Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 22, 2008

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Political » Archive through February 22, 2008 « Previous Next »

Yog
Friday, December 28, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mods,
वरील बेनजीर, पाक विषयी पोस्ट्स त्या सम्बन्धीत (बेनजीर हत्त्या) bb वर हलवाल का..?
धन्यवाद!


Jaymaharashtra
Friday, January 04, 2008 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेझर किरणांनी घेतला बेनझीरचा वेध?
३ ज़न २००८, ०४०० ह्र्स ईSट







* पीपीपी म्हणते, बंदूक नव्हे लेझर शस्त्राने हत्या

इस्लामाबाद

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्याप्रकरणाने बुधवारी नवे वळण घेतले. बेनझीरची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर, लेझर शस्त्राने केल्याचा दावा पाकिस्तान पीपल्स पाटीर्च्या एका नेत्याने केला आहे.

पाकच्या नेशन वर्तमानपत्राने पीपीपीच्या वरिष्ठ नेत्याचा हवाला देत नव्या चचेर्ला तोंड फोडले आहे. या नेत्याच्या म्हणण्यानुुसार भुत्तोंना रावळपिंडी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूवीर्च त्यांचे निधन झाले होते. पण त्यांच्यावर प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉ. मुसाद्दिक खान यांनीही डोक्यावरील आघाताविषयी आश्चर्य व्यक्त केले होते. मेंदुचा काही भाग कवटीतून बाहेर आला होता व हा आघात नेमका कशामुळे झाला, याविषयी डॉक्टरही बुचकळ्यात पडले होते. 'याप्रकारची केस मेडिकल कारकिदीर्त प्रथमच पाहात आहे', असे उद्गार डॉ. खान यांनी काढले होते. बंदुकीच्या गोळीने होणाऱ्या जखमांपेक्षा त्या जखमा फार वेगळ्या होत्या, याकडेही डॉ. खान यांनी लक्ष वेधले होते. लेझर किरणांच्या शस्त्रानेच भुत्तो यांचा वेध घेतला होता. पण त्यावर पडदा घालण्यासाठी गोळीबारही करण्यात आला. तसेच काही क्षणांत बॉम्बस्फोटही घडवून आणला. हल्लेखोर सुरक्षारक्षकांच्या हाती सापडू नये, यासाठी हा कट रचला होता, असेही या नेत्याने सांगितले.

एकीकडे पाक सरकार या हत्येचा संबंध तालिबान व अल कायदाशी जोडत असतानाच पीपीपीने हा दावाही खोडून काढला आहे. बेनझीर यांच्या कराचीतील स्वागतयात्रेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अल कायदाचा पाकिस्तानातील प्रमुख बैतुल्ला मेहसुदने दोन वेळा भुत्तोंना विशेष निरोप धाडला. आमच्याकडून तुमच्या जिवाला धोका नाही. आमच्याकडून तुमच्या हत्येचे प्रयत्न कधीही होणार नाही, असा शब्दही महसुदने दिला होता, याकडेही 'नेशन'ने लक्ष वेधले आहे.




Maanus
Friday, January 04, 2008 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

For all of us who don't know how the US primary elections work.
http://news.bbc.co.uk/1/hi/world/americas/7049207.stm

Shendenaxatra
Wednesday, January 16, 2008 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इन्किलाब
ह्या भारतीय उर्दू दैनिकाची हेडलाईन (१५ जानेवारी २००८)

http://www.inquilab.com/

एहतेजाज्* रंग लाया.
रश्दी मुंबई छोडनेपर मजबूर,

*आंदोलन (चुभूद्याघ्या)

तपशीलात वर्णन आहे की कसे मुसलमानांच्या आंदोलनाला घाबरून अमक्या एयरलाईनच्या तमक्या फ़्लाईटने ह्या महाशयांनी पळ काढला वगैरे.

एम एफ हुसेनला माफी मागायला लागली तर व्यक्तीस्वातंत्र्य कसे नष्ट होऊ लागले आहे असा गळा काढणारे अग्रलेख मराठी पत्रे लिहीतात. हुसेनला माफी मागावी लागली अशी बातमी विजयोन्मादाने सर्वाअत मोठ्ठ्या फ़ॉंटमधे लिहिली जात नाही. मात्र उर्दु पेपरांमधे असल्याच हेडलाईन दिसतात.


Zakki
Wednesday, January 16, 2008 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता उर्दू वर्तमानपत्रात काय छापतील ते आपल्याला कंट्रोल करता येत नाही. पण मराठी वर्तमानपत्रातल्या लेखांचा निषेध करणारे पत्र आपण लिहू शकतो. खरे तर ते वर्तमानपत्र निदान आठ दिवस तरी विकत घेऊ नये, निषेध म्हणून, असे करता आले तरी त्यांना आपल्या भावना कळतील.

दुर्दैवाने तेव्हढी एकी आपल्यात नाही.

व्यक्तिस्वातंत्र्य व कुणा धर्मातल्या आदरस्थानांची अशा तर्‍हेची चित्रे काढून भावना दुखवणे यात फरक आहे.

चित्रकलेतले प्राविण्य इतर तर्‍हांनी पण दाखवता येईल.



Dineshvs
Thursday, January 17, 2008 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या बातमीवरुन पुढे आठवले.
मोहरम, दोन दिवसावर आलाय. मुंबईत अनेक ठिकाणी, मुसलमान लोकानी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलीय. ( हा प्रकार मी मस्कत मधे कधीच बघितला नाही. पण तिथे पिण्याच्या पाण्याची सोय अनेक ठिकाणी कायमची केली आहे. )
तर सांगायचा मुद्दा असा कि, त्यापैकी एका ठिकाणी, मला सद्दाम हुसेनचा मोठा फोटो लावलेला दिसला.

मला या धाडसाचे कौतुक वाटले.


Shendenaxatra
Thursday, January 17, 2008 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहितीप्रमाणे मोहर्रम हा शिया लोक साजरा करतात. निदान माझ्या पाकी दोस्तांनी तसे सांगितले.
सद्दामने शिया लोकांवर अनेक अत्याचार केले. किंबहुना त्याच्यावरील चालवलेल्या खटल्यामधे हा एक आरोप होता.
असे असताना मोहर्रमच्या सणाला त्या महाभागाचा फोटो लावणे म्हणजे पंढरपूरच्या वारीला अफजलखानाचा फोटो नेण्यापैकी आहे. असो.

जे लोक रश्दीच्या सैतानी व्हर्सेस चे एक अक्षर न वाचता लाखांनी त्याच्याविरुद्ध मोर्चे काढतात त्यांची बौद्धिक कुवत काय असणार?


Nandini2911
Thursday, January 17, 2008 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्दामचा फोटो, कुठे?
मस्त बातमी आहे. इस्लाममधे फोटो काढणे अथवा लावणे हे पाप मानतात. कुठल्याही सजीवाची प्रतिक्रुती लावणे निशिद्ध आहे असा वेळेला सद्दामचा फोटो तो पण मोहर्रममधे????
दिनेशदा जरा डीटेल्स द्या ना प्लीज.


Shravan
Thursday, January 17, 2008 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, पत्रकार मोठ्या बातमीच्या शोधात आहेत. द्या लवकर डिटेल्स आता. :-)

बाकी झक्की, इथे धर्मनिरपेक्षतीची व्याख्याच निराळी आहे. अल्पसंख्याकांचे कोडकौतुक केले, किंवा त्यांच्या धर्मीक भावना आपल्या राज्यघटनेच्या पलिकडे जाऊनही (म्हणजे राष्ट्रहितापेक्षा) जपल्या की धर्मनिरपेक्ष असे म्हटले जाते. आतापर्यंत बहुजन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते पण आता मात्र व्यापक प्रमाणावर मतं बदलू लागलीत असे जाणवतेय. म्हणजे यामुळे पुन्हा मुस्लीम द्वेष्टेपण वाढून धार्मीक तेढ तीव्र व्हावी असे नाही. पण राष्ट्रहितासमोर इतर सर्व दुय्यम असा आग्रह धरणे चूकिचे नक्किच नाही.


Dineshvs
Thursday, January 17, 2008 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदीनी, कुर्ला स्टेशनपासुन ३१३ च्या रुटवर, मार्केटजवळ आहे.

Tonaga
Thursday, January 17, 2008 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्दामचा फोटो, कुठे?
मस्त बातमी आहे. इस्लाममधे फोटो काढणे अथवा लावणे हे पाप>>>>>>

यात कसली आहे बातमी बोडक्याची काहीतरी गडबड आहे. इस्लाममध्ये परमेश्वराचा फोटो अथवा मूर्ती लावने मंजूर नाही माणसांची चालते. परवा मेहदी हसनचा वतन तुम्हारा है आल्बम पाहिला आपल्या मिले सुर मेरा तुम्हारा सारखा. त्यात कायदे आझम जीना आणि अल्लामा इकबाल यांचे फोटो पुन्हा पुन्हा येत होते.... बुत परस्ती अल्लापुरतीच आहे...
सद्दाम हुसेन मर्त्य मानव होताच त्यामुळे त्याचा फोटो चालेल. दिनेश साहेबाना त्यात धाडस का वाटले कळत नाही. सद्दाम हा भारत मित्र मानला जातो. कश्मिर प्रश्नावर भारताला पाठिम्बा देणारा तो एकमेव मुस्लिम राष्ट्रप्रमुख होता. त्यामुळे इथल्या अगदी 'भाजपेयी' लोकांच्या डोळ्यानाही सद्दाम मुळे त्रास होऊ नये :-)

आपल्याकडेही निर्गुण निराकार ही कल्पना आहेच तसलाच प्रकार...


Dineshvs
Friday, January 18, 2008 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुसलमान लोक सहसा, असा फोटो पूज्य म्हणुन लावत नाहीत. म्हणुन ते वेगळे वाटले मला. फोटो अजुनही आहेच.

समाजवादाप्रमाणे, मूर्तिपूजा न करणे, हि पण फसलेली कल्पना वाटते मला. मक्केचा काबा वा त्याचा फोटो, लागतोच समोर.
बुद्धालाही ते जमले नाही, त्यानेच तर स्तूप बांधण्याचे आदेश दिले.
आपण मात्र आपल्या बहुतेक सर्व मुर्त्यांचे विसर्जन करतो.

असो, मी ना भाजपेयी ना आणि कुणी. गाडी मूळपदावर येऊ द्या.


Mahaguru
Sunday, January 20, 2008 - 9:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेलारुस मधे प्रेषित मोहम्मद चे कार्टुन काढले म्हणुन त्या पत्रकाराला तुरुंगवास झाला. आपल्या कडे लोक भारतरत्न द्यायला निघालेत.


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2714693.cms

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2713418.cms

Mandard
Monday, February 04, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज ठाकरे ला खुपच frustration आलेले दिसते उगाच कुठले तरी issue काधुन बसतो इतकी मराठी लोंकाची काळजी आहे तर स्वता करावे काही तरी विनाकारण मराठी माणसाबद्दल बाकी प्रांतिय लोकांत चुकीची भावना पेटवत आहे ह्याने काय केले आहे मराठी माणसांसाठी even his contract for Kohinoor mill is given to Gujarati contractor बाळासाहेबांनी वाचवले नसते तर रमेश किणि प्रकरणात आत जात होता.
आज माझ्यासारखे बरेच मराठी लोकं महाराष्ट्राबाहेर काम करतात जर आमच्या विरुध इथल्या लोकांनी मोहीम उघडली तर? त्यामानाने सेनेने उत्तर भारतीयांना सामाऊन घ्यायचे पाउल टाकले आहे तसेच कायद्यानुसार भारतीय भारतात कुठेही काम करु शकतात.



Chyayla
Monday, February 04, 2008 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरुण भारत या वर्तमान पत्रात एका वाचकाने २५ जाने २००८ च्या ई टीव्ही मुसल्मानांच्या "हमारी मसाईले" (आमच्या समस्या) ह्या कार्यक्रमाची माहिती दिली.

सहभाग होता सिक्युलर पत्रकार कुलदीप नायर, कॉन्ग्रेस नेते अहमद रिझवी व ईतर दोन मुस्लिम विद्वान. त्यांच्या मते भारतात कुठल्याही खाजगी क्षेत्रात भेदभाव केला जात नाही. मुसल्मान म्हणून नौकरी किंवा शिक्षण क्षेत्रात प्रवेश नाकारला जात नाही. फ़क्त राजकिय व विशेषता: सत्ताधारी पंक्षाकडून अनावश्यक मुस्लिम प्रेम दाखविले जाते आणि त्यांच्या मागासलेपणाला हेच पक्ष जबाबदार असल्याचे उपस्थित विद्वानांचे मत होते. अर्थातच कॉन्ग्रेस धाजिर्णे नायर व रिझवी यांची बोलती बंद झाली. याच कार्यक्रमात मुस्लिम विद्वानांनी आरक्षण पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन केले, कारण आजचे आरक्षण हे राजकारण्यांच्या खेळाचा एक भाग असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यापूर्वीच्या एका कार्यक्रमात एका मुस्लिम विद्वानाने भारतिय मुस्लिमांना ब्राह्मणांचा आदर्श ठेवण्याची सूचना केली. त्यांच्या मते भारतात ब्राह्मण हाच एक असा अल्पसंख्यक वर्ग आहे, जो कुठल्याही सरकारी मदतीशिवाय स्वता:ची, पर्यायाने समाजाची उन्नती साधतो, कुठलीही अपेक्षा न ठेवता राष्ट्रकार्यात आघाडीवर राहतो. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत शिक्षणाशी नाते अबाधित राखतो.

काही मुस्लिम विद्वान असा समर्पक विचार करु लागलेत हे एक चांगले लक्षण समजावे. दांभिक धर्मनिरपेक्षतेचा दाम्भिकपणा अशा विद्वानांकडुन फ़ाडल्या गेल्यास व हाच विचार त्यांच्या अनुयायात उतरल्यास या देशासाठी चांगलेच पण खंत हीच की हा आवाज पुढे येइल का?


Shravan
Monday, February 04, 2008 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, चांगली माहिती दिलीत. असा विचार मुस्लीमांमधली बरेच सुधारणावादी मंडळी बाळगतात. बाबी तर स्वागतार्ह आहेच! पण मुद्दा पुन्हा धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली व्होटबंकेकडे नजर लावून बसलेल्या तथाकथीत पक्षांच्या दृष्टीकोनाचा येतो. निदान हे तरी लोक असा आवाज बाहेर येऊ देणार नाहीत.

बाकी राज ठाकरेंकडून बर्‍याच अपेक्षा बाळगल्या होत्या. निदान खर्‍या प्रश्नांवर त्यांच्याकडून काम अपेक्षीत होते. मात्र एकंदरीतच निराशाजनक घटना घडल्यात. अर्थात तरी भविष्यात त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत.


Maanus
Wednesday, February 20, 2008 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेरा मिनीटे गेली तरी चालेल पण जरुर ऐका
McCain Speaks he is good speaker

Maanus
Friday, February 22, 2008 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Obama आणि Clinton यांच्यामधे basic difference काय आहे?

if you'll watch their talks carefully you'll find clinton always says, I have dont this, I will do this, whereas obama says we have achived this, and we will do this.


Lalu
Friday, February 22, 2008 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे का? की ते स्वतःच दिले आहे? :-)

Maanus
Friday, February 22, 2008 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Clinton supporters can xerox my words :-)

hope you have seen yesterdays debate. and if you haven't here is the link,
http://rawstory.com/news/2008/Crowd_boos_after_Clinton_accuses_Obama_0221.html

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators