाराष्ट्रीयन व इतर राज्यातील तत्सम लोक यात मला फारसा फरक आढ्ळला नाही.कारण आर्थिक परिस्थिती देखील स्वछ्यतेच्या सवयी बदलते.
कृपया सर्व परिस्थितीचा विवेकाने विचार करा ही नम्र विनन्ती.


Santu
Sunday, March 02, 2008 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपाध्ये
तुम्हाला भैय्यांबद्दल एवढे प्रेम का आहे?
अरे हि लोक इथ येवुन झोपड्या उभारुन आमच्या
डोक्यावर टिबं टिंब करतायत त्याच काय रे?


Raviupadhye
Sunday, March 02, 2008 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला भैय्याच काय सर्व भारतीयांबद्दल प्रेम आहे.तुमच्यावर ही.कितीही ग्राम्य भाषा तुम्ही वापरली तरीही-:-) कारण मी खरोखर जवळ जवळ सर्व राज्यातील सर्व थरातील नागरिकांबरोबर खूप जवळून आणि जवळिकीने वागलो आहे,राहिलो आहे. राहिली बाब झोपड्पट्टीतील टिंब टिंब ची ही टिंब सर्व राज्यातील लोकांची same नाही का?-:-) बाय द वे मराठी लोक झोपड पट्ट्यात रहात नाहित का ओ?एक आर्थिक compulsion म्हणून? का इतर राज्यिय स्वानंदाने तिथे रहातात?

Santu
Sunday, March 02, 2008 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग्राम्य भाषा ))))मग टिंब टींब च्या जागी खर लिहु काय मला काय नाही पण तुला उचमळेल.

आणी टींबटींब सगळ्या चे सेम असले तरी
डोक्यावर केल्यावर कुणाला आंनद होईल का?

भैय्यावर प्रेम आहे)))) अरे अरे थांब कुणि एकेल.

मराठि लोक झोपड पट्ट्यात राहतात)))) मुम्बईत काय परसेंटेजे आहे मराठी लोकांचे झोपड्यात.
च्यायला भरमसाठ पोर काढायची आणि द्यायची इकडे पाठवुन. महाराष्ट्र म्हणजे काय त्यांच्या बा चा माल आहे काय.

घेतला कि माल गेलि पन्नास वर्षे
आता झालि की पन्नास वर्ष बंद कराकी कारखाना आता

आयची कटकट


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators