Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 23, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » UP/Bihar Versus Maharashtra: punha ek raajkaaraN » Archive through February 23, 2008 « Previous Next »

Zakasrao
Friday, February 22, 2008 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

CAN our great leaders dare say that Middle-east countries especially Dubai got developed due to labourers from India ?>>>>>>>>.
हा एक प्रश्न चुकीचा आहे.
पण सतिश यानी जे इथे कॉपी पेस्ट केले तेच मी करण्याच्या उद्देशाने आलो होतो.
बाकी प्रश्न खरच विचार करण्यासारखे आहेतच. :-)
मला भय्या लोकानी सोडुन गेले म्हणुन आमच्या कं ला नुकसान झाले किंवा आम्ची कं बंद आहे अस म्हणणार्‍या लोकांची कीव येते.
(हे वैयक्तीक नाहीये. काल परवाच पेपरात बातमी वाचली आहे की चाकण मधल्या छोट्या छोट्या कं बंद पडण्याच्या मार्गावत त्या संबंधी बोलतोय मी.)
एक ढुंडो हाजा मिलते है
अशी परिस्ठिती आहे कारण भैया लोक्स काही फ़ार कौशल्याच काम करतच नव्हते. तेच काम करायला कोणीही जास्त शाळा न शिकलेला माणुस मिळण कठिण नाही.
ह्या स्थितीचा फ़ायदा घेवुन मराठी लोकानी घेतला पाहिजे. हे मात्र नक्कि.


Satishmadhekar
Friday, February 22, 2008 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या,

मला करूणानिधिबद्दल अजिबात प्रेम नाही. किंबहुना त्याचा २४ तास काळा चष्मा घातलेला चेहरा, त्याचे लुंगी स्टाईलने नेसलेले धोतर (सगळेच दाक्षिणात्य - अगदी पी. चिदम्बरम सारखे शिकलेले सुद्धा, त्या विचित्र धोतर-कम-लुन्गीमध्ये वावरतात आणि त्याची त्यांना काही खंतदेखील वाटत नाही.), रामसेतूसंदर्भात त्याने प्रभु श्रीरामांवर केलेल्या आचरट कोट्या या सर्वांचा मला अतिशय संताप येतो.

परंतु त्याच्या कर्मठपणामुळेच हिंदिला तामिळनाडूमध्ये शिरकाव करता आलेला नाही व तामिळ भाषा जिवंत राहिली आहे हे नाकारता येईल का? तामिळनाडूमध्ये हिंदिला अघोषित बंदी असल्यामुळेच मद्रासची मुंबई किंवा पुणे झालेले नाही. त्यामुळे बिहारि आणि भय्यांना तामिळ संस्कृतीवर आपल्या संस्कृतीचे आक्रमण करता आलेले नाही. तामिळ खासदार तामिळनाडूच्या प्रश्नावर पक्षभेद विसरून कायम एकत्र येतात. तामिळनाडूतून विधानसभेत, लोकसभेत किंवा राज्यसभेत अतामिळ कधीच निवडून येत नाही. करूणानिधि व तामिळांकडून मराठी लोकांनी हे शिकले पाहिजे.

ठाकरे व शिवसेना यांचे मराठी प्रेम बेगडी आहे हे दाखविण्यासाठी मी वरील उदाहरणे दिली. त्यांची उक्ती व कृती वेगळी आहे. राज ठाकरेला जेव्हा २-३ तासांसाठी लुटुपुटीची अटक झाली तेव्हा त्याने त्याचा न्यायालयात बचाव करण्यासाठी एकूण ७ वकील नेमले होते. त्यापैकी ४ जण अमराठी होते. मुंबईत मराठी वकिलांची वानवा आहे का? तेव्हा कुठे गेला त्याचा मराठी बाणा? ठाकर्‍यांची मुले, नातवंडे इंग्रजी शाळेत शिकतात. याला मराठी बाणा म्हणायचे का?


Ladtushar
Friday, February 22, 2008 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> जरी परके लोक येऊन त्यांनी महाराष्ट्राचा बिहाराष्ट्र केला, नि मराठी भाषा संपूर्णपणे लयाला गेली तरी आम्ही काहीहि करणार नाही!

बोला आपण काय करणार!!!

आपले सरकार अणि विरोधी पक्ष जे आपण निवडून देतो ते त्यांच्या फायदया च्या वेळी एकत्र येउन जुने कायदे मोडतात अणि नविन करतात, स्व हिता साठी हे लोक एकत्र येतात अणि सामान्य माणूस ज्याने याना निवडून दिले होते तो नुसता पाहत राहतो,

(उदा: परवाचे विलू यांचे विधान काय बघा
सामान्यांना मुख्यमंत्र्यांचा 'विचारी' सल्ला
- म. टा. प्रतिनिधी
मुंबईतल्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून त्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे या महानगरात घर घेणे हे आता सामान्य माणसांसाठी स्वप्नच राहील, असा 'विचारी' सल्ला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंगळवारी दिला. यूएलसी रद्द करताना घरांच्या किमती गरिबांना परवडणाऱ्या इतक्या खाली येतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता)

नेहमी भाष्य करणे सोपे असते, पण इथे जिथे रोजच्या लढाई मधे... वेगळी विचार सारणी घेउन राहने सोपे नसते.... आणि आपण जे काही करू अगदी मराठी बाणा जपू पण मात्र मुंबई वाचवू शकणार नाही ती या नेत्यानी कधीच वीकली आहे...


Raviupadhye
Friday, February 22, 2008 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला भय्या लोकानी सोडुन गेले म्हणुन आमच्या कं ला नुकसान झाले किंवा आम्ची कं बंद आहे अस म्हणणार्‍या लोकांची कीव येते.

कींव करण्यापलिकडे creative आणि constructive उत्तर किंवा solution आहे का? मराठी माणसे आली की आधी जेवण मग कामाचे तास इ वरच चर्चा फार होते अन मग तीन दिवसात सोडून जातात.खरच कींव करण्यासारखेच आहे---फक्त कुणाची हा प्रश्न आहे-:-)


Raviupadhye
Friday, February 22, 2008 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा थोडी बरीच गम्भीर होतेय.
दुसर्‍या एका बा फ़ वरील उतारा पुन्हा छापतोय
स्माईल च्या आधीचे वाक्य बघा

"पुण्यातल्या पाट्याच नाहीत तर लोकही नमुनेदार आहेत. मी एकदा सिंहगड रोडवरच्या चितळ्यांच्या फ़्रन्चिसे



"मुंबईत एखाद्या ठक्कर नाहीतर ब्रिजवासी कडे गेलो तर नुसती चखायला "म्हणुन १०० ग्राम मिठाई देतील. "------:-)



Trish
Friday, February 22, 2008 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मराठी माणसे आली की आधी जेवण मग कामाचे तास इ वरच चर्चा फार होते अन मग तीन दिवसात सोडून जातात

परिस्थितिची जाण असणारा मराठी माणूस असा नव्हे...हे मराठी माणसा बदल चुकीचे पसरवले जाते आहे...काही मोजक्या लोकांच्या प्रवृतिचा हा परिणाम सर्व मराठी लोकांच्या नावावर लागतो आहे!!अनेक मराठी बेरोजगार अजूनही संधिच्या शोधत आहेत !! पण त्याना गरज आहे ती दिशा दाखवण्याची....आपण संघटित होउन...बोला तयार आहत का ???

Satishmadhekar
Friday, February 22, 2008 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> मराठी माणसे आली की आधी जेवण मग कामाचे तास इ वरच चर्चा फार होते अन मग तीन दिवसात सोडून जातात.खरच कींव करण्यासारखेच आहे---फक्त कुणाची हा प्रश्न आहे

तुमच्या कंपनीतले सर्व मराठी कामगार असे वागतात का? सर्व नसतील तर अंदाजे किती टक्के कामगार असे वागतात?

तुमची कंपनी सोडून इतर कंपन्यांमध्ये साधारणपणे किती टक्के मराठी कामगार असे वागतात? मराठी कामगारांच्या कार्यक्षमतेबद्दल किंवा खरं म्हणायचं तर त्यांच्या कामचुकारपणाबद्दल तुमच्याकडे काही आकडेवारी असल्यास ती प्रसिद्ध करा.

बहुसंख्य मराठी कामगार आळशी, कामचुकार, दांड्या मारणारे, कामाऐवजी कामाचे तास किती व जेवणाची वेळ कोणती याचीच चर्चा करत बसणारे, दारूडे इ. दुर्गुणांनी नखशिखांत भरलेले असताना महाराष्ट्राचे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न भारतातल्या बहुसंख्य राज्यांपेक्षा जास्त कसे? महाराष्ट्रीयन शिक्षणात एवढे पुढे कसे? अशा कामचुकार लोकांच्या राज्यात उद्योगधंदे इतक्या मोठ्या प्रमाणावर का आहेत? Infosys, Wipro, TCS इ. संगणक कंपन्या ऊ.प्र., बिहार अशा कार्यक्षम लोकांच्या राज्यात ऑफिस सुरू करायला का घाबरतात?

त्याचप्रमाणे अत्यंत कार्यक्षम, कष्टाळू इ. सदगुण असलेल्या भय्या-बिहारींची राज्ये उद्योगधंद्यात, शिक्षणात आणि इतर सर्वच बाबतीत इतकी मागासलेली का?

या सदगुणी स्थलांतरितांमुळे महाराष्ट्राची प्रगती झाली हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. नाहीतर आळशी मराठी माणसे काय हे राज्य पुढे नेणार? परंतु ऊ.प्र., बिहार इ. राज्यात नखशिखांत दुर्गुणी असलेले मराठी फारच थोड्या प्रमाणात असल्याने या राज्याची दुर्गती व्हायला नको होती.

कोणी विद्वान या रहस्याचा उलगडा करू शकेल का?


Satishmadhekar
Friday, February 22, 2008 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> "मुंबईत एखाद्या ठक्कर नाहीतर ब्रिजवासी कडे गेलो तर नुसती चखायला "म्हणुन १०० ग्राम मिठाई देतील. "------

ठक्कर किंवा ब्रिजवासी जेव्हा चितळ्यांएवढा मोठा (२५-३० कोटी उलाढाल असलेला) होईल, तेव्हा तो अशीच फुकट मिठाई वाटेल का?

चितळे मिठाईच्या व्यवसायात एवढे प्रस्थापित झालेले आहेत की त्यांनी फुकट मिठाई न वाटता सुद्धा किंवा कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता सुद्धा त्यांचे दुकान कायम ग्राहकांनी भरलेले असते. त्यांना फुकट मिठाई वाटण्याची अजिबात आवश्यकता नाही. ते जर प्रत्येक ग्राहकाला १०० ग्रॅम फुकट मिठाई वाटायला लागले, तर, त्यांना रोज दोनतीनशे किलो फुकट मिठाई वाटायला लागेल. आणि फुकट मिठाई वाटून सुद्धा त्यांची ग्राहक संख्या वाढणार नाही. कारण त्यांच्या आपुलकी किंवा सर्व्हिसमुळे त्यांच्याकडे ग्राहक जात नसून त्यांच्या मालाच्या दर्जामुळे त्यांचा व्यवसाय चालतो.


Satishbv
Friday, February 22, 2008 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संसदेत मागील दरवाज्याने प्रवेश घेण्यासाठी जे इच्छुक असतात त्यांना बहुतेक वेळी राज्यसभा उमेदवारी हवी असते. त्यामुळे अमराठी लोकांना उमेदवारी देताना त्यामागे शिवसेनेचे काही अर्थ कारण अथवा राज कारण असु शकते. परंतु याच शिवसेनेने मुंबै महापालीकेच्या मागील ३ निवडणुकांमध्ये १०० टक्के मराठी उमेदवार दिले होते. याचे कुणालाच कौतुक नाही.


Ladtushar
Friday, February 22, 2008 - 8:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.esakal.com/esakal/esakal/rightframe.html

२५ हजार उत्तर भारतीय कामगार पुण्याबाहेर पडले !!
पुण्यातील बांधकाम मजुरांपासून ते फर्निचर, पानवाले, रिक्षावाले या सर्वांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर भारतीय मजुरांचा भरणा वाढला आहे. कष्टाची कामे करण्यासाठी या प्रांतातील मजुरांची ख्याती आहे. त्याचप्रमाणे या कामगारांची नेण्या- आणण्याची सोय केली, तर सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे कामगार विनातक्रार काम करतात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक या मजुरांना कामावर घेतात. 'प्राप्तिकरामध्ये बांधकाम क्षेत्राला मिळणाऱ्या सवलतींचा "फायदा" घेण्यासाठी' गेल्या दोन वर्षांत पुण्यातील अनेक मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्प मंजूर करून घेऊन घोषणा केल्या आहेत. कोणत्याही स्थितीत पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे बंधन या व्यावसायिकांनी स्वीकारले आहे. त्यामुळे मिळेल ते मनुष्यबळ वापरा; पण वेळापत्रकानुसार काम पूर्ण करा, असा सध्या सर्वांचा खाक्‍या आहे.

*व्यावसायिकांनी स्वताच्या फयाद्या साठी या उ भा कमगारांचा भारणा केला होता, कुठल्या ही बेसिक सोयी न देता या कमगारांचा उपयोग केला जातो.....आणि मराठी कामगार ही पीळवणुक सहन करीत नाही.

असे अनेक प्रश्न आहेत सगल्यां ची उत्तरे आपल्याला हवी तसी मिळ्नार असे नाही, कुठे तरी आपल्याला पण जुळ्ते घ्यावे लागेल, मराठी च्या मुद्या साठी माणुसकी विसरून चालणार नाही!



Chinya1985
Friday, February 22, 2008 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजय निरूपम, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, मुकेश पटेल, राम जेठमलानी

satishbv तुमच बरोबर आहे. माढेकरांनी वरिल अमराठींना राज्यसभेत पाठवण्याचा विरोध केला होता. यापैकी राम जेठमलानी व चंद्रिका केनिया यांना भाजपच्या मागणीवरुन राज्यसभेत पाठवण्यात आले होते. संजय निरुपम सेनेत असताना सेनेचा आवाज घुमवायचा,स्वत्: अमराठी असुन भुमिपुत्रांसाठी बोलायचा. राज्यसभेत पाठवण्यामागे बर्‍याचदा राजकारण असते. सेनेनी पुर्वीच स्पष्ट केलय की ९४पुर्वी जे मुंबईत आलेत ते मुंबईकर आहेत. मग त्या वेळी तुम्ही लोकांनी का विरोध केला नाही???राजच म्हणाल तर त्याने फ़क्त भैय्यांना विरोध केलाय सर्व अमराठी लोकांना नाही.

तामिळी लोकांची परिस्थीती वेगळी आहे. एक म्हणजे भौगोलिक रित्या ते हिंदी भाषीक प्रदेशापासुन दुर आहेत. दुसर म्हणजे त्यांची भाषा हिंदी भाषेपेक्षा खुप वेगळी आहे(आपली फ़ारशी वेगळी नाही). त्यांच्यासाठी तमीळ ही पहीली ओळख आहे(आपल्यासाठी भारतिय,हिंदु,धर्मनिरपेक्ष या पहिल्या ओळखी आहेत). द्रविडी राजकारण फ़ाळणीवादी होते तर आपले टिळक,सावरकर,राजगुरु इत्यादी भारत जोडण्यासाठी उत्सुक होते. तामीळी लोकांमधे आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत,आमची भाषा जगातील बोलली जाणारी सर्वात प्राचीन भाषा आहे याचा फ़ाजील आत्मविश्वास आहे जो आपल्यात नाही. तमिळनाडूत सर्वपक्षिय लोक तमिळ लोकांसाठी एकत्र येतात तर आपल्याकडे फ़क्त शिवसेना,मनसे मराठी साठी बोलतात. अशा वेळी अमराठी मते मिळवण्यासाठी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप त्यांना साथ देत नाहीत. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांचा मराठी बाणा सोईचा असे म्हणनार्‍यांनी आधी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप यांना विरोध करायला हवा कारण ते कधीच मराठीसाठी बोलत नाहीत.

असे असुनही तामीळी चित्रपटांमधे अतामिळी हिरो-हिरॉइन्स भरपुर आहेत. बर्‍याच हिरॉइन्स हिंदीभाषीक आहेत. शिवाय सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात अतामिळी लोक चेन्नईत वाढत आहेत पण माहीती तंत्रज्ञानात त्यांचे राज्य मागे पडू नये म्हणुन तामिळी नेते त्यांना विरोध करत नाहीत.


Raviupadhye
Friday, February 22, 2008 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा गफ़ल्लत होत आहे.मी कष्टाच्या अन्गमेहनतीच्या कामाबद्दल बोलत आहे. ही कामे बुद्धी व कौशल्याच्या कामाबरोबरच कारखाना चालविण्यासाठी आवश्यक असतात.बुद्धी व कौशल्यची कामे मराठी माणसाकडे व अन्ग मेहनतीची अथवा कुणीही सुखासुखी स्वीकार न करणारी कामे पर प्रन्तियांकडे ही अवांछीत पण चालणारी तड्जोड बहुतेक उद्योग धन्द्यात प्रचलीत आहे.या combination मुळे व मराठी enterpreneur च्या कल्पकते मुळे per capita income इ वाढले आहे. हीच परिस्थिती पन्जाब,हरियाणा ए उद्योग शील राज्यात आहे. अश्या मजूर वर्गाची गरज दोन कारणांमुळे- आपल्या लोकाना हे काम नको आहे व ते बिन तक्रार करू शकतात.
आता मग्रूरी कसली हो? जर्मनी त टर्क,अमेरिकेत गुजराथी,इन्ग्लन्ड मध्ये हिथ्रो वर सर्व सफ़ाई कामगार दुय्यम नागरिकत्वाचे लोक करतातच आणि उपजिविकेचे साधन हीच कामे बनतात.
आणि चन्दू ची मिळकत चितळ्यां पेक्ष जास्त्की कमी हा जावई शोध कुणी लवायचा? लई बाणा बुवा!!


Satishmadhekar
Friday, February 22, 2008 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आपल्यासाठी भारतिय,हिंदु,धर्मनिरपेक्ष या पहिल्या ओळखी आहेत).

हिंदू आणि धर्मनिरपेक्ष यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही. एकवेळ स्वतःला हिंदू म्हणणारे धर्मनिरपेक्ष या संबोधनाला फारसा विरोध करणार नाहीत. पण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणार्‍यांना हिंदू हा शब्द म्हणजे कुणीतरी शिवी हासडल्यासारखे वाटते.

>>> तमिळनाडूत सर्वपक्षिय लोक तमिळ लोकांसाठी एकत्र येतात तर आपल्याकडे फ़क्त शिवसेना,मनसे मराठी साठी बोलतात. अशा वेळी अमराठी मते मिळवण्यासाठी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप त्यांना साथ देत नाहीत. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांचा मराठी बाणा सोईचा असे म्हणनार्‍यांनी आधी कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप यांना विरोध करायला हवा कारण ते कधीच मराठीसाठी बोलत नाहीत.

शिवसेना सोडून इतर पक्ष मराठी लोकांसाठी काही बोलत नाहीत व काही कृतीही करत नाहीत. शिवसेनावाले फक्त बोलतात, पण कृती बरोबर विरूद्ध असते. नुसते बोलून काही कृती न करण्यापेक्षा न बोलणारे व कृती न करणारे कमी फसवणारे नाहीत का?

>>> संसदेत मागील दरवाज्याने प्रवेश घेण्यासाठी जे इच्छुक असतात त्यांना बहुतेक वेळी राज्यसभा उमेदवारी हवी असते. त्यामुळे अमराठी लोकांना उमेदवारी देताना त्यामागे शिवसेनेचे काही अर्थ कारण अथवा राज कारण असु शकते. परंतु याच शिवसेनेने मुंबै महापालीकेच्या मागील ३ निवडणुकांमध्ये १०० टक्के मराठी उमेदवार दिले होते. याचे कुणालाच कौतुक नाही.

पूर्वी बाबासाहेब भोसल्यांनी जाहीरपणे सांगितले होते की राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्यांना २५ लाख रूपये शिवसेनेने मागितले होते. त्यांनी ते न दिल्यामुळे कोणत्यातरी अमराठीला (मुकेश पटेल किंवा प्रीतीश नंदी असावा) ते तिकिट मिळाले. वा रे मराठी बाणा!

शिवसेनेने मराठी उमेदवार दिले यात काही विशेष नाही. त्यांनी अमराठी उमेदवार दिले तरी अमराठी मतदार कॉंग्रेसच्याच अमराठी उमेदवारांना मत देतील. भाजपने मुसलमानांचे कितीही लांगूलचालन केले तरी त्यांना मुस्लिमांची मते मिळत नाहीत. त्याचप्रमाणे शिवसेनेला अमराठ्यांची मते मिळत नाहीत. म्हणूनच मग १०० टक्के मराठी उमेदवार दिल्याचे नाटक करावे लागते

तात्पर्य काय कोणताही पक्ष मराठी माणसांसाठी काहिही कृती करत नाही. इतर पक्ष बोलत सुद्धा नाहीत. शिवसेनावाले फक्त बोलतात व त्यामुळे काही लोकांच्या अपेक्षा उंचावतात. पण कृती मात्र शून्य आहे. न बोलून न करणार्‍यांपेक्षा नुसते बोलून न करणारे जास्त वाईट.


Chinya1985
Friday, February 22, 2008 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलुन कृती नाही वगैरे नाही. आणि कुठली कृती विरुध्द होती??तुम्ही दिलेल्या ५ पैकी २ लोकांना भाजपामुळे राज्यसभेत पाठवण्यात आले व एक तर सेनेचा स्वत्:चा नेता होता. राज्यसभेतील उमेदवारी मराठी बाणा नाही हे स्पष्ट करते मात्र महापालिकेतील १००% मराठी उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करत नाही???हे असे double standards का???एकच नियम ठरवा-उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करते का नाही??हो असेल तर मपा मधिल उमेदवारी पण बघा आणि नाही असेल तर राज्यसभेतील उमेदवारी पण बघु नका.बाबासाहेब भोसल्यांनी कुठलिही गोष्ट म्हटली की ती बरोबर ठरते का??आणि जरी पैशाची मागणी केली असेल तरीही आज भारतात कुठला पक्ष आहे जो पैसे घेउन उमेदवारी देत नाही??मुंबैत आता फ़क्त १६% मराठी माणसे आहेत. त्यामुळे फ़क्त त्यांचीच मते सेनेला मिळत असती तर मुंबई महापालिकेत सेना निवडुन येउच शकली नसती. शिवसेनेने टॅक्सी ड्रायव्हर्समधे मराठी लोक आणावेत यासाठी केलेले प्रयत्न कालच्या इथे टाकलेल्या मटाच्या लेखात दिले होते. सेनेने मराठी तरुणांना खाद्यपदार्थाचे स्टॉल्स वगैरे टाकुन देण्यात मदत केली होती मात्र नंतर मराठी तरुणांनी ते स्टॉल्स भैयांना भाड्यानी दिले. सेनेनी शासनात आल्यावर अमराठी लोकांसाठी पर्मिट सिस्टिम आणली मग इतर सर्व पक्ष व न्यायव्यवस्थेने ते होउ दिले नाही. इतरही अनेक उदाहरणे आहेत. पण हे सगळे लक्षात न घेता बाळासाहेब हिंदी अथवा इंग्रजीत का बोलतात हा प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटतो. करुणानिधी एक अडाणी आहे म्हणुन काय सर्वांनीच अडाणी रहायच काय??त्याची मुलगी इंग्रजीत बोलते म्हणुन तमीळ भाषेवर संकट आलं काय??कलाम,जयललिता,चंद्राबाबु,देवेगौडा,चिदंबरम हे लोकही इंग्रजीत बोलतात मात्र त्यांच्या इंग्रजी बोलण्याने त्यांच्या भाषेचे नुकसान झाले आहे असे कोणाला कधीही वाटलेले नाही. मोदीनेही गुजराती अस्मिता आणली पण मोदी तर हिंदी बोलतच नाही तर हिंदीत भाषणही करतो. मुळात मराठी माणुस व भाषा वाचवायला काय रामबाण उपाय आहे हे आपल्याला माहित नाही. त्याचप्रमाणे सेना,मनसेलाही ते माहीत नाही. त्यांना ज्या गोष्टींमधुन मराठी माणुस,भाषा वाचेल असे वाटते त्या गोष्टी ते करतात. त्यांनी काय करायला नको पेक्षा काय करायला हव हे तुम्ही लोकांनी सुचवा(बाळासाहेबांनी इंग्रजीत बोलु नये म्हणु नका).

**हिंदू आणि धर्मनिरपेक्ष यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही.**
माझ म्हणन होत कि आपली पहिलि ओलख भारतिय अथवा हिंदु अथवा धर्मनिरपेक्ष अथवा इतर काही असते आणि त्यांची ती तमिळ असते


Asami
Friday, February 22, 2008 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या बाकीच्या post ला अनुमोदन पण खालील वाक्य म्हणजे naive पणा वाटतो.

त्याचप्रमाणे सेना,मनसेलाही ते माहीत नाही. त्यांना ज्या गोष्टींमधुन मराठी माणुस,भाषा वाचेल असे वाटते त्या गोष्टी ते करतात.

Zakki
Friday, February 22, 2008 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत गुजराथी
अमेरिकेत दुय्यम काम करणारे गुजराथी थोडे. बहुतेक सर्वांचे धंदे आहेत. तुम्ही दुय्यम काम करणार्‍यांशी बोला, ते सांगतील, विकेंडला माझ्या मोटेलचे, नाहीतर दुकानाचे काम बघतो!

दुय्यम, तिय्यम कामे करणारे सगळे मेक्सिकन, प्योर्टो रिकन किंवा तत्सम इतर ठिकाणाहून आलेले.


Kedarjoshi
Saturday, February 23, 2008 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात ऐक जाणतो मराठी
ऐवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुला फुलात हासते मराठी
येथल्या नगनगात गर्जते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या पिकामधुन डोलते मराठी
येथल्या चरचरात राहाते मराठी

पाहुने जरी असख्यं पोसते मराठी
पाहुने जरी असख्यं पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तक्त फोडते मराठी.

सुरेश भट








Raviupadhye
Saturday, February 23, 2008 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की साहेब माझ्या म्हणण्याचा मतितार्थ एवढाच होता की कुठल्या ही देशात परप्रांतियांकडून दुय्यम दर्जाची कामे करवून घेणे व परिस्थिती exploit करणे ही कालान्तरापसून चालत आलेली वाईट की चान्गली ह्या वादात न शिरता-प्रथा आहे. त्यामुळे स्थानीक लोकानी गरज असून ही ते न करणारी कामे आपल्या कडे यू पी व बिहार मधील स्थलान्तरीत लोक करतात. आणि आता निर्माण झालेल्या परिस्थितित ते कामचुकार पणा करणारच.महाराष्ट्र हे एकच राज्य औद्योगिक रित्या प्रगत आहे का? मारुती,होंडा,हिरो होन्डा,टाटा स्टील,टाटा नानो,यासारखे कारखाने उत्तरेत ही आहेत.तिथे कित्येक मराठी माणसे उत्तम हुद्द्यावर आहेत पण मराठी कामगार का नाहीत? आपल्या कडे एवढी बेरोजगारी असून ही??? तिथे केरळी कामगार आहेत,राजस्थानी आहेत.थोडा बाण्याचा बाण बाजूला ठेवला तर कळेल.महाराष्ट्रा आत अन्ग मेहनतीची कामे करायची नाहीत,दुसयाला करू द्यायची नाहीत व राज्या बाहेर जायचे नाही हा कसला वेडेपणा???

Satishmadhekar
Saturday, February 23, 2008 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> राज्यसभेतील उमेदवारी मराठी बाणा नाही हे स्पष्ट करते मात्र महापालिकेतील १००% मराठी उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करत नाही???हे असे double standards का???एकच नियम ठरवा-उमेदवारी मराठी बाणा स्पष्ट करते का नाही??

<Double Standards> कुठे आहे? Standard एकच आहे. ते म्हणजे जो जास्त माल देईल त्याला उमेदवारी! फक्त शिवसेनाच नव्हे तर सर्व पक्षांचे हेच Standard आहे. पण हे Standard उघड दाखविता येत नाही. म्हणून मग कॉंग्रेसला निधर्मी बाणा, भाजपला हिंदू बाणा, शिवसेनेला मराठी बाणा असे बाणे दाखवावे लागतात.

तुम्हाला अजून माझे बोलणे पूर्ण समजलेले दिसत नाही. कॉंग्रेसची धर्मनिरपेक्षता व भाजपचे हिंदुत्व जितके प्रामाणिक (किंवा अप्रामाणिक) आहे, तितकाच प्रामाणिक (किंवा अप्रामाणिक) शिवसेनेचा मराठी बाणा आहे.


Jaymaharashtra
Saturday, February 23, 2008 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्यपाल गवईंविरुद्ध बिहारमध्ये 'राज'कारण

बिहारच्या विधानसभेत राज्यपाल रा. सू. गवई यांचे अभिभाषण सुरू असताना बिहारी आमदारांनी प्रचंड गोंधळ घातलाच; पण गवई यांनाच यापैकी एकाने 'तुमच्या महाराष्ट्रात बिहारींची सुरक्षा धोक्यात आहे... त्याबद्दल महाराष्टाला तुम्ही काय सांगणार?' असे सुनावून राज्यपालपदाचा अवमानही केला.

विधानसभेतली हुल्लडबाजी प्रामुख्याने 'बिहारछाप बजबजपुरी'बद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजवटीला दोष देण्यासाठी होती; पण राष्ट्रीय जनता दलाच्या शकुनी चौधरी यांनी राज्यपालांबद्दल दोषारोपमूलक बोलणे टाळण्याचा संकेत मोडला. यााबद्दल गवईंना प्रतिक्रिया विचारली, तेव्हा गवईंनी 'आपण सारे भारतीयच आहोत... मी राज्यपाल झालो, तेव्हा मीही बिहारीच झालो' हे गवईंनी सुनावले.

आता याला काय म्हणायचे?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators