|
Satishbv
| |
| Friday, February 08, 2008 - 4:08 am: |
| 
|
दिल्लीचे नायब (म्हणजे काय हो ?) राज्यपाल खन्ना यांनी तोफ डागली की कायदा मोडण्यात उत्तर हिंदुस्थानींना मोठेपणा वाटतो. .... आता बोला
|
Satishbv
| |
| Friday, February 08, 2008 - 4:51 am: |
| 
|
काय चाललय काय 
|
मी आपल्या पुण्यनगरीतील एक किस्सा सांगतो. एक यू पी तील ग्रुहस्थ जे माझे मित्र आहेत-(आता मला याबद्दल मारू नका- ) -त्याना मी बाल गंधर्व मध्ये घाशिराम पाहण्याची फर्माईश केली होती. एका मराठी कुटुम्बात ते उतरले होते. सन्ध्याकाळी जायचे होते. आई व बाबा घरी नव्हते म्हणून त्यानी ज्यांच्या कडे उतरले होते त्यांच्या वीस वर्षाच्या मुलीस पत्ता विचारला.तिला जन्गली महाराज नाही पण JM road माहित होता पण बाल गंधर्व मात्र माहित नव्हते----.खूप प्रयत्ना नन्तर ती म्हणाली "oh shit!!!! the one opposite Pizza Hut???? काय म्हणते मराठी अस्मिता आणि म न से तुमच्यात गट्स असले तर पहिले त्याना सुधारा ना!!!
|
Jhuluuk
| |
| Friday, February 08, 2008 - 8:40 am: |
| 
|
विनय देसाई, तुमचे म्हणणे पटले, हा प्रश्न एकतर्फी सोडवण्यासारखा नाही. पण तिथले राजकारणी ही जबाबदारी शिताफीने टाळतात. त्यांना काय, जितका गोंधळ जास्त तितके बरे. जितकी गरम डोकी तेवढच त्यांना भडकवता येतं. झक्की, आपलं म्हणणं नीट्सं कळलं नाही. मुंबईत येउन कसे काम करतात म्हणजे? आणि तुम्हाला बाळासाहेबांनी ७२-७३ साली घडवुन आणलेले similar नाट्य मराठी विरुद्ध उडपी याबद्दल पण माहिती असेल ना? त्याबद्दल थोडेफार ऐकले आहे. इथे काही सांगता येईल का? राजची खेळी त्यांच्या पावलावर पाउल टाकुन आहे का? आशुसचिन धन्स.
|
अगदी बरोबर आहे की राज सध्या जे काहि करत आहेत ते सामान्य माणसाला न पटणारे आहे. मारहाण हा काही उपाय नाहि आणि सणवार साजरे करण्यापसुन रोखने तर मुळीच नाही. पण मराठी माणसाची मुम्बैत सद्यस्थिती मात्र रडवेलीच आहे. आणि याला सुधारण्यासाठी जर राजच काय फाटक्या तोंडाचा तो अबू आझमी देखील काही करत असेल तर त्यालाही पाठींबा पण म्हनुण असे करणारा म्हणजे आहेचा किरण नाही हे तुमचे म्हनणे पटले उदय ते शाश्वत सत्य आहे. कळीचा मुद्दा हा आहे की या मुम्बईकर मराठी लोकांना कुणीतरी वाली हवा आहे. .. पण बांग्लादेशींची मात्र येनकेन प्रकारे हकालपट्टी करणेच योग्य ठरेल ते मराठी माणसाच्या नव्हे तर देशच्या सुरक्षेला पाकिस्तानपेक्षाही घातक आहेत. टीप: मी राज ठाकरे अथवा मनसेचा कार्यकर्ता किंवा समर्थक नाही.
|
किती टक्के मराठी लोकाना स्वत्: व स्वत्:च्या मुलाबाळांना मराठी म्हणून ओळख द्यावयाची आहे?
|
http://www.rediff.com/news/2008/feb/08bal.htm Raj is a chicken suffering from bird flu:says: Bal Thackeray
|
Aavli
| |
| Friday, February 08, 2008 - 11:18 am: |
| 
|
राज जे काही करत आहे ते सर्व मुम्बई करास अभिप्रेत आहे....पण परिस्थिती अशी आहे..शिवाजी जन्माला यावा तो दुसर्याच्या घरात पण आपल्या घरात नको.... शेवटी काही चान्गलं घड्ले तर सारेच त्याला वाटेकरी होतील..
|
अगदी बरोबर बोललात. हे आंदोलन सुज्ञपणे आणि योग्य रितिने पुढे नेणे जास्त गरजेचे आहे. उत्तरभारतीयांना मारुन काहिहि साध्य होणार नाही.प्रत्येक मराठी माणसाने आत्मपरीक्षण करायची खरी गरज आज निर्माण झाली आहे. सत्य परिस्थिति अशी आहे कि हल्लीच्या मराठी युवकांना काही प्रकारची कामे करण्याची लाज वाटते.प्रत्येकालाच इथे पांढरपेशा बनण्याचा हव्यास जडलाय. ठाण्यामधे ८०% ऑटोचालक उत्तरभारतीय आहेत.त्या बहुतेक रिक्शा मराठी माणसाच्या मालकीच्या आहेत पण रिक्शा चालवणे हे लाजीरवाणे वाटते म्हणुन केवळ उत्तर भारतियांना चालक म्हणुन ठेवुन पैसा कमवायचा या वृत्तीला काय म्हणायचे?आपल्या मनगटात जर जोर नसेल, शरीरीक कष्ट करण्याची तयारी नसेल तर बाहेरची माणसे येवुन तुमच्यावर कुरघोडी करणे स्वाभाविक आहे. मार्केट मधे जाण्याचा कंटाळा म्हणुन दारावर येणार्या भैय्यांकडुन मासळी विकत घ्यायची तसेच फ़ेरीवाल्यांकडुन भाजिपाला विकत घेणे अश्या प्रकारच्या गोष्टी करुन आपल्याही नकळत उत्तरभारतीयांना इथे स्थायिक आणि स्थिरस्थावर होवुन स्वतःचे बस्तान बसवण्यास हात भर लावण्याचे काम आपण मराठी लोकच करतो काही गोष्टिंच्या बाबतित मराठी माणसाची उदासीनता आजच्या परिस्थितिला कारणीभुत आहे. सेनेला आपल खरा मराठी चेहरा जर राखता आला नाहि तर ते मनसे ला ते जमेल अशी आशा आपण करावी का? सर्वसामान्य माणसाल वेठीस धरुन आंदोलन करणे मनाला पटत नाहि. मराठी माणसाची कुपमंडुक वृत्तीच महाराष्ट्रात मराठी माणसाच्य र्हासास कारणीभुत होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचे ज्या प्रकारे या वृत्ताला मिडियाने अवास्तव प्रसिद्धी दीली त्याचे कारण भारतात निदान सध्यातरी सर्व electronic प्रसारमाध्यमे पुर्णपणे उत्तरभारतीयांच्या ताब्यात आहेत आणि त्यावर त्यांचा वरचष्मा असल्याकारणाने विपर्यस्त वृत्ते दिली गेली. ज्यामुळे वातावरण अधिकच तणावग्रस्त झाले. एका मोठ्या वृत्तवाहिनीचा सर्वेसर्वा असलेल्या "राजदीप सरदेसाई" सारख्या मराठी माणसाला आपला मराठी बाणा आपल्या वृत्तवाहिनीद्वारे दाखवावा असे एकदाही वाटु नये"हीच महाराष्ट्राची शोकांतिका आहे. चु भु ध्या घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र!
|
अगदी बरोबर!काही गोष्टिंच्या बाबतित मराठी माणसाची उदासीनता आजच्या परिस्थितिला कारणीभुत आहे. ! read this http://www.loksatta.com/lokprabha/20080215/good.htm
|
लोकप्रभा मधिल या लेखात राजु परुळेकर यांनी अतिशय परखड मत मांडलय आता परुळेकर देखिल "राज" चे मित्र म्हणुन इथे कुणाच्या पोटशूळ उठला नाही म्हणजे मिळवले? शनिवारच्या मटा मधे राज़" यांचा लेख छापुन येणार आहे त्यातिल काही मुद्दे- शिखांच्या पगडीवर फ्रान्समध्ये असलेल्या बंदीवर भारताचे पंतप्रधान रदबदली करतात. * दमदमी टाकसाळीमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो. * राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणा-या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष थेट संबंध ठेवून असतात. * गांगुलीला टीममधून काढल्यावर पश्चिम बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात. * हे सारं प्रांतवादी आणि संकुचित-सांस्कृतिक नाही ? * अमिताभ बच्चन स्वतःला ‘ छोरा गंगा किनारेवाला ’ मानतो. ते संकुचित आणि प्रांतवादी नाही का ? * पण मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राची अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो... या प्रश्नांची उत्तरे खरच कुणा मराठीच्या मुद्द्याला विरोध करणार्यांकडे आहेत का? आता मुंबईमधिल तथाकथित(जो मुळातच कधी नव्हता)तणाव संपुष्टात आल्यावर देखिल त्या वाचाळ अमरसिंगच्या वाणीला काही आराम नाही नविन जावई शोध लावल्या सारखे आपला बरळतोय. आता काय तर म्हणे "राज पासुन त्याच्या जिवाला धोका आहे". पहिल्या दिवसापासुन मला एक प्रश्न सारखा भेडसावतोय? कि महानायक असलेल्या अमिताभजींनी काय मौनव्रत घेतले आहे का?कि काहि दिवसांसाठी त्यांनी आपली वाणी अमरसिंगना भाडेपट्टिवर दिली आहे? त्यामुळेच कि काय अमिताभनी महाराष्ट्रासाठी काय काय केले आहे याची उजळणी,पाढे रोज ऐकायला मिळत आहेत सहसा आपण उजव्या हातानी केलेले दान डाव्या हाताला देखिल कळु देऊ नये असा प्रघात आहे. निदान मराठी माणसाचा तरी आहेच उत्तरभारतीयांचे माहित नाहि? "राजनी" देखिल हा मराठीचा मुद्दा उचलुन त्या अमरसिंग नावाच्या वाचाळाला तोंडाचा पट्टा चालु करण्याची आणि प्रसारमाध्यमांकडे मुलाखती देवुन सनसनाटी निर्माण करण्याची आयती संधी उपलब्ध करुन दिली. नाहीतरी उत्तरप्रदेशच्या निवडणुका झाल्या पासुन हा समाजवादी पक्ष आणि त्यांचे ते मुलायम व अमर हे दोघे काहि काम नसल्या कारणाने बेकार झाले होते.त्यांना फुकटचे काम मिळाले. "रिकामा न्हावी भिंतिला तुंबड्या लावी". सेने ने आजच्या सामना मधे मराठी माणसाचा कैवार फक्त सेनाच घेवु शकते असा दावा केलाय. राज" चा मुद्दा सर्व थरातुन उचलुन धरला जातोय म्हंटल्यावर जाग आली म्हणायची आणि त्याच मुळे तथाकथित खिजगणतित नसलेल्या राज"च्या आंदोलनाची दखल घेणे भाग पडलेच. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
बाळासाहेब ठाकरे राज वर टिका करतायेत ते त्यांना राज चा मुद्दा पटला नहिये म्हणुन नाहि.. राज ठाकरे मराठी लोकांचा कैवार घेतोय हे त्यांना पटत नहिये. मराठी लोकांचा उद्धार शिवसेना(च) करु शकते हे त्यांना सांगायचय. तसं नाहि केलं तर कदाचित मराठी व्होट बॅंकेचा बलन्स राजच्या खात्यावर जमा होइल ही भिति त्यांना स्वस्थ बसु देत नसेल. बाकी शिवसेनेनी तरी दुसरं काय केलंय? व्यक्तीगत टिका (कधी कधी कमरेखालची) बाळ ठाकरे करत नव्ह्ते? राडेबाजी, हुल्लडबाजी राज ठाकरे शिवसेनेच्या तालिमीतच शिकलाय.
|
आणि लोकांना मारहाण करून ते परत जाणारेत असं वाटुन घेणं बालिशपणाचं आहे.
|
Chinya1985
| |
| Saturday, February 09, 2008 - 12:22 am: |
| 
|
ही आहे महाराष्ट्र टाईम्समधे आलेली राज ठाकरेची भुमिका माझी भूमिका, माझा लढा! 9 Feb 2008, 0425 hrs IST '' सर्व जग जरी विरोधात गेलं तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता , महाराष्ट्र संस्कृती , मराठी भाषा यासाठीच लढत राहू . यूपी - बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडागिरी आम्ही मोडून काढूच . मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की , जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय ? सामील व्हा !'' खास ' मटा ' च्या वाचकांसाठी लिहीत आहेत , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ..................... मराठी भाषा , मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलल्याबद्दल आणि तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याबद्दल यूपी - बिहारमधून आलेल्या गुंडांकडून आणि पत्रकारांचा बुरखा पांघरून यूपी - बिहारची वकिली करणाऱ्या बहुतेक सर्व हिंदी चॅनल्सच्या भय्या पत्रकारांकडून माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची , माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेची सतत बदनामी होते आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मुलं आणि जे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत , ते चांगल्या घरातले आहेत . त्यांची घरची तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे . त्यांना उत्तम करीयर्स आणि व्यवसाय आहेत . परंतु तरीही त्यांनी ही बदनामी आणि हा प्रचंड त्रास अंगावर घेतला , ज्यातून त्यांना काहीही आथिर्क किंवा इतर कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही . तात्काळ कोणती सत्तापदंही मिळणार नाहीत . नेता म्हणून आणि एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून मलाही या साऱ्या संघर्षाचा कोणताच व्यक्तिगत फायदा होणार नाही , हे सारं माहीत असूनही या संघर्षाला मी प्रवृत्त का झालो ? संपूर्ण महाराष्ट्रातल्या समज असलेल्या जनतेसाठी मी हे लिहीत आहे . महाराष्ट्रात येणाऱ्या यूपी - बिहारमधल्या सर्व भय्यांना आपण इथे महाराष्ट्रात राज्य करण्याकरताच येतो आहे असे वाटत असते . एखाद्या प्रांतातल्या जनतेला तिची स्वत : ची भाषा असते . तिची समृद्ध अशी संस्कृती असते . पाहुणा जेव्हा येतो तेव्हा यजमानाकडून जशी आतिथ्यशीलतेची अपेक्षा असते , तशी पाहुण्याकडून यजमानाच्या घराशी , त्याच्या संस्कृतीशी समरस होण्याची अपेक्षा असते . उत्तर प्रदेश , बिहारमधला साधा माणूस असो , नेता असो , पत्रकार असो , शिक्षणासाठी येणारा विद्याथीर् असो , नट असो , वा मच्छीमार असो - तो तिथे त्या राज्यांमध्ये त्याच्यावर फाके मारण्याची वेळ तिथल्या नेत्यांमुळे आलेली असते म्हणून इथे महाराष्ट्रात येतो - पण इथे आल्यावर त्याची स्टाइल बदलते . इथली भाषा तो शिकत नाही . इथल्या संस्कृतीला , स्थानिक माणसाला तो तुच्छ लेखतो , त्याच्यावर दादागिरी करतो . एखाद्या यूपी - बिहारच्या रिक्षा - टॅक्सीवाल्यापासून ते सिनेमानटांपर्यंत हा अनुभव आपल्याला पुन : पुन्हा येत असतो . आपण आपल्या मराठी संस्कृतीनुसार त्याला उदार सहिष्णूपणे पुन : पुन्हा माफ करतो . विसरून जातो . असं बंगाली , पंजाबी , उडिया , आसामी किंवा तामिळ माणूस कधीही करणार नाही . कारण या भाषिकांची भाषिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टं अतिशय तीक्ष्ण आहेत आणि त्याबाबत ते सतत सावध असतात . परंतु आपण सहिष्णू आहोत . आजही सहिष्णुता हा मला गुणच वाटतो . सर्वच अमराठी माणसांशी असा संघर्ष करण्याच्या बाजूचा मी नव्हतो आणि नाही . परंतु यूपी - बिहारमधल्या भय्यांनी हा संघर्ष आमच्यावर लादलेला आहे . सैन्यात मराठा बटालियनमध्ये ' मराठा ' ( म्हणजे महाराष्ट्रीयन ) या शब्दाची फोड ' मरता लेकिन हटता नही वो मराठा ' अशी केली जाते . यापूवीर् हात जोडून या यूपी - बिहारवाल्यांना मी महाराष्ट्रातल्या मराठी माता - बांधवांच्या वतीने अनेकदा सांगितलेलं आहे की , इथल्या संस्कृतीने तुम्हाला सतत खूप दिलेलं आहे , तेव्हा या संस्कृतीचं रक्षण , संवर्धन आणि आदर करणं तुमचं कर्तव्य आहे , असं जाहीर भाषणांत आणि खासगी चर्चांत सांगितलं . परंतु यांची मगुरी इतकी आहे की , उत्तर प्रदेश - बिहारमधून तिथल्या जनतेची पूर्ण वाताहत करून गब्बर झालेले अमरसिंह , मुलायमसिंह आणि तत्सम इतर अनेक नेते इथे बोलावून घेऊन इथल्या मराठी जनतेला राज्यघटना आणि देशप्रेम ' शिकवण्याचे ' प्रयोग इथल्या यूपी - बिहारवाल्यांनी सुरू केले . एवढेच नव्हे , तर हिंदी भाषा आणि हिंदी संस्कृती मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रावर लादण्यासाठी दादागिरीची भाषा सुरू केली . महाराष्ट्रातल्या बहुतेकांना खरंतर हिंदी भाषा येतेच . पण मराठी ही इथली राजभाषा आहे . तिला घटनेने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे . शिवाय , स्वत : ची भाषा - संस्कृती वाढवण्यासाठी आणि अनिवार्य करण्यासाठी भाषावार प्रांतरचना झालेल्या राज्यातल्या जनतेला यूपी - बिहारमधल्या भय्यांची परवानगी घेण्याची गरज आहे का ? या भय्यांनी चक्क मुंबई महापालिकेत हिंदी अनिवार्य करण्याची मागणी करून मराठी मागे रेटण्याचे प्रयत्न सुरू केले . महाराष्ट्रात छट पूजा , उत्तर प्रदेश स्थापना दिवस , राजकीय बळ दाखवण्याकरिता , जोराने साजरे करायला सुरुवात केली . रिक्षा असो , टॅक्सी असो , रस्ते असोत , इमारती असोत , सोसायट्या असोत , वर्तमानपत्रं असोत , चॅनल्स असोत , मच्छिमारी असो , सिनेमे असो - सर्वत्र या यूपी - बिहारवाल्या भय्यांची बेबंद दादागिरी महाराष्ट्रात सुरू झाली . तेव्हा लक्षात आलं की , यांच्याशी हात जोडून बोलण्याचे दिवस संपले . आता यांना हात सोडून सामोरं जायला हवं . म्हणून मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात यूपी - बिहारवाल्यांच्या सांस्कृतिक व राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध संघर्ष सुरू केला . महाराष्ट्रात राहायचं असेल तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रीयनांच्याच जीवनपद्धतीप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांना जगावं लागेल . महाराष्ट्राशी त्यांना जुळवून घ्यावं लागेल . हे झालं नाही तर महाराष्ट्रात अराजक माजेल . महाराष्ट्रात जी कायदा - सुव्यवस्था आहे , महाराष्ट्रात ज्या विकासाच्या संस्था आहेत , त्यांचा फायदा देशभरचे लोक घेत असतात . ती संस्कृतीच उखडून टाकली , तर इथे जौनपूर - आझमगढसारखीच परिस्थिती निर्माण होईल . राजाभय्या , अमरसिंह , लालू , पासवानांसारखे लोक महाराष्ट्राचा कब्जा घेतील . हे केवळ मी म्हणतोय असं नव्हे , तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आमचं आंदोलन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये ' महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अमराठी झाले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही ,' असे उद्गार काढले . आता कुपेकर हे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्हेत . परंतु ही सार्वत्रिक भावना आहे . मराठी जनतेत , मराठी नेत्यांमध्ये , मराठी नटांमध्ये , सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांमध्ये या यूपी - बिहारवाल्यांबद्दल चीड आहे . मी आणि माझा पक्ष फक्त वाईटपणा घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व करतो . नागड्याला नागडं म्हणण्याचं साहस कुणीतरी सगळ्यांचे शिव्याशाप घेऊन केलं पाहिजे . ते साहस मी करतो आहे . परिणामांची पूर्ण कल्पना करून . एकेकाळी तेच साहस प्रबोधनकारांनी केलेलं होतं . आचार्य अत्र्यांनी केलेलं होतं . बाळासाहेबांनी केलेलं होतं . खुद्द कुसुमाग्रजांनी केलेलं होतं . कित्येकजण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाची तुलना शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाच्या सुरुवातीच्या आंदोलनांशी करतात . परंतु भावना काही प्रमाणात तशीच वाटली तरी दोन्हींमध्ये फरक खूप आहे . तेव्हाचं ते आंदोलन हे गरीब मराठी माणसाचं , प्रामुख्यानं नोकऱ्यांसाठीचं आंदोलन होतं . इतर विषय त्याला नंतर चिकटत गेले . आज माझं आंदोलन हे उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध आहे . त्यांच्याकडे उत्तरेतून येणारे गुंड नेते , त्यांच्यामार्फत येणारे प्रचंड प्रमाणातले चलन , शस्त्रास्त्रं आहेत . इथे त्यांचं मग्रुर मनुष्यबळ वाढवण्याच्या प्रयत्नात ते असतात . भय्या टॅक्सीवाला , रिक्षावाला , मच्छीमार हा गरीब बिचारा उत्तरेतून आलेला असं चित्र भय्यांची लॉबी असलेली चॅनल्स उभी करतात . परंतु त्यांना रोजच्या जगण्यात एकेकटा स्थानिक मराठी माणूस भेटतो , त्यांच्याशी व्यवहार करतो , तेव्हा त्यांची खास उत्तरेतली मगुरी , महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा द्वेष , उत्तरेतल्या गुंडांवरची त्यांची श्रद्धा या साऱ्याचं आपल्याला दर्शन होतं . त्यामुळे ' तो गरीब बिचारा पोटासाठी येतो ' अशा वाक्यात यांचं वर्णन होऊच शकत नाही . राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्धची ही आमची लढाई कितीतरी अवघड आहे . ती एकपदरी नाही , बहुपदरी आहे . महाराष्ट्रात आज राज्य कोणत्याही पक्षाचं असो . यूपी - बिहारमधले त्या त्या पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अतिशय मग्रुरीने ' व्हाया दिल्ली ' चेपू इच्छितात . हा महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे . प . बंगाल , तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओरिसा , आसाम , केरळच्या बाबतीत हे होऊ शकत नाही . कारण तिथली जनता या भय्यांच्या गुंडगिरीबाबत अतिशय सावध आहे . स्वत : च्या सांस्कृतिक आणि भाषिक राजकीय अस्मितेविरुद्ध एकही शब्द ते सहन करत नाहीत . पण महाराष्ट्राची स्थिती तशी नाही . आज मराठी माणूस समृद्ध आहे . त्याची आज जागतिक बाजारात पत आहे . दीपक घैसास , आशुतोष गोवारीकर , सचिन तेंडुलकर आणि यासारखे अनेक दिग्गज मराठी आज बाजारपेठेत वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं अस्तित्व दाखवत आहेत . आज परप्रांतीय मराठी माणसांकडे नोकऱ्या करत आहेत . हा बदल स्वागतार्ह आहे . पण राजकीय आणि सांस्कृतिक सावधपणाविना तो व्यर्थ जाऊ शकतो . या जाणिवेनेच मी आणि माझा पक्ष रस्त्यावर उतरलेलो आहोत . एकेकाळी , म्हणजे बाळासाहेब पूर्णपणे कार्यरत असताना शिवसेना पक्ष मराठी माणसांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा . तेव्हा तो माझाही पक्ष होता . तेव्हाही मी मराठी राजकीय वर्चस्वाचा मुद्दा लावून धरलाच होता . बिहारींविरुद्धचं माझं आंदोलन त्यावेळचंच . त्यामुळे माझ्या नव्या पक्षाच्या नव्या अजेंड्यात हा मुद्दा सामील झाला आहे असं अजिबातच नाही . आता या भयानक परिस्थितीमुळे मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपलं राजकीय आयुष्य आणि सांस्कृतिक पुण्याई जुगारावर लावण्याचा निर्णय घेतला आहे . आपल्यातलेच काही मराठी मला अाणि माझ्या सहकाऱ्यांना शिव्याशाप देत आहेत . पण त्यांची मुलं - नातवंडं पुढे मला दुवा देतील . कविता , पुस्तकं , संस्कृती , अहिंसा , सहिष्णुता मलाही कळते . नवनिर्माणाच्या विकास कामांसाठी , विकासदृष्टीसाठी मी अकादमीच ( पुण्यात ) सुरू केलेली आहे . ज्या शिवाजी पार्कवर परवा स . पा . ने बिहारच्या आणि उत्तरेतल्या गुंडगिरीच्या भाषा केल्या , तिथे मीच मराठी काव्यवाचन आणि मराठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं . त्यामुळे मराठी सुसंस्कृतपणा आणि सहिष्णुता मलाही कळते . पण मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी कविता टिकेल . मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी संस्कृती टिकेल . मराठी संस्कृती टिकेल , तेव्हा अस्सल मराठी राजकारण टिकेल . शेवटी रस्त्यावरचा संघर्ष कुणालाच प्रिय नसतो . पण आत्मरक्षणासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो . तसं नसतं तर शेजाऱ्यांच्या सद्सदविवेकबुद्धीवर विश्वास ठेवून देशांनी सैन्य ठेवणं बंद केलं असतं आणि शेजारी राज्यांच्या प्रेमाखातर सर्व राज्यांत पोलिसदलही ठेवलं नसतं . संघर्ष करताना रक्त , घाम , अश्रू द्यावेच लागतात . पुढे ते संघर्ष यशस्वी झाल्यावर लोकप्रिय होतात ! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी आल्यावर स्वत : भारताचे पंतप्रधान शिखांच्या पगडीवर फ्रान्समध्ये असलेल्या बंदीवर रदबदली करतात . करुणानिधी मलेशियातल्या तामिळंासाठी मलेशियन सरकारशी वाग्युद्ध करतात आणि मग भारत सरकारला त्यात रदबदली करावी लागते . दमदमी टाकसाळमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जनेर्लसिंग भिंदनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो . इंदिराजींच्या हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या या संताबद्दल देशात अवाक्षरही निघत नाही . राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणाऱ्या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष तामिळ मुद्द्यावर थेट संबंध ठेवून असतात . गांगुलीला टीममधून काढल्यावर पं . बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात . हे सारं प्रांतवादी आणि सांस्कृतिक नाही ? मुंबईत चालणारे सर्व हिंदी चॅनल्स आणि त्यांचे पत्रकार महाराष्ट्राविरुद्ध विष ओकत यूपी - बिहारची वकिली करतात , ते प्रांतवादी नाहीत ? अमिताभ बच्चन स्वत : ला ' छोरा गंगा किनारेवाला ' मानतो . ते प्रांतवादी नाही का ? मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो ? हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे . अमिताभ बच्चननी त्यांच्यासाठी मरमर मरून काम करणाऱ्या सावंत नावाच्या मेकअपमनच्या मराठी , भोजपुरी चित्रपटांत दयेने काम केलं , तर ते जणू काही महाराष्ट्रावर उपकारच करताहेत , असं दाखवलं जातं . त्यांचा मेकअपमन जरी गांगुली , सुब्रम्हण्यम , मिश्रा कुणीही असता तरी ते असेच वागले नसते काय ? त्याच्यात त्यांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध काय ? ते तन , मन , धनाने उत्तर प्रदेशचेच आहेत . त्यांनी जे मिळवलं ते इथे , हेही सत्य नाही का ? फक्त मी माझ्या महाराष्ट्रासाठी उभा राहिलो तर गुन्हेगार ठरतो ? राज्यघटनेत असं लिहिलंय का ? मी इथे एकच पुन्हा सांगू इच्छितो . सर्व जग जरी विरोधात गेलं तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता , महाराष्ट्र संस्कृती , मराठी भाषा यासाठीच लढत राहू . यूपी - बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही मोडून काढूच . मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की , जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय ? सामील व्हा ! आपण विजयी होऊच ; कारण कोणताही कायदा , कोणतंही युद्ध , कोणताही माणूस पेटलेल्या मराठी मनांना थोपवू शकतच नाही . माझ्यावर विश्वास ठेवा . माझ्या मराठी माता - भगिनी - बांधवांनो , विजय तुमचाच आहे . जय महाराष्ट्र !
|
अमरसिंग सारख्या लाळ्घोटेपणा करणार्या राजकारण्यांनी मराठी भाषिकांना राजकारण आणि देशप्रेमाचे धडे देण्याचे कष्ट घेवु नयेत.त्या पेक्षा उत्तरप्रदेश खरोखरीच उत्तमप्रदेश कसा होइल याची चिंता करावी. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
मराठी भाषेचे शेवटचे आचके सुरू झाले. चला, उठा, टापश्या शोधायला लागा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2768466.cms
|
Ashwini_k
| |
| Monday, February 11, 2008 - 4:56 am: |
| 
|
आर्च, अहो मी ते अनवधानाने लिहिले. माझ्या लक्षात आल्यावर एडीट करायला गेले तर होत नाही आहे व तेवढ्यात तुमची चूक दुरुस्तीची पोस्टही वाचली thanks . राजकारणात पाटिल खूप असतात त्यामुळे झाले असेल.
|
भूमिपुत्र विरुध्द उपरे (दीपक घैसास,सीईओ, आय-फ्लेस इंडिया ) अन्नातील वाटेकरी आणि भूमीवरील भार वाढला की संघर्ष होतोच; हे झालं सनातन सत्य. त्यात राजकारण आले, की संघर्ष "उभा' केला जातो. मुंबईत गेल्या आठवड्यात झडलेला संघर्ष राजकारणापलीकडे जाऊन शांत डोक्याने तपासल्यास अनेक उत्तरे सापडतील. व्यवसायाच्या निमित्ताने सतत हिंडताना आज ठळकपणे जाणवते काय, तर नव्या संधींच्या, उज्ज्वल भविष्याच्या शोधात केलेले स्थलांतर. युरोपचे उदाहरण घेऊ या. जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यावर पोलंड, चेचेन्या, जॉर्जिया, हंगेरी अशा देशांतील मंडळी संधीच्या शोधात निघाली. आज बाल्कन देशांमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. जर्मनीत टर्की मंडळी मोठ्या प्रमाणात पोचली आहेत. लंडनच्या जवळपास प्रत्येक दुकानात रशियन वंशाची नोकर मंडळी आहेत. घराघरांत कामाला येणाऱ्या बायकाही स्थलांतरित. यजमानबाईची आणि कामवालीची भाषा वेगळी; पण ती आता अपरिहार्यता ठरली आहे. शिवाय या वंशभेदामुळे व्यवहार अडत नाहीत; अडून भागायचेही नाही. आयटीसारखे क्षेत्र असो, धनिक-वणिकांची दुकाने असोत किंवा घरकामगार; स्थलांतरित सर्वत्र आहेतच. अमेरिकेत कित्येक शतकांपासून हे असेच चालत आले आहे. स्थलांतरित अर्थव्यवहाराचा डोलारा सांभाळतात, किंबहुना कार्यक्षम लोकसंख्या याच गटाची असते. क्यूबा, मेक्सिकोतील हजारो लोक अमेरिकेत जातात. झिम्बाब्वे, झांबियातील मंडळी दक्षिण आफ्रिकेत पोचली आहेत. शिवाय हे काही आजचे चित्र नाही. जगाच्या इतिहासाची पाने चाळून पाहिली तर स्थलांतर हा मानवी स्वभाव असल्याचे दिसेल. आर्यदेखील तसे बाहेरचेच. आर्टिक होम इन वेदाजमध्ये लोकमान्य टिळकांनी याबाबत स्पष्ट लिहिले आहे. भारतीयही व्यापारउदिमासाठी फिरत राहिले. कधी कामगार म्हणून त्यांना गुलामासारखे हलवले गेले, तर पूर्व आफ्रिकेत व्यवसायासाठी भारतीय पोचले. दक्षिण आफ्रिकेच्या एका दौऱ्यात तर काळे आणि गोरे यांच्यात तेथील भारतीयांनी मध्यस्थाची भूमिका केल्याने काही वेळा वर्णद्वेष बोथट होऊ शकला. गोऱ्या आणि काळ्या कातडीचा मिलाफ असलेली भारतीय मंडळी मध्यस्थ म्हणून योग्य होती, असे तेथील लोक सांगतात. इंडोनेशिया ही डचांची वसाहत होती. रशियन भाषेत साखर हा शब्द गोडासाठी वापरला जातो. ग्रीसमध्ये मराठी नावाचे बेट आहे असे सांगतात. इस्तंबूल ते उत्तर भारतापर्यंत कुठेही जेवणात नानसारखा एकच पदार्थ कुलचा किंवा पराठा अशा तत्सम नावाने ओळखला जातो, तो स्थलांतरितांनी त्यांच्या प्रवासात अशाच प्रकारचा पदार्थ कुठून कुठेतरी नेल्यामुळेच. संपूर्ण जगाने स्थलांतराचा अनुभव घेतला आहे, याचीच ही उदाहरणे. जाणारा प्रवासात संस्कृती वाहून नेतो अन् मग त्यातून जग नावाची एक एकजिनसी कल्पना अस्तित्वात येते. अंटार्क्टिका ओलांडून लोक आले आणि गेलेही. ऑस्ट्रेलिया हा इंग्लंडमधून तडीपार केलेल्यांचा देश म्हणून ओळखला जायचा. आजही कधीतरी गमतीने तसे उल्लेख केले जातात. जागतिकीकरणाने स्थलांतराची प्रक्रिया गतिमान केली हेही खरे; पण अगदी पूर्वापारपासून स्थलांतर चालतेच. न्यूयॉर्क असो, कॅलिफोर्निया असो किंवा अगदी आपले कोलकता- या प्रत्येक ठिकाणी चायनाटाऊन या नावाने ओळखली जाणारी वसाहत आहे. भारतीय संस्कृतीने समुद्रप्रवास निषिद्ध मानला होता. म्हणून कदाचित भारतीय उशिरा बाहेर पडले असतील; पण मॉरिशस, ओमान, युगांडा अशा कित्येक देशांत आपली मंडळी गेलीच. कित्येक वर्षे स्थलांतरे सुरू असताना आता त्याबद्दल जे विरोधी स्वर उमटतात, त्याचे खरे तर दोन स्तर असतात. एक तर प्रत्येक ठिकाणच्या भूमिपुत्रांना येणाऱ्यांमुळे नोकरी गमवावी लागते, संधींवर ताण पडतो, आणि दुसरे म्हणजे, आलेले लोक तेथील मातीशी फटकून वागण्यात धन्यता मानतात. दोन्हीही प्रश्न अर्थातच महत्त्वाचे असतात. बोचकी बांधून आणि वळकटी घेऊन मंडळी येतात, ती त्यांच्या प्रदेशात समस्या असतात म्हणून. अर्थात स्थलांतर जितके सनातन तितकाच स्थलांतरितांना होणारा विरोधही. आज अत्यंत संपन्न मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतही स्थानमाहात्म्य वाढते आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ऑफ शोअरिंगवर भर आल्याने काही सिनेटर्स विरोधातल्या सुधारणा मांडण्याचा आग्रह धरतातच. पण आता आमच्याकडून कर्ज घ्या, कारण आम्ही त्यासंबंधीची प्रक्रिया परदेशात न करता अमेरिकेतच करतो, अशा जाहिराती बॅंकाही देऊ लागल्या आहेत. तेलाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आखातात अनेक देशांतले लोक पोचले. आता या लोकांनाही विरोध होऊ लागला आहे. ओमान आणि कुवेत हे दोन्ही देश तसे संपन्न; पण आता तेथेही भूमिपुत्र बाहेरच्यांना नोकऱ्या देऊ नका, अशी आंदोलने करीत आहेत. सौदी अरेबियातील स्थानिकांची चळवळ सौदीआयझेशन या नावाने ओळखली जाते आहे. दक्षिण आफ्रिकेत काळ्यांना रोजगारात अमुक प्रमाणात संधी द्या, अशा मागण्या सुरू झाल्या आहेत. बाहेरच्यांच्या येण्यामुळे पायाभूत सुविधांवर ताण येतो. त्यामुळे भडकलेली माथी आंदोलने करतात. या विरोधामागची कारणेही बहुतांश ठिकाणी बाहेरून आलेले समजून घेतात. तेथील मंडळींमधला एक होऊन जाणे, हा आंदोलने बोथट करण्याचा भाग असतो. जिथे पैसा कमवायला जातो आहोत, तेथे गोंधळ घालायचा नाही. स्पॉयलर कम्युनिटी व्हायचे नाही, हा सर्वांत महत्त्वाचा मूलमंत्र. अमेरिकेतले भारतीयही उगाच मुळाचा बाऊ न करता "बाय द वे वुई आर इंडियन,' असे म्हणतात, तेव्हाच ते तिकडचे झालेले असतात हे समजते. जेथे गेला आहात तेथील संस्कृतीचे तुम्ही वाहक झाला आहात काय, हा यातला कळीचा मुद्दा. आज जागतिकीकरणाने संधींचे नवे दरवाजे खुले केले आहेत. मूळ भूमीत संधी नव्हती, म्हणून केरळी परदेशात गेले. आता त्यांनी आखातातून पाठवलेल्या पैशांमुळे केरळचे चित्र बदलते आहे. उद्या कदाचित तेथील स्थलांतर संपेलही. अमेरिकेतले सियाटेल हा काही दुधामधाचा संपन्न परगणा नाही; पण तेथे बोइंग, मायक्रोसॉफ्टसारखे उद्योग पोचले आणि परिसराचा कायापालट झाला. आज जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात तंत्रज्ञानाने उभारलेल्या पुलावरून टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर होते आहे. एखाद्या प्रदेशाचा विकास योग्य प्रकारे झाला, तर तेथील लोक बाहेर पडणार नाहीत. रोजगाराच्या संधी गावागावात उपलब्ध होतील. अमेरिकेतील मिडवेस्ट किंवा साऊथवेस्टची मंडळी न्यूयॉर्कला क्वचित कधीतरी पर्यटनासाठी जातात. त्यांना एखाद्या प्रदेशातून दुसऱ्या महानगरात जावे लागत नाही. समतोल विकास हेच प्रत्येक समस्येवरचे उत्तर आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असेल तर त्या तिळाचा, म्हणजेच संधींचा आकार मोठा करायला हवा. कोणत्याही लोकशाहीत अमुक प्रदेशासाठी प्रवेश परवाना सक्तीचा होऊ शकत नाही. अशी बंधने केवळ चीन -रशियासारख्या साम्यवादी देशात लागू होतात. स्थलांतरे शक ्य तितकी कमी करण्यासाठी सर्वांगीण विकास हा एकमेव मार्ग आहे. तो चोखाळताना जे कामाच्या शोधात नवे प्रांत आक्रमतात त्यांनी त्या ठिकाणचेच होऊन राहणे, हा तात्कालिक उपाय आहे. तो कटाक्षाने अंगीकारला गेला तर राडे थांबतील. स्ट्रायकर स्थलांतर थांबवायचे असेल तर... १. प्रदेशाचा विकास योग्य प्रकारे हवा. २. असमतोल कमी करत आणायला हवा. ३. रोजगाराच्या संधी निर्माण करायला हव्यात. ४. तंत्रज्ञानाचा योग्य तो उपयोग हवा.
|
Mandard
| |
| Monday, February 11, 2008 - 6:19 am: |
| 
|
Mumbai set for biggest land deal by MMRDC is set to auction land worth 1900 Crores in Bandra Kurla complex राज ठाकरे ही जागा विकत घ्या आनि मराठी माणसांना develop करायला द्या. पण एक अट ठेवा सर्व कामगार मराठी पाहिजेत. बघाच किती मराठी माणसे तयार होतात ते. तसेच हिरानंदानी, रिलायन्स इ. कम्पन्या द्या हाकलुन त्या अमराठी माणसांच्या आहेत आणि मुख्यत्वे अमराठी लोकं कामावर ठेवतात. गरिब taxi वाल्यांना मारुन काय उपयोग.
|
Satishbv
| |
| Monday, February 11, 2008 - 6:32 am: |
| 
|
रवीवारच्या सामन्यातील रोखठोक वाचा 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|