|
Suyog_11
| |
| Friday, February 15, 2008 - 9:12 pm: |
| 
|
अरे या ठाकरे घराण्याला सवयच आहे मते मिळवयची असली की मराठी मराठी करा आणि निवडणुक झाली की सगळे विसरून जा. याआधि देखिल बाळासाहेबांनी उडपी, गुजराती, मुस्लिम जनतेच्या नावाखाली खुप राडा रगाडा केला आहे. मला एक सांगा आपण पहिले भारतीय आहोत की मराठी
|
Zakki
| |
| Friday, February 15, 2008 - 10:49 pm: |
| 
|
बाहेरून महाराष्ट्रात आलेले कित्येक लोक पूर्वी तरी मराठी शिकून महाराष्ट्रीय झालेले आहेत. आजकालचे लोक तसे होत नाहीत कारण आजकालचे मराठी लोक स्वत्व विसरून परक्या भाषा, चालीरिती पाळण्यात जणू धन्यता मानतात. वर ७ फेब्रुवरीच्या, काय चालले आहे काय, या प्रशांत कुलकर्णि यांच्या विनोदी चित्रात जसे दाखवले आहे, तसेच आजकाल बरेच मराठी लोक बोलतात. पुण्यात मराठी लोक आपआपसात सुद्धा हिंदीतून बोलतात. इतर लोकांना समजावे म्हणून तशी सवय झाली म्हणे. बंगलोरला, कलकत्त्याला, दिल्लीत कुणि मराठी बोलताना आढळते का? मग मुंबै पुणेकरांनाच हिंदी, इंग्रजी बोलायची गरज काय? असे अगदी थोडे शब्दप्रयोग आहेत की जे इतर भाषांमधे बोलणे जरुरीचे असते, कारण त्याला अर्थपूर्ण असे वाक्प्रचार मराठीत रूढ नाहीत. पण त्या विनोदी चित्रात असे कुठले शब्द आहेत की ज्याला मराठी शब्द नाहीत? तरी सगळे असेच बोलणार. मला भर पुण्यात बॅंकेतल्या एका कारकुनाने जणू मी कुणि अशिक्षित, खेडवळ मनुष्य आहे असे दर्शवत, 'हिंदीमे बोलो ना!' म्हणून सुनावले होते. मी तडक त्या बॅंकेतून बाहेर पडलो. त्यापूर्वी दुसरी माणसे मात्र मुकाट्याने हिंदीत बोलत होती. 'आपल्याच' देशात आपलाच अपमान या परक्या लोकांकडून, नि तो आपण सहन करतो. कशाला उगाच परक्यांना बोलता? इतकी शतके मुसलमान, इंग्रज यांची गुलामगिरी करण्यात घालवला, आता स्वकीयांचीच गुलामगिरी करा. काय बिघडले?
|
मराठी माणुसच मराठी न बोलण्याबद्दलच्या पोस्ट्सवरून एक गोष्ट सांगावीशी वाटते. अर्थात गम्मत म्हणुनच. अमेरिकेत ज्या ऑफ़ीसमधे मी आहे त्यातील भारतीयांमधे ९०% लोक महाराष्ट्रातून आहेत. मी व माझा मॅनॅजर "देशपांडे" तर त्यावर कुलकर्णी त्यामुळे ऑफ़ीसमधल्या चॅटवर सुद्धा मराठीतच संभाषण चालू असतं. किंबहुना ज्या मीटींग मधे अमेरिकन नाही त्याही मराठीतच चालतात इतकंच काय तर अमेरिकन लोकांनाही मराठी शब्द शिकवले आहेत
|
Uday123
| |
| Saturday, February 16, 2008 - 3:34 am: |
| 
|
बरोबर आहे सुयोग तुमचे. भारत माझा देश आहे, आणी सारे भारतीय माझे बांधव आहेत असे रोज शाळेत म्हणायचो आपण, मग आताच का? सरहद्दीवर लढणर्या उप्/ बिहारच्या सैनिकांनी पण असाच विचार केला तर? अरे मी लढतो आहे कशा/ कोणासाठी तर मुंबई, महाराष्ट्र सुरक्षीत ठेवण्यासाठी? मुंबई वरचा लोकांचा बोजा वाढतोच आहे, कमी होण्याचे चिन्ह दिसतच नही, पण म्हणुन राडा हा उपाय ठरत नाही. विकास हा अतिशय असम-प्रमाणात झालेला आहे, का झाला, आणी कोण जबाबदार आहे हा वेगळा विषय ठरेल. मला तरी हा स्वत्:चा 'पाया' (base) रचण्यासाठी केलेला उपद्व्याप वाटतो. ऊद्याला म. न. से. नी कोणा अ-मराठी माणसाला (जे सेनेने केले) राज्यसभेत पाठवले तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
|
Sakhi_d
| |
| Saturday, February 16, 2008 - 5:54 am: |
| 
|
भटांचे काव्य जे आजही खरे ठरते आहे
|
खालील ब्लॉग बगु शकता rajkaran.rediffiland.com
|
राज ठाकर्यांची मुलाखात . . . http://www.loksatta.com/lokprabha/20080222/cover.htm
|
साधी गोष्ट आहे. विशिष्ट भूभाग (जसे मुंबई) किती लोकांना सामावून घेऊ शकतो, किती लोकांना पाण्याची सोय, सांडपाण्याची सोय, रस्ते, वाहतूक, मोकळी मैदाने, शाळा, उद्याने देऊ शकतो हे मर्यादित आहे. कायद्यात सोय आहे म्हणून तमाम बिहारी व उप्रचे लोक मुंबईत आले तर अनर्थच होणार. कायदा ह्या बाबतीत नक्कीच गाढव आहे. दुसरे असे की कायदा कायदा म्हणून रान उठवण्याआधी मुंबईतील असंख्य बेकायदा झोपडपट्ट्यांचे काय? त्या पाडताना हळूवार, संवेदनाक्षम असले पाहिजे. मात्र मराठी लोकांनी आंदोलन केले की मात्र कायदा पहायचा. असे दुटप्पी धोरण कसे चालते? मला वाटते काही काळ बाहेरून येणार्या कुणालाही मुंबईत स्थाईक होणे अवघड(अशक्य) बनवले पाहिजे. अगदी बाहेरगावच्या मराठी लोकांनाही. बदली झालेले सरकारी नोकर, सैन्यातील अधिकारी एवढेच अपवाद.
|
काही वर्षांपुर्वी फिजी मधील स्थानिक जनतेने तुलनेने श्रिमंत व सत्ता चालवनार्या भारतीयांना बंड करुन हाकलुन दिलेले आठवते का? आज अमेरिकेत पण २००८ च्या निवडनुकीत इमींग्रंटस चा मोठा मुद्दा आहे त्यावर बोलावच लागत. आणि सर्वच नेते त्या विरुध्द(च) बोलतात. ह्याच कारणामुळे इंग्लड मधील भारतीयांना इकॉनॉमी मायाग्रंट्स म्हणतात. ईंडोनेशिआत दोन वर्षापुर्वी भारतीय वंशाचे अनेक राजकारणी सत्तेत सहभागी होते आता नाहीत. आपल्याच देशात १७६० मध्ये परकिय लोकांना बोलावुन मराठ्यांचे ख्च्चीकरण केले गेल. कारण होते उत्तर भारतात मराठ्यांची वाढती सत्ता व रोजच्या बाबीत लक्ष घालने. वरिल घटना हेच सिध्द करतात की आधी स्थानिक लोक मग ग्लोबलायझेशन वैगरे. राज ठाकरे राजकारण करत असतील तर गोष्ट वेगळी पण त्यांचा मुद्दा महत्वाचा आहे असे मलाही वाटते. पण नुसत्याच मारामारी ने प्रश्न सुटनार नाही. खरतर आपल्या पंचवार्षीक योजनेत विकासातील असमतोल कसा कमी झाली पाहीजे ह्यावर विचार व्ह्यावा. सर्व भुभागाचा परिपुर्णे विकास हेच त्यावर उत्तर असु शकेल पण त्यासाठी उत्तर प्रदेश वा बिहारातील नेत्यांनी तिकडे इंडस्ट्रीज चालु करने हा उपाय आहे. मी महाराष्ट्रात येउन छट्पुजा करनारच बघु कोण काय करते ते ही भुमीका अयोग्य आहे. BTW गंगाजल मध्ये दाखवलेलाच बिहार अस्तित्वात असेल तर तिथे कोण कंपन्या चालु करेन हा विचार लालु वा अमरसिंग ने करायचाय, राज ने नाही. ज्या जागी कोणी कधीही देवाघरी जातो तिथे उद्योगपती का जातील हा प्रश्न लालु, अमर ने स्वतला विचारला पाहीजे. पण त्यांना आयती मिळालेली पोळी खायचीय त्यासाठी ह्या फुकाचा गमजा. गुजरात चे उदा घ्या गेल्या तिन वर्षात तिथे महाराष्ट्रापेक्षा जास्त गुंतवनुक झालीये. याचा विचार कधी केलाय का? तिथे तर उत्तरप्रदेशातील स्वस्त मजदुर पण नाहीत तरीही इंडस्ट्री वाढतेय. थोडा वेळ विचार करा उत्तर सापडेल. बर्याच गोष्टी मजुरी पेक्षा वर असतात. आणि हो स्वस्त मजुर हे उत्तर राहीले असते तर इंडस्ट्रीज डायरेक्ट बिहार, उत्तरप्रदेश व मध्य प्रदेशातच स्थापण नसत्या का झाल्या?
|

|
ठाण्यात वाहतूक पोलिसावर हात उचलणाऱ्या टोळक्याला पिटाळले उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनानंतर समाजात निर्माण होत असलेल्या तणावाचे चटके आता जाणवू लागले असून शुक्रवारी ठाण्यात दोन पोलिस हवालदारांना त्याचा फटका बसला. कोणतीही कागदपत्रे नसलेल्या रिक्षा चालकावर कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच परप्रांतियांच्या टोळक्याने हात उचलला. त्यांची ही मुजोरी पाहून मराठी बाणा अचानक उफाळून आला आणि त्यांनी या परप्रांतीयांच्या टोळक्याला चांगलाच चोप देत पिटाळून लावले. ठाणे रेल्वे स्टेशनसमोर कोपरी येथे एस. एस. सुर्यवंशी आणि कोळी हे वाहतूक शाखेचे दोन हवालदार रिक्षांची तपासणी करीत होते. त्यावेळी ज्ञानेश्वर गिरी याला कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय रिक्षा चालविताना पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून रितसर दंड वसूल करण्यासाठी पावती फाडली. मात्र, तोपर्यंत पोलिस जाणुनबुजून परप्रांतिय रिक्षाचालकांवर कारवाई करतात, असा गळा काढून गिरी याने आणखी चार-पाच परप्रांतिय रिक्षाचालकांना तेथे गोळा केले. या टोळक्याने घेराव घालून पोलिसांनाच दमदाटी आणि धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्याने सारेच चक्रावले. त्यापैकी एकाने सुर्यवंशी यांच्या डोक्यावरची टोपीही उडविली. रिक्षाचालकांच्या दंडेलीमुळे संतापलेले शांताराम नेमण पोलिसांच्या मदतीला धावले. नेमण यांच्यापाठोपाठ आणखी मराठी बांधवही या मुजोर रिक्षाचालकांवर तुटून पडले. अखेर या रिक्षाचालकांनी धूम ठोकली. पोलिसांनी या गिरी या रिक्षाचालकाच्या विरोधात कोपरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून कोर्टाने एक हजार रुपये दंड आकारून गिरीची सुटका केल्याची माहिती पोलिस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आता यावर उत्तर कोण देणार? ही मुजोरी ठाणेकर पदोपदी अनुभवतात. निदान असे अनुभव मलातरी नक्किच आले आहेत.
|
Suyog_11
| |
| Monday, February 18, 2008 - 5:54 am: |
| 
|
जयमहाराष्ट्र, आहो ठाण्यात जे झाले आणि राज ठाकरेने जे केले त्याचा संबंध काय? तुम्हाला असे म्हणायचे आहे का की कोणताही मराठी माणुस पोलीसावर कधीच हात उचलत नाही? की असे म्हणायचे आहे की सर्व पोलिस अगदी इमानदार असतात?
|
सुयोग तुम्ही उत्तरप्रदेशमधे जावुन एखाद्या शिपायाच्या अंगावर हात लावुन दाखवा आणि मग मजा बघा! हे आंदोलन सुरु करण्याची गरज आज महाराष्ट्रात का आहे? याचे एक प्रातिनिधिक उदाहरणा दाखल मी ही बातमी इथे पोस्ट केली आहे.सध्या या उत्तरभारतीयांचे आचरण म्हणजे "कानामागुन आली अन तिखट झाली" असे झाले आहे.
|
अहो जय महाराष्ट्र तुम्ही कशाला एव्हढ टेन्शन घेताय????झाल आंदोलन संपल आहे. आता जास्त चिघळल तर राजला शिक्षाही होउ शकते त्यामुळे थंड होइल सगळ. आणि राजचा अभिमन्यु वगैरे काही होणार नाहिये. सध्यापुरत नॉर्थ इन्डिअन्स पळुन गेलेत ना???काही दिवसांनी परततील,मग त्यांना कोण थांबवणार???त्यापेक्षा राजनी जिथुन जिथुन नॉर्थ इन्डिअन्स पळालेत तिथे तिथे मराठी माणसांना कामाला लावल पाहिजे तर काही उपयोग आहे,नाहीतर नाही. पण तेव्हढ कोण करणार???
|
Zakki
| |
| Monday, February 18, 2008 - 3:11 pm: |
| 
|
राजनी जिथुन जिथुन नॉर्थ इन्डिअन्स पळालेत तिथे तिथे मराठी माणसांना कामाला लावल पाहिजे हे राजने कशाला करायला पाहिजे? नोकर्या बघायला मराठी लोक आपले आपण जाऊ शकत नाहीत का? 'अहो, नोकर्या शोधा, पैसे मिळवा,' असे सांगावे लागते? ही काय माणसे आहेत का गाढवे? की बैल? कुणि जोरात मागे काठी मारली नाही तर कामे करणार नाहीत? सगळे जण आपले, दुसर्या कुणितरी काहीतरी करावे म्हणणारे!
|
Suyog_11
| |
| Monday, February 18, 2008 - 9:28 pm: |
| 
|
जयमहाराष्ट्र, कोण कानामागुन आले आणि कोण तिखट झाले याचा विचार तुम्हीच व्यवस्थित करावा. तोडा आणि राज्य करा ही नीती राज ठाकरे सारखे लोक आजही वापरतात आणि शिकले सवरलेले लोक याला आजही बळी पडतात हेच दुर्भाग्य!!
|
Suyog_11
| |
| Monday, February 18, 2008 - 9:36 pm: |
| 
|
एक गोष्ट विसरलो, खाली एक लिंक पाठवत आहे...काही मराठी माणसांनी दोन पोलिसांना जबर मारहाण केली... आता तुम्ही असे म्हणनार का की मराठी माणूस पण माजलाय? अहो कोणी २, ४ माणसे अयोग्य वागली तर संपुर्ण उत्तरभारतीयांच्यावर खापर क फोडताय? http://www.pudhari.com/PuneGraminDetailNews.aspx?news_id=26549
|
सुयोग तुम्ही उत्तरप्रदेशमधे जावुन एखाद्या शिपायाच्या अंगावर हात लावुन दाखवा आणि मग मजा बघा! तुम्ही उत्तर हिन्दुस्थानात किती दिवस होता हो?
|
सुयोग! शक्यतो मायबोली वर वैयक्तिक ताशेरे ओढणे मला पटत नाही.ज्यांचे मुद्दे पटतात त्यांना मी अनुमोदन पण ज्यांचे पटत नाहीत त्यावर प्रतिक्रिया देणे मला उचित वाटत नाही. तरी व्यक्ती सुज्ञ असेल तर तिच्यशी संवाद साधणे योग्य. इथे आपापले विचार शब्दात मांडण्याचे स्वातंत्र्य मायबोली ने दिलेले आहे.पण इथे उल्लेख करुन सुरुवात तुम्ही केलीत म्हणुन मी प्रत्युत्तर दिले इतकेच. कुणी कुठली आणि कुठल्या पक्षाची विचारधार स्वीकारावी हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे? पोलिसांवर मराठी माणसे हात उगारत नाहित अथवा नसावेत असे मी मुळीच म्हंटलेले नाही.पण म्हणुन परप्रांतीयांना पोलिसांना मारण्याचा अधिकार दिला असे होत नाही. श्री उपाध्ये! शीतावरुन भाताची परीक्षा करता येण्याइतपत अक्कल मला देखिल आहे.त्यासाठी उत्तरप्रदेशात जाण्याची अथवा वास्तव्य करण्याची गरज आहे असे निदान मला तरी वाटत नाही. सध्याच्या भारताच्या राजकारणात ज्या प्रकारची गोरीगोमटी फळे नेत्यांच्या रुपात उत्तरभारताने दिली आहेत त्यावरुन प्रत्यय येतोच की? सरसकट सगळेच अवगुणी नसतिल कदाचित पण सुक्याबरोबर ओले देखिल जळतेच.उत्तरभारतीयांच्या स्थलांतराचा प्रश्न हा फ़क्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही. भारतातील इतर प्रांताची देखिल हे उत्तरभारतीय डोकेदुखी बनले आहेत. तुमचा या आंदोलनावरील राग मी समजु शकते कारण तुमचे कामगार काम सोडुन गेल्यामुळे तुमचे वैयक्तिक नुकसान झाले आहे.पण म्हणुन त्याची आगपाखड तुम्ही अवघ्या महाराष्ट्रावर आणि मराठीजनां वर करणार आहात का? इथे माझा अनुभव लिहिते आहे.काही दिवसांपुर्वी ठाण्यामधे एका ठिकाणी माझी गाडी वळण घेत असताना मागुन एक रिक्शा माझ्या गाडीवर आदळली. रिक्शा इतक्या जोरात आदळली कि माझी गाडी रस्ता सोडुन फुटपाथवर चढण्याच्या बेतात होती. रिक्शाचे बरेच नुकसान झाले होते. रिक्शात कुणी लहान मुलवगैरे नाही ना याची खात्री करुन घेण्यासाठी मी गाडीबाहेर आल्यावर रिक्शाच्या चालकाने शिवीगाळ सुरु केली गाडित मी आणि माझ्या दोन मैत्रिणीच होतो.या सगळ्या गदारोळात गर्दी जमली कुणीतरी trafic police ना बोलावले. त्यांनी शहानीशा केली असता आणि तिथे जमलेल्या माणसांना व प्रत्यक्षदर्शींना विचारले असता त्यांनी चुक रिक्शावाल्याची असल्याचे सांगीतले.सुदैवाने वळण घेताना सुरु केलेला गाडीचा indicator देखिल चालुच होता.तेव्हढ्यात त्या चालकाने आपले उत्तरभारतीय भाईबंद गोळा केले आणि पोलिसांवरच अरेरावी सुरु केली.शेवटी पोलिसांनी गाडी वागळेइस्टेट पोलिस ठाण्यावर नेण्यास सांगीतले. मला त्याच दिवशी रात्री परतीचा प्रवास करायचा होता.पण रिक्शावाला ऐकायला तयार नाहि.त्याची चुक तो मान्य करत नव्हता मी चांगल्या प्रकारे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्याचे म्हणणे होते की मी नुकसानभरपाई म्हणुन त्याला १०,००० रुपये द्यावेत. आणि माझी चुक नसताना त्याला एव्हढी रक्कम देण्याची माझी तयारी नव्हती. मधल्या काळात माझ्या एका मैत्रिणीने तिच्या नवर्याला फोन करुन सगळी कथा ऐकवली. त्याचे कुणीतरी वरिष्ठ अधिकारी ओळखीचे होते त्यांना परिस्थितिची कल्पना दिली त्यांनी त्यांच्या assisstant ला पाठवले.त्याला बघुन रिक्शावाल्याने तो स्वतः कृपाशंकर सिंग यांचा नातेवाईक असल्याचे सांगुन दडपण आणायला सुरुवात केली. मला काहिच कळेना काय करावे? पण जेंव्हा त्या चालकाने त्याची पातळी सोडुन संभाषण करण्यास सुरुवात केली तेंव्हा शेवटी मी माझी ओळख वापरुन त्याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि तसे केले देखिल. त्या रिक्शावाल्याने जर चांगल्या शब्दात आणि सभ्य भाषेत माझ्याशी संवाद साधला असाता तर कदाचीत मी त्याला माझी चुक नसताना पैसे दिले असते सुद्धा पण ज्याप्रकारे त्याने त्याची ओळख असल्याचे सांगुन पोलिसांवर दमदाटी सुरु केली तेंव्हा मात्र माझ्या डोक्यात सणक गेली. कदाचित आम्हा बायकांना बघुन त्याला वाटले असावे की आम्ही सहजासहजी पैसे देऊ.यालाच म्हणतात "कानामागुन आली आणि तिखट झाली" चु भु द्या घ्या! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Aavli
| |
| Tuesday, February 19, 2008 - 12:57 pm: |
| 
|
धन्यवाद जय महाराष्ट्राताई आमचे म्हणने पण तेच आहे..वैयक्तिक फायद्यासाठी सर्वच जण त्यांचे समर्थन करतात..तुम्ही महाराष्ट्रात या पण ते व्यवसायापुरते या इथे राजकारनाचे ढोंगी चाळे कशाला करता. शिस्तीत या शिस्तीत रहा स्थानिक लोकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|